#मोदीइनअमेरीका
लेखनप्रकार
सगळ्यांना न्यूयॉर्कला येणे शक्य नव्हते, विशेष करून विद्यार्थ्यांना त्यामुळे १९ राज्यांमधल्या ४५ विद्यापिठांमधल्या भारतीय विद्यार्थी संघटनांनी थेटप्रक्षेपणा एकत्रित पहाण्याची विशेष व्यवस्था केली होती. तुमच्यातल्या अनेकांनी देखील हा कार्यक्रम इंटरनेटद्वारा पाहीलेला असू शकतो.
पहाटे चार वाजता बॉस्टनहून निघालो आणि पार्कींग वगैरे मिळून सव्वा आठच्या दरम्यान मॅडीसन स्क्वेअर गार्डनच्या बाहेरच्या आवारात पोचलो तर मैलभर किंवा त्याहूनही मोठी रांग! सुरवातीस मोठी रांग पाहून सुरक्षेतून वगैरे वेळेत पोचू का अशी शंका होती पण व्यवस्था चांगली होती हे अनुभव आल्यावर समजले!
१८,००० जागांचे हे स्टेडीयम भरले होते. त्यात अक्षरशः अबालवृद्ध, विविध भाषिक भारतीय, विविध धर्मिय, पंथीय दिसले. भारतात असताना भाजपाचे पारंपारीक समर्थक असलेले जसे यात होते तसे अगदी भाजपाचे पारंपारीक समर्थक नसलेले देखील होते. पण यातील प्रत्येकाला मोदींमुळे काही चांगले बदल घडतील अशी आशा किंबहूना खात्रीच आहे असे जाणवत होते.
आत प्रवेश केल्यावर प्रत्येक तिकीटास एक अशा पध्दतीने एक टिशर्ट देण्यात आला. लहानसे अमेरीकन आणि भारतीय झेंडे पण वाटणे चालले होते. त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! मोदी ११:३० ला येणार होते. त्या आधी आत बसलेल्या मोठ्या जनसमुदायास खिळवून ठेवण्यासाठी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम झाले.
नंतर कविता कृष्णमुर्ती यांनी काही गाणी म्हणली. ह्यातील एका गाण्याच्या वेळेस एक अमेरीकन चित्रकाराने रंगाचे फराटे मारत ज्या पद्धतीने मोदींचे चित्र काढले ते प्रत्यक्ष बघताना खूपच आवडले. जनतेने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. मिस अमेरीका २०१४४ निना दावुलूरी आणि अमेरीकेतील पब्लीक ब्रॉडकास्टींग स्टेशनचा वृत्त निवेदक हरी श्रीनिवासन हे कार्यक्रमाचे संयोजन करत होते. वातावरणात प्रचंड उत्साह दिसत होता.
मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर स्टेजवर अमेरीकन राजकीय नेत्यांना बोलावण्यात आले. त्यात जवळपास ३० सिनेटर्स, काँग्रेसमेन आणि साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर (भारतीय वंशाच्या) निकी हिली असे सर्व स्टेजवर आले. त्यांच्या उपस्थित मग मोदींचे स्वागत झाले!
नंतर अमेरीकन आणि भारतीय राष्ट्रगीताने अधिकृत कार्यक्रमाची सुरवात झाली.
मोदींच्या भाषणात एकाच वेळेस भारतीय, अनिवासी भारतीय आणि अमेरीकन राज्यकर्ते, धोरणकर्ते तसेच उद्योजक यांच्याशी संवाद करण्याचे कौशल्य जाणवले. भाषण केवळ गोडगोड नव्हते तर देश घडवण्यासाठी प्रत्येकाकडून सहकार्य मिळवण्याचे आवाहन त्यात होते. भाषण पूर्णपणे हिंदीत झाले. पण क्षणार्धात भाषांतर करून ते स्क्रीन वर सबटायटल म्हणून दाखवले जात होते. तसेच, स्वतः मोदी जनतेला भावेल अशा शब्दात बोलत असताना देखील त्यांच्या कौतूकाने ओतप्रोत भरलेल्या प्रसंगात देखील पाय जमिनीवरच ठेवून होते असे त्यांच्या हालचालींवरून समजू शकत होते.
