Skip to main content

आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 28/10/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते. तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो . मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्‍या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे----- कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33002
प्रतिक्रिया 261

प्रतिक्रिया

दिवाळीच्या आधी दोन्-चार दिवस सटकायचं कामानिमित्त बाहेर आणि दिवाळीत बरोब्बर टपकायचं.. 'तिकडून' अगदीच बोलाचाल झाली तर आउटसोर्स करुन टाक सांगून स्वतः ही मोकळं व्हावं, तिला पटलं तर करेल स्वतः नाहीतर करुन घेईल.. निदान सणासुदीच्या दिवसात दोन चार रिकाम्या हाताना काम असं वर समजाववं तिला! हां पण पाडव्याला अंग रगडून घेतलं सकाळी की संध्याकाळी ओवाळणी क ड क झालीच पाहिजे नाहीतर धडगत नाही ;)

मी काय म्हणतो, २१व्या शतकात दिवाळी फिवाळी सण साजरे करायचेच कशाला?

अर्रे! आमच्याकडे उजाडेपर्यंत (दोन्ही अर्थी) धाग्याने दंगा उडीवलाय राव! बाबा पाटील यांनी अनेक पिपूंना मने मोकळी करायला संधी दिल्याबद्दल त्यांना बर्‍याच शुभेच्छा मिळाल्या असणार.

दुपारचा बायकोच्या हातचा मटण रस्सा जरा आज अंमळ जास्तच झाला,त्यामुळे जागा होउन पाहतोय तर तिन तासात धागा शतकोत्तर गेला.विषय जरा जास्तच वादग्रस्त झाला राव.बाकी चालु द्या आज ढेकर जरा जास्तच येतायेत.

पाशवी शक्ती लै दिवसांनी जागृतावस्थेत आल्याने धाग्यात मजा आली आहे.. मस्त एंजॉय झाला .. दिवाळीच्या सुरुवातीलाच फुलबाज्या आणि फटाके !!

बरोब्बर बोललात बाबा. हे असेच आहे बघा. पन सर्वात जलद शतक गाठणारा आनि जलद द्वीशतक गाठणारा धागा म्हणून रेकॉर्ड नोंद केल्या जाइल धाग्याची

पण बाई शिवाय आयुक्षात मजा नाई ब्वा !

In reply to by राजु भारतीय

@पण बाई शिवाय>>> =)) मंजे?????... लग्न नै करणार? :P की लग्नानंतर,,, पश्चात् तापातले उद्गारआहेत हे? =))

सगळे पुरुषमुक्तीवाले साफसफाईत गुंतले वाट्टं? सगळं घरकाम मन लावून करा!!

In reply to by मृत्युन्जय

खरंय. बसू शकतो पण गप्प बसणे अवघड आहे. कसला तरी आवाज येणारच. "सृजत्येरण्डतैलार्कः ध्वनिमपि विरेचने" (बॅटुश्रुताचार्य)

In reply to by मृत्युन्जय

@एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प ' बसु शकेल असे वाटत नाही>>> =)) ठ्ठो! ठ्ठो! ठ्ठो! =)) गप्प "बसू"तर शकणारच नाही,पण 'कळ' आली...तर गपकन~बसेल! त्याचे काय? =))

In reply to by पैसा

वरील वाक्यावरोन बाकी पुरुषवर्गास एरंडेल पाजवल्या गेले असून 'नवर्‍या जा पळ रे' केल्या गेले आहे असे काहीसे चित्र डोळियांपुढे तरळोन क्षणमात्र अंधारी पसरली. पाशवी शक्ती हे संबोधन अगदी खरेच आहे. इतके अत्याचार आणि तेसुद्धा गरीब बिचार्‍या पुरुषांवर? याचसाठी का आम्ही *&^%%% ? (रिकाम्या जागा मगदुराप्रमाणे भरणे).

In reply to by पैसा

आम्ही कधी म्हणालो अल्पहालासाठी येम्मी पाहिजे? पण येम्मीची मुख्य पर्पज लक्षात घेतली तर जष्टिफायेबल आहे हेवेसांनल =)) अल्पहालच पाहिजे असेल तर इतक्या डेअर्‍या आहेत तिकडे जावे ;) (मरतंय आता)

In reply to by पैसा

अरेरेरेरे, इतकी हिंसा बरी नव्हे. शांती शांती! (दिसत नैये सध्या ते एक सोडा) आमचे ऐका, अहिंव्सा फ्वालो करा. -वाग्बॅट ऊर्फ बॅटात्मा गांधी.

