Skip to main content

ज्योतिष .......

लेखक झंडुबाम यांनी रविवार, 16/08/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष शास्त्र . यामध्ये विज्ञानाचा भाग किती हा खरच एक कुतूहलाचा विषय आहे . कुठलाही माणूस असू देत आस्तिक किंवा नास्तिक पण आपलं भविष्य कसं असलं पाहिजे या बद्दल एक विलक्षण कुतूहल ,जिज्ञासा . त्यानंतर भविष्य समजलं कि मग ते खरं मानायचं कि खोटं ते मात्र आपण ठरवायचं ,म्हणजे कोणी चांगलं सांगितलं तर ते छाती ठोकपणे सगळ्यांना सांगणार , आणि तेच जर काही वाईट समजलं तर मात्र हे सगळं थोतांड ठरवून मोकळं व्हायचं . मुळात जन्मवेळ देण्यात येते ती किती योग्य असते ? नर्स चे घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ? लिहिताना चूक झाली तर? एक न अनेक बर्याच शक्यता . चूक होण्याची पूर्ण शक्यता . म्हणजे कसं कि आयुष्य म्हणजे पत्त्याचा डाव , कोण कधी कुठला पत्ता टाकणार त्यावर कोण डाव जिंकणार हे ठरतं . पण म्हणूनच कोणाकडे काय पत्ते आहेत हे समजून घ्यायची इच्छा का बाळगायची ,आणि आणि जरी पत्ते समजले तर खेळायला मजा तरी येईल का ? आणि उद्या काय होणार हे आधीच समजणार असेल तर त्यामुळे जगण्याची मजाच निघून जाईल . पैसे देऊन फिक्स केलेल्या खेळासारखं . वाटतं जर स्वतः सचिन किंवा कलाम साहेब कुंडली पाहून असते तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठता आले असते का ? आणि यातली सगळ्यात मोठी न पटणारी गोष्ट म्हणजे जर एखाद्या वेळेस ज्योतिष जेव्हा सांगतो कि काही दोष आहे तर त्याला ऊपाय देखील असतो , पैसे देऊन जर सगळे दोष जर निघून जात असतील तर मग मूळात हे दोष निर्माण तरी कसे होतात ? असे काही प्रश्न आहेत कि ज्याची उत्तरं नाहीत . याचा अर्थ असा मुळीच नाही कि ज्योतिष शास्त्र म्हणजे थोतांड आहे . पण आजकालच्या ज्योतिषांनी त्याला थोतांड बनवलं आहे . प्रलोभनं दाखवली जातात आणि लोक फसतात , आजही मी पत्रिका जुळवून मोडलेली लग्न पहिली आहेत . आणि ज्यांच्या कुंडलीत नाडी दोष नव्हता त्यांच्या मुलांचा अपघाती मृत्यू सुद्धा . खरं काय आणि खोटं काय त्यालाच माहित .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6574
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

>>> वाटतं जर स्वतः सचिन किंवा कलाम साहेब कुंडली पाहून असते तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठता आले असते का ? का नसतं गाठता आलं?

@झंडुबाम: ज्योतिष खरं आहे की खोटं हे समजायला तुम्ही स्वतः अभ्यास करणे आवश्यक आहे. मी स्वतः पाराशरी पद्धतीने कुंडलीचा अभ्यास करतो. मला अनेकवेळा प्रचिती आलेली आहे. त्यामुळे कुणी हे सर्व थोतांड म्हणत असेल तर त्याकडे दुर्लक्षच करतो. तुम्ही स्वतः अभ्यास करा. जे काही सत्य असेल ते आपोआप समजेल.

धाग्यात फारसा काही जीव नाही.नेहमीचे खेळाडु गैरहजर.धागा शतकी होईल का नाही याबाबत साशंक आहे! (मिपा होराभुषण)-जेपी

मिपावर चर्चा "झालेल्या" धाग्यांचि एक लिंकावळ मुख्य पानावर डाविकडे लिम्बू मिर्ची सारखी टांगुन ठेवायला हवी , असे वाटु लागले आहे!

