द मरुन रोब
लेखनप्रकार
आम्ही दोघं पार्टीहून घरी आलो तर सासूबाई रडतायत, सासरे समजूत घालतायत आणि माझे आई वडील बघतायत असा नजारा होता. मला वाटलं, आजे सासूबाईंची तब्येत मधे फारच नाजूक होती त्यांनी बहुतेक व्हर्टिकल टेक-ऑफ घेतलेला दिसतोय. प्रसंगाचं गांभीर्य बघून मी सीरियसली विचारलं 'आहो, काय झालं? '
तर आई म्हणाली 'तुझ्यामुळे रडतायेत!'.
मला जाम टोटल लागेना, मी प्रश्न रिपीट केला 'काय झालं? '
तर सासूमां म्हणाल्या 'तुम्ही ऐन उमेदीत अध्यात्माला लागलात, मला काळजी वाटतेय'
'कसली? '
'तुम्ही सगळं सोडून जाल'
'कशाबद्दल? '
'सगळे अध्यात्माला लागलेले संसार टाकून जातात, तुमचा बुद्ध नाही का तान्हं मूल आणि बायको सोडून गेला? ' अत्यंत भेदक संवाद आणि त्याला भावनेची डूब हे त्यांच्या संभाषण कौशल्याचं मर्म आहे.
'आहो पण इथे मी सी ए केलंय, काय कष्ट उपसलेत ते माझं मला माहिती, आता कुठे बरे दिवस दिसतायत, इतकं सुरेख घर घेतलंय, मी कशाला सोडून जाईन? '
बायकोकडे आपला गडी म्हणून बघतोय तर ती त्यांच्यात कधी सामील झाली ते कळलंच नाही, म्हणाली 'हो यांचा काही भरोसा नाही'. मी परत चाट, आताच पार्टीहून आलोत ते विसरली काय ही? सामना आता "तीन विरुद्ध एक आणि दोन तटस्थ" असा झाला.
'आहो पण बुद्ध शेवटी परत आलाच ना? ' मी त्यातल्या त्यात माझी आध्यात्मिक माहिती कामाला आणली.
'काय परत आला? आल्यावर स्वतःचा मुलगा म्हणाला 'माझ्यासाठी काय आणलं? ' तर त्याच्या हातात भिक्षापात्र दिलं! ' सासूमां सुसाट झाल्या होत्या. मला क्षणभर त्यांच्याकडून संसारदिक्षा घेतली असती तर एव्हाना कुठल्या कुठे पोहोचलो असतो असं वाटायला लागलं.
एवढ्यात आमचा मुलगा बाहेरून आला. वातावरणाचं गांभीर्य बघून त्याला मिश्किल हसू येत होतं, म्हणाला 'काय झालं? '
मी प्रसंग सावरण्यासाठी त्याला म्हटलं 'जगातला एकमेव प्रश्न काय आहे? '
प्रसंगाची काहीही कल्पना नसताना देखील तो तितक्याच तप्तरतेनं आणि गंभीरपणे म्हणाला 'आता माझं कसं होणार? '
आम्हाला इतकं कमालीचं हसू आलं की माझे तटस्थ आई वडील देखील त्यात सामील झाले आणि "चार विरुद्ध तीन" असा आम्ही तो सामना जिंकला!
_________________________
तीन चार दिवसांनी बायको म्हणाली 'आपण प्रभातकडे केव्हा जायचं?' ( प्रभात वकील आहे), मी म्हणालो 'चल लगेच, पण आता त्याच काय आहे?'
तुम्ही कधी बुद्धिबळ खेळला असाल तर निष्णात खेळाडू साधारण सहा चालींची एक स्ट्रॅटजी आखतो आणि त्याचं कौशल्य असं असतं की प्रतिस्पर्ध्याला अजिबात पत्ता न लागू देता त्या सहा चाली तो अशा काही उलट सुलट खेळतो की स्ट्रॅटजी पूर्ण झाल्यावरच प्रतिस्पर्ध्याला काय प्रसंग ओढवलाय ते कळतं. स्त्रियांना ही कला जन्मजातच असते म्हणून "पुरुष विरुद्ध स्त्री" असा बुद्धिबळाचा सामना जगाच्या इतिहासात बहुदा कधी झाला नाही. जगज्जेत्या बुद्धिबळपटूला देखील स्त्रियांची स्ट्रॅटजी लक्षात येणार नाही! (त्यातून या वर्तमानात राहण्याच्या आध्यात्मिक प्रॅक्टिसमुळे मला भूतकाळ जाम विसरायला होतो).
