कारण 24. Qe5 असा वजीर पुढे काढल्यानंतर मॅग्नुसची घोडा एफ ६ शह अशी धमकी आहे आणि राजा-हत्ती यांना बसलेल्या फोर्कमुळे हत्ती पडेल! बरं हत्ती वाचवावा म्हणून आनंद हत्ती राजाच्या जवळ घेऊ शकत नाही कारण मग घोडा एच ६ शह आणि मात!!
त्यामुळे आनंदने घोडा मागे घेऊन Ng7 मॅग्नुसच्या वजिरावर हल्ला केला. शिवाय राजाला बचावासाठी एच स्तंभात सुरक्षित घर निर्माण झाले. आता पांढरा वजीर एफ स्तंभ सोडून कुठेच जाऊ शकत नाही कारण मग हत्तीने हत्ती मारुन आनंद शेवटच्या पट्टीतली मात करेल! शिवाय आता आनंदचा घोडा मधून निघाल्यामुळे आधीची घोडा एफ ६ शह अशी धमकी होती ती कुचकामी झाली कारण आनंद त्याच्या वजिराने एफ ६ वरचा घोडा मारेल. कारण मग मॅग्नुस आनंदचा वजीर घेऊ शकत नाही पुन्हा बॅकरँक मेट आहेच!!
त्यामुळे पुढच्या 25. Qxe8+ Nxe8 26. Rxe8+ Qxe8 27. Nf6+ Kf8 28. Nxe8 Kxe8
इथप र्यंत खेळ्या अनिवार्य होत्या.
काही गोष्टी लक्षात आल्या.
एकतर ५ आणि ६ डाव हारल्यामुळे जो आत्मविश्वास गमावला होता तो थोडातरी ७ व्या डावातल्या बरोबरीने भरुन निघायला मदत झाली.
आठव्या डावात आनंदकडे काळी मोहोरी होती त्यामुळे काळ्याकडून बर्लिन खेळताना पांढर्याकडून काय चाली होतात हे जोखण्याची ही नामी संधी होती. कारण आधीच्या दोन्ही वेळेला बर्लिन झाला त्यावेळी मॅग्नुस काळ्या मोहोर्यांनी खेळत होता. त्यातल्या एका वेळेला आनंद हारला होता! ते समजल्यामुळे आता पुढच्या डावात बर्लिनवर सणसणीत तोडगा काढणे किंवा ज्यात बर्लिन डिफेन्स होत नाही असे ओपनिंग करणे असे दोन स्पष्ट पर्याय समोर आहेत. शिवाय मधे एक सुट्टीचा दिवसही आहे आणि आनंदची पांढरी मोहोरी सुद्धा आहेत!
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नववा डाव मात्र महत्त्वाचा आहेच आहे. कारण यानंतर फक्त ११ वा डाव पांढर्याचा आनंदला मिळेल.
जे काय करायचे आहे ते आता नवव्या डावातच सुरु करावे लागणार हे निश्चित! त्यामुळे माझ्यालेखी अजूनही आशा सोडायला नको, काम भलतेच कठिण आहे परंतु अशक्य नाहीये!
घरची तयारी आणि नैसर्गिक खेळ यांची सांगड जर आनंदला घालता आली तर परवाचा डाव त्याचाच असेल.
गुडलक आनंद!! :)
प्रतिक्रिया
आत्ताचा आपल्यातील चेसचा डाव मी जिंकलो कारण
हाहा.
:) डोंट वरी शेवटच्या खेळी पर्यंतची फाइल माज्याकड़ सेव आहेे
चालेल की. त्यात काय.
[Event "Cloudroid Chess
ती खेळी कार्लसनला अनिवार्यच होती
उत्तम विश्लेषण!
सातव्या आणि आठव्या डावाचा शांतपणे विचार केल्यावर
अवघड आहे