✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

#मोदीइनअमेरीका

व
विकास यांनी
Tue, 09/30/2014 - 00:07  ·  लेख
लेख
Modi in America
सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥ उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः .... कालाय तस्मै नमः ।
आज, वरील सुभाषित, वर्तमानाचे भान ठेवत काही शब्द बदलून, मराठीत, "ते रम्य शहर, ते पंतप्रधान, ते मंत्री आणि लोकप्रतिनिधी, पार्श्वभूमीवर ती विद्वानांची सभा, त्या चन्द्रमुखी युवती, तो तरूणांचा घोळका, ते भाटचारण तसेच माध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या कथा, हे सर्व पहात असताना परत परत कालाय तस्मै नमः," असे म्हणावेसे वाटत आहे. २८ सप्टेंबर २०१४ - न्यूयॉर्क आणि एकूणच अमेरीकेतील अनिवासी भारतीयांसाठी एक आठवणीत राहील असा दिवस ठरला आहे. बास्केट बॉल, आईस-हॉकी, महम्मद अली सारखे बॉक्सर्स, ब्रुस स्प्रिंगस्टीन सारख्यांच्या कॉन्सर्ट्स यांनी भरून जाणारे हे स्टेडीयम काल (२८ सप्टेंबरला) भारतीयांनी भरून गेले होते. ह्या स्टेडीयमच्या इतिहासात नक्कीच पण किंबहूना एकंदरीतच अमेरीकेत एखाद्या बाहेरील राष्ट्रप्रमुखाचे त्याच्या देशातील मूळ रहीवाशांनी केलेल्या एव्हढ्या मोठ्या स्वागताचा हा पहीलाच प्रसंग असावा. एकूण ४०८ विविध भारतीय संस्थांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे तिकीट मोफत होते. पण त्यासाठी आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आणि कुठल्या संस्थेकडून करत आहात हे सांगणे गरजेचे होते. रजिस्ट्रेशन नंतर प्रत्येक नावाची खात्री केली गेली आणि नंतर प्रिंटेड तिकीट दिले गेले. Ticket सगळ्यांना न्यूयॉर्कला येणे शक्य नव्हते, विशेष करून विद्यार्थ्यांना त्यामुळे १९ राज्यांमधल्या ४५ विद्यापिठांमधल्या भारतीय विद्यार्थी संघटनांनी थेटप्रक्षेपणा एकत्रित पहाण्याची विशेष व्यवस्था केली होती. तुमच्यातल्या अनेकांनी देखील हा कार्यक्रम इंटरनेटद्वारा पाहीलेला असू शकतो. पहाटे चार वाजता बॉस्टनहून निघालो आणि पार्कींग वगैरे मिळून सव्वा आठच्या दरम्यान मॅडीसन स्क्वेअर गार्डनच्या बाहेरच्या आवारात पोचलो तर मैलभर किंवा त्याहूनही मोठी रांग! सुरवातीस मोठी रांग पाहून सुरक्षेतून वगैरे वेळेत पोचू का अशी शंका होती पण व्यवस्था चांगली होती हे अनुभव आल्यावर समजले! Line १८,००० जागांचे हे स्टेडीयम भरले होते. त्यात अक्षरशः अबालवृद्ध, विविध भाषिक भारतीय, विविध धर्मिय, पंथीय दिसले. भारतात असताना भाजपाचे पारंपारीक समर्थक असलेले जसे यात होते तसे अगदी भाजपाचे पारंपारीक समर्थक नसलेले देखील होते. पण यातील प्रत्येकाला मोदींमुळे काही चांगले बदल घडतील अशी आशा किंबहूना खात्रीच आहे असे जाणवत होते. Crowd Crowd आत प्रवेश केल्यावर प्रत्येक तिकीटास एक अशा पध्दतीने एक टिशर्ट देण्यात आला. लहानसे अमेरीकन आणि भारतीय झेंडे पण वाटणे चालले होते. त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! मोदी ११:३० ला येणार होते. त्या आधी आत बसलेल्या मोठ्या जनसमुदायास खिळवून ठेवण्यासाठी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम झाले. नंतर कविता कृष्णमुर्ती यांनी काही गाणी म्हणली. ह्यातील एका गाण्याच्या वेळेस एक अमेरीकन चित्रकाराने रंगाचे फराटे मारत ज्या पद्धतीने मोदींचे चित्र काढले ते प्रत्यक्ष बघताना खूपच आवडले. जनतेने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. मिस अमेरीका २०१४४ निना दावुलूरी आणि अमेरीकेतील पब्लीक ब्रॉडकास्टींग स्टेशनचा वृत्त निवेदक हरी श्रीनिवासन हे कार्यक्रमाचे संयोजन करत होते. वातावरणात प्रचंड उत्साह दिसत होता. potrait मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर स्टेजवर अमेरीकन राजकीय नेत्यांना बोलावण्यात आले. त्यात जवळपास ३० सिनेटर्स, काँग्रेसमेन आणि साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर (भारतीय वंशाच्या) निकी हिली असे सर्व स्टेजवर आले. त्यांच्या उपस्थित मग मोदींचे स्वागत झाले! Welcome नंतर अमेरीकन आणि भारतीय राष्ट्रगीताने अधिकृत कार्यक्रमाची सुरवात झाली. Welcome National Anthem National Anthem मोदींच्या भाषणात एकाच वेळेस भारतीय, अनिवासी भारतीय आणि अमेरीकन राज्यकर्ते, धोरणकर्ते तसेच उद्योजक यांच्याशी संवाद करण्याचे कौशल्य जाणवले. भाषण केवळ गोडगोड नव्हते तर देश घडवण्यासाठी प्रत्येकाकडून सहकार्य मिळवण्याचे आवाहन त्यात होते. भाषण पूर्णपणे हिंदीत झाले. पण क्षणार्धात भाषांतर करून ते स्क्रीन वर सबटायटल म्हणून दाखवले जात होते. तसेच, स्वतः मोदी जनतेला भावेल अशा शब्दात बोलत असताना देखील त्यांच्या कौतूकाने ओतप्रोत भरलेल्या प्रसंगात देखील पाय जमिनीवरच ठेवून होते असे त्यांच्या हालचालींवरून समजू शकत होते. Thank you! कार्यक्रमानंतर अनेकांशी संवाद झाला तसेच फेसबूक अपडेट्स पाहीले. यातील अनेक जण हे कधीच भाजपाचे नव्हते, मोदींचे असण्याचा प्रश्नच नाही... पण तरी देखील यातील प्रत्येकास/प्रत्येकीस देशाला नेतॄत्व मिळाले असे वाटत होते. मोदींच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि जे काही बातम्यातून वाचले जात आहे त्यातून सतत काहीतरी वेगळा विचार आणि त्याबरोबर सक्रीयता दिसत आहे. जर हा आलेख सकारात्मक वाढत राहीला तर जनता केवळ मोदींवरच खुश होईल असे नाही तर जो काही राज्यकर्ते, सरकार या बद्दलचा भ्रमनिरास झालेला आहे, भारतीय व्यवस्थेबद्दल नैराश्य आले आहे, त्यातून बाहेर पडू शकेल असे वाटते. ते तसेच व्हावे अशी मनोमन प्रार्थना! माझ्या दृष्टीने स्टेजवर झालेले मोदींचे स्वागत, हे कार्यक्रमाचे एकाअर्थी शिखर होते. Welcome ज्या माणसाला मुळच्या त्याच्याच देशातील असलेल्या व्यक्तींनी राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला आणि अमेरीकेतील कधिही न वापरल्या गेलेल्या एका कायद्याचा वापर करत अमेरीकन सरकारला असलेला व्हिसा रद्द करायला लावला आणि जे अमेरीकन सरकारने देखील ऐकले, त्या माणसास आज त्याच्याच देशातील जनतेनी निर्विवाद बहुमताने निवडून दिल्यावर अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! ह्यात मोदींची प्रतिमा जशी स्पष्ट दिसत होती तशीच "मोदी भक्त" नाही तर मोदींनी घेतलेल्या आव्हानाचे आणि कार्याचे समर्थक असलेल्या अनिवासी भारतीयांचे अमेरीकेतील राजकीय सामर्थ्य देखील दिसू शकले. हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिक्रिया
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
28621 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