जडभरत >>> +१११११११११११ लोकांना एक तर स्वतःला कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायला नको असतो . नुसती नावं ठेवायला हवी असतात . ज्योतिष थोतांड नाही . ज्योतिषी म्हणवून घेणारे काही महाभाग थोतांडी आहेत

In reply to by तुडतुडी

अभ्यास करूनच विषयाची निरर्थकता पटवून दिली पाहिजे,असा ज्यांचा आग्रह असेल..त्यांनी इकडे या.......... आणि हरवा त्यांना.. आजची सही :- टन्नाटन्नः

वाटतं जर स्वतः सचिन किंवा कलाम साहेब कुंडली पाहून असते तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठता आले असते का ? >>> ह्या लोकांनी कधी कुंडली बघितली नाही ह्याची तुम्हाला खात्री आहे का ? इस्लाम मध्ये कुंडली बघतात कि नाही माहित नाही पण सत्यसाई बाबा नावाच्या भोन्दुच्या नादी लागणाऱ्या सचिन चं काय ? कुंडली बघितली नाही म्हणून शिखर गाठता येत नै काय ? मग १० वि नापास पण होता नसेल

In reply to by तुडतुडी

सहमत. सचिन आणि कलाम साहेबांविषयी यांचे मत खालील गृहितकांवर आधारीत असावे. (१) सचिन आणि कलाम साहेबांनी आपल्या आयुष्यात कधीही कुंडली ज्योतिषाला दाखविलेली नाही. (२) समजा सचिन आणि कलाम साहेबांनी आपल्या आयुष्यात आपली कुंडली एखाद्या ज्योतिषाला दाखविली असेल तर त्या ज्योतिषाने अज्ञानामुळे (किंवा ज्योतिषशास्त्र हे भोंदूंची फसवणूक असल्याने) यांच्या करीअरविषयी चुकीचे सांगितले असणार. (३) ज्योतिषाने चुकीचे भाकीत करूनसुद्धा यांनी त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्नांती शिखर गाठले. थोडक्यात या दोघांनी आपली कुंडली ज्योतिषाला दाखविलेलीच नाही व त्यामुळेच त्यांनी शिखर गाठले आणि समजा कुंडली दाखविली असल्यास ज्योतिषाने चुकीचे भाकीत केले होते, या तर्कांवर यांचे वाक्य आधारलेले आहे. बादवे, २००५ नंतर ग्रेग चॅपेलमुळे सौरभ गांगुलीचे कर्णधारपद जाऊन त्याचे संघातील स्थान डळमळीत झाल्याने त्याच्या पत्नीने मुंबईला येऊन प्रख्यात ज्योतिषी बेजान दारूवाला यांना त्याची कुंडली दाखविली होती असे वाचल्याचे आठवते.

In reply to by श्रीगुरुजी

कोणी ज्योतिष्य कडे जावून पत्रिका दाखवून सल्ला घेतला तर काही लगेच बातमी होते का? नाही ना.. प्रत्यक्ष सचिन जरी नाही गेला आणि त्याच्या परिवारापैकी कोणी सल्ला घेण्यासाठी गेला तर तुमचे गृहीतक चुकते.. आपणही रोजच्या जगण्यात लोकांचे सल्ले घेतो, कधी ते मानतो तर कधी नाही. आपल्या बुद्धीनुसार आपण आपले काम करत राहतो. करियर साठी बॉसचा सल्ला घेतला तर ठीक आणि ज्योतिषाचा सल्ला घेतला तर वाईट असा भेदाभेद करणे खरच योग्य आहे का? स्वताला जे पटेल ते करावे..दुसर्याने काय करावे हे आपण विचारल्याशिवाय सांगू नये ही सामान्य जनरीत आहे.

या सदाहरीत पण चावून चोथा झालेल्या विषयावरची चर्चा वाचून डोके दुखु लागल्यास, हा घ्या...