In reply to by सूड

काय बे वश्शाडवाडीकरा ;) बादवे या मिपाकरणींना मी हात दाखवला नाही, दाखवणारही नाही. ज्योतिषावर आपला विश्वास नाही ;)

पापक्षालनार्थं प्रतिसादः (की प्रतिसादं ?) समर्पयामि! द्विशतक प्राप्ती हेतु प्रतिसादः (की प्रतिसादं ?) समर्पयामि!

@ बाबा पाटील, आभार प्रदर्शनाचं भाषण करा. काम झालंय! ;)

१९९

डबल सेंच्युरी झाली की रे....धन्यवाद बायका लोक्स.साला बायकांना चिडवुन देण्यात जी मजा आहे ना ती कश्यातच नाही.(स्वानुभव-चिडलेली बायको ड्याम सुंदर दिसते राव.)

In reply to by बाबा पाटील

मिसेस पाटीलांनी वाचला काय धागा? (अचानक चिडलेली बायको सुंदर दिसते वगैरे वर आलात..!!)

In reply to by पिलीयन रायडर

बिचारा नवरा दुसर काय बोलु शकतो. सपशेल शरणागती.नशिब आमच दुसर काय....!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिकांनी शिक्का मारल्यावर तर आता पिलियन आता स्वतःच राईड करायला लागणार. बाकी बिकांचं हे एक मला कधीच कळत नाही. मागच्यांना पुढं आणायचं नि पुढंपुढं करणारांना हळूच शर्टाला धरुन लायनीत...

In reply to by कवितानागेश

एक विजेतेपद तुमच्या पार्टीला दिलं तर बास नै का? खुश र्‍हावा की ;) सगळेच घेतल्यावर आम्ही काय करायचं? (नाही-रे वाला) बॅटमॅन.

In reply to by पैसा

तपशिलात घोळ घातलासा बघा. किसनदेवांचा प्रतिसाद पहा, ते बक्षीस विजेत्यांसाठी आहे, उपविजेत्यांसाठी नै कै =))

In reply to by पैसा

विजेत्यांची देणगी त्यांनाच साभार परत केल्या गेली आहे. शिवाय इनो देऊनही काही फरक पडेल असे वाटत नै तो भाग वेगळाच ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिनदा, विजेत्यांसाठी घेतलेली खराट्याचा झाडू आणि जुनी पोतेरं हि घर साफ करण्यासाठीची बक्षिसे कुठायंत? ;-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी विचार..जन्मजात भांडकुदळ स्वभाव..अजुन काय!! (अवांतर - ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठीच मला कंपनीत नेमण्यात आलं आहे असं वाटायला लागलय इतके प्रतिसाद मी हापिसात बसुन इथे दिलेत..)

In reply to by पिलीयन रायडर

वा वा ! असं कसं ??? स्वतःहून कबुली ?! इतका प्रामाणिकपणा हल्ली औषधालाही सापडत नाही :) संमं द्याच ते बक्षीस लगेच ;) (ह्घ्या... गैर्सम्जाने हल्ला स्रू होण्याआधी हे लिव्लेले बरे.)

In reply to by पिलीयन रायडर

कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी विचार..जन्मजात भांडकुदळ स्वभाव..अजुन काय!! (अवांतर - ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठीच मला कंपनीत नेमण्यात आलं आहे असं वाटायला लागलय इतके प्रतिसाद मी हापिसात बसुन इथे दिलेत..)
कंसातली आणि कंसाबाहेरची अशा दोन्ही कबुल्या पाहून अं.ह. झाल्या गेले आहे.

आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले. ;)...!! बाकी लग्नं झालं नसलं तरी मातोश्री कामाला लावतातचं त्यामुळे ह्या पुरुष आघाडीस पाठींबा. ;) ;) ;)...!!!! (घरगडी कम हमाल कम ए.टी.एम. मशिन कम सांगकाम्या कम ड्रायव्हर कम झाडुवाला कम हाडाचा गरीब) मन उधाण वार्‍याचे...

In reply to by सूड

त्या रफाराचं काहीतरी करा !!
तेच म्हणालो होतो मी गेल्या वेळेल तर मला म्हणाले की नसलेल्या वेलांट्या वाचू नका...... ;)

In reply to by विजुभाऊ

विजुभौ...मी नव्हतो म्हणालो असं काही...तो दुसर्‍याचा रीप्लाय होता... :).. च्यामारी नवं अकाऊंट रगीस्टर करायला लागेलं :(..

