एक धाव पोटासाठी
आज सकाळी लवकर जाग आली म्हणून सहज फिरायला म्हणून गेलो होतो . थंड हवेचा आस्वाद घेत असताना समोर २ वेगवेगळ्या घटना दिसल्या .
एक स्त्री सायकलवरून जाताना दिसली . एकंदरीत पेहरावावरून गरीब घरातली असावी . सायकलला पुढे एक थोडीशी मलिन झालेली पिशवी होती . बहुधा जेवणाचा डबा असावा त्यात . धापा टाकत , हळुवारपणे , सावध गिरीने रस्त्यावरील इतर वाहनांचा अंदाज घेत ती सायकल चालवत होती . प्रचंड घामाघूम झालेली .
दुसरी घटना म्हणजे थोड्याच वेळाने तिथून आणखी एक लट्ठ अशी स्त्री मॉर्निंग वॉक साठी जाताना दिसली . तीही प्रचंड घामाघूम झालेली, रस्त्याचा अंदाज घेत चालत होती अधून मधून पळत होती .
वर पाहता ह्या दोन्ही घटना अगदी सामान्य आहेत . रोजच्या जीवनाचा भाग म्हणा हवं तर . पण त्या एका धावेमागाची करणे वेगळी . एक स्त्री धावते आहे आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी . तर दुसरी धाव आहे आपल्या पोटावर नको असलेले खाउन साठलेली चरबी कमी करण्यासाठी .
ह्या सध्या घटनेने आपल्या समाजातील विरोधाभासाचे प्रत्यंतर समोर आले.
वाचने
2914
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
लठ्ठ म्हणजे काय?
In reply to लठ्ठ म्हण्जे काय? by इरसाल
ते नाही का इरसाल साहेब.."लाडू झाले घट्ट म्हातारी झाली लठ्ठ ! " ते लठ्ठ.
In reply to ते नाही का इरसाल साहेब.."लाडू by स्पंदना
लाडु झाले लठ्ठ, म्हातारी झाली घट्ट !
In reply to लठ्ठ म्हण्जे काय? by इरसाल
लिहिताना लठ्ठ लिहिले तरी उच्चार मात्र लट्ठ असाच होतो, चेकवून पहा. जसे लिहितो दु:ख, उच्चार तदनुसार पाहिजे दुह्ख, पण केल्या जाणारा उच्चार दुक्ख.
भावना पोहोचल्या म्हणजे कमावलं :)
त्या लठ्ठ बाइला बजावले का.... की भाजी विकत घेताना २-४ रुपड्यांची घासाघिस करायची नाही ते ? पिझ्झा खात खात जाड होताना कसा हात सढळ सोडला होता ते...>
In reply to हम्म! by अग्निकोल्हा
हाहाहा !
जाऊ द्या हो ज्याचं त्याच्यापाशी :)
हा ही लेख घामटा काढणार ,असं दिसतय. ;-)
In reply to हा ही लेख घामटा काढणार ,असं by अत्रुप्त आत्मा
:)
दुष्काळाचे कारण आणि परिणाम एकाच दिवशी पहिल्याने हा विरोधाभास लक्षात आलेला आहे…. दोन्ही बायका वेगवेगळ्या दिवशी बघितल्या असत्या तर बरे झाले असते…
(अवांतर -तुमची बायकांच्या बाबतीतली निरीक्षणशक्ती अफाट आहे…असो…सांभाळून रहा…कायदे बदललेत…)
In reply to हा हा हा …. by माम्लेदारचा पन्खा
दुष्काळाचे कारण आणि परिणाम एकाच दिवशी पहिल्याने हा विरोधाभास लक्षात आलेला आहेअगदी बरोबर
आता `सहज फिरायला म्हणून' जायचं निमित्त साधत राहा आणि `मॉर्निंगवॉक' चुकवू नका. नजिकच्या काळात मजा येऊ शकते.
लठ्ठ म्हण्जे काय?