मी आत्ताच एका श्रीलंकन (?) लेखकाचा "दि काँट्रीब्युशन ऑफ श्री लंकन हिस्टॉरीकल ट्रॅडीशन टू द रिकन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टरी ऑफ अँशिएण्ट इंडीया(पिडीएफ-पेपर)" ऑनलाईन वाचला. त्यातील टिकेची दखल घेण्याच्या निमीत्ताने, माझे हा नवपुराणाचा धागा बखरींची सांगी अन पुराणातली वांगी या पहिल्या पाना-धाग्या-वरून पुढे नेत आहे. मागच्या धागा चर्चेत वचन 'पुराणातील वांगी' नव्हे, तर 'पुराणातील वानगी' असे आहे हे काही जणांनी आवर्जून सांगितले. असा तथ्याचा आग्रह प्रत्यक्षात इतर वेळीही असावयास हवा
(कृ. कुणी व्यक्तीशः घेऊ नये), प्रत्यक्षात मला सातत्याने पडत आलेला प्रश्न हा आहे की, असा तथ्याचा आग्रहाचा अभाव केवळ भारतीयांच्या ऐतिहासिक लेखनात होता का वर्तमान लेखनातही अंशतःतरी तो ट्रेंड आजवरही जपला जातोच आहे? मी माझ्या मनातील साशंकतेकडे या धागा लेखात खाली पुन्हा येणारच आहे.
आधी आनंद ड्ब्ल्यु पी. गुरुगॆ या लेखकाच्या लेखाची दखल घेऊयात. भारतातील प्राचीन संस्कृत आणि प्राकृत साहित्याच्या उपलब्धतेची दखल घेतानाच, आनंद गुरुगॆ इतिहासाचे लेखन करताना प्राचीन भारतीय साहित्य नेमकं कुठे कमी पडतं (आणि श्रीलंकन नोंदी कशा उपयूक्त ठरू शकतील इत्यादी) याचा उहापोह करतात. बेट्टी हायमन यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाची गरज का व्यक्त केली कारण भारतीय इतिहास तीसफूट उंचीच्या आणि तीस हजार वर्षे राज्य करणार्या राजांच्या नावांनी भरलेला आहे. गूढ, कल्पनातीत, दंतकथांची भारतीयांना असलेली ओढ यास कारणीभूत असल्याचं बेट्टी हायमन मानतात याचा संदर्भ घेत, भारतीयांत अशाप्रकारे हिस्टॉरीकल सेन्सचा अभाव असल्यामुळे भारतीय उपखंडात अफाट साहित्यिक संपदेची रचना होऊनही प्राचीन इतिहास लेखनाचा स्रोत म्हणून ते सारे निरुपयोगी ठरते असे आनंद गुरुगॆ म्हणतात.
स्वतःच्या मताच्या पुष्ट्यर्थ आनंद गुरुगॆ यांनी अजून दोन संदर्भ उधृत केले आहेत त्यातील एक (इ.सन?) १०३० मधील अरेबीयन प्रवासी अल्बेरुनीचा आहे. अल्बेरुनी म्हणतो, "दुर्दैवाने हिंदुलोक हिस्टॉरीकल ऑर्डरकडे पुरेसे लक्ष देत नाहीत; त्यांच्या राजांच्या कालानुक्रमाबद्दल ते अत्यंत निष्काळजी आहेत, त्यांना माहितीसाठी अधिक खोदल्यास काय उत्तर द्यावे हे माहित नसल्याने ते कल्पनारम्यतेत हरवतात."