वृत्तांत आवडला

श्रीरंग_जोशी
Tue, 09/30/2014 - 00:17 नवीन
या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
Tue, 09/30/2014 - 00:24 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

1+

काउबॉय
Tue, 09/30/2014 - 00:49 नवीन
माझ्या मते मोदिनी जेष्ठाना डोक्यावर बसवले नाही की समाज आपल्या बाजूने यायची वाट बघितली नाही अतिशय गहन विचार करून रणनीति आखली विकास साधला प्रतिस्पर्ध्याना पेचात जखडले आणि आज ऑलमोस्ट देशाच्या सर्वोच्य स्थानी पोचले. म्हनुनच आज ते हे अमेरिकेत घडवू शकले. मराठी माणसांनी मोदींकडून बरेच शिकण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पर्फेक्ट

vikramaditya
Tue, 09/30/2014 - 09:12 नवीन
+१००००००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

अभिनंदन

अमित खोजे
Tue, 09/30/2014 - 02:45 नवीन
न्यूयॉर्कमध्ये असून या कार्यक्रमाला न गेलेला माझ्या सारखा करंटा मीच :( पण तुम्हाला उपस्थितीबद्दल अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

राघवेंद्र
Tue, 09/30/2014 - 21:49 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे

मस्त वृतांत.

प्रचेतस
Tue, 09/30/2014 - 00:17 नवीन
मस्त वृतांत. टिव्हीवर कालच हे भाषण पाहिले होते. पण तुमच्या 'आँखो देखा हाल' मुळे खुमारी वाढली.
  • Log in or register to post comments

खूप जबरदस्त भाषण केले.