'मला डायव्होर्स पाहिजे! 'ती म्हणाली
'कुणाकडून? ' मी बावळटासारखा म्हणालो
'उगाच सगळं माहीत असून नसल्यासारखं करू नका, तुमच्याकडून!'
तिच्या आवाजातला ठामपणा मला जाणवला. 'अग पण उगाच कशाला डिवोर्स घ्यायचा आपला चांगलं चाललंय की, छान मुलगा आहे, घरात सगळं आबादी आबाद आहे' मी प्रसंग सावरायला लागलो.
'नाही आपण प्रभातकडे जाऊया' ती हट्ट सोडायला तयार नाही.
मग मी ट्रॅफिक जॅम मधून गाडी काढायचा प्रयत्न केला, 'त्यापेक्षा आपण छायाकडे जाऊ या'
छाया तिची स्त्रीमुक्तिवादी मैत्रीण आणि माझी कॉलेजची कोप्रोफेसर आहे, सॉलिड कौन्सेलिंग वगैरे करते. तिचा नवरा तिला "बाहेर दोरीवर घातलेले कपडे वाळले असतील का? मी आता ते घड्याकरून ठेवू का?" असे प्रश्न विचारून तिनं "हो" म्हटल्या शिवाय काही करत नाही. छाया किती जरी स्त्रीमुक्तिवादी असली तरी माझा बिंधास्तपणा तिला आवडायचा, तिला आपल्या पार्टीत आणू शकीन असं मला वाटत होतं पण आपली स्ट्रॅटजी चालेल तर ना!
'नको, तुम्ही डायव्होर्सचे कागद घेऊन या, मी पुढचं बघते'. तिनं पुन्हा ट्रॅफिक जॅम केला!
आता काय बोलणार? मी म्हणालो 'चल फिरायला जाऊ'
'नको तुम्ही क्लायंटकडे जा, माझा मूड नाही' तिनं चेकमेट करून टाकला.
____________________________
मग मला बाहेर जाववेना मी परत घरात आलो, ड्रॉवर उघडला सगळ्या एफ डीज् आणि पासबुक्स बाहेर काढली एक लिस्ट केली आणि तिच्या हातात ठेवली "हे एवढे पैसे आहेत माझ्याकडे ते सगळे तुला घे आणि तुझा मुलात जीव आहे तो पण तू घे" मी इतका भावनाविवश आयुष्यात कधी झालो नव्हतो पण तिच्यासमोर प्रामाणिकपणे सगळा मार्ग मोकळा करून दिला. लिस्टकडे बघून ती विचार करायला लागली.
"माझ्याकडे मरेपर्यंत उपयोगी पडेल असं क्वालिफिकेशन आहे पैसे मी कसेही मिळवीन आणि तुला मुलगा हवा आहे मला मंजूर आहे उगाच कशाला कोर्टात जायचं?"
ती कसल्याशा विचारात पडली, मी म्हणालो चल फिरून येऊ.
बाहेर पडल्यावर मी म्हणालो "तुला हवं तेव्हा तू नीघ पण मला नीट विचार करून सांग कुठे जाणार तू? तुला आता मिळणारी रक्कम मोठी वाटत असली तरी बरेचसे पैसे फ्लॅटमध्ये जातील, मुलगा मनातून दुभंगेल, काय साधशील यातून?" ती एक शब्द बोलली नाही.
" एक मार्ग आहे " मी म्हणालो
"काय? "
"लग्न जशी एक कल्पना आहे तशी डिवोर्स पण एक कल्पना आहे. तू कमालीचा फिटनेस ठेव आणि माझ्यापेक्षा एखादा उमदा नवरा शोध मी तुझं लग्न करून देईन, दरम्यानच्या काळात माझी मैत्रीण म्हणून रहा."
"चालेल" ती म्हणाली . तिच्या मनाचा मला जाम पत्ता लागेना पण ही रिलेशनशिप मला मजेशीर वाटायला लागली.
"आता मला आईकडे सोडा" तिला माहेरी सोडून मी क्लायंटकडे गेलो.