आनंद गुरुगॆ त्यांचा अजून एक महत्वपूर्ण संदर्भ एफ.इ.पॅर्गीटेर यांच्या 'अॅन्सीएंट हिस्टॉरीकल ट्रेडीशन', (बनारसीदास, दिल्ली १९७२, पृष्ठ ६३-७७) मधून देतात. गुरुगॆ म्हणतात पौराणिक साहित्याबद्दल पॅर्गीटेरच्या निष्कर्षानुसार, 'हिस्टॉरीकल सेन्सचा अभाव (या साहित्यातील) गोंधळाचा सुपिक स्रोत आहे'. पॅर्गीटेर या गोंधळाची सहा कारणे सांगतात,
- एकाच नावाच्या वेगवेगळ्या व्यक्तींची सरमिसळ करणे
- राजे, ऋषी आणि इतर व्यक्तींची त्याच नावाच्या दंतकथातील व्यक्तींसोबत सरमिसळ करणे
- वेगवेगळ्या काळात फरक न करणे, आणि विभीन्नकाळात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींची काळाचा क्रम चुकवून सरमिसळ करणे अथवा त्यांना लेखनात सद्यकालीन व्यक्ती म्हणून दाखवणे
- वेगवेगळ्या काळात फरक न करणे, आणि विभीन्नकाळात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींची काळाचा क्रम चुकवून सरमिसळ करणे अथवा त्यांना लेखनात सद्यकालीन व्यक्ती म्हणून दाखवणे
- वास्तव आणि दंतकथातील फरक मिटवणे
- नैतिक अथवा धार्मिक संदेश फॅब्रीकेट करण्या(थोपवण्या)साठी ऐतिहासिक परंपरेतील व्यक्ती अथवा घटनांच्या उल्लेखांचा उपयोग करणे
वाचने
10889
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख प्रस्तावनेसारखा वाटला.
भारतीयांच्या इतिहास
In reply to लेख प्रस्तावनेसारखा वाटला. by एस
तुमच्या संपूर्ण लेखाबद्दल मी
तोपर्यंत तो एक "असू शकणारा
In reply to तुमच्या संपूर्ण लेखाबद्दल मी by काळा पहाड
माहितगार, तुमच्या या मोठ्ठ्या
In reply to तोपर्यंत तो एक "असू शकणारा by माहितगार
कुणा एका मराठी माणसाचे ते
In reply to माहितगार, तुमच्या या मोठ्ठ्या by हाडक्या
हाडक्याजी,
In reply to माहितगार, तुमच्या या मोठ्ठ्या by हाडक्या
का.प. साहेब,
In reply to हाडक्याजी, by काळा पहाड
असं म्हणून आमच्या गावातले
In reply to का.प. साहेब, by हाडक्या
एक अल्प स्पष्टीकरण
In reply to असं म्हणून आमच्या गावातले by काळा पहाड
का.प. तुम्हाला झटकून टाकत नै
In reply to असं म्हणून आमच्या गावातले by काळा पहाड
माहितगार तुम्ही लेख लिहिला
In reply to का.प. तुम्हाला झटकून टाकत नै by हाडक्या
बापरे ...
In reply to का.प. तुम्हाला झटकून टाकत नै by हाडक्या
१)बय्राच लेण्या " पांडवांनी
आणि ते स्थानिक अर्थव्यवस्थेस
In reply to १)बय्राच लेण्या " पांडवांनी by कंजूस
४)महाबळेश्वरच्या शंकराच्या
In reply to १)बय्राच लेण्या " पांडवांनी by कंजूस
+१
In reply to ४)महाबळेश्वरच्या शंकराच्या by प्रचेतस
चिमाजीअप्पांनी वसईच्या
In reply to +१ by हाडक्या
वेगवेगळ्या सभ्यतेत इतिहास जतन
व्यक्तीच्या कार्याला जास्त
In reply to वेगवेगळ्या सभ्यतेत इतिहास जतन by विवेकपटाईत
इतिहासात जे घडून गेले आहे.
In reply to व्यक्तीच्या कार्याला जास्त by माहितगार
इतिहासाच्या चिकित्सेचे अनेक
In reply to इतिहासात जे घडून गेले आहे. by विवेकपटाईत
इतिहासाबद्दल माझं अत्यंत
अंशतः तथ्य असे नाही असे नाही
In reply to इतिहासाबद्दल माझं अत्यंत by कॅप्टन जॅक स्पॅरो
चमत्कृती आणि सत्य.
वानगी की वांगीच ?
In reply to चमत्कृती आणि सत्य. by प्रभाकर पेठकर
२००७ साली भीमपुत्र घटोत्कच
अर्थात हे खोटे होते
In reply to २००७ साली भीमपुत्र घटोत्कच by मदनबाण
बाजूला उभ्या असलेल्या
रोहींग्या निर्वासितांची नसलेली छायाचित्रे
In reply to बाजूला उभ्या असलेल्या by मदनबाण
मयन्मार मधील रोहींग्या
In reply to रोहींग्या निर्वासितांची नसलेली छायाचित्रे by माहितगार