Skip to main content

आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 28/10/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते. तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो . मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्‍या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे----- कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33207
प्रतिक्रिया 261

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

तु बायको कडुन पीडित नाहीस सबब तुला इथे बोलण्याचा आवश्यक अनुभव नाही.
आरोपींनी आरोप स्वतःच कबूल केला आहे रे बॅट्या! :-)

In reply to by किसन शिंदे

ठ्ठ्ठ्ठ्ठो!!!!!!!!!!!!!!!!!!! हे लक्षातच आलं नव्हतं किसनद्येवा, तुमच्या पायांची हाय रेझोल्यूशन स्क्यान करून ईमेलवा, प्रिंटून फटू फ्रेममध्ये लावतो ;) शेवटी आरोपीने गुन्हा कबूल केलाच म्हणायचा तर =))

In reply to by पैसा

हा अवांतर प्रश्न आहे. त्याबद्दल धागा काढला तर तिथे मत नोंदवेन ;) तूर्तास बायकोशाहीबद्दल बोलणे चालू आहे, नही चलेगी नही चलेगी!!

In reply to by पिलीयन रायडर

समस्त स्त्री जातीच्या वर्चस्वाचं प्रदर्शनच चाललंय जणू.... बघा बघा, नवर्‍यांना असं फडकं घेऊन घर पुसायला लावणं हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे. हा सरळ सरळ पुरुष जातीवर अन्याय आहे. कसलं कोमल हृदय नि कसलं काय! बसाल्ट (सह्याद्रीचा कातळ) बरा च्यामारी.

In reply to by प्यारे१

पाषाणहृदय हा शब्दप्रयोग पाषाणाचा अपमान करणारा असल्याची तक्रार या निमित्ताने नोंदवीत आहे ;)

In reply to by प्यारे१

डॉ. खरे जे लहन मुलांविषयी बोलतात तेच नवर्‍यालाही लागु झाहे. इथे हळवेणा उपयोगाचा नाही !! चांगलं बदडलं पाहीजे..!! सुतळ्या, दोरखंड घेऊन यायला पहिजेत!! आणि त्या दृष्टीने कथा पण येत आहेत हल्ली मि.पा वर (गाईडलाइन्स यु नो..) (अवांतरः- बॅट्याच्या लग्नात काही कथांच्या प्रिंटाऔट देणारे मी त्याच्या बायकोला. "ह्याला खुप खुप आवडली आहे ही कथा" म्हणुन!!) ह.घे रे बॅट्या..

In reply to by पिलीयन रायडर

आणि त्या दृष्टीने कथा पण येत आहेत हल्ली मि.पा वर (गाईडलाइन्स यु नो..)
चला, उलट्या दिशेच्या काही कथांचे भाषांतर पाडीन म्हणतो ;) बाकी मी ह.घे.प. (हलके घेण्यात पटाईत) आहे, कल्जि नसावी.

In reply to by प्यारे१

नवर्‍यांना असं फडकं घेऊन घर पुसायला लावणं हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे आयला प्यारे फडकं घेउन नाही पुसायचे तर कसे पुसायचे रे मग? आता अंगातला बनियान काढुन पुसायचं की काय?

In reply to by मृत्युन्जय

काय राव मृत्यूंजय तू पण? प्रश्न फडकं अथवा बनियनचा आहे का? प्रश्न घर पुसण्याचा आहे! बाकी फडक्याचं डिटेलिंग करण्याचा मान पिलीयन रायडरचा. आम्हाला कुठलं रे एवढं सुचायला? आम्ही एकदा एका कपड्यानं बूट पुसले. नंतर ४ दिवस डोळे पुसावे लागले. आधी बायकोचे पुसण्याचा प्रयत्न केला, नंतर स्वतःचे पुसत बसलो. 'तिकडून' आलेलं काही होतं म्हणे! बाकी तुझी पुरुष पार्टीच ना? का हल्लीचा हुच्चभ्रू पुरुष आहेस? ;) ह. घ्या. -लग्नापूर्वी वेळेला पुरणयंत्रातून पुरण काढून दिलेला प्यारे

