ABCD म्हणजे ABCD ; की ABD, की ABCDG ,की A1BCD, की ABcD, की अबकड ? वाच्यार्थ, शब्द प्रामाण्याची स्विकार्यता, लक्ष्यार्थ कसे आणि केव्हा ठरवावेत ?
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकांच्या जीवनातील एका आख्यायिकेत, त्यांनी त्यांच्या एका शिष्याला त्यांच्या घराच्या कंपाऊंडची भींत बांधण्याची आज्ञा दिली. शिष्याने भिंत बांधली, ती नानकजींना पसंतीस उतरली नाही त्यांनी ती शिष्यास पाडून पुन्हा बांधावयास सांगितली त्याने ती पुन्हा बांधली. तरीही नानकजींचे समाधान होईना त्यांचे भींत पुन्हा पाडून पुन्हा बांधण्याची आज्ञा देणे चालूच होते. नानकजींचे कुटूंबीय- मला वाटते त्यांची मुले त्या शिष्याला पुन्हा पुन्हा आज्ञेच्या पालना बद्दल हसून काम झाले तसे असू द्यावे असे त्यास म्हणाली पण शिष्याने इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ८-९ वेळा भींत पाडून नानकजींचे समाधान होई पर्यंत पुन्हा पुन्हा बांधली. गुरूनानकजींनी आपल्या मुलांना वंशपरंपरेने गुरुपद न देता त्या शिष्यास पुढे शीख पंथाचा दुसरा गुरू म्हणून नियुक्त केले. या आख्यायिकेत या शिष्याची गुरूप्रती असलेली श्रद्धा आणि श्रद्धेमुळे कोणतीही शंका न काढता, फाटे न फोडता, आळस न करता दिलेले काम गुरुचे पुर्ण समाधान होईपर्यंत चोखपणे केलेले दिसून येते. एखाद्या शिक्षकाने अथवा टिमलिडर दिलेला अभ्यास अथवा सराव अथवा उत्पादन आणि ग्राहक सेवेत अशीच सेवा दिली, सैन्य दलांमध्ये याच शिस्तीने काम झाले तर श्रद्धा आणि सबुरीच फळ सर्वांनाच चांगल मिळणार नाही का ?
शिरडीच्या साईबाबांचही मत गुरु हा गुरु असतो त्याच्या बद्दल शंका काढू नयेत असेच आहे. संगीत आणि इतरही क्षेत्रातील अनेक मान्यवर गुरु मंडळी त्यांच्या तर्हेवाईकपणा बद्दल प्रसिद्ध होती आणि त्यांची शिष्य मंडळी आपापल्या गुरुंच्या लहरी तर्हा आनंदाने झेलत आपापल्या क्षेत्रातील शिक्षणात उंचीही गाठत गेलेली उदाहरणे वाचण्यात येतात. या श्रद्धेत व्यक्तीप्रामाण्यही आहे आणि शब्दप्रामाण्यही आहे, काही वेळा गुरुने केलेला अधिकाराता अतीटोकाचा अब्युजीव वापरही क्वचित होताना दिसतो आणि त्यांचे त्यांचे शिष्य आणि भक्त ते स्विकारत असतात.
याच श्रद्धेने वागण्याची दुसरी बाजू बघायची झाल्यास व्यक्ती प्रामाण्य आणि शब्दप्रामाण्य विषयक श्रद्धा कर्मकांडाप्रमाणे डोळेझाकून निभावल्या जाताना दिसून येतात. कर्मकांडाने इतर काहीच नुकसान झाले नाही तरीही वेळ आणि प्राधान्यक्रमांचा अपव्यय होण्याचा धोका शिल्लाक राहतोच. दुसरे म्हणजे संबंधीत प्रेषित, संत, गुरु, नेता काळाच्या पडद्या आड जातो काळ बदललेला असतो पण व्यक्ती प्रामाण्य आणि शब्दप्रामाण्य बदलेल्या काळातील बदललेले परिपेक्ष आणि दृष्टिकोण न लक्षात घेताच शिष्य आणि भक्तमंडळी कालपरत्वे बदल स्विकारावयाचे नाकारून डोळे झाकुन व्यक्ती प्रामाण्य आणि शब्द प्रामाण्य टिकवण्यावर आग्रही भर देत राहताना दिसतात. या श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधील फरक कसा करावा, स्वतःला कुठे केव्हा, कसे, किती बदलावे आणि किती तसेच रहावे ? काही स्वघोषित संत महंत अशा मानवी श्रद्धा आणि भाविकांचा सरळ सरळ गैरफायदाही घेताना दिसतात मग अशा व्यक्ती प्रामाण्यावर आणि शब्द प्रामाण्यावर यथोचित टिकेचे स्वातंत्र्य टिकाकारांना असावयास हवे अथवा नको ? ज्यांच्या शिष्य आणि भक्तगणांचे सामाजिक, राजकीय वर्चस्व अथवा उपद्रवमुल्य अधिक त्या प्रमाणात टिकाकारांना अमूक एक स्वातंत्र्य द्यावे किंवा नको हे ठरवावे ?
