आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली.
नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय.
अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??!
पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं.. त्याच्या कुशीत झोपायला शिरतं. आईकडे जास्त जात नाही.
दादा हा ताईदेखील असू शकेल.. :)
आणि उरलेलं तिसरं (मधलं.. म्हणजे २ नंबर) पिल्लू मात्र मम्माज बॉय आहे. ते कायम आईच्या पंखाखाली.
लहान्या आणि मोठ्याला पंखातून सुटका करुन मोकळ्यावर खेळायची हौस.. तर मधला मात्र आईच्या पदरात सदैव दडून.. बाहेर आला तरी नुसतं डोचकं बाहेर काढून अंदाज घेतो आणि आत दडतो.
थोडक्यात मोठा दादा आणि शेंडेफळ (आत्तापावेतोचं) यांचा कंपू झालेला दिसतो. व्हिडीओ नीट पाहिलेत तर मी काय म्हणतो कळेलच. एकदोनदा तर मला दादा (अर्थात त्याचं स्वतःचं हादडून झाल्यावरच बहुधा..) त्याच्या छोट्या दोस्ताला खायला मदत करतानाही भासला. आणखी निरीक्षणाने पक्कं सांगता येईल.
३१ ऑक्टोबर..
१. आधी बघा एक थोडा मोठा व्हिडीओ. यात आई आणि पोरं यांच्या दिनचर्येतला काही भाग.. शिकारीचे लचके, पोरांची मागणी, घुबडाईची स्वतःची साफसफाई... आणखीही काही दिसलं तर मला कळवा. हा व्हिडीओ फक्त थोडा जास्त वेळ तुम्हाला या घरात डोकावता यावं यासाठी.
२. हा व्हिडीओ दिवाळीत काय होईल याची झलक दाखवतो. शेवटपर्यंत पाहिला तर आधी एक सुतळी बॉंम्ब किंवा लक्ष्मीतोटा उडल्यावरची रिअॅक्शन.. थोडीशीच.. आणि नंतर फटाक्यांची माळ वाजल्यावर मात्र एकदम दचकून चला रे पंखांखाली.. मस्ती बास आता.. असा घुबडाईचा पोक्त इशारा..
३. बिग ब्रदर ईटिंग लंच.. डिस्टर्बन्स नको.. घुबडाईकडे चिर्र चिर्र अशा आवाजांनी मागणी केली जाते आणि ती आणलेल्या शिकारीचा एक लचका तोडून पिल्लांना देते. पिल्लं गुणी आहेत. आ करुन भरवण्याचा हट्ट न धरता आपापली हाताने जेवतात.. (लिटरली.. पिल्लांचे पंजे प्रचंड आहेत.. ते लचका पंजात पकडून किंवा पंजे त्यात रोवून त्यावर बसून चोचीने आपापले खातात.) माझी अशी समजूत होती की त्यांना चोचीत भरवावं लागत असेल. अर्थात मोठं झालेलं पिल्लू अशा रितीने खात असेल हीदेखील शक्यता आहेच.
४. बिग ब्रो झोपलाय. त्याचा छोटा चाहता त्याला ढोसकलतोय. त्याच्यावर चढायचा प्रयत्न करतोय. इतकावेळ ते दोघे एकमेकांशी काहीतरी ढकलाढकली करत होते. त्यानंतर मोठा भाऊ झोपला. तेव्हा लहान बाळ "माझ्याशी अजून खेळ ना रे.. " असं म्हटल्यासारखं मला वाटलं.
५. मला माझ्या वाट्याचा लचका दे अशी घुबडाईकडे बडादादाची तीव्र मागणी आणि लचका तोडून मिळाल्यावर संतोष पावून तो कोपर्यात नेणे. (कोपर्यात घेऊन निवांत खात बसण्याचा भाग व्हिडीओत आलेला नाही.)
पिल्लं घशातून कसलातरी वेगळाच सीर्र सीर्र अशा आवाज करतात. तो यातल्या बर्याचशा व्हिडीओजमधे ऐकायला मिळेलच. पण त्या आवाजाने त्यांची शांतताप्रेमी आई वैतागते आणि त्यांना पंखाखाली घेऊन आणि अर्रर्र किंवा तत्सम दबक्या आवाजात दामटते असं दिसलं. केवळ खाणं / भक्ष्य इतकाच इंटरेस्ट न राहता आता त्या पिल्लांना (निदान थोरल्याला) खेळण्यातही रस उत्पन्न झाला आहे असं वाटतंय. एक रंगीबेरंगी चिंधी मिळाली आहे त्यांना. ती फाडत बसतात.
बाकी अपडेट उद्या किंवा जसाजसा लाभेल तसा. साधारण कालक्रमानुसार आणखी एक पिल्लू उद्या यायलाच हवं.
भेटू..
वाचने
62672
प्रतिक्रिया
187
मिसळपाव
प्रतिक्रिया
गवि द ग्रेट..
कसली गोड आहेत पिल्ल! मस्तच!