____________________________
जिथे जातो तिथे रमतो त्यामुळे मी कामात गर्क झालो, वर्षातनं एकदाच प्रत्यक्ष भेटत असल्यानं क्लायंटही वाट बघत असतात. क्लायंट बरोबर जेवण, गप्पा आणि काम यात संध्याकाळ केव्हा झाली कळलं नाही. काम संपवलं तेव्हा लक्षात आलं की बायकोला सकाळी माहेरी सोडलंय, तिला फोन केला. मुलगा मित्रांबरोबर पिक्चरला गेलायं आणि रात्री मित्राकडेच राहणार आहे तीनं सांगितलं. माझे आई वडिल, मेव्हणा गावाला गेल्यामुळे बहिणीकडे रहायला गेले होते. "मग तू इकडे का येत नाहीस, आपण कँपमध्ये फिरु, मलाका स्पाइसला जेवू आणि तू येईपर्यंत मी इ-स्क्वेअरच्या लास्ट शोची तिकीटं पण काढतो". ती म्हणाली "चालेल, मी वेस्टएंडपाशी थांबते". इ-स्क्वेअरला ओळख असल्यानं तिथे फोन केला आणि आमच्यासाठी दोन लास्ट शोची तिकीटं ठेवायला सांगितली.
वेस्टएंडपाशी पोहोचलो तर बघतंच राहिलो, तिनं पिंक अँड ग्रे कॉंबीनेशनचा स्टँडकॉलरचा ड्रेस घातला होता आणि त्याच्यावर पिंक दुपट्टा घेऊन केसात मोगरा माळला होता. मी गाडीचं दार उघडायचं सोडून बघतच राहीलो. ती दार उघडून आत आली आणि आतला सगळा रंगच बदलून गेला.
" पहेले वो सितम करते थे तो कयामत थी, अब मेहेरबां हुऐ तो हादसा हो गया"!
तिला अर्थ समजला होता पण तरीही म्हणाली : "म्हणजे नक्की काय?"
"मला तुझ्याशी पुन्हा लग्न करावसं वाटतंय"
साली ही उस्तफूर्तता मला केंव्हा काय बोलायला लावेल याचा नेम नाही; वाटायला लागलं आपण इतक्या चांगल्या मूड मध्ये उगाच पार स्टेडियम बाहेर बॉल मारला, पण वातावरणाचे सूर जुळले असावेत, ती म्हणाली : "मी योगा आणि प्राणायाम करून आता कमालीचा फिटनेस आणि फिगर ठेवणार आहे"
"क्या बात है"! मला तिचं कौतुक वाटलं, तिनं परत मूड तयार केला होता.
___________________________
मलाका स्पाईस जवळ एक बाग आहे आम्ही तिथे गेलो. हिरवळीवर स्प्रिंकलर्स चालू होते, मी म्हणालो "चल, मी भिजून घेतो". ट्रॅकवर आम्ही निःशब्द फिरत राहीलो कारण तिची पावलं माझ्या पावलांबरोबर पडत होती आणि हे आत कुठे तरी सूर जुळल्यामुळे होत असावं असं वाटलं.
स्वाद ही चव आणि गंध यांनी मिळून होणारी जादू आहे आणि ती मलाका स्पाईसवाले अशी काही जमवतात की जेवणाची मैफल संपूच नाही असं वाटतं. त्यात कॉईन थ्रू ही लिक्यूअर देखील अशी काही भन्नाट आहे की तुम्ही एकाच वेळी कवी, शायर आणि संगीतकार होता. तुमचा रंग असा काही आकाशी होतो की तुम्हाला नवनवीन कल्पना सुचायला लागतात. त्यात अशी मैत्रीण बरोबर मग तर काही विचारायलाच नको.
मला एकाच वेळी तिच्यात आणि माझ्यात एक ओढ लावेल असं अंतर आणि निर्भय समन्वय जाणवायला लागला. माझे सगळे शब्द आणि अर्थ अभीव्यक्तीच्या सार्या सीमा ओलांडून तिच्यापर्यंत पोहोचतील असं वाटायला लागलं. ती काही बोलत नव्हती पण विचार ही करत नव्हती फक्त सगळा विरोध, सगळा विसंवाद संपल्यासारखा वाटत होता. मला वाटायला लागलं बास! या क्षणी हे आयुष्य संपावं! स्त्री ही काय जादूगीरी आहे, एका स्त्रिशी सूर जुळणं सार्या अस्तित्वाशी एकरुपता जमण्यासारखं आहे.