In reply to by पैसा

वकिली करायची तर लॉजिक पाहिजे. माणसामधले लॉजिक मेले म्हणजे तो लग्न करतो. मग फारतर तो पोराला वकील बनवण्याची स्वप्ने पाहु शकतो. स्वतः वकिली नाय करु शकत. त्यामुळे लॉजिक जिवंत असलेला अविवाहित ब्याट्याच योग्य ते प्रतिनिधित्व करु शकतो.

In reply to by मृत्युन्जय

सपोर्टबद्दल धन्यवाद मृत्युञ्जयजी!! आपल्या सारख्यांच्या सपोर्टनेच वकिली होवू शकते ;)

बाप रे ! गडाबडा लोळ्णारी स्माइली आहे कुणाकडे ;) एक से एक प्रति. पाउस नुसता , मी काय म्हणते सर्व पुरुष वर्षभर आयतच खाता मग दिवळीला थोडा हातभार लावला कामात तर लगेच पोटात दुखायला लागले ;) लगेच पुरुष मुक्ती धागा ? बाबा पाटील कीती आळशी ओ तुम्ही :p काकुला नाव सांगु का तुमचे ? ऑ ;)

In reply to by पियुशा

बघा, बघा.........अविवाहित म्हैलांनी प्रतिक्रिया दिलेली चालते तर अविवाहित पुरुषांनी काय झुरळ मारलंय हो आँ? ;)

In reply to by बॅटमॅन

ब्याट्या ......अविवाहीत " महिला " कुणाला म्हणालास रे ? कन्या म्हण हव तर ;)

In reply to by बॅटमॅन

म्हैला नको रे म्हणु. ते एक तर म्हैस म्हटल्यासारखे वाटते किंवा मैला म्हटल्यासारखे वाटते.

In reply to by मृत्युन्जय

उच्चार तसाच आहे ना? आपल्यापैकी कितीजण महिला हा शब्द उच्चारताना म आणि हि एकदम शेप्रेट उच्चारतात? ते रूप शुद्ध लिहिलेले पाहून विचित्र वाटते, इतकेच. :) बाकी खेळ मनाचे ;)

In reply to by पियुशा

ओके, विषय काय होता ;) (विषय जाणण्यास उत्सुक-साला कोण रे तो समास बनव म्हणतोय) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

तसे माझ्या पाहण्यात बरेच जण आहेत जे आपल्या कुटुंबाबद्दल म्हैला आणि म्हैस हे शब्द आलटुन पालटुन वापरतात.

In reply to by मृत्युन्जय

हम्म (हा महिषोद्गार नाही याची नोंद घेणे) ते स्वतःचे कुल भार्येवर आरोपित करीत असतील.

In reply to by पियुशा

म्हैस वरून एक किस्सा आठवला. आमचा मेहुणा सिंगापूर हून मुंबईत येत होता. त्याने दिल्लीला विमान बदलले आणि एअर इंडिया चे विमान घेतले. त्यात आपल्याबरोबर कप्तान अमुक तमुक आणि हवाई सुंदरी मिस अमुक तमुक अशी घोषणा झाली. मेहुणा तिच्या आकाराकडे बघून हळूच पुटपुटला कि मिस नव्हे म्हैस म्हणा. तर अर्धे विमान हसले. मग त्याच्या लक्षात आले कि आपण आता आंतर राष्ट्रीय नव्हे तर अंतर्देशीय आणि मुंबईला जाणार्या विमानात अहोत.

