पुस्तकांची नावे सुचवा.

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in काथ्याकूट
26 Jun 2015 - 12:30 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी ,

मला अनुवादित पुस्तके वाचायला आवडतात. कारण विंग्रजी मधुन आस्वाद घ्यायचा असेल तर मग बाजुला शब्दकोष घेवुनच बसावं लागते तरच ती अलंकारीक भाषा समजते. असो.

आपला जीव वाचवण्यासाठी तुरुंगातुन किंवा छळछावण्यांमधुन सहिसलमात पलायनाची वर्णने असलेली पुस्तके मी वाचलेली आहेत. आणि मला तीच जास्त आवडतात.

मला कोणी इथे अशा प्रकारच्या पुस्तकांची नावे सुचवाल काय?

आता पर्यंत मी वाचलेल्या पुस्तकांची यादी.

मुळ पुस्तकाचे नांव

मुळ लेखक
पुस्तकाचे अनुवादित नांव
अनुवादाकाचे नांव

पॅपिलॉन
हेन्री शॅरियर
पॅपिलॉन
रविंद्र गुर्जर

बँको (पॅपिलॉनचा उत्तरार्ध)
हेन्री शॅरियर
बँको
रविंद्र गुर्जर

लाँग वॉक
स्लावोमिर राविझ
मला निसटलंच पाहिजे
श्रीकांत लागु

आय डेझर्टेड रोमेल
गंथर बान्हमन
डेझर्टर
विजय देवधर

ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स
केन फोलेट
ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स
ज्योत्स्ना लेले

रॉबिनसन क्रुसो
रॉबिनसन क्रुसो
< font size= "1"> शाळेत असताना मराठीत वाचले होते.
पण आता अनुवाद कुठेच उपलब्ध नाहीये.

-

इतर काही अपलायनवादी पण गुप्तहेरगिरी / पाठलाग असा मसाला असलेली अनुवादित पुस्तके त्यात जॉन ग्रिशम यांच्या पुस्तकांना प्राधान्य. बाकी जेफ्री आर्चर, अ‍ॅगथा ख्रिस्ती, सिडने शेल्डन वगैरे.

द क्लायंट
ग्रिशम जॉन
द क्लायंट
माधव कर्वे

द पेलिकन ब्रिफ
ग्रिशम जॉन
द पेलिकन ब्रिफ
रविंद्र गुर्जर

द रेनमेकर
ग्रिशम जॉन
द रेनमेकर
अनिल काळे

फर्स्ट टु डाय
जेम्स पॅटरसन
फर्स्ट टु डाय
रवींद्र गुर्जर

तर आपणही आपल्याला आवडलेली अशा प्रकारची साहसी , पलायन , गुप्तहेरीच्या रोमहर्षक कहाण्यांनी भरलेली पुस्तके वाचलेली असतील तर कृपया त्याची यादी द्यावी.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

26 Jun 2015 - 12:35 pm | महासंग्राम

जेम्स बॉंड च्या कथांच अनुवादित पुस्तक आहे. ते नक्की वाचा

एक एकटा एकटाच's picture

26 Jun 2015 - 12:43 pm | एक एकटा एकटाच

सिडनी शिल्डेन ची पुस्तक वाचन म्हणजे जबरदस्त थ्रिल असते.

Tell me your dreams
Naked face

बरीच लिस्ट आहे
आणि ही सगळी पुस्तक अत्यंत सुंदररित्या अनुवादित केली आहेत.

मुक्त विहारि's picture

26 Jun 2015 - 12:46 pm | मुक्त विहारि

तुम्ही पण आमच्या सारखेच येडे दिसतांय.....

सध्या लगेच ओठावर आलेले नांव म्हणजे...

वन शॉट, लेखक "ली चाइल्ड"

ह्या कथेवरून एक सिनेमा पण निघाला होता.

सिनेमाचे नांव "जॅक रीचर" (सिनेमाची लिंक देत आहे "https://www.youtube.com/watch?v=MnWUQEF4NsI")

बाद्वे,

पुस्तकावरून बेतलेल्या सिनेमाची वाट लावण्यात आपले हॉलीवूड पण, बॉलीवूड इतकेच तत्पर आहेत.तस्मात सिनेमा बघीतला नाहीत तरी चालेल.किंबहूना अजिबात बघू नका.

जसे जमेल तसे, तुम्हाला पुस्तके सुचवत जाईनच

खूप छान धागा. वा.कू. साठवलेली आहे.