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे वा, एक चांगला नवरा बनण्याच्या सर्व qualities आहेत तुमच्या कडे. (कृपया हलके घ्या) (गरीब बापुडी)त्रिवेनी

धागा आणि सर्व प्रतिसाद वाचले.पण माझे असे स्पष्ट मत आहे की बहुतांशी पुरुष,हे आळशी आणि कांगावखोर असतात.उदाहरणः- पुलंची, वार्‍यावरची वरात मधील 'रविवारची सकाळ'! तेंव्हा, समस्त मिपाकरणींनो, माझी तुम्हाला सहानुभूति आहे. - तिरशिंग फितुरणे

In reply to by तिमा

हरकत नाही. फितुरांनाही उदार मनाने सामावून घेणारा पुरुषपक्ष आहे. स्त्रियांकडे इतके औदार्य असते तर................हम्म, काकूचा ट्वापिक मिळाला की काय ;) =))

नवा विषय मांडूयात. "स्त्रीयांकडे औदार्य असते का ?" @ ब्याटमन : अवांतर : औदार्य हा शब्द उदर या शब्दापासून तयार झाला अहे का?

In reply to by विजुभाऊ

औदार्य=उदारपण, जसे कौमार्य=कुमारपण. त्यामुळे औदार्य चे कनेक्शन उदार या शब्दाशी आहे.

In reply to by बॅटमॅन

काय हे बट्टमना ?! असा सरळसोट विरोधी प्रतिसाद अपेक्षित नव्हता... अश्याने धाग्याचा ट्यार्पी वाढवण्याचा छुपा पण स्तुत्य प्रयत्न उधळून लावल्याचे पाप माथी लागेल ना?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मनातल्यामनातः औदार्याची गोष्ट वाच्ल्यावर आताच कुठे पोपकोर्ण घेऊन बसलो होतो :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहो नै हो साहेब! तूर्तास फक्त शब्दार्थाची क्वेरी उत्तरिली आहे, मूळ विषयाकडे दुर्लक्ष नाहीये ;) =)) बाकी मूळ मुद्दा. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी उदार असतात असे हा वेष्टर्न ष्टडी म्हणतोय ;) कारणे काही असली तरी स्त्रिया कमी उदार असतात हा निष्कर्ष बाकी रोचक आहे ;) (उदारपणे पळालेला) बॅटमॅन.

बायकांकडे औदार्य अजिबात नसले तरी लग्नानंतर २-३ वर्षातच उदर मात्र नक्की असते.( स्वतः अथेलेटीक असलेला बाबा.) (अती अवांतर-बायकोच्या शब्दात याला सोन्याचा घास भरवा ही सुधारणारी जमात नाही.)

In reply to by बाबा पाटील

->>>बायकोच्या शब्दात याला सोन्याचा घास भरवा ही सुधारणारी जमात नाही.>>> ही ही ही. हा हा हा. आता झाली दिवाळी बाबांच्या घरी! फटाक्याची गरजच नाही!!!

In reply to by बाबा पाटील

अजून एका स्फोटक मुद्द्याला हात घातल्या गेला आहे. इंचा-इंचाने हाही धागा उदंड वाढू दे!!! (मिपावरच्या सर्वांत प्रतिसादखेचक धाग्यालाही ५०० पेक्षा कमी प्रतिक्रिया असल्याने हिरमुसलेला) बॅटमॅन.

मस्तं आतषबाजी चालू आहे .. पण सगळी दिवाळीची कामे आटपली की नाही? काही बाकी असेल तर लवकर लवकर आवरा आता.. :D Happy Diwali !!

ऑ? अगदी सामसूम... सगळे पुरुषमुक्तीवाले फराळ खाऊन झोपा काढतायत का पत्ते खेळतायत?

In reply to by पिशी अबोली

बायका पंचर काढायल्यात गाडीचा म्हणून पुरुष फूटपाथवर बसलेत निवांत. (संदर्भ कुणाकुणाला माहिती आहे? चेपु हे मिसळपावचंच एक्स्टेंन्शन आहे असं कोणीतरी कुणाला तरी सांगत असताना कुणीतरी ऐकलं! ;) )

In reply to by प्यारे१

प्यारेकाका ते नुकतेच लग्न झालेले पुरुष आहेत हो... हा धागा जुन्या बायकोमुळे पीडित पुरुषांचा आहे ना? ;) (संदर्भ माहीत असल्याचा पुरावा... ;) )