In reply to by मृत्युन्जय

@म्हैला नको रे म्हणु. ते एक तर म्हैस म्हटल्यासारखे वाटते किंवा मैला म्हटल्यासारखे वाटते.>>> =)) अगागागागागागा.....! =)) दिवंगत झालो आहे. =))

In reply to by पियुशा

सर्व पुरुष वर्षभर आयतच खाता आँ? आँ?? आँआँ?????? च्यामारी मी समजत होतो इथे दिवसभर पडीक असतात त्या अर्थी सगळे लोक कामधंदा करणारे असतील. हापिसातले फुकट नेट वापरणारे असतील. स्वतःच्या (पक्षी: बायकोच्या असणार कारण स्वतः तर आयतच खातात) पैशाने नेट वापरुन लोक इतका वेळ मिपावर येतात म्हंजे भारतात क्रांती झाली म्हनायची.

तु बायको कडुन पीडित नाहीस सबब तुला इथे बोलण्याचा आवश्यक अनुभव नाही.
आरोपींनी आरोप स्वतःच कबूल केला आहे रे बॅट्या! :-)

In reply to by किसन शिंदे

आत्ता शोध लागला..? वरचे प्रतिसाद पहा की.. राबवुन तर घेणारच.. नो डाऊट..

In reply to by बॅटमॅन

काय म्हणुन? तु विवाहीत नाहिस.. तु बायको कडुन पीडित नाहीस तरी एवढी बडबड करत सुटलाएस.. मी किमान आरोपी तरी आहे. शिवाय बोलणे हा माझा(च) जन्मसिद्ध(च्)...वगैरे वगैरे तर आहे (च)..

In reply to by पिलीयन रायडर

फिर्यादींची वकिली करण्याला स्वतः फिर्यादीच असावे लागते असा नियम नाही. तदुपरि, प्रतिसादातून चिडचीड स्पष्ट जाणवतेय =)) इतकं नका हो चिडू, मौस फेकून मारशिला कुणालातरी ;) च च च ची बाराखडीही उत्तमच.

In reply to by बॅटमॅन

तुझं लग्न झाला की ह्या सगळ्याचा कडता बरोब्बर काढला जाईल.. (समर्पणच्या प्रिंटाऔटचा गठ्ठा आणि त्यावर तुझे प्रतिसाद हाय लाईट केलेले, असा गिफ्ट बॉक्स रेडी आहे!)

In reply to by पिलीयन रायडर

'कडता' लै दिवसांनी हा शब्द ऐकला. धारवाडास चकावची खेळलेले इसवी सनपूर्व दिवस आठवले.

काय सांगू पीपू लोक्स ( पीडीत पुरूष ) .कल्पनेत नाही तर सत्यात ते भांडी घासणे विसळणे,किचन साफ करणे सगळे करून आता कुठे मिपावर येतोय. पण मी पीपू नाय बा ! कारण कुटुंबाला कामाला लावायची आयडियाच माझी. अरे ८० टक्के त्याना करायला लावायचं २० टक्क्केच आपण करायचं आसली आपुनकी पोळीशी असते राव !

दिवाळीच्या आधी दोन्-चार दिवस सटकायचं कामानिमित्त बाहेर आणि दिवाळीत बरोब्बर टपकायचं.. 'तिकडून' अगदीच बोलाचाल झाली तर आउटसोर्स करुन टाक सांगून स्वतः ही मोकळं व्हावं, तिला पटलं तर करेल स्वतः नाहीतर करुन घेईल.. निदान सणासुदीच्या दिवसात दोन चार रिकाम्या हाताना काम असं वर समजाववं तिला! हां पण पाडव्याला अंग रगडून घेतलं सकाळी की संध्याकाळी ओवाळणी क ड क झालीच पाहिजे नाहीतर धडगत नाही ;)

मी काय म्हणतो, २१व्या शतकात दिवाळी फिवाळी सण साजरे करायचेच कशाला?

अर्रे! आमच्याकडे उजाडेपर्यंत (दोन्ही अर्थी) धाग्याने दंगा उडीवलाय राव! बाबा पाटील यांनी अनेक पिपूंना मने मोकळी करायला संधी दिल्याबद्दल त्यांना बर्‍याच शुभेच्छा मिळाल्या असणार.

