Skip to main content

आकुर्डीला एक मिनी कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 25/05/2015 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे. सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो. त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत. मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का? खर्च आपापला. कळावे, लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा. आपला, कट्टेकरी मुवि.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18981
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

सावरकर उद्यानात का? गणेश तलावापाशी फारच रम्य आठवणी आहेत!! मज्जा करा.. जमल्यास येऊ.. निश्चित नाही..

समद्यांण्सी राम्राम, कट्ट्याचं स्वरुप साधारणपणे असं असावं असं मला आणि नाखुनकाकांना वाटतं. गणेश तलावापाशी साधारण ५.३०-६.०० पर्यंत भेटणं (मी ६.३० ला येणारे). तलावाची दारं उघडी असतील तर आतमधे बसायला छोटेखानी घाट आहे तिथे तास-दिड तास मस्तं गप्पा मारु. त्यानंतर मग खादाडी कार्यक्रमासाठी प्रस्थान करु. माझ्या मते रामदेव, रसोईसे अश्या दोन जागा आहेत चांगल्या. त्यापैकी रामदेव ही जागा मोठ्या गृपसाठी चांगली राहिल. ह्याशिवाय थाळी सिस्टीम हॉटेलमधे गेल्यास जास्तं चांगलं होईल असं मला वाटतं. जेणेकरुन सगळ्यांना एकाचं वेळी पदार्थ वाढले जातील. कट्ट्याचा खर्च टी.टी.एम.एम. पद्धतीनी करायचा असल्यानी ते सोयीचं पडेल. अडचण अशी आहे की मला आमच्या इकडे चांगली थाळी कुठे मिळते हे अजिबात माहिती नाही त्यामुळे पिंचिंकरांनी सल्ला द्यावा. (मयुर चं नावं काढणार्‍याला फाट्यावर मारण्यात येईल). जेवताना परत गप्पा वगैरे मारता येतीलचं. शिवाय मग जेवण झाल्यावर परत गप्पांचा फड जमवु वेळ उरला तर. साधारण ९.३० ते १०.०० पर्यंत कट्ट्याची सांगता करु. ज्यांना लांब जायचयं अश्यांनी जेवुन लगेचं गेलं तरी हलकट नाही. कोणाला काही शंका असल्यास व्यनि करा. एखाद्याला/दिला जागा माहित नसेल किंवा काही शंका-कु.शंका असेल तर फोन करा मला. ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांनी व्यनि करा. ओळखीच्या आयडीला नंबर दिला जाईल. आणि कोणीतरी अत्रुप्त बुवांना किड्णॅप करायची जबाबदारी घ्या. कळावे अनिरुद्ध दातार (अंड्या)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बाबा रामदेवचीच थाळी टिळक चौकात हायवेच्या पलीकडच्या बाजूला सुरु झालीय पण इतकी काही ख़ास वाटली नाही.

In reply to by नाखु

भोज मध्ये सुद्धा राजस्थानी थाळी चांगली मिळते . दुवा वासू वडापावच्या गल्ल्लीमधे वासूचा नवीन हॉटेलच्या शेजारी. menu

दिल्ली स्वादच्या बाजुलाच चौधरी ची थाळी आहे. गुजराथी थाळी आहे. पण कधी जेवलो नाही त्यामुळे क्वालिटी माहिती नाही. रामदेव योग्य होइल अस वाटतय. थाळीचे ऑप्शन्स पिंची मध्ये फारसे नाहियेत.

डोकी मोजणी सांगणे इथेच धाग्यावर. आत्तापर्यंतचे अभिप्राय वाचना नंतरचे अनुमान येन प्रकारे १.उत्सव मूर्ती चिमणराव २.मा. मितान तै ३.मुवी सहपरीवार ४.वल्लीदा ५.प्रगो ६.कपीलमुनी ७.एक्का काका ८.चौराकाका ९.झकासराव १०.बाबा पाटील (विथ दंबूक) ११.त्रिवेणी १२ चौथा कोनाडा १३ गणेशा (तुझं नाव टाकतोय मला तोंडावर आप्टू नकोस रे) १४ आणि मी सोत्ता (नाखु) यादी अद्द्यायावत ठेवायचे काम चिमणकडे सूपूर्त.

In reply to by नाखु

अरे वा ! बाबा पाटील येणार आहेत काय ? छान छान !! काही जालीम औषधोपचारावर चर्चा करायची आहे त्यांच्याशी ;) =))

In reply to by नाखु

नक्कीच येणार.. टाईम मात्र मॅनेज करावा लागेल.. नाही तर आधीच २-३ तासाची सुट्टी घेवुन येतो जमल्यास. अवांतर : थाळी सिस्टीम मध्ये.. शक्यतो जेवताना निटसे बोलता येत नाही..आणि खुप घाई होते असा अनुभव .. टेबल जोडता आले नाही तर अर्धे अर्धे गृप होतात .. बाकी सर्व ठरवणारे योग्य ठरवतील ... मी येतो आहे..उशीर झाल्यावर ही सामावुन घेणे

In reply to by अमृत

असं काहीही नाहिये ह्या यादीमधल्या लोकांनी मी म्हणल्याप्रमाणे व्यनि करुन याय्चं खात्रीशिरपणे कळवलेलं आहे. तुम्हीही जरुर या. तुमचं स्वागतचं असेल.

आत्तापर्यंतचे अभिप्राय वाचना नंतरचे अनुमान येन प्रकारे
  • पहिला राजा
  • अमृत
  • उत्सव मूर्ती चिमणराव
  • मा. मितान तै
  • मुवी सहपरीवार
  • वल्लीदा
  • प्रगो
  • कपीलमुनी
  • एक्का काका
  • चौराकाका
  • झकासराव
  • बाबा पाटील (विथ दंबूक)
  • त्रिवेणी
  • चौथा कोनाडा
  • गणेशा
  • आणि मी सोत्ता (नाखु
)
  • नीओ नी तत्वतः मान्य केलयं फक्त खरडीत
  • )

    In reply to by नाखु

    ना खु सर, OFFICE ची वेळ सांभाळून येईन भेटायला. खादाडी साठी नाही थांबू शकणार.

    In reply to by नाखु

    उत्सवमुर्ती आणि कट्टा आयोजक मुवि आहेत. मी जेवायला नसणारे कदाचित. मात्र गप्पा मारायला असेन खात्रीने.

    कट्टा वृत्तांतात कुठलाही खाद्यपदार्थ आणि त्यांचे फोटो समाविष्ट करू नका. (हापिसात खादाडीच्या फोटोंसहित कट्टा वृत्तांत वाचताना खुप त्रास होतो.) बाकी मिपाकरांचे फोटो आणि सविस्तर कट्टा वृत्तांताच्या प्रतिक्षेत! कट्टा होतो तो एकमेकांना भेटण्यासाठी. खादाडी आणि फोटो दुय्यम असतात.

    हे पर्याय कसे वाटतात ? अ) हॉटेल वृंदावन, भक्ति-शक्ति स्फुर्तीउद्याना मागे. ऐसपैस ले आउट, सुरेख इंटेरियर. आपल्या गृपसाठी वरचा एसी हॉल सुटेबल. अंगणातही टेबल्स जोडता येतील. ब) हॉटेल पिंगारा : भेळ चौका जवळच, तुलनेने नवे हॉटेल. अंगणात टेबल्स जोडता येतील.

    In reply to by चौथा कोनाडा

    बडा घर पोकळ वासा आहे आधीक तपाशील वल्लीदा. त्या मानाने रसोईसे चांगले आहे पण आसनक्षमतेबाबत चिमण्राव-मितान तैच सांगू शकतील.

    आता भेटायची वेळ (दिवस नाही) आली तरी अजून ठिकाण ठरत नाहीय, या वेळेस हे असे का होत आहे ?? ठरवा पाहू एकदाचे ... वल्ली दा - घ्या पुढाकार & declare करून टाका कि अमुक अमुक ठिकाणी भेटणे final झाले आहे आणि, मी पण पिंपरी चिंचवडकरच बर का ...

    In reply to by पहिला राजा

    समद्यांण्सी राम्राम, कॅप्टन जॅक स्पॅरो -

    Wed, 27/05/2015 - 19:20

    समद्यांण्सी राम्राम, कट्ट्याचं स्वरुप साधारणपणे असं असावं असं मला आणि नाखुनकाकांना वाटतं.

    गणेश तलावापाशी

    साधारण ५.३०-६.०० पर्यंत भेटणं (मी ६.३० ला येणारे). तलावाची दारं उघडी असतील तर आतमधे बसायला छोटेखानी घाट आहे तिथे तास-दिड तास मस्तं गप्पा मारु. त्यानंतर मग खादाडी कार्यक्रमासाठी प्रस्थान करु. माझ्या मते रामदेव, रसोईसे अश्या दोन जागा आहेत चांगल्या. त्यापैकी रामदेव ही जागा मोठ्या गृपसाठी चांगली राहिल. ह्याशिवाय थाळी सिस्टीम हॉटेलमधे गेल्यास जास्तं चांगलं होईल असं मला वाटतं. जेणेकरुन सगळ्यांना एकाचं वेळी पदार्थ वाढले जातील. कट्ट्याचा खर्च टी.टी.एम.एम. पद्धतीनी करायचा असल्यानी ते सोयीचं पडेल. अडचण अशी आहे की मला आमच्या इकडे चांगली थाळी कुठे मिळते हे अजिबात माहिती नाही त्यामुळे पिंचिंकरांनी सल्ला द्यावा. (मयुर चं नावं काढणार्‍याला फाट्यावर मारण्यात येईल). जेवताना परत गप्पा वगैरे मारता येतीलचं. शिवाय मग जेवण झाल्यावर परत गप्पांचा फड जमवु वेळ उरला तर. साधारण ९.३० ते १०.०० पर्यंत कट्ट्याची सांगता करु. ज्यांना लांब जायचयं अश्यांनी जेवुन लगेचं गेलं तरी हलकट नाही. कोणाला काही शंका असल्यास व्यनि करा. एखाद्याला/दिला जागा माहित नसेल किंवा काही शंका-कु.शंका असेल तर फोन करा मला. ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांनी व्यनि करा. ओळखीच्या आयडीला नंबर दिला जाईल. आणि कोणीतरी अत्रुप्त बुवांना किड्णॅप करायची जबाबदारी घ्या. कळावे अनिरुद्ध दातार (अंड्या) फक्त जेवण्याचे ठिकाण भोज किंवा रसोईसे यापैकी एक ठरवू जवळ आहे म्हणून्.(ऐन्वेळी बदलता येईल हुकुमाचे पान मितान तै आणि चिमणकडे आहे. उत्तर द्या

    नकाशा पासून भेटीचे ठिकाणा पर्यंत टिचकी मारा माहीती मिळवा अगदीच ठरवून चुकल्यास जवळची मोठ्ठी खूण म्हणजे

    पाटीदार भवन मंगल कार्यालय

    हुश्श्$$$$$$$$$$$श नाखु