वा! क्या बात है।
गवी
भारीच
ग्रेट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
17 November 2013
:)
In reply to 17 November 2013 by गवि
सुन्दर
In reply to 17 November 2013 by गवि
खरंच देखणी दिसताहेत.
In reply to 17 November 2013 by गवि
छान
In reply to 17 November 2013 by गवि
+१
:)
मस्तच!
गवि हल्ली पालकत्व कोणाकडे आहे
पालकत्व मूळ पालकांकडेच आहे.
In reply to गवि हल्ली पालकत्व कोणाकडे आहे by स्पंदना
हुश्श्य!
In reply to पालकत्व मूळ पालकांकडेच आहे. by गवि
नवीन
नवीन फोटों टाका ना प्लिज...
२२ नोव्हेंबर.. सकाळची वेळ झोपण्याची..
गुड मॉर्निंग
In reply to २२ नोव्हेंबर.. सकाळची वेळ झोपण्याची.. by गवि
छान
In reply to २२ नोव्हेंबर.. सकाळची वेळ झोपण्याची.. by गवि
धन्यवाद...
In reply to २२ नोव्हेंबर.. सकाळची वेळ झोपण्याची.. by गवि
*****
छान धागा!
वाचतोय,व्हिडियो पाहतोय.
गवी सर, पुढे काही अपडेट्स असतील तर प्लीज टाका.
२५ नोव्हेंबर...
हे चित्र नंबर वन ! मी किती
In reply to २५ नोव्हेंबर... by गवि
बाकी घरट्यात गुटख्याचे पाकीट दिसत असल्याने यांचे पिताश्री येतजात असावेत असं दिसतंय...+Dमस्तं घुबी.
In reply to २५ नोव्हेंबर... by गवि
जबरदस्त!
In reply to २५ नोव्हेंबर... by गवि
हायला! घुबडं पण गुटखा खातात
काही फोटो पुन्हा एकत्रित ..
झक्कास!
In reply to काही फोटो पुन्हा एकत्रित .. by गवि
पालकांची जबाबदारी.... मर्यादित.
In reply to झक्कास! by पैसा
ये जवानी....
In reply to काही फोटो पुन्हा एकत्रित .. by गवि
गविशेठ , ही लेखमाला /
सुपर्ब..
केव्हढ उंच आहे घुबडु.
२७ नोव्हेंबर्..पहिल्यांदाच कम्फर्ट झोन सोडला..
सहीच्च.
In reply to २७ नोव्हेंबर्..पहिल्यांदाच कम्फर्ट झोन सोडला.. by गवि
क्लासच!
वाढता वाढता वाढे....
+११११११११११११११११११११११११११११
In reply to वाढता वाढता वाढे.... by प्रभाकर पेठकर
काही अपडेट्स?
+१
In reply to काही अपडेट्स? by पैसा
३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या..
वा!
In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
गवि, हे सगळं वाचतोय. आसुसून
In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
खरंच बिका!
In reply to गवि, हे सगळं वाचतोय. आसुसून by बिपिन कार्यकर्ते
+1
In reply to गवि, हे सगळं वाचतोय. आसुसून by बिपिन कार्यकर्ते
एक पाय असाच टक करायची सवय
In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
एका पायावर उभं राहणं हा दुसर्
In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
एका पायावर उभं राहणं हा दुसर्या पायाला विश्रांती देण्याचा प्रकार आहे की उगीच आपली स्टाईल हे माहीत नाही.आँ ! तुमाला "पक्षीयोगा" म्हाईत नाय ? ते त्योच करत्यात न्हव? ;) बाकी ही नविन पिढी आईबापांच्या सततच्या सहवासाविना मस्त वाढतेय हे बघून गार्गार वाटलं !सुन्दर........
In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
पुढचे अपडेट्स नवीन धागा काढुन
अपडेट देत राहा. प्रत्येकवेळी
बघतोय प्रतिसाद..
आपण तरी आपले(म्हणजे आईचे)
एक दिवस तुमचा 'रिचर्ड पार्कर'
असेच म्हणतो.
In reply to एक दिवस तुमचा 'रिचर्ड पार्कर' by गणपा
रिचर्ड पार्कर>>>>>>>>>>>>>
In reply to एक दिवस तुमचा 'रिचर्ड पार्कर' by गणपा
टॅगिंग, बारसे
नवीन फोटोंची वाट पाहत आहोत.
सांगता येत नाही.
In reply to नवीन फोटोंची वाट पाहत आहोत. by रुस्तम
हेहेहे....
In reply to सांगता येत नाही. by प्रभाकर पेठकर
११ डिसेंबर.. धाकटाही मोठा झाला..
मस्तं.
In reply to ११ डिसेंबर.. धाकटाही मोठा झाला.. by गवि
लहान्याच्या चेहर्यावरील
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
.....सुपरहिट......
In reply to ११ डिसेंबर.. धाकटाही मोठा झाला.. by गवि
हा हा हा एकच नंबर! फुल
In reply to .....सुपरहिट...... by कानडाऊ योगेशु