कार्यक्रमानंतर अनेकांशी संवाद झाला तसेच फेसबूक अपडेट्स पाहीले. यातील अनेक जण हे कधीच भाजपाचे नव्हते, मोदींचे असण्याचा प्रश्नच नाही... पण तरी देखील यातील प्रत्येकास/प्रत्येकीस देशाला नेतॄत्व मिळाले असे वाटत होते. मोदींच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि जे काही बातम्यातून वाचले जात आहे त्यातून सतत काहीतरी वेगळा विचार आणि त्याबरोबर सक्रीयता दिसत आहे. जर हा आलेख सकारात्मक वाढत राहीला तर जनता केवळ मोदींवरच खुश होईल असे नाही तर जो काही राज्यकर्ते, सरकार या बद्दलचा भ्रमनिरास झालेला आहे, भारतीय व्यवस्थेबद्दल नैराश्य आले आहे, त्यातून बाहेर पडू शकेल असे वाटते. ते तसेच व्हावे अशी मनोमन प्रार्थना!
माझ्या दृष्टीने स्टेजवर झालेले मोदींचे स्वागत, हे कार्यक्रमाचे एकाअर्थी शिखर होते.
ज्या माणसाला मुळच्या त्याच्याच देशातील असलेल्या व्यक्तींनी राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला आणि अमेरीकेतील कधिही न वापरल्या गेलेल्या एका कायद्याचा वापर करत अमेरीकन सरकारला असलेला व्हिसा रद्द करायला लावला आणि जे अमेरीकन सरकारने देखील ऐकले, त्या माणसास आज त्याच्याच देशातील जनतेनी निर्विवाद बहुमताने निवडून दिल्यावर अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! ह्यात मोदींची प्रतिमा जशी स्पष्ट दिसत होती तशीच "मोदी भक्त" नाही तर मोदींनी घेतलेल्या आव्हानाचे आणि कार्याचे समर्थक असलेल्या अनिवासी भारतीयांचे अमेरीकेतील राजकीय सामर्थ्य देखील दिसू शकले.
हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
वाचने
28658
वाचनखूण
प्रतिक्रिया
119
वृत्तांत आवडला
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
+ १
In reply to + १ by मुक्त विहारि
1+
In reply to 1+ by काउबॉय
पर्फेक्ट
In reply to + १ by मुक्त विहारि
अभिनंदन
In reply to अभिनंदन by अमित खोजे
+१
मस्त वृतांत.
खूप जबरदस्त भाषण केले.
बढिया!
In reply to बढिया! by प्यारे१
हा घ्या..
In reply to हा घ्या.. by नाखु
त्याचा व्हिडियो सुद्धा आहे.
In reply to त्याचा व्हिडियो सुद्धा आहे. by वेल्लाभट
स्वतःला
अमेरीकन राज्यकर्ते केवळ
जबरा
वृत्तांत आवडला. विशेषतः
शुभेच्छा..!
In reply to शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
+१
In reply to +१ by विकास
सध्याचे भारतीय राजकारणातील
विकास,- झकास
सहमत
In reply to सहमत by vikramaditya
चुका?
भाषण ऐकायला मिळाले नाही -
गांधी आणि मोदी!
In reply to गांधी आणि मोदी! by ऋषिकेश
मोदिना वास्तवाचे जबरदस्त भान आहे _/\_
In reply to गांधी आणि मोदी! by ऋषिकेश
याबद्दल अवांतर टाळणे योग्य
In reply to गांधी आणि मोदी! by ऋषिकेश
मोदीसमर्थकांची मते जाणुन
In reply to मोदीसमर्थकांची मते जाणुन by मृत्युन्जय
नाही प्रत्येक मोदीसमर्थक
In reply to नाही प्रत्येक मोदीसमर्थक by ऋषिकेश
काड्या
In reply to नाही प्रत्येक मोदीसमर्थक by ऋषिकेश
मी न्युट्रल आहे. काही बाबतीत
In reply to मी न्युट्रल आहे. काही बाबतीत by मृत्युन्जय
कुठल्या कुठल्या चुका भोवल्या?
