ज्योतिष शास्त्र . यामध्ये विज्ञानाचा भाग किती हा खरच एक कुतूहलाचा विषय आहे . कुठलाही माणूस असू देत आस्तिक किंवा नास्तिक पण आपलं भविष्य कसं असलं पाहिजे या बद्दल एक विलक्षण कुतूहल ,जिज्ञासा . त्यानंतर भविष्य समजलं कि मग ते खरं मानायचं कि खोटं ते मात्र आपण ठरवायचं ,म्हणजे कोणी चांगलं सांगितलं तर ते छाती ठोकपणे सगळ्यांना सांगणार , आणि तेच जर काही वाईट समजलं तर मात्र हे सगळं थोतांड ठरवून मोकळं व्हायचं . मुळात जन्मवेळ देण्यात येते ती किती योग्य असते ? नर्स चे घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ? लिहिताना चूक झाली तर? एक न अनेक बर्याच शक्यता . चूक होण्याची पूर्ण शक्यता .
म्हणजे कसं कि आयुष्य म्हणजे पत्त्याचा डाव , कोण कधी कुठला पत्ता टाकणार त्यावर कोण डाव जिंकणार हे ठरतं . पण म्हणूनच कोणाकडे काय पत्ते आहेत हे समजून घ्यायची इच्छा का बाळगायची ,आणि आणि जरी पत्ते समजले तर खेळायला मजा तरी येईल का ? आणि उद्या काय होणार हे आधीच समजणार असेल तर त्यामुळे जगण्याची मजाच निघून जाईल . पैसे देऊन फिक्स केलेल्या खेळासारखं .
वाटतं जर स्वतः सचिन किंवा कलाम साहेब कुंडली पाहून असते तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठता आले असते का ? आणि यातली सगळ्यात मोठी न पटणारी गोष्ट म्हणजे जर एखाद्या वेळेस ज्योतिष जेव्हा सांगतो कि काही दोष आहे तर त्याला ऊपाय देखील असतो , पैसे देऊन जर सगळे दोष जर निघून जात असतील तर मग मूळात हे दोष निर्माण तरी कसे होतात ? असे काही प्रश्न आहेत कि ज्याची उत्तरं नाहीत . याचा अर्थ असा मुळीच नाही कि ज्योतिष शास्त्र म्हणजे थोतांड आहे . पण आजकालच्या ज्योतिषांनी त्याला थोतांड बनवलं आहे .
प्रलोभनं दाखवली जातात आणि लोक फसतात , आजही मी पत्रिका जुळवून मोडलेली लग्न पहिली आहेत . आणि ज्यांच्या कुंडलीत नाडी दोष नव्हता त्यांच्या मुलांचा अपघाती मृत्यू सुद्धा . खरं काय आणि खोटं काय त्यालाच माहित .
वाचने
6574
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळे थोतांड आहे.
चित्रहार सदाबहार
>>> वाटतं जर स्वतः सचिन किंवा
@झंडुबाम:
धाग्यात फारसा काही जीव नाही
तुम्ही पण जुने आहात. टाका की
In reply to धाग्यात फारसा काही जीव नाही by जेपी
ओ मुन्नी रे ओ मुन्नी रे!
मिपावर चर्चा "झालेल्या"
जडभरत >>> +१११११११११११
अभ्यास करूनच विषयाची
In reply to जडभरत >>> +१११११११११११ by तुडतुडी
वाटतं जर स्वतः सचिन किंवा
हायला मिपावर बर्याच दिवसांनी
In reply to वाटतं जर स्वतः सचिन किंवा by तुडतुडी
सहमत.
In reply to वाटतं जर स्वतः सचिन किंवा by तुडतुडी
सहमत
In reply to सहमत. by श्रीगुरुजी
या सदाहरीत पण चावून चोथा
सदाहरीत विषय आहे मग हिरवा
In reply to या सदाहरीत पण चावून चोथा by डॉ सुहास म्हात्रे
एक आठवण
सहमत गॅरी ट्रूमनजी! अगदी
In reply to एक आठवण by गॅरी ट्रुमन
गॅरी ट्रुमन, प्रतिसाद पटला.
In reply to एक आठवण by गॅरी ट्रुमन
फार खोलात जाउ लिखाण केलं आहे.
छान विषय
गॅरी ट्रूमन आणि बोका +१००!
अगदी अगदी... निरुपयोगी
In reply to गॅरी ट्रूमन आणि बोका +१००! by अजया
तुम्ही शतकी धाग्याची नाडी
चावून चोथा झालेला विषय....
मी शिरीयसली या धाग्यावर