खटपट्या
Tue, 09/30/2014 - 00:41 नवीन
खूप जबरदस्त भाषण केले. वॄतान्ताबद्द्ल धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

बढिया!

प्यारे१
Tue, 09/30/2014 - 00:53 नवीन
बढिया! बाकी स्टेडियमबाहेर काही घटना घडल्या म्हणे. त्या घटनांचं काय? (स्लोगन्स, नारेबाजी, धक्काबुक्की, टोप्या, पगड्या, बुरखे, काळे झेंडे आणि इ.इ.इ.)
  • Log in or register to post comments

हा घ्या..

नाखु
Tue, 09/30/2014 - 08:25 नवीन
http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his-fellow-media-persons-attacked-truth/ आणि हो ही बातमी फक्त झी न्यज वर दखिवली ईंडीया टुडे ई नी २ ओळीची देखील बातमी दिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

त्याचा व्हिडियो सुद्धा आहे.

वेल्लाभट
Tue, 09/30/2014 - 10:29 नवीन
त्याचा व्हिडियो सुद्धा आहे. बघितला असेल अनेकांनी. सरदेसाईंनी प्रथम आपण अँटी मोदी असल्याचं सिद्ध करत लोकांना उद्युक्त करणारे उद्विग्न करणारे प्रश्न विचारले, त्यांची यथोचित उत्तरं त्यांना मिळाली. त्यानंतर आटपतं घेताना त्यांनी एका व्यक्तीला 'अ‍ॅसहोल' असे संबोधले. व्हिडियोत स्पष्टपणे कळत आहे की ती व्यक्ती त्यास 'यू आर अ‍ॅन अ‍ॅसहोल टू' असं प्रत्युत्तर देते आणि नंतर सरदेसाई त्या व्यक्तीस धक्का देतात. इथेच उलट धक्काबुक्की होते. ट्विटर वरून जरी सरदेसाईंनी आपण स्वतः नामानिराळे होतो आणि लोकच कशी बेशिस्त, उद्दाम होती वगैरे भासवण्याचा प्रयत्न केला असला तरीही विडियोतून हेच अनुमान निघतं की दोष सरदेसाईंचाच होता, जो त्यांना भोवला. योग्य झालं. जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

स्वतःला

vikramaditya
Tue, 09/30/2014 - 18:22 नवीन
द फोर्थ एस्टेट म्हणवत सगळ्या जगाला आरोपीच्या पिंज-यात उभ्या करण्या-या आततायी मीडीया विषयी एक वेगळी चर्चा व्हावी असे वाटते. हा एक वेगळ्या प्रकारचा दहशतवादच म्हणायचा. ह्या सरदेसाईंना रा़ज ठाकरेंनी "धीस ईज इंटरव्ह्यु नॉट ईंटरॉगेशन' असे सांगीतले होते. समोरच्याला पूर्ण बोलु न देता, त्याच्या बोलण्याचा विकृत अर्थ काढणे आणि "ट्रायल बाय मीडीया" असले प्रकार हे लोक करतात. वर आपण हे देशाच्या नागरीकांसाठी करतो (टीआरपी साठी नव्हे) असा आव आणतात तो वेगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अमेरीकन राज्यकर्ते केवळ

रेवती
Tue, 09/30/2014 - 01:13 नवीन
अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! अगदी हेच वाटले, बर्‍याचजणांना असे वाटले असेल. वृत्तांत आवडला. मी मोदीभक्त नसले तरी त्यांचे काम एक पंतप्रधान म्हणून व्यवस्थित चालले असल्यास मोदी किंवा केजरीवाल असा फरक माझ्यासारख्या अतिसामान्य नागरिकाला पडत नाही.
  • Log in or register to post comments

जबरा

भास्कर केन्डे
Tue, 09/30/2014 - 03:31 नवीन
त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! -- आमच्या एका मित्राने शक्कल लढवली आणि थंड पेयाची प्लास्तीकची नळी आम्ही सर्वांनी खें झेंड्याला वापरली. कर्यक्रम एकंदर जबरा झाला. भारतीय म्हणून अभिमानाने छती "५६ इंची" झाली. ;)
  • Log in or register to post comments

वृत्तांत आवडला. विशेषतः

उगा काहितरीच
Tue, 09/30/2014 - 08:29 नवीन
वृत्तांत आवडला. विशेषतः शेवटचे दोन परीच्छेद.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा..!