________________________________
मला पिक्चरचं प्रचंड आकर्षण आहे. तुम्हाला गुतंवून ठेवणारी विषयाची मांडणी, ती रमणीय स्थळांची, आपण पोहोचू शकणार नाही अशा अँगल मधून घेतलेली दृश्य, रंगांची सुरेख उधळण, पेहेरावांची नजाकत, बेभान करणारं संगीत, परस्परातले संबंध, संवादांची जादू, सौंदर्य, प्रणय आणि अभिनय सगळं एकावेळी हजर असतं! हे पिक्चरवाले कल्पनाच इतक्या सुरेख मांडतात की वास्तव फिकं वाटतं. जगातली सारी बुद्धीमत्ता, सौंदर्य आणि संपत्ती जर तुम्हाला एका जागी पहायची असेल तर एकेका फ्रेमची मजा घेत पिक्चर बघावा.
घरी आलो तेंव्हा एक वाजला असावा; घर इतकं शांत आहे की आपण बोललो तरच आवाज त्यामुळे वेळेचा फक्त अंदाज बांधावा लागतो. त्यात घरात आज आम्ही दोघंच आणि जीवनातला 'उद्या' माझ्यासाठी कायमचा संपलेला; असा काही माहौल झाला होता की कॉफी घेत एकमेकांच्या सहवासात शांत बसून रहावं आणि झोप आली की झोपून जावं. तिनी कॉफी केली आणि आम्ही एकमेकांसमोर बसलो.
"सत्य म्हणजे नक्की काय हो?" ती म्हणाली.
मला तिचा धाडसी स्वभाव आणि कमालीची पारदकर्शता माहिती होती, तिनं इतका खोलवरचा पण इतका उघड प्रश्न विचारला होता की मी शब्द जुळवू शकत नव्हतो. सरळ ऊठलो आणि माझा स्टँडकॉलरचा सिल्कचा अप्रतिम मरून मेडिटेशन रोब घेऊन आलो, तो घातल्या क्षणी तुमचं अंतरंग बदलून जातं.
"तू मस्तं वॉश घे आणि हा मरून रोब घालून ये".
काहीही न विचारता ती उठली आणि फ्रेश होऊन तो मरून रोब परिधान करून समोर येऊन बसली. त्या रोबमध्ये ती अशी काही लावण्यवती दिसायला लागली की मी सत्य वगैरे सगळं पार विसरून गेलो आणि तिच्याकडे बघतच राहीलो.
"सांगा नं सत्य म्हणजे काय? "
"सखे खरं सांगू? मला ही नक्की माहिती नाहीये पण आताचा हा जो माहौल आपल्याला जाणवतोयं ना, त्याला बहुदा सत्य म्हणत असावेत".
माझ्याकडे पहात अत्यंत शांतपणे ती म्हणाली "सत्य म्हणजे काय ते मला कळलंय".
मी सर्दच झालो. "क्या बात है! सुनाइए"
"आपण वेगळे होऊ शकत नाही!"
मी इतका सद्गदीत झालो की मला शब्दच सुचेनात, "पियू हा रोब मी तुला बहाल करतो! तुला सत्य समजलयं! '. संन्यास्यानी स्वतःचा रोब पत्नीला बहाल केल्याची जगाच्या इतिहासातली ती बहुदा पहिली घटना असावी, तिनं माझे हात हातात घेतले आणि मला मिठी मारली.
"मी तुम्हाला समजू शकले नव्हते"
कॉईन थ्रू ची नशा अशी काही भन्नाट झाली होती की मला तीच एक रहस्य वाटायला लागली; प्रकृती आणि पुरुष एक कसे याचा मला अचानक उलगडा पण ते रहस्य आता मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो.
वाचने
21435
वाचनखूण
प्रतिक्रिया
99
अय्या, एक्दम सोप्पी
In reply to अय्या, एक्दम सोप्पी by पिवळा डांबिस
जरूर!
In reply to जरूर! by संजय क्षीरसागर
नो वरीज!!
In reply to नो वरीज!! by पिवळा डांबिस
अशक्य हसतोय
In reply to अय्या, एक्दम सोप्पी by पिवळा डांबिस
सोप्पी रेसिपी
In reply to अय्या, एक्दम सोप्पी by पिवळा डांबिस
प्रतिसाद वाचुन फुटले ना मी !
In reply to अय्या, एक्दम सोप्पी by पिवळा डांबिस
काका अगदी अगदी
*सासूमां सुसाट झाल्या होत्या.
In reply to *सासूमां सुसाट झाल्या होत्या. by स्पंदना
+१.
In reply to *सासूमां सुसाट झाल्या होत्या. by स्पंदना
@ अपर्णा >सारा माहौल बदलुन टाकल्याबद्दल..