खूप छान धागा. वा.कू. साठवलेली आहे.

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2015 - 1:10 pm | टवाळ कार्टा

जुरासिक पार्क १ आणि २
प्रे

कळवा मार्केटमधल्या लॅबररी मध्ये आहेत दोन्ही
भन्नाट आहेत...अंगावर काटा येतो वाचताना

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2015 - 1:11 pm | टवाळ कार्टा

विंसी-दा-कोड आणि एंजल्स अँड डिमन्स पण मस्त आहेत

काळा पहाड's picture

28 Jun 2015 - 9:09 am | काळा पहाड

प्रे हा एक थरारक अनुभव आहे पण वाचायचं तर इंग्रजी मध्येच वाचायला हवं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jul 2015 - 7:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प.द.फ. असेल तर मेलणे!!

टवाळ कार्टा's picture

3 Jul 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा

माझ्याकडे नै...गुगल* बाबाला विचार

*यावर एक कोटी करायचा मोह झालेला...तुला समज्लच असेल ;)

काळा पहाड's picture

3 Jul 2015 - 12:03 pm | काळा पहाड

.मोबी फाईल चालत असतील तर मला व्यनी करा

कंजूस's picture

26 Jun 2015 - 1:49 pm | कंजूस

हे एक चांगलं काम केलंत.
>>पुस्तकावरून बेतलेल्या सिनेमाची वाट लावण्यात आपले हॉलीवूड पण, बॉलीवूड इतकेच तत्पर आहेत.तस्मात सिनेमा बघीतला नाहीत तरी चालेल.किंबहूना अजिबात बघू नका.>> १००

उगा काहितरीच's picture

26 Jun 2015 - 1:59 pm | उगा काहितरीच

रॉबीन कुक- मेडीकर क्षेत्रावर आधारीत कादंबऱ्या .
जेफ्री आर्चर- पैशाच्या संदर्भातील कादंबऱ्या (नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनि लेस)
मायकेल क्रायटन - प्रसिद्ध ज्युरासीक पार्क चे लेखक , द टाईम मशीन वगैरे पण मस्त .
इयान फ्लेमिंग- जेम्स बॉंडचे लेखक
ॲलीस्टर म्याकलीन - द गोल्डन गेट , फिआर इज द की अप्रतिम .
डँन ब्राऊन - द दा विंची कोड चे लेखक

(वरीलपैकी कुठल्याही लेखकाचे कुठलेही पुस्तक हातातून खाली ठेवणार नाहीत वाचून होई पर्यंत याची ग्यारंटी माझी, जवळपास सर्व अनुवाद मेहता प्रकाशन यांनी छापलेले आहेत)

नीलकांत's picture

26 Jun 2015 - 2:00 pm | नीलकांत

नक्की वाचावं असं पुस्तक आहे. अमेरीकन मुलीनं एका इराणी मानसाशी लग्न केल्यावर तीला इराणमध्ये आलेल्या अनुभवाबाबत पुस्तक आहे. तिला तीच्या मुलीला घेऊन त्या देशातून बाहेर पडायचे असते. तिचा संघर्ष खुप छान आहे.

प्रमोद देर्देकर's picture

26 Jun 2015 - 2:47 pm | प्रमोद देर्देकर

सगळ्यांना धन्यवाद

पण मी जसे वर्गिकरण केले तसे, स्वल्प विराम टाकुन पुस्तकाची पुर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करा.

मी यादीत टाकयला विसरलेलो ती पुस्तके १) डायरी ऑफ अ‍ॅना फ्रँक, २) आय मस्ट गो पण लेखक आणि अनुवादक स्मरणात नाहीत.

@ मुवी :- अहो स्वभाव एक म्हणुन तर मिपावर सगळे एकत्र आलो आपण.

@ उगा का.:-रॉबीन कुक- सोडला तर बाकी सगळी वाचलेली आहेत. पुन्हा पुन्हा वाचावीशी अशीच ती पुस्तके

आहेत.

@ नीलकंत साहेब नॉट विदाऊट माय डॉटरचा दुसरा भाग जो तिच्या नवर्‍या विषयी लिहलंय तो वाचलात का त्या मध्ये म्हणे तो बाप एवढा क्रुर नव्हता. माझं अजुन ते पुस्तक वाचायचे राहिले आहे.