प्रभाकर पेठकर
Tue, 09/30/2014 - 09:03 नवीन
एकूणात परिस्थिती आपल्या समर्थनात बदलण्याची जी अनोखी क्षमता श्री नरेन्द्र मोदींनी दाखविली त्या बद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच होईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून श्री मोदी पुढे आले आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून देशाच्या अपेक्षा अवाजवी पातळीपर्यंत उंचावल्या आहेत. येती ५ वर्षे ते भारतात काय काय बदल घडवितात त्यावर त्यांचे आणि भारतिय जनता पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. भारत अमेरिका संबंध तसेच भारत पाकिस्तान नाते एका वेगळ्या वळणावर उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. श्री. नरेन्द्र मोदी आणि भारतिय जनता पक्षाला अनेकानेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Tue, 09/30/2014 - 20:50 नवीन
त्यामुळेच त्यांच्याकडून देशाच्या अपेक्षा अवाजवी पातळीपर्यंत उंचावल्या आहेत. येती ५ वर्षे ते भारतात काय काय बदल घडवितात त्यावर त्यांचे आणि भारतिय जनता पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. अगदी १००% वास्तव आहे हे! (जमले नाही तर भाजपाला विस्तव आहे! ;) ). एकंदरीत लोकांशी बोलताना काय जाणवते तर मोदींकडून अवाजवी अपेक्षा असल्यातरी कुठेतरी भान आहे. कोणी म्हणतो, "पुढच्या काही वर्षात स्वच्छता आली तरी खूप झाले" तर काहींचे म्हणणे (मोदींच्या राज्यात) "भ्रष्टाचार (बर्‍यापैकी) कमी झाला तरी बरेच काही होईल. गेल्या काही काळात काही काँग्रेसविरोधी आणि भ्रष्टाचारविरोधी असलेल्या काहींना मोदी या दोन्ही विरोधात काही ठोस करताना दिसत नाही म्हणून राग आला आहे. (त्यात काही मोदी समर्थकही आहेत). पण मला वाटते, मोदी सुडाचे राजकारण जे विशेष करून ७७ सालात जनता पार्टीने अवलंबीले ते न करायचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो भ्रमनिरास जरी असला तरी योग्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सध्याचे भारतीय राजकारणातील

निनाद मुक्काम …
Wed, 10/01/2014 - 03:46 नवीन
सध्याचे भारतीय राजकारणातील दिशाहीन नेतृत्व ज्यांचे पायांना अकार्यशामातेचा पोलियो झाला आहे , भ्रष्टाचाराच्या दुर्धर रोगाने ग्रासलेल्या विरोधकांच्या समोर ह्या सरकारने केवळ भ्रष्टाचार न करता देखील भारतीय सरकार ५ वर्ष तग धरू शकते एवढे सिद्ध केले तरी पुढील ५ वर्ष ह्या सरकारला एकतर जनता बहाल करेल, मोदी ह्यांनी चाणाक्षपणे जनतेला पुढील १० वर्ष मागितली आहेत. अनिवासी भारतीयांच्या दोन कार्डाचे एकत्रीकरण हि मनमोहन ह्यांच्या काळातील संकल्पना तसेस विसा ऑन अरायावल सारख्या पर्यटन शेत्राला सुगीचे दिवस आणणाऱ्या योजना कागदावर राहिल्या होत्या त्या ह्या सरकारने प्रत्यक्षात आणल्या. तरीही काही कर्म दरिद्री मोदी विरोधक अश्या प्रसंगी मोदी हे मनोहन ह्यांच्या कल्पना चोरत आहेत अशी चेपू वर आवई उठवतात. हे पाहून अमळ गंमत वाटते , त्यांच्या भाषणात गांधींचा एवढा उल्लेख झालेला पाहून त्यांचे विरोधक आता आपण कोणाचे नावावर राजकीय पोळ्या पिकवायाच्या ह्या चिंतेत असतील. मोदी ह्यांनी माफी मागितली नाही , आपली राजकीय भूमिका , मतांवर ठाम राहिले , मते बदलावी लागली ती प्रगत देशांना सुजाण भारतीय मतदारांच्या मुळे हे शक्य झाले मोदी ह्यांचे अमेरिकेत आगमन होणे हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. फरीद त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याच्या अमेरिकी मिडिया मध्ये अमेरिकेने मोदी ह्यांना विसा नाकारण्याच्या मागे असलेले कारण किती फसवे दुटप्पी आहे हे आवर्जून सांगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

विकास,- झकास

सार्थबोध
Tue, 09/30/2014 - 09:22 नवीन
छान वर्णन , उपस्थित राहून पाहत आहे असा भास झाला, अत्यंत आभारी आहे
  • Log in or register to post comments

सहमत

vikramaditya
Tue, 09/30/2014 - 09:51 नवीन
"पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!"
चुका कोण करत नाही? झालेल्या चुका उगाळत न बसता, प्रचंड चिंतन करुन त्यांनी एक मार्ग शोधला आणि त्याच मार्गावर अविरत चालुन ते आज इथवर पोहोचले. केवळ पैसा ओरबाडण्याच्या नादात हीच संधी मोदींच्या अनेक समकालीनांनी गमवली किंवा त्यांची तेवढी कुवतच नव्हती असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

चुका?

आजानुकर्ण
Wed, 10/01/2014 - 18:14 नवीन
चुका कोण करत नाही? झालेल्या चुका उगाळत न बसता, प्रचंड चिंतन करुन त्यांनी एक मार्ग शोधला
कोणत्या चुका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya

भाषण ऐकायला मिळाले नाही -

ऋषिकेश
Tue, 09/30/2014 - 09:59 नवीन
भाषण ऐकायला मिळाले नाही - मात्र नंतर वाचले. छान झाले होते भाषण त्या भाषणापल्याड तिथल्या वातावरणाबद्द्ल, काही प्रसंग/संवादाबद्दल व इतर अनुभवांबद्दल वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

गांधी आणि मोदी!