In reply to @ अपर्णा >सारा माहौल बदलुन टाकल्याबद्दल.. by संजय क्षीरसागर
खरंच मजा येतेय प्रतिसाद वाचायला
In reply to @ अपर्णा >सारा माहौल बदलुन टाकल्याबद्दल.. by संजय क्षीरसागर
अशमत !
In reply to अशमत ! by परिकथेतील राजकुमार
पर्या, आय अॅग्री!
In reply to पर्या, आय अॅग्री! by संजय क्षीरसागर
एक खुसपटः भारतीय स्त्रिया
In reply to पर्या, आय अॅग्री! by संजय क्षीरसागर
अहो,
In reply to पर्या, आय अॅग्री! by संजय क्षीरसागर
तुमच्या भावना एक फार दुखावतात
In reply to तुमच्या भावना एक फार दुखावतात by शिल्पा ब
भावना कशाला दुखावतील हो
In reply to भावना कशाला दुखावतील हो by संजय क्षीरसागर
तुम्ही तरी सार्या दुनियेची
In reply to तुम्ही तरी सार्या दुनियेची by शिल्पा ब
तुम्ही कशाला उगीच मला सल्ले देताय?
In reply to तुम्ही कशाला उगीच मला सल्ले देताय? by संजय क्षीरसागर
कोणी मागत नाही म्हणुन तर
In reply to कोणी मागत नाही म्हणुन तर by शिल्पा ब
तुम्ही काय लिहिताय ते तुम्हाला कळत नाहीये असं वाटतं
In reply to तुम्ही काय लिहिताय ते तुम्हाला कळत नाहीये असं वाटतं by संजय क्षीरसागर
काय सांगता ! आम्हाला वाटलं
In reply to काय सांगता ! आम्हाला वाटलं by शिल्पा ब
तायडे 'णवीण' आहेत गं
In reply to तायडे 'णवीण' आहेत गं by प्यारे१
दादा, फोरम ओपन आहे याची पूर्ण कल्पना आहे
In reply to दादा, फोरम ओपन आहे याची पूर्ण कल्पना आहे by संजय क्षीरसागर
तुमच्या विद्वत्तेबद्दल आदर
In reply to तुम्ही कशाला उगीच मला सल्ले देताय? by संजय क्षीरसागर
जैसा राजा तैशी प्रजा या
In reply to अशमत ! by परिकथेतील राजकुमार
पराषेट, चटेरीपटेरी पायजमा /
In reply to पराषेट, चटेरीपटेरी पायजमा / by गवि
@ गवि
In reply to @ गवि by परिकथेतील राजकुमार
?
In reply to ? by नितिन थत्ते
हम्म्म्म
In reply to पराषेट, चटेरीपटेरी पायजमा / by गवि
CPU (चटेरीपटेरी अंडरवेयर)
In reply to अशमत ! by परिकथेतील राजकुमार
एकाचवेळी...
In reply to अशमत ! by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to @ अपर्णा >सारा माहौल बदलुन टाकल्याबद्दल.. by संजय क्षीरसागर
माणसाचं मन!
In reply to माणसाचं मन! by पिवळा डांबिस
प्रतिसादातून आपली मानसिकता प्रकट होते
In reply to प्रतिसादातून आपली मानसिकता प्रकट होते by संजय क्षीरसागर
या नंतर मात्र असे आणि यासम
In reply to प्रतिसादातून आपली मानसिकता प्रकट होते by संजय क्षीरसागर
पहिली गोष्ट कोणताही सूज्ञ पती
In reply to प्रतिसादातून आपली मानसिकता प्रकट होते by संजय क्षीरसागर
काय बोलताय?
लई भारी, धन्यवाद.
In reply to लई भारी, धन्यवाद. by ५० फक्त
क्षीरसागर साहेब,तुमच्या
In reply to क्षीरसागर साहेब,तुमच्या by परिकथेतील राजकुमार
परा, व्य. नि. सोडता संकेतस्थळावरची प्रत्येक गोष्ट सार्वजनिक आहे
In reply to परा, व्य. नि. सोडता संकेतस्थळावरची प्रत्येक गोष्ट सार्वजनिक आहे by संजय क्षीरसागर
हांगाश्शी
In reply to क्षीरसागर साहेब,तुमच्या by परिकथेतील राजकुमार
इट्स ओके!
In reply to इट्स ओके! by पिवळा डांबिस
फॉरच्यून कुकी तत्वज्ञान...
In reply to फॉरच्यून कुकी तत्वज्ञान... by अर्धवटराव
माझ्या माउची शिकवणी लाव
In reply to माझ्या माउची शिकवणी लाव by कवितानागेश
सगळी तत्वज्ञाने कोळून पिता येतील...