दुपारचा बायकोच्या हातचा मटण रस्सा जरा आज अंमळ जास्तच झाला,त्यामुळे जागा होउन पाहतोय तर तिन तासात धागा शतकोत्तर गेला.विषय जरा जास्तच वादग्रस्त झाला राव.बाकी चालु द्या आज ढेकर जरा जास्तच येतायेत.

पाशवी शक्ती लै दिवसांनी जागृतावस्थेत आल्याने धाग्यात मजा आली आहे.. मस्त एंजॉय झाला .. दिवाळीच्या सुरुवातीलाच फुलबाज्या आणि फटाके !!

बरोब्बर बोललात बाबा. हे असेच आहे बघा. पन सर्वात जलद शतक गाठणारा आनि जलद द्वीशतक गाठणारा धागा म्हणून रेकॉर्ड नोंद केल्या जाइल धाग्याची

In reply to by राजु भारतीय

@पण बाई शिवाय>>> =)) मंजे?????... लग्न नै करणार? :P की लग्नानंतर,,, पश्चात् तापातले उद्गारआहेत हे? =))

In reply to by पैसा

पाशवी शक्ती इतका हैदोस घालुन देखील तृप्त नाहितच का? परत काड्या सारायला आल्याच ;)

In reply to by मृत्युन्जय

मी आपली आपुलकीने चौकशी करत होते, तर म्हणे काड्या! खर्‍याचा जमाना नाही राहिला आजकाल!

In reply to by पैसा

खर्‍याचा जमाना नाही राहिला आजकाल!
कैपण कै? डॉ.सुबोध खरे मला एरंडेल पाजतील हे वाचलं तर ;)

In reply to by मृत्युन्जय

खरंय. बसू शकतो पण गप्प बसणे अवघड आहे. कसला तरी आवाज येणारच. "सृजत्येरण्डतैलार्कः ध्वनिमपि विरेचने" (बॅटुश्रुताचार्य)

In reply to by मृत्युन्जय

@एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प ' बसु शकेल असे वाटत नाही>>> =)) ठ्ठो! ठ्ठो! ठ्ठो! =)) गप्प "बसू"तर शकणारच नाही,पण 'कळ' आली...तर गपकन~बसेल! त्याचे काय? =))

In reply to by पैसा

वरील वाक्यावरोन बाकी पुरुषवर्गास एरंडेल पाजवल्या गेले असून 'नवर्‍या जा पळ रे' केल्या गेले आहे असे काहीसे चित्र डोळियांपुढे तरळोन क्षणमात्र अंधारी पसरली. पाशवी शक्ती हे संबोधन अगदी खरेच आहे. इतके अत्याचार आणि तेसुद्धा गरीब बिचार्‍या पुरुषांवर? याचसाठी का आम्ही *&^%%% ? (रिकाम्या जागा मगदुराप्रमाणे भरणे).

In reply to by पैसा

आम्ही कधी म्हणालो अल्पहालासाठी येम्मी पाहिजे? पण येम्मीची मुख्य पर्पज लक्षात घेतली तर जष्टिफायेबल आहे हेवेसांनल =)) अल्पहालच पाहिजे असेल तर इतक्या डेअर्‍या आहेत तिकडे जावे ;) (मरतंय आता)

In reply to by पैसा

अरेरेरेरे, इतकी हिंसा बरी नव्हे. शांती शांती! (दिसत नैये सध्या ते एक सोडा) आमचे ऐका, अहिंव्सा फ्वालो करा. -वाग्बॅट ऊर्फ बॅटात्मा गांधी.

In reply to by सूड

काय बे वश्शाडवाडीकरा ;) बादवे या मिपाकरणींना मी हात दाखवला नाही, दाखवणारही नाही. ज्योतिषावर आपला विश्वास नाही ;)

पापक्षालनार्थं प्रतिसादः (की प्रतिसादं ?) समर्पयामि! द्विशतक प्राप्ती हेतु प्रतिसादः (की प्रतिसादं ?) समर्पयामि!