ग्रंथ प्रामाण्य मानणार्या जुन्या काळातील असंख्य ग्रंथ परंपरा मौखिक होत्या त्यात मूळ लेखकास अभिप्रेत नसलेले ABD, किंवा ABCDG ,किंवा A1BCD, किंवा ABcD, किंवा अबकड असा एकही बदल जाणता अजाणता न होताच मौखिक परंपरा अत्यंत शुद्ध स्वरूपातच प्रत्येक पाठांतरकर्त्या व्यक्तीने जपल्या (एकही अक्षर-शब्द-अर्थ गहाळ अथवा चूक न करण्या एवढे सगळ्या मौखीक परंपरातील सगळे पाठांतरकर्ते अलौकीक असल्या प्रमाणे शब्दप्रामाण्यवाद्यांचे वर्तन हा ही अत्यंत महत्वाचा विषय पुरेशा चर्चे विना राहून जाताना आढळतो) , किंवा काळाच्या ओघात भाषेतील अर्थ / अर्थछटात , परिपेक्षामंध्ये काहीच बदल न होता हे सर्व आमच्या पर्यंत पोहोचले आहे का ?; आम्ही जे प्रमाण म्हणून वाचतो विश्वास ठेवतो ते किती प्रमाण असते की आम्ही काळाप्रमाणे बदलूच नये ?
या धागा लेखाचा विषय उपरोक्त मुद्द्यापर्यंत मर्यादीत नाही तो बराच व्यापक आहे हे लक्षात घेता यावे म्हणून धागा लेख शीर्षक मोठे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दप्रामाण्याबद्दलही लोक प्रामाणिक नसतात अथवा गोंधळतात पण ABCD मधील अंशिक मजकुर खाऊन ABD असे वाचणे, किंवा आपल्या सोईचे ABCDG किंवा A1BCD किंवा ABcD, किंवा अबकड जोड देऊन बदल करून वाचणे, जिथे कोणताही लक्ष्यार्थ अभिप्रेत नाही तेथे लक्ष्यार्थ योजणे किंवा चुकीचा लक्ष्यार्थ योजणे आणि जिथे लक्ष्यार्थ अभिप्रेत आहे तो बाजूस ठेऊन वाच्यार्थास चिटकून राहणे असे होता नाही दिसते का ? वाच्यार्थ केव्हा घ्यावा लक्ष्यार्थ केव्हा घ्यावा आणि आपण सुयोग्य लक्ष्यार्थ वापरतो आहोत हे कसे ठरवावे असे तुम्हाला वाटते ?
*** चर्चा संक्षेप ***
* धू म्हणले की धुवायचे, पॉलिसी केव्हा योग्य केव्हा अयोग्य ?
* त वरून ताकभात असा अर्थ किंवा दोन ओळींच्या मध्ये अर्थ केव्हा काढावा केव्हा काढू नये ? त म्हणजे त च समजावे आणि सूतावरून स्वर्ग गाठायचे केव्हा टाळावे ?
* ध चा मा होतो आहे हे केव्हा आणि कसे लक्षात घ्यावे ?
*** *** ***
* मी वर नमूद केलेल्या आख्यायिका या माझ्या आंतरजालावरील वाचनावर आधारीत आहेत, चुक भूल देणे घेणे.
* प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संपादकांना विनंती
शुद्ध तात्विक चर्चा
प्रश्न असा कि पडायची भिंत का
दुसरे म्हणजे गुरुचे विशिष्ट
+ १
कळळ नाही .. त्या मुळे पास !!!
धाग्याला भेट दिल्या बद्दल
जसा आमिरने पीकेमध्ये केलाय
प्रतिसादासाठी धन्यवाद
गृहीतक
श्रद्धा आणि विश्वासाच नातं येथे महत्वाचे असेल का ?
भिंत
+१
आपण धागा लेखातील आख्यायिका
ह्या वरुन आठवलेला एक विनोद.
मार्मिक
+ १
(No subject)
(No subject)
उत्तम शिष्य म्हणजे
परिणती