In reply to कुठल्या कुठल्या चुका भोवल्या? by अनुप ढेरे
अर्रे बापरे. गांधी चरित्रच
In reply to अर्रे बापरे. गांधी चरित्रच by मृत्युन्जय
अजून कितीतरी चुका आहेत.
In reply to गांधी आणि मोदी! by ऋषिकेश
>>> मात्र मोदीसमर्थकांचे
In reply to गांधी आणि मोदी! by ऋषिकेश
नवीन नाही...
In reply to नवीन नाही... by विकास
+१
आपण गांधीजींना
In reply to आपण गांधीजींना by ऋतुराज चित्रे
अजून दोन गोष्टी दिल्या
In reply to आपण गांधीजींना by ऋतुराज चित्रे
निश्चित आर एस एस आणि भाजपा
...उत्तम वृतांत....!
In reply to ...उत्तम वृतांत....! by विनोद१८
म्हणजे कोणाचे?
In reply to म्हणजे कोणाचे? by ऋषिकेश
टीका करणे वाईट नाहीच आहे, टी
...त्या मेडीसन गार्डनच्या सभेबद्दलच म्हणतोय मी....
In reply to ...त्या मेडीसन गार्डनच्या सभेबद्दलच म्हणतोय मी.... by विनोद१८
थोडक्यात..
In reply to थोडक्यात.. by नाखु
यातल्या पहिल्या व्यक्तीला
In reply to यातल्या पहिल्या व्यक्तीला by काळा पहाड
दुसर्याला पुढची १२ वर्ष रोज
मोदींचे पुर्ण भाषण खालील
In reply to मोदींचे पुर्ण भाषण खालील by शिद
सांगायचेच राहीले....
वा! थोडक्यात परंतु नेमके मुद्दे विचारात घेणारा वृत्तांत.
In reply to वा! थोडक्यात परंतु नेमके मुद्दे विचारात घेणारा वृत्तांत. by चतुरंग
+१
In reply to +१ by आतिवास
निरीक्षणे
In reply to निरीक्षणे by विकास
अजून एक गोष्ट जाणवली:
In reply to निरीक्षणे by विकास
आक्षेप
विचारवंतआणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..." असे असावे.In reply to वा! थोडक्यात परंतु नेमके मुद्दे विचारात घेणारा वृत्तांत. by चतुरंग
धन्यवाद +
मी ही भाषण दूरदर्शन वर बघितले
In reply to मी ही भाषण दूरदर्शन वर बघितले by विवेकपटाईत
जाहीर विनंती...
धन्यवाद...
मोदींनी भारत पूर्ण पाहिला आहे
In reply to मोदींनी भारत पूर्ण पाहिला आहे by कंजूस
काळा फळा नाही
लाईव वृत्तांत छानच लिहला आहे,
In reply to लाईव वृत्तांत छानच लिहला आहे, by सखी
दिसतोय .चुकलं.
सुरेख वर्णन!
कविता मॅडम चा आवाज आणि
In reply to कविता मॅडम चा आवाज आणि by माझीही शॅम्पेन
बाप रे! नवरा आणि मुलालाही
In reply to बाप रे! नवरा आणि मुलालाही by रेवती
मोदींचे राजकारण हे नव्या
In reply to बाप रे! नवरा आणि मुलालाही by रेवती
ज्याचे त्याचे मत
In reply to ज्याचे त्याचे मत by प्रदीप
मी नाही ठरवले.