ऋषिकेश
Tue, 09/30/2014 - 10:02 नवीन
बाकी मोदींनी गांधीजींची स्तुती केली आहे त्या भाषणात, त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले - त्यांनीच जनसामान्यांना चळवळीत ओढले - बाकीच्यांचे प्रयत्न एकेकट्याचे व लहान गटांपुरते मर्यादित होते असे विश्लेषण केले आहे. अर्थातच विश्लेषण योग्य आहे. मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!
  • Log in or register to post comments

मोदिना वास्तवाचे जबरदस्त भान आहे _/\_

काउबॉय
Tue, 09/30/2014 - 10:08 नवीन
तसेच कुठे काय खपते/खपवावे याची अक्कलसुधा... स्तुती योग्य गांधींची केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

याबद्दल अवांतर टाळणे योग्य

आनन्दा
Tue, 09/30/2014 - 10:29 नवीन
याबद्दल अवांतर टाळणे योग्य ठरेल. पण मोदीसमर्थक असले म्हणजे गांधीविरोधक असलेच पाहिजेत असे काही नाही. आणि, गांधीसमर्थक आणि गांधीहत्यासमर्थक या वेगळ्या गोष्टी आहेत. एक माणूस एकाच वेळेस गांधीसमर्थक आणि गांधीहत्यासमर्थक असू शकतो. असो. अवांतर थांबवतो, नाहीतर या धाग्याचे काश्मीर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मोदीसमर्थकांची मते जाणुन

मृत्युन्जय
Tue, 09/30/2014 - 12:38 नवीन
मोदीसमर्थकांची मते जाणुन घ्यायची इच्छा का झाली याबद्दल उत्सुकता आहे. मोदी समर्थक म्हणजे पर्यायाने गांधीसमर्थक किंवा गांधी विरोधक अशी घाऊक समजुत तर नाही ना झालेली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

नाही प्रत्येक मोदीसमर्थक

ऋषिकेश
Tue, 09/30/2014 - 13:44 नवीन
नाही प्रत्येक मोदीसमर्थक यापैकी एका गटात येतो अशी समजुत नाही. मात्र मला भेटलेले अनेक समर्थक यापैकी एका गटात येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

काड्या

कपिलमुनी
Tue, 09/30/2014 - 15:49 नवीन
चांगल्या धाग्यावर कशाला काड्या घालताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मी न्युट्रल आहे. काही बाबतीत

मृत्युन्जय
Tue, 09/30/2014 - 16:40 नवीन
मी न्युट्रल आहे. काही बाबतीत गांधींना मानतो. काही बाबतीत त्यांच्या चुका देशाला प्रचंड भोवल्या असे मानतो. माझ्या माहितीतले ९०% मोदी समर्थक असेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

कुठल्या कुठल्या चुका भोवल्या?

अनुप ढेरे
Tue, 09/30/2014 - 21:15 नवीन
कुठल्या कुठल्या चुका भोवल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अर्रे बापरे. गांधी चरित्रच

मृत्युन्जय
Wed, 10/01/2014 - 18:23 नवीन
अर्रे बापरे. गांधी चरित्रच उगाळावे लागेल. अगदी उदाहरणच द्यायचे तर असहकार चळवळ मागे घेतली त्याचे उदाहरण घ्या. अजुन बरीच आहेत त्यासाठी वेगळा धागा उघडावा लागेल (मी फाळणीबद्दल त्यांना दोषी धरत नाही. ती अपरिहार्यता होती हे इथे नमूद करु इच्छितो. तो मुद्दा अपेक्षित असेल तर माझा पास)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अजून कितीतरी चुका आहेत.

श्रीगुरुजी
Wed, 10/01/2014 - 21:03 नवीन
अजून कितीतरी चुका आहेत. तुर्कस्तानमधील खिलाफत चळवळीला पाठिंबा, स्वामी श्रध्दानंदाचा खून करणार्‍या रशीदला "भाई रशीद" म्हणून आपुलकी दाखविणे, पाकड्यांना ५५ कोटी देण्यासाठी उपोषण करणे, पंतप्रधानपदासाठी नेहरूंना पाठिंबा देणे ... यादी खूप मोठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>>> मात्र मोदीसमर्थकांचे

श्रीगुरुजी
Tue, 09/30/2014 - 20:56 नवीन
>>> मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे! मी मोदीसमर्थक असलो तरी मोदींचे प्रत्येक मत मला मान्य आहे असा याचा अर्थ नाही. मोदींनी गांधीजींची स्तुती केली म्हणून लगेच प्रत्येक मोदीसमर्थक त्यांच्या मताचे समर्थन करतीलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

नवीन नाही...

