✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/01/2015 - 13:34  ·  लेख
लेख
मिपाकरांनो, प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818) ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे. पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा. मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा. ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत. मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच. नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको. आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला. तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा. अरे हां..महत्वाची गोष्ट...... प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण :वनविहार , ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात. काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला). प्रवेश फी :नाही. जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज). पार्किँग :भरपूर. राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु. संपर्क 9226093034 शिवाजी 0214683313 जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार. पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल. पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल. मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत. कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता. राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे. कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
30080 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

१००

टवाळ कार्टा
Tue, 01/13/2015 - 21:25 नवीन
१००
  • Log in or register to post comments

नका रे आता जास्त चर्चा करू,

रेवती
Wed, 01/14/2015 - 01:48 नवीन
नका रे आता जास्त चर्चा करू, वैट वाट्टं.
  • Log in or register to post comments

तुम्ही आलात की...

मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 02:20 नवीन
एक २-४ कट्टे करू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कशेळे वनविहार कट्ट्याला

कंजूस
Fri, 01/16/2015 - 19:34 नवीन
कशेळे वनविहार कट्ट्याला रस्त्याने येण्यासाठी मार्ग १)मुंबईकडून दादर.. चेंबूर.. वाशी ..सीबिडी ..पनवेल.. पळस्पे ..{खोपोली रस्त्याने}.. अंबानी हॉस्पिटल .. कर्जतफाट्याला डावीकडे वळणे पुढे  प्रमाणे २)पुण्याकडून पुणे ..लोणावळा ..घाट उतरणे ..आडोशी बोगद्यानंतर एक्सप्रेसवे सोडून डावीकडचा खोपोली रस्ता घेणे.. खाली खालापूर नाका ..{पनवेल रस्त्याने} ..कर्जतफाट्याला उजवीकडे वळणे ..पुढे  प्रमाणे  कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार. ३) कल्याण डोंबिवलीकडून {शिळफाटा रस्त्याने} काटई नाक्याअगोदर डावीकडे ..{पाईपलाईन रोडने} अंबरनाथ एमआइडिसी ..बदलापूर ..{बदलापूर नेरळ रस्त्याने} नेरळ ..फाटक रे क्रॉसिँग करून ..{कशेळे रस्त्याने} कशेळे ..{जामरुघ रस्त्याने} आंबिवली ..@वनविहार.
  • Log in or register to post comments

४)अलिबाग/पेणकडून

कंजूस
Fri, 01/16/2015 - 20:28 नवीन
४)अलिबाग/पेणकडून पेण-पनवेल रस्त्याने ..खारपाडा.. खाडी ओलांडल्यावर.. जिते.. आपटेफाट्याला उजवीकडे वळा.. आपटा ,आपटा रे॰ स्टे॰.. रसायनी रे॰ स्टे॰.. उजवीकडे वळून.. मोहापाडा ..दांडफाटा ..{पनवेल-खोपोली रस्त्याने उजवीकडे खोपोलीच्या दिशेने पुढे} कर्जतफाटा.. कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हे असे आहे का ?

चौकटराजा
Fri, 01/16/2015 - 23:06 नवीन
Image removed. वरील चित्रात जिथे पिवळ्या रंगातील मार्ग ( डाव्या बाजूस) चालू होतो ते कशेळे गाव आहे. त्या गावात आणखी गौलवाडी कडून येणारा फिकट पिवळा मार्ग हा करजत-कशेळे व्हाया काडाव असा आहे. आता ठळक पिवळा मार्ग म्हणजे कशेळे- आंबिवली केव्ह असा १० किमी चा मार्ग व्हाया कोथिबे खणंद पिगळस असा आहे. हे वनविहार म्हणजे आंबिवली केव्ह हे ठिकाण आहे का ? असे असेल तर जीपीएस लावणे फार आवश्यक असणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

१५ तारखेला सकाळी सहकुटुंब

सुबोध खरे
Fri, 01/16/2015 - 22:41 नवीन
१५ तारखेला सकाळी सहकुटुंब कट्ट्याला येत आहे. स्वतः मोटार चालवत नेणार असशील तरच येईन असे सौ ने सांगितल्याने नाईलाज आहे. किती जण सहकुटुंब येत आहेत?
  • Log in or register to post comments

मी १००%...

मुक्त विहारि
Sat, 01/17/2015 - 04:13 नवीन
१४ ता. रात्री पासूनच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आमी बी हाय की वो.....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 01/22/2015 - 11:56 नवीन
आमी आन बायको....होऊ द्या खर्च... वाह्न आहे घरचं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

१५ ला सकाळी येण्याचा नक्की

किसन शिंदे
Sun, 01/18/2015 - 00:03 नवीन
१५ ला सकाळी येण्याचा नक्की प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

मी सुद्धा प्रयत्न करतो..