In reply to मी नाही ठरवले. by रेवती
बरोबर
In reply to बरोबर by प्रदीप
"जुगलबंदी" हा शब्द कदाचित
In reply to कविता मॅडम चा आवाज आणि by माझीही शॅम्पेन
अनेकांनी
In reply to कविता मॅडम चा आवाज आणि by माझीही शॅम्पेन
घुसवले?
In reply to घुसवले? by आजानुकर्ण
तुम्ही म्हणता ते 100% खर आहे
वृत्तांत खूप आवडला. आम्ही
In reply to वृत्तांत खूप आवडला. आम्ही by स्रुजा
+१
In reply to वृत्तांत खूप आवडला. आम्ही by स्रुजा
+१ स्रुजा
In reply to +१ स्रुजा by स्पंदना
भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा
In reply to वृत्तांत खूप आवडला. आम्ही by स्रुजा
अमेरिकन राष्ट्रपती भारतात
In reply to अमेरिकन राष्ट्रपती भारतात by ऋषिकेश
वास्तववीक
In reply to वास्तववीक by विकास
ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या
In reply to ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या by ऋषिकेश
माझ्यामते गेल्या दहा वर्षात
In reply to माझ्यामते गेल्या दहा वर्षात by निनाद मुक्काम …
सध्या भारतात एक मॉम मंगळावर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian GamesIn reply to वृत्तांत खूप आवडला. आम्ही by स्रुजा
मलापण
फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं .मला पण नाही आवडले , रादर , चीड आली . क्यामेर्यासमोर येण्याची ही कसली लाजिरवाणी हौस ? क्रिकेट्च्या म्याचच्यावेळी देखील लोक असेच करतात. अरे , तुम्हाला बघतोय का ? क्यामेरामन ने सहज क्यामेरा फिरवला त्यात तुमचे काय कर्तृत्व? मूर्खांनो हात कसले हालवताय ? कार्यक्रमाला तुम्ही आलात म्हणजे काय ग्रेट आहात का ? आणखी एक खटकलेली गोष्ट - सार्या जगात बॉलीवूड प्रचंड आवडते ! अश्या कार्यक्रमाच्यावेळी तथाकथित देशभक्तिपर गाणी त्या कार्यक्रमाच्या उंचीची नव्हती असे खेदाने म्हणावेसे वाटले. बॉलीवूड वाल्यांनी अपवादानेच देशभक्तीपर गाणी / संगीत बनविले आहे. त्या दिशेने काही जाणिव पूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. ज्या पद्धतीचे चित्रपट आपण बनवतो ( ९९% लव्ह / सेक्स / गुन्हेगारी / आणि एकूणच भडकपणा ) ते काही भारतीय संस्कृतीचे खरे चित्रण नव्हे ! पूर्वी साप - गारुड्यांचा देश अशी ओळख होती , आता एखाद्याला भारतात लोक बागेत झाडांना आणि बायकांना मिठ्या मारतात किंवा एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यन्त मारतात .. असा गैरसमज झाला तर आश्चर्य वाटायला नको ! वास्तविक भारतीयांचा शृन्गार फार तरल आणि अतीव संवेदनाशील असतो, ते एक काव्य आहे. पण आ़ज बॉलीवूड मधले चित्रिकरण पाहीले तर त्रयस्थ माणसाचे काय मत होईल? असो खूपच विषयांतर झाले , कार्यक्रम फारच देखणा झाला , भारतीय म्हणून अभिमान वाटला.In reply to मलापण by विटेकर
जर हॉलीवूड चे सिनेमे पाहून
वा
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
आधी कुठल्या पंतप्रधानाला असा
In reply to आधी कुठल्या पंतप्रधानाला असा by निनाद मुक्काम …
भोपाळ
In reply to भोपाळ by कपिलमुनी
भोपाळ दुर्घटने साठी कुठल्या
हिप्नॉटिस्ट
एक भारतिय म्हणून अभिमान
विकास,
आपल्या अनुभवचा हा वॄत्तांत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games