ज्योतिष या विषयाविषयी मला फार ममत्व वाटत नाही. तरीही एक गोष्ट सांगतो-- २००५ मध्ये अमेरिकेत कॅट्रिना आणि रिटा या वादळांनी धुमाकूळ घातल्यानंतर २००६ मध्ये कॅटेगिरी ३ पेक्षा जास्त असलेली ४ ते ६ वादळे येतील असा अंदाज अमेरिकन सरकारच्या National Oceanic and Atmospheric Administration ने व्यक्त केला होता. मी त्यावेळी फ्लॉरिडामध्ये टॅलाहासीला होतो. २००५ मध्ये कॅट्रिना पहिल्यांदा मायामीला आले आणि प्रोजेक्टेड पाथ आमच्या शहरातून जाणार होता.पण नंतर ते न्यू ऑरलीन्सला गेले. त्यामुळे २००६ मध्ये या वादळांच्या अंदाजांमुळे नाही म्हटले तरी थोडी घबराट उडाली होती. पण २००६ मध्ये प्रत्यक्षात किती वादळे आली?बर्‍यापैकी पाऊस पडला असे फक्त एकदा झाले.आणि तो पण पाऊस घाबरायला होईल इतका नक्कीच नव्हता. सर्व प्रकारचे उपग्रह आणि उपकरणे दिमतीला असूनही हा अंदाज का चुकला?कारण शेवटी अंदाज व्यक्त करायचे ते एक मॉडेल आहे आणि कुठलेच मॉडेल हे परिपूर्ण नसते.तेव्हा असे अंदाज चुकणे क्रमप्राप्त आहे. फक्त असाच बचाव चुकलेल्या भाकितांविषयी ज्योतिषांनी केला तर ती भोंदूगिरी ठरते आणि वैज्ञानिक अंदाज तसे चुकले तर तो ठरतो "शास्त्रीय दृष्टीकोन"!! चला पळतो आता.

In reply to by गॅरी ट्रुमन

ज्योतिष्याला हे आजकाल दांभिक रूप आले असावे याला कारण हे शास्त्रच मुळात दांभिक आहे की ह्या विषयाचा नीट अभ्यास, संशोधन झाले नाहीये असा विचार माझ्या मनात आला. जर ज्योतिषशास्त्रात काहीतरी तथ्य आहे ह्या assumption वर खरोखर काही गंभीरतेने विचार, अभ्यास, संशोधन सुरू झाले तर नक्की काय, कोणाचे आणि कितपत नुकसान होणार आहे? जास्तीत जास्तं काय होईल काही प्रमाणावर वेळ, पैसा आणि मेहेनत याचा अपव्यय होईल आणि हे खरोखर हे शास्त्र नसून थोतांड आहे हे सिद्ध होईल. निदान एखाद्या गोष्टीला खोटं ठरवतांना त्यावर पुरेसा अभ्यास झाला आहे, फेयर चान्स दिला गेला आहे हे तर समाधान मिळेल. पण जर जर हे संशोधन यशस्वी झालं तर सार्या जगाला याचा फायदाच होईल, निदान नुकसान तर नाही होणार. जगातील कुठलेही शास्त्र मग ते वैद्यकीय असो रसायन शास्त्र असो. काहीही एकदोन दिवसात निर्माण झालेलं नाहीये. प्रत्येक शास्त्रामागे वर्षानुवर्षे चाललेले परिश्रम, अभ्यास असतो. नवनवीन थेयरीज येतात, जुन्या मागे पडतात. ज्या कॉन्सेप्ट्स कसोटीवर उतरत नाहीत त्या मागे पडतात. पण त्यांच्यावरही आधी अभ्यास झालेला असतोच. मग ज्योतिष्यालाच काही अभ्यास, वेळ चान्स न देता थोतांड का ठरवा. यात काही अर्थच नाही असा आधीच नेगेटीव विचार का करा.

गॅरी ट्रूमन यांच्या प्रतिसादाशी सहमत. एखादा विषय जेव्हा शास्त्र म्हणून मांडला जातो, तेव्हा त्यात भविष्यकाळाबद्दल भाकितं करण्याची क्षमता असावी (Predictive Ability ) असा एक निकष आहे. अनेक विचारवंत राज्यशास्त्र (Political Science ) आणि समाजशास्त्र (Sociology ) यांना त्यामुळे रुढार्थाने शास्त्रच मानत नाहीत. ज्योतिषशास्त्र या बाबतीत बदनाम होण्याचं एक कारण हे असावं की कुठलंही शास्त्र जर वस्तुस्थिती ही सिद्धांतापेक्षा वेगळी असेल तर वस्तुस्थितीचं प्राधान्य मानतं (If Facts are different from theory, then facts are prevalent over theory) पण ज्योतिषी मात्र स्वतःच्या सिद्धांतांच्या समर्थनासाठी वस्तुस्थितीकडे कानाडोळा करतात किंवा ती आपल्या सोयीनुसार फिरवतात (distortion ).

तुम्ही शतकी धाग्याची नाडी बरोबर ओळखलीत अन पट्टीचा लेख लिहिलात! आता या धाग्याचे "भविष्य" उज्वल आहे असा माझा होरा आहे.