योगी९००
Sun, 01/18/2015 - 00:14 नवीन
१५ ला येण्याचा प्रयत्न करतो. आदल्या दिवशी घरात समारंभ असल्याने दुसर्‍या दिवसाची खात्री नाही. आलो तर गाडीने येईन आणि कांदीवली - ठाणे अशा मार्गाने येईन.
  • Log in or register to post comments

वनविहारचे तारीख बुकिंग नक्की

अजया
Sun, 01/18/2015 - 08:31 नवीन
वनविहारचे तारीख बुकिंग नक्की केले आहे.१४-१५ फेब्रुवारीसाठी.साधारण पन्नास माणसांची रहायची सोय होऊ शकते असे तिथल्या मॅनेजरने सांगीतले आहे.
  • Log in or register to post comments

१४ तारखेला भावाच्या लग्नाचा

सुबोध खरे
Sun, 01/18/2015 - 23:17 नवीन
१४ तारखेला भावाच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे आणि १६ तारखेला मुलाचा १८ वा वाढदिवस आहे त्यामुळे १४ ला रात्री जमणार नाही. १५ ला सकाळी नक्की.
  • Log in or register to post comments

शेवटी तेच्च झाले. आमचा १३ ते

यसवायजी
Mon, 01/19/2015 - 23:22 नवीन
शेवटी तेच्च झाले. आमचा १३ ते २१चा परदेशी पलायनाचा प्लान झाल्याने हाही महाकट्टा हुकणार च्यामारी.. (दुःखी)SYG
  • Log in or register to post comments

परदेशी पलायनाचा प्लान

सूड
Mon, 01/19/2015 - 23:57 नवीन
परदेशी पलायनाचा प्लान झाल्याने हाही महाकट्टा हुकणार च्यामारी..(दुःखी)SYG
अरे दु:खी काय होतांयस? हा हुकला तर आणखी एक होईल कट्टा, परदेशी जावयाची संधी मिळणें महत्त्वाचें !! काय समजलांस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

व्हय जी मास्तर

यसवायजी
Tue, 01/20/2015 - 00:25 नवीन
व्हय जी मास्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

येण्याची इच्छा बळावली आहे

मेघनाद
Tue, 01/20/2015 - 01:29 नवीन
येण्याची इच्छा बळावली आहे (रविवारी शिफ्ट लागली नाही ऑफीस मधे म्हणजे कट्टा पावला)...एवढे मीपकार येताहेत बघून. १५ तारखेला आल्यास किती खर्च होईल एका व्यक्तीचा ह्याचा अंदाज मिळाला तर बरे होईल. मी आलोच तर बहुतेक बाईकने प्रवास करायचा विचार आहे डोंबिवलीमधून.
  • Log in or register to post comments

आजच ७/७ आणि १४/१५ ला हापिसला

प्रचेतस
Wed, 01/21/2015 - 21:26 नवीन
आजच ७/८ आणि १४/१५ ला हापिसला यावे लागेल असा मेल इनबॉक्सात पडल्यामुळे आमचे येणे क्यान्सल. :(
  • Log in or register to post comments

अरारारा......

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 01/22/2015 - 11:57 नवीन
बुवा...तुमी पूर्वकल्पना नाय दिली हापिसला???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्लीशेठ

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 12:04 नवीन
फ्रेंच लीव्ह मारा बॉ ! कुलसंमेलनाला ज्येष्ठ संपादक कुणीच नैत असं व्हायचं नैतर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

++++++११११११

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/22/2015 - 14:14 नवीन
++++++११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

दोन्ही वीकेंड स्केड्युल आलंय.

प्रचेतस
गुरुवार, 01/22/2015 - 14:16 नवीन
दोन्ही वीकेंड स्केड्युल आलंय. नायतर आलो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

फ्रेंच कट, फ्रेंच किस ऐकलंय

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 14:20 नवीन
फ्रेंच कट, फ्रेंच किस ऐकलंय आता हे फ्रेंच लीव्ह काय अस्तं म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

इंग्लीशाने कामाला दांडी मारली

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/22/2015 - 14:25 नवीन
इंग्लीशाने कामाला दांडी मारली की ती झाली, "फ्रेंच लीव्ह" आणि तेच फ्रेंचाने केले तर ती झाली, "इंग्लिश लीव्ह" ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ते असं की घरातूनच एस्सेमेस

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 14:27 नवीन
ते असं की घरातूनच एस्सेमेस करायचा आज तापानं फणफणलोय / डिसेंट्री लागलीय / चुलतआजोबा वारले / बायको पडलीय हात मोडलाय किंवा यापेक्षा अॅडव्हान्सड कुणाला माहिती असेल ते कारण *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

डिसेंट्री लागलीय हाच पर्याय

यसवायजी
Fri, 01/23/2015 - 11:02 नवीन
डिसेंट्री लागलीय हाच पर्याय सर्वोत्तम। दुसऱ्या दिवशी शिंकून/खोकून/कन्हू न दाखवावे लागत नाही। :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

दर्पणाबै हात मोडक्याच आहेत!

अजया
Fri, 01/23/2015 - 19:48 नवीन
दर्पणाबै हात मोडक्याच आहेत!!कारण खोटं नाही होणार ^_~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

(No subject)

प्रचेतस
Fri, 01/23/2015 - 19:58 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कट्टाप्रवर्तक आणि कशेळी कर्जत

गवि
गुरुवार, 01/22/2015 - 14:23 नवीन
कट्टाप्रवर्तक आणि कशेळी कर्जत परिसराचे माहितगार यांना उद्देशून प्रश्नः लेणी, गुंफा, कोरीवकाम, सातवाहन, गुप्त, पांडवकालीन दगडाचं काही आहे का त्या कट्ट्याच्या परिसरात. असेल तर इथे वर्णन करा. बघा..वल्लीचा इन्कार इकरारमधे बदलेल क्षणात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हो हो

इरसाल
गुरुवार, 01/22/2015 - 15:54 नवीन
आहे आहे. आंबिवली जवळच वनविहार म्हणुन बौद्धकालीन विहार आणी लेण्या आहेत. परत पेठचा किल्ला आहे तो वेगळाच. अति उत्साही मंडळी नंतर मांगी-तुंगीच्या भेटीलाही जावुन येवु शकतात. गवि इतके पुरेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वल्ली.. पुरेल का?

गवि
Fri, 01/23/2015 - 07:54 नवीन
वल्ली.. पुरेल का? बादवे वर्क फ्रोम होम वगैरे चालत नाही का एखाद्या रविवारी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

नै ना.

प्रचेतस
Fri, 01/23/2015 - 08:25 नवीन
नै ना. :( आंबिवली लेणी माहीत आहेत पण ह्यावेळी जमणे अशक्य दिसत्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असे करा ना

चौकटराजा
Fri, 01/23/2015 - 19:32 नवीन
इजिप्त या देशात आस्वान धरण होणार म्हणून अबु सिम्बेलचे देवालय पूर्ण फोडून ते साडेतीनशे फूट उंच जागेवर नेले आहे. त्या तंत्रज्ञाना बोलावून वेरूळ अबिम्वली येथे शिफ्ट करा. वल्ली कंपनीच्या कारने कट्ट्याला येणार ! साहेबाना घेउन येणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खात्रीचा खबऱ्या पाठवत आहेत

कंजूस
Fri, 01/23/2015 - 02:17 नवीन
खात्रीचा खबऱ्या पाठवत आहेत ना वल्ली. तो गुंफेत ओऽम म्हणून रिपोर्ट पाठवणार आहे. त्यामुळे सध्या पाकिट सलामत तो पांडवलेणी पचास. इथे नदीकाठी ५०X५० फुट विहार आहे मूर्ती नाहीत. शिलालेख नाहीत. भिमाशंकर पेठ ट्रेकरांचे विरंगुळा ठिकाण आहे.
  • Log in or register to post comments

कशेळी कट्टा संयोजन : पुणे आणि पिंपरी-चिंचवड

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/29/2015 - 11:18 नवीन

कशेळी कट्टा संयोजन : पुणे आणि पिंपरी-चिंचवड

कशेळी येथील कट्ट्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथून येणार्‍या मंडळींचे संयोजन श्री चौकटराजा साहेब करणार आहेत. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अनेक धन्यवाद. लवकरच ते याबाबत सभासदांशी या धाग्यावर संवाद साधतील. सभासद त्यांना पूर्ण सहकार्य देतील याची खात्री आहेच, त्यासाठी सर्वांना आगाऊ धन्यवाद !
  • Log in or register to post comments

काही स्पष्टीकरण...

चौकटराजा
गुरुवार, 01/29/2015 - 12:41 नवीन
नेरळ ते कशेळे व कशेळे ते आंबिवली या अंतरावर किती सहज व मोठ्या प्रमाणात वहातुक चालू असते. त्या बद्दलची नक्की माहिती कुणास आहे का ? तसे नसेल तर जे काही पुणेकर येणार असतील. त्यानी एक मोटर पुण्याहुन करावी त्याला मी व इतर चिंचवड वासी आमचे येथून सामील होउ. मी खरे तर दुचाकीवरून चिंचवड ते आंबिवली जाणार होतो. पण परत येताना अंधार पडला तर पंचाईत नको म्हणून तो बेत मी रद्द केला. पण पुणेकरानी एकजूट केल्यास येता जाता धमाल मजा करीत जाता येता येईल. त्यासाठी येणार्‍यांची नक्की यादी करण्यासाठी मला व्यनि करावा. व यादी पक्की झाल्यास पुण्यातीलच एकाकडे मोटर निवडण्याची जबाबदारी द्यावी. पाहू या कसे जमते ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अत्रुप्तजी आत्मा हे येणारच

प्रचेतस
गुरुवार, 01/29/2015 - 18:29 नवीन
अत्रुप्तजी आत्मा हे येणारच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पुण्याकडून वाहनाने येण्याचा

कंजूस
Fri, 01/30/2015 - 08:40 नवीन
पुण्याकडून वाहनाने येण्याचा मार्ग दिलेला आहे. कर्जत-कशेळे आणि कशेळे-आंबिवली यावर अगदीच तुरळक वाहतूक असते.
  • Log in or register to post comments

पुणेकर याची नोंद घ्या..

चौकटराजा
Fri, 01/30/2015 - 10:30 नवीन
पुण्याकडून वाहनाने येण्याचा मार्ग दिलेला आहे. कर्जत-कशेळे आणि कशेळे-आंबिवली यावर अगदीच तुरळक वाहतूक असते. याचा अर्थ आपण असा घेउ शकतो की वाई येथून पाचगणी येथे जाण्यासाठी एस टी बस नाही मिळाली तरी अडत नसे. जुन्या मोठ्या डॉज पंपं तिथे सर्रासपणे ट्याक्स्या म्हणून मिळत असत. तसे इथे सिक्स सिटरचे नसेल तर हु दे खर्च्व्च पण सुरक्षित घरी येउ असा बेत करून खाजगी गाडीनेच जाणे श्रेयस्कर. पण त्यासाठी ३०० किमी चे भाडे द्यावे लागेल. काय करावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लक्ष आहे माझे.

जेपी
Fri, 01/30/2015 - 10:32 नवीन
लक्ष आहे माझे.
  • Log in or register to post comments

मि येनार आहे मुबंईहुन

सुधीर जी
Fri, 01/30/2015 - 15:36 नवीन
मि येनार आहे मुबंईहुन
  • Log in or register to post comments

कंपणीतील ट्रेनिंगमुळे मला

गणेशा
Tue, 02/03/2015 - 14:02 नवीन
कंपणीतील ट्रेनिंगमुळे मला येणे शक्य नसल्याने खेद व्यक्त करतो. कृपया माझे बुकिंग कॅन्सल किंवा नविन कोणाला यायचे असल्यास त्याला देवु शकताल का ? क्षमस्व गणेशा
  • Log in or register to post comments

एक विनंती...

संदीप डांगे
Wed, 02/04/2015 - 03:52 नवीन
मला ह्या कट्ट्याला यायचे आहे. १४ रात्रिपासुन. आता नाव नोंदवले तर चालेल काय?
  • Log in or register to post comments

ओके...

मुक्त विहारि
Wed, 02/04/2015 - 03:55 नवीन
पण तुम्ही पुण्याहून येणार की? मुंबई हून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नाशिकवरुन

संदीप डांगे
Wed, 02/04/2015 - 04:14 नवीन
नाशिकवरुन कल्याण. कल्याणवरून बसने किंवा रेल्वे ने नेरूळ, मग तिथून शेअर रिक्षा. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कंजूस

मुक्त विहारि
Wed, 02/04/2015 - 04:41 नवीन
ह्यांना विचारायला पाहिजे.आम्ही त्यांचे बोट पकडूनच गेलो होतो. बादवे, ते "नेरूळ" नसून "नेरळ" आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हो. नेरळ.

संदीप डांगे
Wed, 02/04/2015 - 04:45 नवीन
हो. नेरळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कशेळे माहिती आहे. कधी गेलो

संदीप डांगे
Wed, 02/04/2015 - 04:53 नवीन
कशेळे माहिती आहे. कधी गेलो नाही पण सदर परिसराची नकाशा माहिती आहे. खाली दिलेला मार्ग योग्य आहे. जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार. संध्याकाळी किती वाजेपर्यंत पोचावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

संध्याकाळी ६ पर्यंत आलात तर फार उत्तम...

मुक्त विहारि
Wed, 02/04/2015 - 05:01 नवीन
येत्या शनिवारी किंवा रविवारी फायनल प्रोग्राम ठरेल. मग सोमवारी तसा धागा काढूच. म्हणजे कल्याण-मुंबई हून येणार्‍या मिपाकरांची गैर सोय होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

फारच छान.

संदीप डांगे
Wed, 02/04/2015 - 05:10 नवीन
फारच छान. पेट्रोल थोडे स्वस्त झाले आहे. त्यामुळे कार घेऊन येणेसुद्धा परवडेल असे वाटते आहे. :-) कार कि रेल्वे हे नेमक्या वेळी ठरेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा