मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द मरुन रोब

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आम्ही दोघं पार्टीहून घरी आलो तर सासूबाई रडतायत, सासरे समजूत घालतायत आणि माझे आई वडील बघतायत असा नजारा होता. मला वाटलं, आजे सासूबाईंची तब्येत मधे फारच नाजूक होती त्यांनी बहुतेक व्हर्टिकल टेक-ऑफ घेतलेला दिसतोय. प्रसंगाचं गांभीर्य बघून मी सीरियसली विचारलं 'आहो, काय झालं? ' तर आई म्हणाली 'तुझ्यामुळे रडतायेत!'. मला जाम टोटल लागेना, मी प्रश्न रिपीट केला 'काय झालं? ' तर सासूमां म्हणाल्या 'तुम्ही ऐन उमेदीत अध्यात्माला लागलात, मला काळजी वाटतेय' 'कसली? ' 'तुम्ही सगळं सोडून जाल' 'कशाबद्दल? ' 'सगळे अध्यात्माला लागलेले संसार टाकून जातात, तुमचा बुद्ध नाही का तान्हं मूल आणि बायको सोडून गेला? ' अत्यंत भेदक संवाद आणि त्याला भावनेची डूब हे त्यांच्या संभाषण कौशल्याचं मर्म आहे. 'आहो पण इथे मी सी ए केलंय, काय कष्ट उपसलेत ते माझं मला माहिती, आता कुठे बरे दिवस दिसतायत, इतकं सुरेख घर घेतलंय, मी कशाला सोडून जाईन? ' बायकोकडे आपला गडी म्हणून बघतोय तर ती त्यांच्यात कधी सामील झाली ते कळलंच नाही, म्हणाली 'हो यांचा काही भरोसा नाही'. मी परत चाट, आताच पार्टीहून आलोत ते विसरली काय ही? सामना आता "तीन विरुद्ध एक आणि दोन तटस्थ" असा झाला. 'आहो पण बुद्ध शेवटी परत आलाच ना? ' मी त्यातल्या त्यात माझी आध्यात्मिक माहिती कामाला आणली. 'काय परत आला? आल्यावर स्वतःचा मुलगा म्हणाला 'माझ्यासाठी काय आणलं? ' तर त्याच्या हातात भिक्षापात्र दिलं! ' सासूमां सुसाट झाल्या होत्या. मला क्षणभर त्यांच्याकडून संसारदिक्षा घेतली असती तर एव्हाना कुठल्या कुठे पोहोचलो असतो असं वाटायला लागलं. एवढ्यात आमचा मुलगा बाहेरून आला. वातावरणाचं गांभीर्य बघून त्याला मिश्किल हसू येत होतं, म्हणाला 'काय झालं? ' मी प्रसंग सावरण्यासाठी त्याला म्हटलं 'जगातला एकमेव प्रश्न काय आहे? ' प्रसंगाची काहीही कल्पना नसताना देखील तो तितक्याच तप्तरतेनं आणि गंभीरपणे म्हणाला 'आता माझं कसं होणार? ' आम्हाला इतकं कमालीचं हसू आलं की माझे तटस्थ आई वडील देखील त्यात सामील झाले आणि "चार विरुद्ध तीन" असा आम्ही तो सामना जिंकला! _________________________ तीन चार दिवसांनी बायको म्हणाली 'आपण प्रभातकडे केव्हा जायचं?' ( प्रभात वकील आहे), मी म्हणालो 'चल लगेच, पण आता त्याच काय आहे?' तुम्ही कधी बुद्धिबळ खेळला असाल तर निष्णात खेळाडू साधारण सहा चालींची एक स्ट्रॅटजी आखतो आणि त्याचं कौशल्य असं असतं की प्रतिस्पर्ध्याला अजिबात पत्ता न लागू देता त्या सहा चाली तो अशा काही उलट सुलट खेळतो की स्ट्रॅटजी पूर्ण झाल्यावरच प्रतिस्पर्ध्याला काय प्रसंग ओढवलाय ते कळतं. स्त्रियांना ही कला जन्मजातच असते म्हणून "पुरुष विरुद्ध स्त्री" असा बुद्धिबळाचा सामना जगाच्या इतिहासात बहुदा कधी झाला नाही. जगज्जेत्या बुद्धिबळपटूला देखील स्त्रियांची स्ट्रॅटजी लक्षात येणार नाही! (त्यातून या वर्तमानात राहण्याच्या आध्यात्मिक प्रॅक्टिसमुळे मला भूतकाळ जाम विसरायला होतो). 'मला डायव्होर्स पाहिजे! 'ती म्हणाली 'कुणाकडून? ' मी बावळटासारखा म्हणालो 'उगाच सगळं माहीत असून नसल्यासारखं करू नका, तुमच्याकडून!' तिच्या आवाजातला ठामपणा मला जाणवला. 'अग पण उगाच कशाला डिवोर्स घ्यायचा आपला चांगलं चाललंय की, छान मुलगा आहे, घरात सगळं आबादी आबाद आहे' मी प्रसंग सावरायला लागलो. 'नाही आपण प्रभातकडे जाऊया' ती हट्ट सोडायला तयार नाही. मग मी ट्रॅफिक जॅम मधून गाडी काढायचा प्रयत्न केला, 'त्यापेक्षा आपण छायाकडे जाऊ या' छाया तिची स्त्रीमुक्तिवादी मैत्रीण आणि माझी कॉलेजची कोप्रोफेसर आहे, सॉलिड कौन्सेलिंग वगैरे करते. तिचा नवरा तिला "बाहेर दोरीवर घातलेले कपडे वाळले असतील का? मी आता ते घड्याकरून ठेवू का?" असे प्रश्न विचारून तिनं "हो" म्हटल्या शिवाय काही करत नाही. छाया किती जरी स्त्रीमुक्तिवादी असली तरी माझा बिंधास्तपणा तिला आवडायचा, तिला आपल्या पार्टीत आणू शकीन असं मला वाटत होतं पण आपली स्ट्रॅटजी चालेल तर ना! 'नको, तुम्ही डायव्होर्सचे कागद घेऊन या, मी पुढचं बघते'. तिनं पुन्हा ट्रॅफिक जॅम केला! आता काय बोलणार? मी म्हणालो 'चल फिरायला जाऊ' 'नको तुम्ही क्लायंटकडे जा, माझा मूड नाही' तिनं चेकमेट करून टाकला. ____________________________ मग मला बाहेर जाववेना मी परत घरात आलो, ड्रॉवर उघडला सगळ्या एफ डीज् आणि पासबुक्स बाहेर काढली एक लिस्ट केली आणि तिच्या हातात ठेवली "हे एवढे पैसे आहेत माझ्याकडे ते सगळे तुला घे आणि तुझा मुलात जीव आहे तो पण तू घे" मी इतका भावनाविवश आयुष्यात कधी झालो नव्हतो पण तिच्यासमोर प्रामाणिकपणे सगळा मार्ग मोकळा करून दिला. लिस्टकडे बघून ती विचार करायला लागली. "माझ्याकडे मरेपर्यंत उपयोगी पडेल असं क्वालिफिकेशन आहे पैसे मी कसेही मिळवीन आणि तुला मुलगा हवा आहे मला मंजूर आहे उगाच कशाला कोर्टात जायचं?" ती कसल्याशा विचारात पडली, मी म्हणालो चल फिरून येऊ. बाहेर पडल्यावर मी म्हणालो "तुला हवं तेव्हा तू नीघ पण मला नीट विचार करून सांग कुठे जाणार तू? तुला आता मिळणारी रक्कम मोठी वाटत असली तरी बरेचसे पैसे फ्लॅटमध्ये जातील, मुलगा मनातून दुभंगेल, काय साधशील यातून?" ती एक शब्द बोलली नाही. " एक मार्ग आहे " मी म्हणालो "काय? " "लग्न जशी एक कल्पना आहे तशी डिवोर्स पण एक कल्पना आहे. तू कमालीचा फिटनेस ठेव आणि माझ्यापेक्षा एखादा उमदा नवरा शोध मी तुझं लग्न करून देईन, दरम्यानच्या काळात माझी मैत्रीण म्हणून रहा." "चालेल" ती म्हणाली . तिच्या मनाचा मला जाम पत्ता लागेना पण ही रिलेशनशिप मला मजेशीर वाटायला लागली. "आता मला आईकडे सोडा" तिला माहेरी सोडून मी क्लायंटकडे गेलो. ____________________________ जिथे जातो तिथे रमतो त्यामुळे मी कामात गर्क झालो, वर्षातनं एकदाच प्रत्यक्ष भेटत असल्यानं क्लायंटही वाट बघत असतात. क्लायंट बरोबर जेवण, गप्पा आणि काम यात संध्याकाळ केव्हा झाली कळलं नाही. काम संपवलं तेव्हा लक्षात आलं की बायकोला सकाळी माहेरी सोडलंय, तिला फोन केला. मुलगा मित्रांबरोबर पिक्चरला गेलायं आणि रात्री मित्राकडेच राहणार आहे तीनं सांगितलं. माझे आई वडिल, मेव्हणा गावाला गेल्यामुळे बहिणीकडे रहायला गेले होते. "मग तू इकडे का येत नाहीस, आपण कँपमध्ये फिरु, मलाका स्पाइसला जेवू आणि तू येईपर्यंत मी इ-स्क्वेअरच्या लास्ट शोची तिकीटं पण काढतो". ती म्हणाली "चालेल, मी वेस्टएंडपाशी थांबते". इ-स्क्वेअरला ओळख असल्यानं तिथे फोन केला आणि आमच्यासाठी दोन लास्ट शोची तिकीटं ठेवायला सांगितली. वेस्टएंडपाशी पोहोचलो तर बघतंच राहिलो, तिनं पिंक अँड ग्रे कॉंबीनेशनचा स्टँडकॉलरचा ड्रेस घातला होता आणि त्याच्यावर पिंक दुपट्टा घेऊन केसात मोगरा माळला होता. मी गाडीचं दार उघडायचं सोडून बघतच राहीलो. ती दार उघडून आत आली आणि आतला सगळा रंगच बदलून गेला. " पहेले वो सितम करते थे तो कयामत थी, अब मेहेरबां हुऐ तो हादसा हो गया"! तिला अर्थ समजला होता पण तरीही म्हणाली : "म्हणजे नक्की काय?" "मला तुझ्याशी पुन्हा लग्न करावसं वाटतंय" साली ही उस्तफूर्तता मला केंव्हा काय बोलायला लावेल याचा नेम नाही; वाटायला लागलं आपण इतक्या चांगल्या मूड मध्ये उगाच पार स्टेडियम बाहेर बॉल मारला, पण वातावरणाचे सूर जुळले असावेत, ती म्हणाली : "मी योगा आणि प्राणायाम करून आता कमालीचा फिटनेस आणि फिगर ठेवणार आहे" "क्या बात है"! मला तिचं कौतुक वाटलं, तिनं परत मूड तयार केला होता. ___________________________ मलाका स्पाईस जवळ एक बाग आहे आम्ही तिथे गेलो. हिरवळीवर स्प्रिंकलर्स चालू होते, मी म्हणालो "चल, मी भिजून घेतो". ट्रॅकवर आम्ही निःशब्द फिरत राहीलो कारण तिची पावलं माझ्या पावलांबरोबर पडत होती आणि हे आत कुठे तरी सूर जुळल्यामुळे होत असावं असं वाटलं. स्वाद ही चव आणि गंध यांनी मिळून होणारी जादू आहे आणि ती मलाका स्पाईसवाले अशी काही जमवतात की जेवणाची मैफल संपूच नाही असं वाटतं. त्यात कॉईन थ्रू ही लिक्यूअर देखील अशी काही भन्नाट आहे की तुम्ही एकाच वेळी कवी, शायर आणि संगीतकार होता. तुमचा रंग असा काही आकाशी होतो की तुम्हाला नवनवीन कल्पना सुचायला लागतात. त्यात अशी मैत्रीण बरोबर मग तर काही विचारायलाच नको. मला एकाच वेळी तिच्यात आणि माझ्यात एक ओढ लावेल असं अंतर आणि निर्भय समन्वय जाणवायला लागला. माझे सगळे शब्द आणि अर्थ अभीव्यक्तीच्या सार्‍या सीमा ओलांडून तिच्यापर्यंत पोहोचतील असं वाटायला लागलं. ती काही बोलत नव्हती पण विचार ही करत नव्हती फक्त सगळा विरोध, सगळा विसंवाद संपल्यासारखा वाटत होता. मला वाटायला लागलं बास! या क्षणी हे आयुष्य संपावं! स्त्री ही काय जादूगीरी आहे, एका स्त्रिशी सूर जुळणं सार्‍या अस्तित्वाशी एकरुपता जमण्यासारखं आहे. ________________________________ मला पिक्चरचं प्रचंड आकर्षण आहे. तुम्हाला गुतंवून ठेवणारी विषयाची मांडणी, ती रमणीय स्थळांची, आपण पोहोचू शकणार नाही अशा अँगल मधून घेतलेली दृश्य, रंगांची सुरेख उधळण, पेहेरावांची नजाकत, बेभान करणारं संगीत, परस्परातले संबंध, संवादांची जादू, सौंदर्य, प्रणय आणि अभिनय सगळं एकावेळी हजर असतं! हे पिक्चरवाले कल्पनाच इतक्या सुरेख मांडतात की वास्तव फिकं वाटतं. जगातली सारी बुद्धीमत्ता, सौंदर्य आणि संपत्ती जर तुम्हाला एका जागी पहायची असेल तर एकेका फ्रेमची मजा घेत पिक्चर बघावा. घरी आलो तेंव्हा एक वाजला असावा; घर इतकं शांत आहे की आपण बोललो तरच आवाज त्यामुळे वेळेचा फक्त अंदाज बांधावा लागतो. त्यात घरात आज आम्ही दोघंच आणि जीवनातला 'उद्या' माझ्यासाठी कायमचा संपलेला; असा काही माहौल झाला होता की कॉफी घेत एकमेकांच्या सहवासात शांत बसून रहावं आणि झोप आली की झोपून जावं. तिनी कॉफी केली आणि आम्ही एकमेकांसमोर बसलो. "सत्य म्हणजे नक्की काय हो?" ती म्हणाली. मला तिचा धाडसी स्वभाव आणि कमालीची पारदकर्शता माहिती होती, तिनं इतका खोलवरचा पण इतका उघड प्रश्न विचारला होता की मी शब्द जुळवू शकत नव्हतो. सरळ ऊठलो आणि माझा स्टँडकॉलरचा सिल्कचा अप्रतिम मरून मेडिटेशन रोब घेऊन आलो, तो घातल्या क्षणी तुमचं अंतरंग बदलून जातं. "तू मस्तं वॉश घे आणि हा मरून रोब घालून ये". काहीही न विचारता ती उठली आणि फ्रेश होऊन तो मरून रोब परिधान करून समोर येऊन बसली. त्या रोबमध्ये ती अशी काही लावण्यवती दिसायला लागली की मी सत्य वगैरे सगळं पार विसरून गेलो आणि तिच्याकडे बघतच राहीलो. "सांगा नं सत्य म्हणजे काय? " "सखे खरं सांगू? मला ही नक्की माहिती नाहीये पण आताचा हा जो माहौल आपल्याला जाणवतोयं ना, त्याला बहुदा सत्य म्हणत असावेत". माझ्याकडे पहात अत्यंत शांतपणे ती म्हणाली "सत्य म्हणजे काय ते मला कळलंय". मी सर्दच झालो. "क्या बात है! सुनाइए" "आपण वेगळे होऊ शकत नाही!" मी इतका सद्गदीत झालो की मला शब्दच सुचेनात, "पियू हा रोब मी तुला बहाल करतो! तुला सत्य समजलयं! '. संन्यास्यानी स्वतःचा रोब पत्नीला बहाल केल्याची जगाच्या इतिहासातली ती बहुदा पहिली घटना असावी, तिनं माझे हात हातात घेतले आणि मला मिठी मारली. "मी तुम्हाला समजू शकले नव्हते" कॉईन थ्रू ची नशा अशी काही भन्नाट झाली होती की मला तीच एक रहस्य वाटायला लागली; प्रकृती आणि पुरुष एक कसे याचा मला अचानक उलगडा पण ते रहस्य आता मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो.

वाचने 21435 वाचनखूण प्रतिक्रिया 99

अय्या, एक्दम सोप्पी रेसेपी!! या विकांताला नक्की करीन!!!!!!! पण आमच्याकडे किनई तो स्टँन्डकॉलरचा सिल्कचा मरून रोब मिळत नाहिय्ये..... त्याच्याऐवजी पट्ट्यापट्ट्याचा पायजमा चालेल का? :)

In reply to by संजय क्षीरसागर

ती जातीची सुंदर असल्याने तिला काहीही शोभतं!! शिवाय ......तिला अत्यंत शांतपणे 'सत्य' काय आहे ते दाखवण्याचा हा एक सोपा मार्ग नाही का? :)

In reply to by पिवळा डांबिस

रामपुरी 01/08/2012 - 04:18
सोप्पी रेसिपी बद्दल सहमत. तों पा सु. फक्त चित्रे डकविली नसल्याने विरस झाला. "साली ही उस्तफूर्तता मला केंव्हा काय बोलायला लावेल याचा नेम नाही" अश्या आत्मस्तुती/आत्मप्रौढीपर वाक्यांनी खुमारी वाढवली आहे. नेहेमीप्रमाणे असली एक आड एक अशी वाक्ये टाकली असती तर लज्जत आणखी वाढली असती.

In reply to by पिवळा डांबिस

इरसाल 01/08/2012 - 12:12
तुम्ही निळ्या चट्ट्यापट्ट्याच्या लेंग्याबद्दल बोलत आहात. अवांतर : ( माझा एक मित्र तीच चट्ट्यापट्ट्याची चड्डी वापरतो. म्हणे रात्री फक्त फुलाची गाठीचे एक टोक ओढायचे चड्डी डायरेक्ट पावलाजवळ. ओढाताण करायची गरज नाही. )

स्पंदना 01/08/2012 - 07:13
*सासूमां सुसाट झाल्या होत्या. मला क्षणभर त्यांच्याकडून संसारदिक्षा घेतली असती तर एव्हाना कुठल्या कुठे पोहोचलो असतो असं वाटायला लागलं. *प्रसंगाची काहीही कल्पना नसताना देखील तो तितक्याच तप्तरतेनं आणि गंभीरपणे म्हणाला 'आता माझं कसं होणार? ' *पुरुष विरुद्ध स्त्री" असा बुद्धिबळाचा सामना जगाच्या इतिहासात बहुदा कधी झाला नाही *तू कमालीचा फिटनेस ठेव आणि माझ्यापेक्षा एखादा उमदा नवरा शोध मी तुझं लग्न करून देईन *मला एकाच वेळी तिच्यात आणि माझ्यात एक ओढ लावेल असं अंतर आणि निर्भय समन्वय जाणवायला लागला. माझे सगळे शब्द आणि अर्थ अभीव्यक्तीच्या सार्‍या सीमा ओलांडून तिच्यापर्यंत पोहोचतील असं वाटायला लागलं *एका स्त्रिशी सूर जुळणं सार्‍या अस्तित्वाशी एकरुपता जमण्यासारखं आहे. *मी इतका सद्गदीत झालो की मला शब्दच सुचेनात, "पियू हा रोब मी तुला बहाल करतो! तुला सत्य समजलयं! '. संन्यास्यानी स्वतःचा रोब पत्नीला बहाल केल्याची जगाच्या इतिहासातली ती बहुदा पहिली घटना असावी. निव्वळ टाळ्या!!!! अगदी मनापासुन. नवर्‍याला वाचुन दाखवते अन "बघा! शिका जरा असल काही" अस म्हणुन घेते. अन सारा माहौल बदलुन टाकल्याबद्दल पिडाकाकांना "पितामह " हा किताब विथ शाल & श्रीफळ!

In reply to by स्पंदना

माणसाचं मन मोठं मजेशीर आहे, ते कमीतकमी प्रयासाचा पर्याय शोधतं, नाही जमतना आपल्याला उंची गाठायला, खेचा दुसर्‍याला खाली. ज्याला पायजोमा आणि रोब सारखेच वाटतात तो सत्य काय सांगणार आणि कोणती स्त्री नवर्‍याचा पट्यापट्याच्या पायजोमा घालयला तयार होईल आणि त्यातूनही समजा तिनं घातलाच तर कितीही लावण्यवती असली तरी तिचं सौंदर्य कसं खुलेल ? पण एकदा हुकलो म्हटल्यावर नंतर सारवासारवी करुन आणखी उघडे पडणार हे कळून देखील मन मानत नाही त्याला काय करणार. मजा येतेय एकेक प्रतिसाद वाचायला

In reply to by संजय क्षीरसागर

अन्या दातार 01/08/2012 - 12:26
ज्याला पायजोमा आणि रोब सारखेच वाटतात तो सत्य काय सांगणार
जैन मुनींना मी ना पायजम्यात बघितले ना रोब घालून; बाकी ते सांगतात ते सत्य म्हणावे का नाही याबाबत वाद असू शकतात.
कोणती स्त्री नवर्‍याचा पट्यापट्याच्या पायजोमा घालयला तयार होईल
झाली कुणी तयार; तर तुमचा आक्षेप असणार आहे का?
त्यातूनही समजा तिनं घातलाच तर कितीही लावण्यवती असली तरी तिचं सौंदर्य कसं खुलेल ?
ही काळजी तरी तुम्ही कशाला करावी मुळात? ज्याची त्याची नजर अन ज्याची त्याची सौंदर्यविषयक जाण. असो, लेख सुंदर जमलाय. इतर प्रतिक्रियांमध्ये जास्त अडकत जाऊ नका हा अनाहूत सल्ला.

In reply to by संजय क्षीरसागर

आणि कोणती स्त्री नवर्‍याचा पट्यापट्याच्या पायजोमा घालयला तयार होईल आणि त्यातूनही समजा तिनं घातलाच तर कितीही लावण्यवती असली तरी तिचं सौंदर्य कसं खुलेल ?
मग तुम्हाला स्त्री चे सौंदर्य कळालेच नाही असे म्हणावे लागेल. हे माझ्या सारख्या अविवाहित माणसाने तुम्हाला सांगावे हे अजून एक दुर्दैव. ;) अहो आजकाल बरेचसे चट्यापट्याचेच नाईट ड्रेस असतात. त्यातले सौंदर्य कधी जाणवलेच नाही तुम्हाला ? *'चट्या पट्याच्या शर्ट आणि चट्या पट्याच्या पायजम्यात येवढी सुरेख दिसणारी स्त्री, फक्त चट्यापट्याच्या पायजम्यातच अजून किती सुरेख दिसत असेल बरे... ' असे लिहायची फार इच्छा होत होती. अर्थात सनातन्यांची बोंबाबोंब नको म्हणून पिडाकाकांसाठी हे वाक्य पांढरे फासून लिहित आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद देणार्‍याची पत्नी आंग्ल असली तर अशी दिसेल रे, मी भारतीय स्त्री विषयी लिहिलय! पण महौल बदल्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार!

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन 01/08/2012 - 12:44
एक खुसपटः भारतीय स्त्रिया सर्व रंग व आकारांच्या असतात. सबब पोषाखावरूनचे सरसकटीकरण योग्य नै. बाकी चालू द्या.

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब 01/08/2012 - 12:48
तुमच्या भावना एक फार दुखावतात तर सारखं कै ना कै लिहत जाउ नका. आत्मियतेने सल्ला दिलाय एवढंच. बाकी इतकं अधात्म वेग्रे करुन सुद्धा साधा लेख लिहुन गंगार्पण करता येउ नये याचं आश्चर्य वाटलं ! इतर चालु द्या.

In reply to by शिल्पा ब

माहौल बदलणारे आणि त्यांची री ओढणारे काय मानसिकतेतून लिहितायत ते सांगितलं; गंगार्पण वगैरे आम्ही बघू पण तुम्ही कशाला मनावर घेताय?

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब 01/08/2012 - 13:00
तुम्ही तरी सार्‍या दुनियेची मानसिकता मनावर घेउन का ताण घेताय ? बाकी अध्यात्मिक लोकं एवढे चिडके असतील असं नव्हतं वाटलं !

In reply to by शिल्पा ब

माझ्या आधीच्या पोस्टवर सुद्धा तुमचे प्रतिसाद "हा आमचा फुकटचा सल्ला" असे आहेत, आहो, मागतोय कोण तुम्हाला सल्ला? आणि निर्बुद्ध प्रतिसादांना तिथल्या तिथं उत्तर देणं कौशल्य आहे, ते रागवणं वाटत असेल तर तुमचं निरिक्षण तुमच्यापाशी.

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब 01/08/2012 - 21:38
कोणी मागत नाही म्हणुन तर फुकटचे सल्ले म्हंटलं ना! तुमच्यासारख्या विद्वानाला इतकं समजु नये म्हणजे कमाल ए! बाकी तुमच्यासारखे कौशल्य असणारे लोकं आहेत हेच मिपाच्या एंटरटेनमेंट क्वालिटीचं रहस्य आहे हे आमचं निरीक्षण आहे पण तुमचा आग्रहंच आहे तर माझ्याचजवळ ठेवते.

In reply to by शिल्पा ब

सल्ला तुम्ही मला देताय आणि माझ्या पोस्टवर प्रतिसाद देताय, मी तुमच्या पोस्टवर आलेलो नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब 02/08/2012 - 00:57
काय सांगता ! आम्हाला वाटलं होतं की कोणीही कोणत्याही धाग्यावर प्रतिसाद देउ शकतं म्हणुन !

In reply to by शिल्पा ब

प्यारे१ 02/08/2012 - 11:47
तायडे 'णवीण' आहेत गं ते....! एकदम यॉर्कर नको टाकूस. (माहिती नसलेल्यांसाठी : यॉर्करः ही क्रिकेट या खेळामधली चेंडू फेकण्याची एक पद्धत असते. यामध्ये चेंडूचा टप्पा बरोबर फलंदाजाच्या पायामध्ये टाकला जातो जेणेकरुन त्याला आपले 'फळकुट' हलवता येईपर्यंत चेंडू मागच्या यष्ट्या उडवतो व फलंदाज 'बाद' होतो. :) ) संक्षी साहेब, मिपा हे एक ओपन फोरम आहे. धन्यवाद.

In reply to by प्यारे१

त्यांना `मला सल्ला देऊ नका' एवढच (पहिल्यापासनं) सांगतोय, आता तुम्ही इतकं `प्रेमाणं' सागितल्यावर तुमचं तरी ऐकतायेत का बघू

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब 02/08/2012 - 23:46
तुमच्या विद्वत्तेबद्दल आदर अजुन वाढला ! तसंच दु सर्‍या ए ! का आ यडी, ची. आठव ,ण झाली.

In reply to by संजय क्षीरसागर

रामपुरी 02/08/2012 - 01:51
जैसा राजा तैशी प्रजा या न्यायाने जसा लेख तसे प्रतिसाद... (एवढ्या सगळ्यांना जे म्हणायचंय ते शेवटी तुमचं तुम्हीच मान्य केलंत हे बरं झालं. नाहीतर फुकट आमचा प्रतिसाद उडाला असता वैयक्तिक रोख म्हणून...)

In reply to by परिकथेतील राजकुमार

गवि 01/08/2012 - 12:45
पराषेट, चटेरीपटेरी पायजमा / चड्ड्या हे कितीही प्रसिद्ध झाले असले तरी या मोकळ्याढाकळ्या पेहरावाबाबत आमच्या कोंकणाला मूळ श्रेय देण्याचे विसरु नका हो.. कोंकणातला माणूस गरीबीतही सुखी असण्यामागे हे मुख्य कारण आहे हो....

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 01/08/2012 - 16:35
>>ह्या श्रेयाबद्दल नक्की दुमत नाही. कोण बरे ही श्रेया ????

In reply to by परिकथेतील राजकुमार

मन१ 01/08/2012 - 20:27
एकाचवेळी "अहाहा(वा वा)" आणि "हा हा हा" असे उद्गार काडहयला भाग पाडल्याबद्दल पराला दंडवत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मग तुम्हाला स्त्री चे सौंदर्य कळालेच नाही असे म्हणावे लागेल. हे माझ्या सारख्या अविवाहित माणसाने तुम्हाला सांगावे हे अजून एक दुर्दैव. अहो आजकाल बरेचसे चट्यापट्याचेच नाईट ड्रेस असतात. परा, परा, लेका फॅशन डिझायनर का नाही झालास? :) त्यातले सौंदर्य कधी जाणवलेच नाही तुम्हाला ? सभोवतालचे सौंदर्य कधी जाणवलेच नाही की माणूस अध्यात्माकडे वळतो, म्हणतात!! ;)

In reply to by संजय क्षीरसागर

माणसाचं मन मोठं मजेशीर आहे, ते कमीतकमी प्रयासाचा पर्याय शोधतं, नाही जमतना आपल्याला उंची गाठायला, खेचा दुसर्‍याला खाली. सहमत आहे. पूर्वीचे पैसा, काल आणि आता हा लेख वाचून नेमकं तेच मनात येतं... ज्याला पायजोमा आणि रोब सारखेच वाटतात तो सत्य काय सांगणार खरं तर ज्याला पायजमा आणि रोब हा सारखाच वाटतो तोच सत्य काय ते सागू शकतो. ज्याला या दोन गोष्टी भिन्न वाटतात तो मनाने मायेत गुंतलेला असतो. मग त्याने तोंडाने अध्यात्माची कितीही बडबड केली तरी... आणि कोणती स्त्री नवर्‍याचा पट्यापट्याच्या पायजोमा घालयला तयार होईल जिचं आपल्य नवर्‍यावर खूप प्रेम आहे ती जरूर होईल... आणि त्यातूनही समजा तिनं घातलाच तर कितीही लावण्यवती असली तरी तिचं सौंदर्य कसं खुलेल ? ते ती किती लावण्यवती आहे त्यावर अवलंबून आहे पण एकदा हुकलो म्हटल्यावर नंतर सारवासारवी करुन आणखी उघडे पडणार हे कळून देखील मन मानत नाही त्याला काय करणार. अगदी बरोबर! तुमचा लेख आणि आता त्यावरचे तुमचे प्रति-प्रतिसाद वाचून असंच वाटलं मजा येतेय एकेक प्रतिसाद वाचायला मलाही! चालू द्या... :)

In reply to by पिवळा डांबिस

बिफोर वी गो इंटू धिस, एक-दोन गोष्टी क्लिअर करतो: काळा रंग जीवनात जेजे न्यून आहे, त्याज्य आहे त्याचा निदर्शक आहे, सायकॉलॉजित तो वैषम्य तर अंतीम विश्लेषणात मृत्यू दर्शवतो. प्रतिसादकाच्या प्रोफाईलवर अपलोड केलेलं चित्र, प्रतिसादातला मजकूर हायलाइट करण्यासाठी त्यानं निवडलेला ठळक काळ्या अक्षरांचा पर्याय याचं यथार्थ उदाहरण आहे आणि प्रोफाईलवर नमूद केलेल्या आवडीनिवडी आणि इतर तपशील ती गोष्ट पुन्हा अधोरेखित करतात. माझी कथा कशी आहे हा प्रश्न नाही कारण तिच्यावर दोन्ही प्रकारचे प्रतिसाद आहेत, प्रतिसादातून आपली मानसिकता प्रकट होते हा आहे >माणसाचं मन मोठं मजेशीर आहे, ते कमीतकमी प्रयासाचा पर्याय शोधतं, नाही जमतना आपल्याला उंची गाठायला, खेचा दुसर्‍याला खाली. सहमत आहे. पूर्वीचे पैसा, काल आणि आता हा लेख वाचून नेमकं तेच मनात येतं.. = कोण कुणाला खाली खेचायचा प्रयत्न करतय हे इतकं उघड आहे की हा मुद्दा निरर्थक आहे. पैसा या लेखात मी "पैसा कल्पना आहे" आणि काल या लेखात "काल भास आहे" हे मांडलय, कुणालाही खाली खेचण्याचा प्रयत्न केला नाही. >ज्याला पायजोमा आणि रोब सारखेच वाटतात तो सत्य काय सांगणार खरं तर ज्याला पायजमा आणि रोब हा सारखाच वाटतो तोच सत्य काय ते सागू शकतो. ज्याला या दोन गोष्टी भिन्न वाटतात तो मनाने मायेत गुंतलेला असतो. मग त्याने तोंडाने अध्यात्माची कितीही बडबड केली तरी... = व्यक्त जगात जशी स्त्री ही स्त्री आहे आणि पुरुष पुरुष आहे तद्वत पायजमा हा पायजमा आहे आणि रोब रोब आहे त्याचा माया आणि अद्वैताशी काही एक संबंध नाही, कुठलीही गोष्ट कुठेही जोडणं अध्यात्म समजलं नसलं तरी कश्याही प्रकारे बाजू सावरण्याचा प्रयत्न दर्शवतो. >आणि कोणती स्त्री नवर्‍याचा पट्यापट्याच्या पायजोमा घालयला तयार होईल जिचं आपल्य नवर्‍यावर खूप प्रेम आहे ती जरूर होईल... = हे तर अती हास्यास्पद आहे, पहिली गोष्ट कोणताही सूज्ञ पती "आपल्या पत्नीनं त्याचा पायजमा परिधान" करावा अशी इच्छा धरणार नाही आणि कोणतीही सूज्ञ स्त्री अशा मूर्ख इच्छेला प्रतिसाद देणार नाही, याचा प्रेमाशी काही एक संबंध नाही. पुन्हा प्रेम म्हणजे काय याविषयी संकल्पनात कमालीची गफलत. >आणि त्यातूनही समजा तिनं घातलाच तर कितीही लावण्यवती असली तरी तिचं सौंदर्य कसं खुलेल ? ते ती किती लावण्यवती आहे त्यावर अवलंबून आहे = इथे सदस्याच्या लेखनाशिवाय इतर काहीही वेरिफाय करता येत नसल्यानं पास. तरीही काल पराच्या प्रतिसादावर लिहिताना राहून गेलं, त्या युवतीनं नाईट सूट परिधान केलाय, प्रतिसादकाचा पायजमा (फक्त पायजमा- कारण तो तेवढाच बहाल करायचं म्हणतोय) परिधान केल्यावर ती कशी दिसेल याची कल्पना न केलेली बरी. >पण एकदा हुकलो म्हटल्यावर नंतर सारवासारवी करुन आणखी उघडे पडणार हे कळून देखील मन मानत नाही त्याला काय करणार. अगदी बरोबर! तुमचा लेख आणि आता त्यावरचे तुमचे प्रति-प्रतिसाद वाचून असंच वाटलं = या प्रतिसादा नंतर मला "सारवासारवी करुन आणखी उघडे पडणार" म्हणजे नक्की काय हे वेगळं सांगावं लागणार नाही >मजा येतेय एकेक प्रतिसाद वाचायला मलाही! चालू द्या... = इतर अनेक प्रतिसाद वाचताना आतापर्यंत मजा येत होती पण पट्यापट्याच्या पायजमा आणि मरुन रोब इतक्या लेवलवर येऊन प्रतिसाद द्यायला मला तरी मजा येत नाही. उगीच रंगाचा बेरंग नको म्हणून पहिला प्रतिसाद फक्त एका ओळीचा ठेवला होता या नंतर मात्र असे आणि यासम येणारे इतर प्रतिसाद अनुत्तरित राहतील.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन 02/08/2012 - 11:51
या नंतर मात्र असे आणि यासम येणारे इतर प्रतिसाद अनुत्तरित राहतील.
मंडळ आपले आभारी आहे :)

In reply to by संजय क्षीरसागर

विजुभाऊ 02/08/2012 - 13:14
पहिली गोष्ट कोणताही सूज्ञ पती "आपल्या पत्नीनं त्याचा पायजमा परिधान" करावा अशी इच्छा धरणार नाही हायपोथेटिकल्... हे व्यक्तीसापेक्ष आहे. पायजम्याला लेंगा म्हंटले तर चालेल का? ज्याला पायजमा आणि रोब हा सारखाच वाटतो तोच सत्य काय ते सागू शकतो. ज्याला या दोन गोष्टी भिन्न वाटतात तो मनाने मायेत गुंतलेला असतो शेवटी पंचा काय किंवा टॉवेल काय हे एकच गोष्ट करतात म्हणुन पंच्याच्या दरात टॉवेल मिळत नाही. धोतर आणि साडी हे दोन्ही नेसण्याचेच प्र्कार आहेत म्हणुन साडी आणि धोतरात फरक नाही असे म्हणून कसे चालेल? उद्या म्हणाल पंजाबी सुटाची सलवार आणि जीनची प्यान्ट हे दोन्ही सारखेच कैच्या कैच हे सदर अख्खेच्या आख्खे " काथ्याकुट " म्हणून चालु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो 02/08/2012 - 17:27
तरीही काल पराच्या प्रतिसादावर लिहिताना राहून गेलं, त्या युवतीनं नाईट सूट परिधान केलाय, प्रतिसादकाचा पायजमा (फक्त पायजमा- कारण तो तेवढाच बहाल करायचं म्हणतोय) परिधान केल्यावर ती कशी दिसेल याची कल्पना न केलेली बरी.
बरोब्बर.. ऑफीसात बसल्यावर तर असं काही करु पण नये.. लै त्रास होतो ;-) काय आहे की ऑफीसात मोकळे-ढाकळे कपडे घालून बसता येत नाही ना म्हणून.. :-p

In reply to by ५० फक्त

क्षीरसागर साहेब, तुमच्या दोघांच्या चर्चेत खरेतर उडी मारत नाहीये, पण..
प्रतिसादकाच्या प्रोफाईलवर अपलोड केलेलं चित्र, प्रतिसादातला मजकूर हायलाइट करण्यासाठी त्यानं निवडलेला ठळक काळ्या अक्षरांचा पर्याय याचं यथार्थ उदाहरण आहे आणि प्रोफाईलवर नमूद केलेल्या आवडीनिवडी आणि इतर तपशील ती गोष्ट पुन्हा अधोरेखित करतात.
हे दोन संदर्भ अतिशय खटकले. खरडवही आणि त्यातील सदस्याची स्वतः विषयीची माहिती, फोटो ही सदस्याची वैयक्तिक गोष्ट आहे. त्या गोष्टींची चर्चा सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही असे वाटते. कोण कोणाच्या खरडवहीत काय लिहीतो, किंवा काय गप्पा मारतो हा विषय खरडवही पुरताच मर्यादित रहावा असे वाटते. मागे देखील मी ह्या संदर्भात काही सदस्यांना अशीच विनंती केल्याचे आठवते. अर्थात माझे मत हे योग्यच आहे असे नाही, पण मनात आलेले विचार तुमच्यापर्यंत पोचवले इतकेच. तुम्हाला ते योग्य वाटल्यास तुमच्या प्रतिसादात तुम्ही संपादन कराल अशी आशा करतो. *तुम्हाला प्रतिसाद संपादन करता यावा ह्यासाठी प्रतिसादाला बूच मारलेले नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ली माऊला प्रतिसाद देताना मी कथेमागची भूमिका स्पष्ट केलीये आणि ती विशद करण्यापूर्वी देखील विधायक प्रतिसाद आलेत आणि तुझ्या किंवा चित्रगुप्ताजीं सारख्यांचे मजेशीर प्रतिसाद देखील आलेत आणि ते होणारच. कथेवर काय अँगलनं चर्चा व्हावी याला डेकोरम आहे त्यांनी इतका हिणकस प्रतिसाद दिलाय त्यामुळे मला अत्यंत खेदानं त्या मागची मानसिकता विषद करावी लागली. यू आर अ वेटरन, अशा प्रतिसादानंतर कथेचा फज्जा उडणार नाही आणि तरीही त्यात व्यक्तीगतता येऊ नये यासाठी मला पहिल्या प्रतिसादापासून कमालीची कसरत करावी लागली. मजा म्हणजे माझी बाजू मांडून मी थांबलो देखील होतो तर त्यांनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली. नशीबानं साहित्य काय , अध्यात्म काय किंवा सौंदर्य काय, प्रेम काय की या कथेचा विषय काय मी कोणत्याही अँगलनं उत्तर देऊ शकतो म्हणून नाही तर दुसर्‍या कुणाची दुर्दशा झाली असती. इथल्या प्रत्येक सुरेख कवितेवर, कथेवर किंवा लेखावर माझा आवर्जून प्रतिसाद आहे मग भले तो सदस्य कुणीही असो आणि त्यानं माझ्या विरुद्ध काहीही लिहिलेलं असो, व्यक्तीगत आकस मला धरताच येत नाही. प्रतिसाद संपादित करायला काय मी काढून टाकायला देखील राजी आहे (सध्या तो ब्लॉक झालाय) पण संकेतस्थळावरचं वातावरण आणि प्रतिसादांचा दर्जा ही सर्वांची जवाबदारी आहे. सदर सदस्याचा पहिला प्रतिसाद जर त्यानं काढायची तयारी दर्शवली तर माझा वरचा प्रतिसाद देखील काढून टाकावा अशी मी अ‍ॅडमिनीस्ट्रेटर्सना विनंती करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

रामपुरी 03/08/2012 - 00:53
आत्ता कसं बरं वाटलं. मी, माझे, मला, माझ्या, मी, मी, मी, मी.... चालू द्या नवीन म्हणः आपले ते उत्तर दुसर्‍याची ती नवी सुरूवात

In reply to by परिकथेतील राजकुमार

खरडवही आणि त्यातील सदस्याची स्वतः विषयीची माहिती, फोटो ही सदस्याची वैयक्तिक गोष्ट आहे. त्या गोष्टींची चर्चा सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही असे वाटते. परा, इट्स ओके!! मला त्याबद्दल राग नाही.... पिवळा डांबिस ही एक व्यक्तिरेखा आहे. त्या व्यक्तिरेखेला अनुसरून खवमधले चित्र आणि मजकूर लिहिलेला आहे. कुणीही जाणकार मिपाकर प्रत्यक्षात मी तसाच आहे असं समजणार नाही हे तुलाही माहिती आहे.... काळ्या वाक्यांबद्द्ल बोलायचं तर मिपावर दुसर्‍याने लिहिलेली वाक्यं उधृत करतांना ती बोल्डफेस (वा इटालिक वा अंडरलाईन) करायची ही मिपास्थापनेच्या काळापासूनची जुनी पद्धत आहे. जेंव्हा मिपावर रंग वापरता येत नव्हते तेंव्हापासूनची! त्याचा कुणाच्या मानसिकतेशी काही संबंध नाही हेही जाणकारांना माहिती आहे... आता अभिप्रायांबद्दल! माझा पहिला अभिप्राय हा ते गंभीर विषयांवर आपल्या धाग्यांतून हे जे फॉरच्यून कुकी तत्वज्ञान मांडत असतात त्याची खिल्ली उडवणारा आहे. त्या प्रतिसादात त्यांच्यावर व्यक्तिशः टीका काही नाही. पण त्यानंतर त्यांनी माझी (आणि त्याहून वाईट म्हणजे इतर सभासदांची) मानसिकता वगैरे काढल्यामुळे मला नंतरचे प्रतिसाद द्यावे लागले, अन्यथा गरज नव्हती... तू म्हटल्याप्रमाणे मिपा हा ओपन फोरम आहे. इथे त्यांना आपले धागे काढायचा जसा पूर्ण अधिकार आहे तसाच इतर सभासदांना अनुकूल/ प्रतीकूल अभिप्राय द्यायचा पूर्ण अधिकार आहे अशी माझीही समजूत आहे. बाकी प्रतिक्रिया (वा धागेही!) ठेवण्या-उडवण्याबद्दल मी मतप्रदर्शन करत नाही कारण संपादकमंडळाला सभासदांच्या अशा परवानगीची आवश्यकता नसते हे माहिती असण्याइतका मी इथे जुना आहे... सारांश, तू इथे चार शब्द लिहिल्याबद्दल धन्यवाद. मलाही जे सांगायचं ते सांगून झालेलं आहे. तेंव्हा आता या धाग्यावर लेखनसीमा. आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

>माझा पहिला अभिप्राय हा ते गंभीर विषयांवर आपल्या धाग्यांतून हे जे फॉरच्यून कुकी तत्वज्ञान मांडत असतात त्याची खिल्ली उडवणारा आहे. त्या प्रतिसादात त्यांच्यावर व्यक्तिशः टीका काही नाही. = बघा, तुमचा रोख माझ्याकडे आहे, कथाविषयाकडे नाही! ही कथा आहे आणि विषय रोजच्यातला आहे, कथेला अध्यात्मिक अ‍ॅंगल असला तरी मांडणी अत्यंत तरल मूडमधे केलीये (निरंजन, गवि आणि अपर्णाचे प्रतिसाद पाहा). अर्थात कथेचा मूड इतरांना समजला नसेल अशी शक्यता नाही पण तुमच्या प्रतिसादाचा हेतू अपर्णानं अचूक हेरलाय "अन सारा माहौल बदलुन टाकल्याबद्दल..." अध्यात्म वेगळा विषय आहे आणि तो सर्वस्पर्शी असला तरी माझ्या लेखी तो गंभीर खचितच नाही. खरं तर मी इथे अजून एकही पूर्णपणे अध्यात्मिक असा लेख लिहिलेला नाही. शरीर, पैसा, काल हे अत्यंत मूलभूत विषय अतीशय हलक्या-फुलक्या शैलीत मांडलेत. दुसरं असं की तुम्हाला अध्यात्म समजलय, तो गंभीर विषय आहे आणि मी "फॉरच्यून कुकी तत्वज्ञान " मांडतोय असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं आकलन इथे मांडा. तुम्ही अध्यात्मातल्या अ ते ज्ञ कोणत्याही विषयावर लिहा, जर तुम्ही निर्विवाद लिहू शकलात तर तिथे माझा प्रशंसेचा प्रतिसाद नक्की असेल पण मी जर तुमची ढोबळ चूक दाखवली तर ती मान्य करण्याची दिलदारी दाखवा. असं लेखन संकेतस्थळाचं मूल्यवर्धन करेल आणि सर्वांना उपयोगी होईल. >त्या व्यक्तिरेखेला अनुसरून खवमधले चित्र आणि मजकूर लिहिलेला आहे. कुणीही जाणकार मिपाकर प्रत्यक्षात मी तसाच आहे असं समजणार नाही..... = हे फार लक्षवेधी आहे. व्यक्तीरेखेमागे व्यक्ती असते हे विसरता येत नाही आणि व्यक्तीरेखेतून ती स्वत:लाच व्यक्त करत असते; तुम्हाला जर अध्यात्म समजलं असेल तर यालाच तादात्म्य म्हटलय. वास्तविकात आपण नि:संग असलो तरी ज्याच्याशी तादात्म्य पावतो तसे होतो हा अत्यंत बेसिक अध्यात्मिक फंडा आहे आणि तेच तर खरं विधायकतेच मूल्य आहे. >पण त्यानंतर त्यांनी माझी (आणि त्याहून वाईट म्हणजे इतर सभासदांची) मानसिकता वगैरे काढल्यामुळे मला नंतरचे प्रतिसाद द्यावे लागले, अन्यथा गरज नव्हती... = मी "प्रतिसादातून आपली मानसिकता प्रकट होते" असं म्हटलय आणि ती शुद्ध वास्तविकता असल्यानं मला सुद्धा अ‍ॅप्लिकेबल आहे. हिणकस प्रतिसादावर टाळ्या वाजवणं हे अनाहूतपणे तश्याच वृत्तीचं प्रदर्शन आहे हे उघड असलं तरी त्यात मी संकेतस्थलावरच्या सर्व सदस्यांना ओढलय असा निष्कर्श काढणं अयोग्य होईल. असो, आपल्याला व्यक्तीश: ओळखत नसल्यानं मी सुद्धा `प्रतिसादामागच्या मानसिकतेचं' विश्लेषण केलय, तुमच्या प्रत्यक्ष असण्याचं नाही हे अत्यंत मनःपूर्वक नमूद करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब 03/08/2012 - 21:50
व्यक्तीरेखेमागे व्यक्ती असते हे विसरता येत नाही आणि व्यक्तीरेखेतून ती स्वत:लाच व्यक्त करत असते; हेच पु.ल., खांडेकर, चि.वि., झालंच तर प्रेमचंद, बर्नार्ड शॉ, हिचकॉक अशा लोकांना सुद्धा अ‍ॅप्लिकेबल आहे का हो? एक आपलं शंका निरसन व्हावं म्हणुन विचारतेय इतकंच. बाकी तुमचं मी, माझा प्रतिसाद, माझा धागा, माझे विचार वगैरे चालु द्या.

नंदन 01/08/2012 - 11:21
कथा आवडली. हिंदीत 'रोब दिखाना' हा वाक्प्रचार कसा आला असावा, ते समजले ;)

आत्मशून्य 01/08/2012 - 11:43
प्रकृती आणि पुरुष एक कसे याचा मला अचानक उलगडा पण ते रहस्य आता मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो.
क्या बात है. इर्षाद. पण मला तरी रहस्य "कमालीचा फिटनेस" असावं असं वाटतं. इतकच काय पण अवांतर वाटणार नसेल तर जेव्हां वेळ कसोशीने प्रयत्न करुन करुन करुनही अनुभवाला येत नाही अशी स्थितीसुध्दा कमालीचा फिटनेसच देतो असा अनुभव आहे. 0:)

मन१ 01/08/2012 - 11:48
पहिले काही परिच्छेद जास्त आवडले. अध्यात्माच्या विचारांची ब"रोब"री सांसारिक माणसानं केल्याचं पाहून सासू सासर्‍यांनाही बरं वाटलं असावं.

गवि 01/08/2012 - 12:19
मस्त खुसखुशीत...आवडलं.. फिलॉसॉफी / अध्यात्म म्हणजेच वैराग्य नव्हे , इट्स अ वे ऑफ लाईफ... किंवा इट्स सिंप्ली अ रियलायझेशन.. हे एकदम योग्य फॉरमॅटमधे मांडलं आहेत...

कवितानागेश 01/08/2012 - 13:49
हे पूर्वप्रकाशित आहे असे वाटतय. तसे असल्यास कृपया तसा उल्लेख करावा. निदान मला तरी पूर्वी वाचल्यासारखा वाटतोय. आणि पूर्वीइतकीच मजा आली वाचताना. :) अवांतरः "प्रकृती आणि पुरुष" म्हणजे "स्त्री आणि पुरुष" नाही. शिवाय प्रकृती आणि पुरुष एक नाहीत, आणि वेगवेगळेही नाहीत!

In reply to by कवितानागेश

खरं तर तुमचा प्रतिसाद बघून मजा वाटली आणि तो प्रामाणिक वाटतोय म्हणून उत्तर देतो >प्रकृती आणि पुरुष" म्हणजे "स्त्री आणि पुरुष" नाही =येस, प्रकृती म्हणजे जेजे व्यक्त आहे ते आणि पुरुष म्हणजे निराकार, ज्यात प्रकृती प्रकट झालीये आणि विलीन होईल ते. >शिवाय प्रकृती आणि पुरुष एक नाहीत, आणि वेगवेगळेही नाहीत! = व्यक्तात प्रकृती आणि पुरुष एक नाहीत, तुम्ही वेगळ्या आहात आणि मी वेगळा आहे, पण अव्यक्तात आपण सर्व एक आहोत कारण अव्यक्ताला आकार नाही. ही कथा आहे त्यामुळे तिच्यात व्यक्त जगातल्या संबंधांचा विचार आहे जिथे पती-पत्नी वेगळे आहेत आणि तरीही एका मान्यतेनं सहजीवनात साथी आहेत. कथेची कॅच लाईन :"लग्न जशी एक कल्पना आहे तशी डिवोर्स पण एक कल्पना आहे" ही आहे आणि इतिश्री "आपण वेगळे होऊ शकत नाही!" ही आहे. कथेवर भलत्याच अँगलनं प्रतिसाद आल्यानं मुख्य विषय नजरेआड झालाय.

In reply to by संजय क्षीरसागर

मन१ 01/08/2012 - 20:30
प्रियांका चोप्राच्या च्या तोंडून अरबी गाणे ऐकल्यासारखे वाटते. सुंदर पोरगी आहे, जे म्हणेल ते छानच वाटते, पण साला एक छटाकभरही समजणार नाही. तस्साच हा रमणीय वाटणारा आध्यात्मिक प्रतिसाद.

चित्रगुप्त 01/08/2012 - 15:14
ब्रम्हांडाची निर्मिती दिव्य ध्वनीपासून झाली... ध्वनी म्हणजेच "रव" = "रब" = "रोब" (बोंगाली उच्चार) तर असा अवघ्या ब्रम्हांडाला कवेत घेणारा रोब कुठे आणि कुठे तो चट्ट्यापट्ट्याचा पायजमा... छ्या... आणखी एक गुपित "मरून" रोब मधे दडलेले आहे. जेंव्हा तुम्ही 'मरून' जाता, अर्थातच तुमचा अहंकार, वासना, 'मी'पण, भूत-भविष्य, काळाची जाणीव, देहबुद्धी, हे सर्व विलयाला जाते, तेंव्हा तुम्ही ब्रम्हाशी, त्या दिव्य ब्रम्हनादाशी एकरूप होता, ब्रम्हच बनता... अशी आहे 'मरून रोब' ची महती. बघा, या रोबमधे कशी लागते ब्रम्हानंदी टाळी...

In reply to by चित्रगुप्त

गवि 01/08/2012 - 15:16
पाय् म्हणजे ३.१४ अर्थात मानवी पायांसारखं हे चिन्हः पाय् म्हणजे एकाचवेळी विश्वाचं इर्रॅशनल असणं आणि विश्वाचं वर्तुळपण जाणवून देणारा शब्द.. आणि जमा म्हणजे आयुष्याची पॉझिटिव्ह, जमेची बाजू दाखवणारा शब्द..जे काही आहे ते 'जमे'च्या बाजूला टाकत चला असा सकारात्मक संदेश देणारा जादुई शब्द... तस्मात "पाय+जमा" पायजमा...अर्थात वर्तुळाप्रमाणे विस्तारत जमा होत जाणार्‍या शारिरीक आणि वैश्विक गोलाईला वेढू पाहणार्‍या शब्दाला तुम्ही कमी लेखावेत याचा विषाद वाटला..

In reply to by गवि

चौकटराजा 01/08/2012 - 15:28
मला हा काही ३.१४ वगैरे दिसत नाही तर गवि मधल्या ग सारखा दिसतो आहे. प्रजापतीने "गवि" हा शब्द लिहायला घेतल्यावर प्रथम काना काढला मग वरची रेघ काढली व ग ची गाठ काढायच्या आतच शाई संपलेली दिसतेय ! ऑं नाही नाही हे स्वर्गाचं दार दिसतंय ! अध्यात्म चावलं की हे दिसतं व मोक्ष का काय ते मिळतं म्हणतात !

In reply to by गवि

विजुभाऊ 01/08/2012 - 15:39
बोला................................ ..................सत्यपूर्ण सव्यसाची सव्यापसव्यकारी समभ्रमकारी सदैवजागृत चट्टेरीपट्टेरी रंगांकीत वस्त्रांपरीधारक श्री श्री श्री बाबा गवि म्हाराज की जै...... आरती झाली की प्रसाद बाहेर दिला जाईल

In reply to by बॅटमॅन

सहमत होण्याची इच्छा नाही, पण होऊन टाकते. ब्याटम्यानही आजकाल जुनाजाणता झालाय ना. :प एकेकाळी पिडाकाकांनाही स्वपीडनाची उबळ आली होती हे पाहून अंमळ मौज वाटली.

In reply to by गवि

चित्रगुप्त 03/08/2012 - 11:26
आज पहाटे नाडि-महर्षींनी दृष्टांत दिला आणि म्हणाले, अरे, तू समजतोस तसा पट्ट्या-पट्यांचा पायजमा म्हणजे साधेसुधे प्रकरण नव्हे... असे बघ, त्याचे दोन पाय हे द्वैताचे प्रतीक आहेत. सुख-दु:ख, प्रकाश-अंधार, उंच-नीच... इ. द्वैतावरच जग चालत असते... पण जसजसे 'वर' जावे,तसे हे द्वैत मावळून दोन्ही पाय एकरूप होतात, आणि तिथेच असते 'नाडी.'. ... आणि या नाडी मुळेच हे 'अद्वैत' टिकून रहात असते. आपले शरीर, मन, आत्मा, भूत-भविष्य हे सर्व 'नाडी' च्या आधारेच सुखनैव चालत असते. मी नाडि-महर्षींना लोटांगण घातले आणि जागा झालो... आणि सुचले, अरे खरेच, 'पट्ट्या-पट्ट्या' हे विशेषणही नाडी-पट्ट्यांवरूनच आलेले असणार.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी , जिओ! तुम्ही कथेचं सौंदर्य खुलवलत, मूड बदलवला, धन्यवाद! पूर्वापार चालत आलेला संन्यस्त भगवा आणि मरुन यात जमीनास्मानाचा फरक आहे, भगवा विरक्ती दर्शवतो तर मरुन समन्वय

In reply to by चित्रगुप्त

अर्धवटराव 01/08/2012 - 21:23
असं वाटतं तिने कधि डोळे उघडुच नये आणि तिला बघताना माझे डोळे कधि मिटुच नये. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बॅटमॅन 02/08/2012 - 23:47
असं वाटतं तिने कधि डोळे उघडुच नये आणि तिला बघताना माझे डोळे कधि मिटुच नये.
किंचित असहमत. असं वाटतं की तिने डोळे उघडून माझ्याकडेच बघावं आणि बघत रहावं ;) तिला बघताना माझे डोळे कधीच मिटणार नाहीत हे तर सरळच आहे :)

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 03/08/2012 - 03:11
आणखी एक शक्यता म्हणजे... ... तिने डोळे उघडून माझ्याकडेच बघावं आणि बघत रहावं, आणि तिला बघताना त्या अथांग सुखात माझे डोळे कायमचे मिटावेत... (कधी कधी अद्वितीय कलाकृती बघताना मला असे वाटून गेलेले आहे)

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 03/08/2012 - 10:17
भारी गंमत चाललीये तुम्हा लोकांची. मला तर ती "करून करून भागले आणि अध्यात्माला लागले" अशा प्रकारातली वाटतेय. ;-)

निवांत पोपट 01/08/2012 - 18:30
एरिक क्लॅप्टन च्या I feel wonderful tonight गाण्यामधील सौम्यसा,धुंद आणि तरल मूड लिखाणात उतरला आहे. रेसिपी छान जमली आहे.चव चांगली आहेच. फ़क्त एक दोन खडॆ दाताखाली आले.चालायचेच.पण एकूण लेख आवडला..

नगरीनिरंजन 02/08/2012 - 12:17
कथा आवडली. आधीही एकदा मनोगतावर वाचली होती. साध्याशा प्रसंगाला अध्यात्माची छान डूब दिली आहे. सामान्य माणसाच्याही आयुष्यात असे प्रसंग अनेकदा येतात. नवरा-बायको तडातडा भांडतात. एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो. एकमेकांचं तोंड पुन्हा पाहणार नाही अशी प्रतिज्ञा केली जाते. चार दिवस सोय झाली नाही की वेगळे होणे शक्य नाही हे सत्य सापडते. पण ते प्रसंग अशा रंगतदार खुबीने मांडणे सगळ्यांनाच शक्य नसते.

In reply to by नगरीनिरंजन

सहजीवनात घटस्फोट ही अत्यंत नकारात्मक घटना आहे आणि त्यातनं कुणाचंही भलं होत नाही हे सांगण्याचा कथेत प्रयत्न आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

विजुभाऊ 03/08/2012 - 09:54
सहजीवनात घटस्फोट ही अत्यंत नकारात्मक घटना आहे आणि त्यातनं कुणाचंही भलं होत नाही हे काही सत्य नाही. एकमेकांषी पटत नाही म्हणून तर घटास्फोटाची सोय कायद्याने दिलेली आहे. मारुनमुटकुन नावडत्या व्यक्तीसोबत रहाण्यापेक्षा वेगळे झालेले बरे ना. एखादा पुरुष बायकोला मारहाण करत असेल अथवा एखादी बायको नवर्‍याचा सदोदीत रागराग करत असेल तर अशा संसाराला काय अर्थ आहे. त्यापेक्षा घटस्फोट घेवुन नवे इनिंग सुरु करता येइल निदान अन्याय सहन करत बसावा लागणार नाही

मनीषा 03/08/2012 - 16:49
उत्तम कथा पण खरोखरीच, "सत्य म्हणजे काय?" हा एक मिलीयन डॉलर क्वेच्शन आहे. ज्याला उत्तर मिळाले तो भाग्यवान. पण असा कुणी भाग्यवान पहाण्यात अथवा ऐकीवात नाही.

Dhananjay Borgaonkar 03/08/2012 - 18:57
भगवा विरक्ती दर्शवतो तर मरुन समन्वय
मरुन समन्वय दर्शवतो म्हणजे नक्की कशातला समन्वय? प्रपंच आणि अध्यात्मा मधील समन्वय का? आणि मरुनच का समन्वय दर्शवतो दुसरा कुठला रंग का नाही? ईथे धागा भरकटवण्याचा मुळीच उद्देश नाहीये. मला पडलेले हे प्रामाणिक प्रश्ण आहेत.