In reply to इट्स ओके! by पिवळा डांबिस
तुम्ही पोझिशन क्लिअर केली ते बरं झालं
In reply to तुम्ही पोझिशन क्लिअर केली ते बरं झालं by संजय क्षीरसागर
<<<व्यक्तीरेखेमागे व्यक्ती
चला सामंत काकांची कमतरता
रोब
In reply to रोब by नंदन
हॅहॅहॅहॅ
व्हेरी व्हेरी टची.
गुड वन...
मस्त खुसखुशीत...आवडलं..
In reply to मस्त खुसखुशीत...आवडलं.. by गवि
+१
या रेसिपी चे किट कुठे .....
हे पूर्वप्रकाशित आहे असे
In reply to हे पूर्वप्रकाशित आहे असे by कवितानागेश
>पूर्वीइतकीच मजा आली वाचताना, धन्यवाद!
In reply to >पूर्वीइतकीच मजा आली वाचताना, धन्यवाद! by संजय क्षीरसागर
अप्रतिम...
खुसखुशीत लेखन
कुठे इंद्राचा ऐरावत, आणि कुठे शामभटाची तट्टाणी..
In reply to कुठे इंद्राचा ऐरावत, आणि कुठे शामभटाची तट्टाणी.. by चित्रगुप्त
पाय् म्हणजे ३.१४ अर्थात मानवी
In reply to पाय् म्हणजे ३.१४ अर्थात मानवी by गवि
मला तर
In reply to पाय् म्हणजे ३.१४ अर्थात मानवी by गवि
बोला.........................
In reply to पाय् म्हणजे ३.१४ अर्थात मानवी by गवि
३.१४ - प्रक्षिप्त
In reply to ३.१४ - प्रक्षिप्त by बॅटमॅन
+३.१४
In reply to पाय् म्हणजे ३.१४ अर्थात मानवी by गवि
नाडि-महर्षी आणि पायजमा
In reply to नाडि-महर्षी आणि पायजमा by चित्रगुप्त
:D
In reply to कुठे इंद्राचा ऐरावत, आणि कुठे शामभटाची तट्टाणी.. by चित्रगुप्त
याला म्हणतात मरुन रोब!
In reply to कुठे इंद्राचा ऐरावत, आणि कुठे शामभटाची तट्टाणी.. by चित्रगुप्त
काय सुंदर पोरगी आहे !!
In reply to काय सुंदर पोरगी आहे !! by अर्धवटराव
असं वाटतं तिने कधि डोळे उघडुच
In reply to असं वाटतं तिने कधि डोळे उघडुच by बॅटमॅन
तुमचं बरं आहे हो...
In reply to असं वाटतं तिने कधि डोळे उघडुच by बॅटमॅन
आणखी एक शक्यता..
In reply to आणखी एक शक्यता.. by चित्रगुप्त
क्या बात!! खरे कलाकार आहात
In reply to क्या बात!! खरे कलाकार आहात by बॅटमॅन
भारी गंमत चाललीये तुम्हा
In reply to भारी गंमत चाललीये तुम्हा by नगरीनिरंजन
आओ कशी का असेना पोरगी भारी
In reply to आओ कशी का असेना पोरगी भारी by बॅटमॅन
या प्रतिसादावर धुळवड कशी काय झाली नाही..??
In reply to या प्रतिसादावर धुळवड कशी काय झाली नाही..?? by मोदक
करा की मग सुरू हाण द गप्पा
आवडले.
कथा आवड्ली
In reply to कथा आवड्ली by पैसा
+१
कथा आवडली. आधीही एकदा
In reply to कथा आवडली. आधीही एकदा by नगरीनिरंजन
निरंजन, दॅट वॉज रियली द पॉइंट!
In reply to निरंजन, दॅट वॉज रियली द पॉइंट! by संजय क्षीरसागर
सहजीवनात घटस्फोट ही अत्यंत
दोन्ही ड्रेसातल्या पोरी आपल्याला जाम
एक गहन प्रश्न..अगर आप रूपा
In reply to एक गहन प्रश्न..अगर आप रूपा by कानडाऊ योगेशु
लय भारी!
उत्तम कथापण खरोखरीच, "सत्य
In reply to उत्तम कथापण खरोखरीच, "सत्य by मनीषा
झालं ? बोललात कळीचा मुद्दा ?
भगवा विरक्ती दर्शवतो तर मरुन