विकास
Tue, 09/30/2014 - 21:46 नवीन
मोदी गांधीजींबद्दल प्रथमच बोललेले नाहीत. गांधीजींबद्दलचे निरीक्षण हे योग्यच आहे आणि त्याबद्दल या संस्थळावर मी देखील आधी लिहीलेले होते (अर्थात मी काही पंतप्रधान नसल्याने लोकं विसरली असतील! ;) ) काँग्रेस ही प्रथम रावसाहेबांसारख्या हुच्चभ्रूंसाठी होते. टिळकांनी प्रथम सामान्यांमधे जनसंपर्क कसा करावा ह्याचा परीपाठ घातला आणि गांधीजींनी ते निर्णायकपणे (आणि स्वतंत्रपणे) जनआंदोलन केले आणि ते चांगलेच झाले. गांधीजींबद्दल जर कोणी "हिंदूत्व", "संघिष्ट" वगैरे विशेषण लागलेल्या व्यक्तीकडून कौतूक झाले तर लगेच आश्चर्य वाटते. आता "मोदी समर्थक" / "मोदी भक्त" हे अजून एक विशेषण आहे. ;) कुणाचेच कुठलेच विचार पूर्ण पटू शकत नाहीत. काही निर्णय हे कालांतराने बघताना आधी बरोबर वाटले असले तर नंतर चुकीचे वाटू शकतात अथवा आधी चुकीचे वाटलेले पण बरोबर वाटू शकतात... पण जर एखाद्या व्यक्तीवर टिका करणे निषिद्धच ठरवले असले तर सगळे बिघडते. मग ते स्वतःस मोदीभक्त म्हणणारे असोत अथवा गांधीवादी म्हणणारे तथाकथीत गांधीवादी असोत. अशाच गांधीवाद्यांनी गांधीहत्येनंतर तमाम निष्पाप लोकांचे आणि कुटूंबांचे हत्याकांड केले होते अथवा ज्यांनी तसे केले त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. (एकमेव अपवादः मोरारजी देसाई) आजही त्यांच्या नंतरच्या तिसर्‍या चौथ्या पिढीस जर का "हिंदूत्व" म्हणले अथवा तसे वाटले, तर जणू काही यांच्याच हातात बंदूक होती अशा थाटात आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. त्यात अजून भर म्हणजे "गांधी म्हणजे आमचेच" असे काँग्रेसजनांनी समजून आता गांधीजींचे नाव घेतले म्हणून मोदींवर टिका करणे... या असल्या कारणामुळे सामान्य जास्त गांधीविरोधात बोलतात. थोडक्यात विरोध हा गांधीजींपेक्षा भंपक गांधीवाद्यांना अथवा "गांधी के नाम" हिंसा अथवा भ्रष्टाचार करणार्‍यांच्या भोंदूगिरीस असतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+१

स्पंदना
Wed, 10/01/2014 - 06:35 नवीन
त्यात अजून भर म्हणजे "गांधी म्हणजे आमचेच" असे काँग्रेसजनांनी समजून आता गांधीजींचे नाव घेतले म्हणून मोदींवर टिका करणे... या असल्या कारणामुळे सामान्य जास्त गांधीविरोधात बोलतात. थोडक्यात विरोध हा गांधीजींपेक्षा भंपक गांधीवाद्यांना अथवा "गांधी के नाम" हिंसा अथवा भ्रष्टाचार करणार्‍यांच्या भोंदूगिरीस असतो.
कार्यक्रम पहात असताना हेच वेचार मनात आले. अगदी काँग्रेसने गांधीजी ही त्यांची मोनोपॉली असल्याचा जो अविर्भाव आजवर आणला होता तो मोडीत निघाल्याच जाणवल. गांधीजी आदरणिय आहेत अन राहतील. त्यांच्या जश्या चुका चर्चिल्या जातात तशीच त्यांची मुल्ये सुद्धा चर्चेत राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आपण गांधीजींना

ऋतुराज चित्रे
Tue, 09/30/2014 - 10:31 नवीन
आपण गांधीजींना काय दिले ? असे मोदिंनी आपल्या भाषणात विचारले. हे रामच्या गोळ्या कोणी दिल्या ?
  • Log in or register to post comments

अजून दोन गोष्टी दिल्या

विकास
Tue, 09/30/2014 - 16:48 नवीन
सरकारी भिंती आणि त्या भिंती समोरच्या टेबलाखालून दिल्या जाणार्‍या भारतीय चलनांच्या कागदावर त्यांच्या फोटो साठी जागा. असो. ह्या विषयावर चर्चा करायची असेल तर अवश्य वेगळा धागा काढूयात, येथे अवांतर ठरू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

निश्चित आर एस एस आणि भाजपा

विवेकपटाईत
Tue, 09/30/2014 - 20:01 नवीन
निश्चित आर एस एस आणि भाजपा वाल्यांनी नव्हत्या दिल्या.... एक खोटा प्रचार १९४७ होत आहे. खरे म्हणाल तर गांधीजींची स्वदेशी विचार धारा आर एस एस वाल्यांनी जिवंत ठेवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

...उत्तम वृतांत....!

विनोद१८
Tue, 09/30/2014 - 13:55 नवीन
श्री. विकास धन्यवाद व अभिनंदन या उत्तम वृतांकनाबद्दल.
हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
वरील अधोरेखित मुद्दा तर खचितच विचार करण्यायोग्य आहे. @....ऋषिकेश...."मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!" त्या पातळीवर मोदीसमर्थकांचे मत हे नेहमीच अनुकुल असेल, परंतु 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे' यांचे प्रामाणिक मत जाणुन घेण्यात रस आहे.
  • Log in or register to post comments

म्हणजे कोणाचे?

ऋषिकेश
Tue, 09/30/2014 - 14:22 नवीन
परंतु 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे' यांचे प्रामाणिक मत जाणुन घेण्यात रस आहे.
कशाबद्द्ल मत जाणून घेण्यात रस आहे? मी कायम मोदीद्वेष्टा नाही परंतु मला अयोग्य वाटेल तिथे अनेकदा मोदींच्या विरोधातील माझी मते मांडत असतो माझे मत चालणार असेल तर माझे भाषणाबद्दलचे मत वर दिले आहेच (की छान झाले भाषण). अर्थात माझे मत हे माझे आहे कोणत्याही गटाचे प्रतिनिधित्त्व करत नाही. बाकी, मला गांधींजी हे अत्यंत थोर लोकनेते वाटतात. एकेकट्याने काम करणार्‍या, अगदी प्रसंगी जीव ओवाळून टाकणार्‍या (राष्ट्रभक्ती नी स्वातंत्र्याची आस तीव्र असणार्‍या) क्रांतीकारकांपेक्षा गांधींनी देशातील अख्खे वातावरण- देशातील तळागातील व्यक्तीला - भारून टाकणे हे अधिक महत्त्वाचे कार्य होते अशासारखे मोदींचे म्हणणे माझ्या मताशी सुसंगतच असल्याने मला योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

टीका करणे वाईट नाहीच आहे, टी

आनन्दा
Tue, 09/30/2014 - 18:27 नवीन
टीका करणे वाईट नाहीच आहे, टी आर पी साठी टीका करणे वाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

...त्या मेडीसन गार्डनच्या सभेबद्दलच म्हणतोय मी....

विनोद१८
Tue, 09/30/2014 - 15:01 नवीन
.....झालेल्या सभेबद्दलच म्हणतोय मी. 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे ( व्यावसायिक विरोधक )' यामध्ये तुम्ही येत नाहीत, जे विधायक टिका करतात त्यांच्याबद्द्ल नाही बोलत मी. ज्यांना मोदींचे कार्यात कधीच काही चांगले दिसत नाही, अगदी सुपारी घेउन आल्यासारखे विरोध करतात किंवा तसे सोंग तरी घेतात, कदाचित हा त्यांच्या रोजीरोटीचा उद्योग असु शकेल असे कित्येक इथले व मिपाबाहेरचे लोक्स. या अशा लोकांची त्या मेडीसन गार्डनच्या सभेबद्दलची मते जाणुन घेण्यात मला रस आहे.
  • Log in or register to post comments

थोडक्यात..

नाखु
Tue, 09/30/2014 - 15:37 नवीन
मिपावरील थोर केतकर्-सरदेसाई-वागळेंचा (ज्यांना मोदींचे कार्यात कधीच काही चांगले दिसत नाही) अशा महाभागांची वाट पहाताय्.आपल्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

यातल्या पहिल्या व्यक्तीला

काळा पहाड
Tue, 09/30/2014 - 19:46 नवीन
यातल्या पहिल्या व्यक्तीला टोले बसलेले बघायची फार इच्छा आहे. फार विखारी जहरी फुत्कार असतात याचे. विनाकारण. बहुधा काँग्रेस कडून राज्यसभेची अपेक्षा असणार. कुठलीही चांगली राजकारणविरहीत चर्चा गढूळ करून टाकतो. आणि याच्या डोळ्यातच हिंदूत्वाबद्दल द्वेष दिसतो (जितका कदाचित सोनिया गांधीलाही नसेल). दुसर्‍याबद्द्ल काही कल्पना नाही कारण मी अर्णब गोस्वामी बघतो. तिसरा खरं सांगायचं तर पत्रकारच नाहिये. हा थोडासा मूर्ख कॅटेगिरी मध्ये येतो. आणि त्याला बहुधा आपण फार स्मार्ट प्रश्न विचारतो असं वाटंत असावं. कारण तसं त्याच्या चेहर्‍यावर दिसतं. लोकमत असेपर्यंत याचा आपला सवाल पहायचो कधी कधी. मी मराठी जॉईन केल्यापासून मी याला बघणं बंद केलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

दुसर्‍याला पुढची १२ वर्ष रोज

प्रसाद१९७१
Wed, 10/01/2014 - 09:28 नवीन
दुसर्‍याला पुढची १२ वर्ष रोज जाहीर एकदा तोंडात मारायला पाहीजे. २००२ पासुन तो मोदींविरुद्ध खोटी गरळ ओकतो आहे. अगदीच हीन वृतीचा माणुस आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मोदींचे पुर्ण भाषण खालील

शिद
Tue, 09/30/2014 - 15:56 नवीन
मोदींचे पुर्ण भाषण खालील विडीओमध्ये पाहता येईल अथवा येथे टिचकी मारून युट्यूबवर पहा.
  • Log in or register to post comments

सांगायचेच राहीले....

शिद
Tue, 09/30/2014 - 16:04 नवीन
मोदींचे भाषण एकदम जबरदस्त होतं. सभागृहातील वातावरण अगदी मोदीमय झालं होतं. मोदी एक चांगले नेता तर आहेतच पण चांगले वक्ता देखील.
पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
+१०००...सहमत. मोदींना पुढील वाटचाली साठी भरपूर शुभेच्छा. विकास, तुम्हाला तेथे प्रत्यक्ष हजर राहून भाषण ऐकण्याची संधी मिळाली त्याबद्दल अभिनंदन. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

वा! थोडक्यात परंतु नेमके मुद्दे विचारात घेणारा वृत्तांत.

चतुरंग
Tue, 09/30/2014 - 17:31 नवीन
अमेरिकास्थित भारतीयांच्या मदतीने मोदींनी त्यांचा ब्रँड अगदी ताकदीने सादर केला. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात तुमचा छाप उमटेल अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करणे गरजेचे झाले आहे त्याचे भान मोदींनी ठेवले. भाषण थोडेच ऐकले आणि ते बरेच प्रभावी झाले असावे असा एकूण सूर दिसला. आवर्जून हा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद विकास! :)
  • Log in or register to post comments

+१

आतिवास
Tue, 09/30/2014 - 19:18 नवीन
या प्रसंगी लोकांचे प्रतिसाद, आपापसातील चर्चा याविषयी तुमचे अनुभव वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

निरीक्षणे

विकास
Wed, 10/01/2014 - 02:06 नवीन
या प्रसंगी लोकांचे प्रतिसाद, आपापसातील चर्चा याविषयी तुमचे अनुभव वाचायला आवडतील. वर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे मी ज्यांच्याशी बोललो त्यांना भाषण प्रभावी वाटलेले दिसले, पण काही जणांना ते भारतातील भारतीयांना अधिक उद्देशून असल्यासारखे वाटले आणि अजून अनिवासी भारतीयांसाठी "अ‍ॅक्शन आयटम्स" असायला हवेत असे वाटले. थोडक्यात आपण काहीतरी भारतासाठी करावे असे जे आधी वाटत होते ते कदाचीत प्रत्यक्षात येऊ शकेल असे वाटताना दिसले. मला माहीत असलेले अनेक जण हे मोदी समर्थक काय भाजपाचे आधी मतदार पण नव्हते. पण यावेळेस काँग्रेस आणि म्हणून युपिएने नक्कीच कायमचे भ्रमनिरास केले. मोदी हे नक्कीच काम करण्यात स्वतःच पुढे रहात असल्याचे दिसल्याने या सर्वजणांचा आशावाद आणि उत्साह वाढलेला दिसला. (ऐकल्याप्रमाणे मोदी शुक्रवारी अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक रात्री केवळ ४ तासच झोपले आहेत. बाकी वेळ काम आणि भेटीगाठी). काही ३०शीच्या आतील तरूणांशी बोललो त्याप्रमाणे त्यांना त्यांचा सेंट्रल पार्क मधील ग्लोबल सिटीझन्स फेस्टीवल मधील सहभाग पण खूप भावल्याचे जाणवले. अजून एक गोष्ट जाणवली: अनेकांसाठी मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे जुन्या कडवटपणाला आलेले एक प्रकारचे closure होते. अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून केवळ मोदींनाच बदनाम केले नव्हते तर इथल्या सामान्य जनतेला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू संघटनांशी संलग्न असतील त्यांना देखील बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता (guilt by association). जर मोदींना व्हिसा न मिळणे हे ह्या (मूळच्या भारतीय) डाव्यांसाठी विजय होता तर मोदींचे जिंकणे, सन्मानाने इकडे येणे हे इथल्या तमाम भारतीय जनतेसाठी वर म्हणल्याप्रमाणे closure होते. विविध क्षेत्रातील आणि आचार-विचारांच्या भारतीयांच्या ४०८ संघटना जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा आत्तापर्यंत फुटीचे समाजकारण करणार्‍या येथील (मूळच्या भारतीय) डाव्यांना मिळालेले सकारात्मक उत्तर होते. मोदींना डिप्लोमॅटीक व्हिसामुळे इथले कोर्ट समन्स बजावू शकत नव्हते. म्हणून जो कोणी त्यांच्या हातात ते ठेवेल त्याला $१०,००० चे बक्षिस इथल्या डाव्या जनतेने जाहीर केल्याचे ऐकले होते. पण ते किमान अजून तरी करू शकलेले नाहीत असे दिसतयं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा