Skip to main content

मराठी अंताक्षरी

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 17/09/2007 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
चला मराठी अंताक्षरी खेळूया! आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे हरी पाहिला रे र.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 172377
प्रतिक्रिया 317

प्रतिक्रिया

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी

तेच स्वप्‍न लोचनांत रोज रोज अंकुरे पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे शरद चांदण्यातली भेट आठवे मला गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला रास संपला तरी भास अंतरी उरे -दिलीप बिरुटे

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई - राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया

चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का.. लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी

लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू

रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये वेणु वाजवी वृंदावना वृंदावना गोधने चारिता हे सावळा गे माये पैजारबुवा,

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..

हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे

हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे

रात्र काळी, घागर काळी, यमुना जळें ही काळीं वो माय, बुन्थ काळी, बिलवर काळी, गळा मध्ये मोती काळी वो माय पैजारबुवा,

या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया. ऐकू न येते हळू हळू अशी माझी छबी बोलते.

तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे गोविंदु रे, अजी गोविंदु रे, तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, अनुमाने ना अनुमाने ना, श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, पैजारबुवा,

डोळे कशासाठी? कशासाठी? तुला साठवून मिटून घेण्यासाठी आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस आरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी पैजारबुवा,

ठरला जणु मत्सर राजा, वृद्धतरूण बांधिती पूजा ॥ होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अजि गेला ॥

लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लायेकरनी पोरी लायेकरनी वाकड्या शेंड्याच्या गोयेकरनी वाशी नी कुर्ला वरलीकरनी पोरी वरलीकरनी सफेद परकर्या मुंबईकरनी भिंगरी ताई ती वरची कविता संपुर्ण टाका ना मस्त वाटते आहे या आधी ऐकलेली नाही. पैजारबुवा,

द्रौपदी नाटकातली आहे. एव्हढीच दिसते आहे. (कदाचित संगीत नाट्य असेल,घोळून घोळून म्हणत असतील) संगित नाटकाचे ज्ञान नसलेली 'भिंगरी'

चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान गाऊ मोटं वरचं गानं पैजारबुवा,

रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला... हात नका लाऊ माझ्या साडीला