सानिकास्वप्निल's picture

27 Jun 2015 - 1:11 am | सानिकास्वप्निल

डेबोराह एलिसची तीन पुस्तके - दी ब्रेडविनर, परवाना, शौझिया.
अनुवाद - अपर्णा वेलणकर

सुस्मिता बॅनर्जी - काबुलीवाल्याची बंगाली बायको
अनुवाद - मृणालिनी गडकरी

बोका-ए-आझम's picture

28 Jun 2015 - 4:06 am | बोका-ए-आझम

आगाथा ख्रिस्तीच्या हर्क्युल पाॅयराॅट मालिकेचं मधुकर तोरडमलांनी केलेलं भाषांतर छानच आहे.द मर्डर आॅफ राॅजर अॅक्राॅइड, डेथ आॅन द नाईल, अपाॅइंटमेंट विथ डेथ, हर्क्युल पाॅयराॅट्स ख्रिसमस - ही त्यातली काही उल्लेखनीय.

'आय आॉफ द निडल'नक्की वाचा..
आणि' एस्केप फ्रॉम सॉबिबोर हा चित्रपट पहा..

माधुरी विनायक's picture

2 Jul 2015 - 12:47 pm | माधुरी विनायक

चौघीजणी/ द लिटल वुमेन - शांता शेळके
पाडस/ द इयर्लींग्ज -मार्जोरी रॉलींग्ज - राम पटवर्धन
लॉर्ड ऑफ द फ्लाईज - विल्यम गोल्डींग - जी. ए. कुलकर्णी
मध्यस्थ - फ्रेडरीक फोरसीथ - लीना सोहनी

सौंदाळा's picture

2 Jul 2015 - 1:59 pm | सौंदाळा

नुकतेच वाचलेले जबरदस्त रोमांचक पुस्तक
वन शॉट - अनुवादः बाळ भागवत

'सत्तर दिवस' कसे कोणी लिहिले नाही अजुन

काही अनुवाद
सेकंड लेडी, सेवेन्थ सिक्रेट, काँगो, साउथ बाय जावा हेड (अ‍ॅलिस्टर मॅकलीन : याची सर्व पुस्तके समुद्र, नौका वगैरेशी संबंधीत थ्रीलर्स असतात), स्ट्राँग मेडीसीन, हॉटेल, सिमिऑन चेंबर, शांताराम (प्रदिर्घ : बर्‍याच ठिकाणी कंटाळवाणे पण एकदा वाचायला ठीक)
रॉबिन कुक : कोमा, क्रोमोझोम-६, क्रायसिस, कन्टेजन, टोक्सिन, सीझर, स्फिंक्स (मेडीकल थ्रीलर नाही पण अप्रतिम)
सिडने शेल्डनः स्टार्स शाईन डाउन, अदर साइड ऑफ मिडनाइट, विंडमिल्स ऑफ द गॉड, डुम्स डे कॉनस्पिरसी, ब्लडलाइन, टेल मी युवर ड्रीम्स, मेमरीज ऑफ मिडनाईट, बेस्ट लेड प्लॅन्स, नेकेड फेस
शेरलॉक होम्सः संपुर्ण शेरलॉक होम्स, हाउंड ऑफ बास्करव्हिल, व्हॅली ऑफ फिअर, स्ट्डी इन स्कोर्लेट

अजुन बरीच आहेत नावे विसरली.
इंका संस्कृतीवर आधारीत एक होते, पिरॅमिड हे यंत्र असुन त्याच्या सगळ्यात वर असणारा दगड (बेनबेन स्टोन) एका विशिष्ट वेळी बसवला तर ते चालु होणार असे काहीतरी

papilon's picture

2 Jul 2015 - 3:52 pm | papilon

द ब्लाइंड असेसीन : मार्गारेट अटवूड
द रुट्स : अलेक्स हेली

संदीप डांगे's picture

2 Jul 2015 - 8:10 pm | संदीप डांगे

जॉन ग्रिशॅमचं एक अनुवादित पुस्तक आताच परवा वाचलं, तुमच्या लिस्टमधे नाही.

द स्ट्रीट लॉयर

साध्या रोजच्या घटना, आपल्याही आयुष्यात घडतात. पण त्याचा भव्य अर्थ आणि जबरदस्त मांडणी. थ्रीलर आहे पण अगदी सामान्य वाटणार्‍या घटनांमधेही किती थ्रील असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कादंबरी.

सुरुवात रटाळ वाटू शकते पण नेटाने वाचल्यासच क्लायमॅक्सची मजा घेता येते.