इंटरव्हेन्शन
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं.
पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात. आणि नाहीत मैफिली तर नाहीत, पण दारू हवी. दारू हीच मैफील होते. मग तो त्या व्यसनाच्या गर्तेत बुडून जातो. सोन्यासारखं आयुष्य त्या खोल खोल गर्तेत बुडवून टाकतो. आपण त्याला अधूनमधून 'जरा बेताने बरं का' असा सल्ला दिलेला असतो. त्यावर 'अरे काही नाही रे. आपला कंट्रोल आहे.' असं जड जिभेने ऐकलेलंही असतं. आपल्याप्रमाणेच इतर मित्रही अधूनमधून सांगतात. पण सुधारणा होत नाही. आणि अचानक तो एकेकाळी धट्टाकट्टा दिसणारा, रोडावलेला दिसतो. आपण त्याला पुन्हा सांगून बघतो. पण नंतर संबंध तुटतो. आणि काही वर्षांनी अचानक तो दारूपायी गेल्याची बातमी येते.
साला काय फास्ट बॉलिंग करायचा... डोळ्यात चमक होती त्याच्या, मी दोन वर्षांपूर्वी पाहिलं तेव्हा सगळी रया गेली होती... मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण किती करणार?
नुसती हळहळ शिल्लक राहाते.
दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो. दलदलीत पाय रुतल्यावर शरीर सावकाश आत आत शिरत जावं तसा. कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते. पण तिच्याकडे लक्ष देण्यापलिकडे कान बधीर झालेले असतात. अशा व्यक्तीकडून 'मला काही प्रॉब्लेम नाही' हे विधान अतिशय ठामपणे येताना दिसतं.
अशा गर्तेत बुडताना कधीकधी बाहेरून एखादा प्रचंड धक्का बसतो. आणि मग आत जाण्याचा वेग वाढतो. नोकरी जाणं, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचं निधन... अशी कुठचीही गोष्ट परिस्थितीवरचा ताबा घालवायला कारणीभूत ठरू शकते. बुडत्याचा काडीचाही आधार जातो. आणि गटांगळ्या सुरू होतात. बाहेर डोकं काढून हपापल्यासारखा श्वास घ्यायचा... मदतीसाठी हाक मारायची. कधी हे होतं, तर काही वेळा तेही होत नाही. प्रवाहाला शरण जाऊन भोवऱ्यात जाणं होतं.
आणि आपण किनाऱ्यावर बसून बघत राहातो.
पण अशा वेळी नक्की करायचं तरी काय? 'मी माझ्या मित्राला माझ्या परीने सांगून पाहिलं. उपयोग झाला नाही. याच्यापलिकडे मी काय करणार?' असं म्हणता येतं खरं. पण मी अजून काहीतरी करायला हवं होतं ही मनाला चुकचुक लागून राहाते.
इंटरव्हेन्शन हा त्यावरचा एक उपाय आहे. जेव्हा एखाद्या रोग्याला त्याचा रोग इतका वेढून टाकतो की आपल्याला मदत हवी आहे याचीही जाणीव नाहीशी होते तेव्हा ती मदत पुरवण्याची जबाबदारी इतरांवर येते. आपल्या समोर कोणी गाडीखाली येऊन बेशुद्ध पडला असेल तर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली. 'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते. वाहातं रक्त डोळ्यासमोर दिसत नसेल, हात-पाय मोडलेले दिसत नसतील तर प्रत्यक्ष उचलून हॉस्पिटलमध्ये टाकायची गरज तितक्या तीव्रतेने जाणवत नाही. पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.
'तुला मदतीची गरज आहे. आणि ती तू घ्यावीस यासाठी आम्ही पडेल ते करू' असं अनेक मित्र, सुहृद, आप्तेष्ट यांनी एकत्र येऊन सांगणं हा एक मार्ग असतो. यालाच इंटरव्हेन्शन असं म्हणतात. एखादा मित्र जेव्हा कळकळीने सांगतो तेव्हा त्याचा थोडा परिणाम होतो, नाही असं नाही. पण तो कदाचित पुरेसा नसतो. त्याऐवजी जर त्याचे जमतील तितके मित्र, नातेवाईक, त्याच्यावर प्रेम करणारे आणि त्याचं ज्यांच्यावर प्रेम आहे असे सगळेजण एकत्र येऊन त्यांनी ठामपणे सांगितलं तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीचं जीवन बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. मरण टाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
विकीपिडियावर http://en.wikipedia.org/wiki/Intervention_%28counseling%29 इंटरव्हेन्शनची व्याख्या अशी दिली आहे
An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items.
हे घडण्यासाठी त्या व्यक्तीला आडून आडून, गोड शब्दांत सल्ला देण्यापलिकडे जाऊन स्पष्ट, काहीशा कठोर शब्दांतच 'तुला मदतीची गरज आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. ती तू घेण्यासाठी आम्ही पडेल ते करू. ती घेण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ती घेताना जे अडथळे येतील त्यात आम्ही तुला मदत करू. पण तू ज्या मार्गावरून चालला आहेस त्यात तुझं भलं नाही.' असं सांगण्याची गरज असते. दलदलीत फसत जाणाऱ्याला, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, दोऱ्या बांधून, सगळ्यांनी मिळून खेचून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असतो. या प्रयत्नांत अर्थातच दोरी गळ्याला लागून फास बसणार नाही याची काळजी घ्यायची असतेच - पण दोरी कंबरेला काचून जखमा होतील त्याची काळजी करायची नसते.
सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो. पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे. तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही. हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा. तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका. तात्काळ कृती करा. पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा.
नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.
वाचने
26793
वाचनखूण
प्रतिक्रिया
94
कधी ही दलदल खूप उबदार असते.
+
खुपच छान!आवडले.नाथ, संदेश
खरोखर उत्तम लिहिलं आहे, आता
घासकडवी साहेब, तुम्ही
In reply to घासकडवी साहेब, तुम्ही by यकु
याचे लेख आणि प्रतिसाद फक्त
In reply to याचे लेख आणि प्रतिसाद फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
ऑ ?
In reply to याचे लेख आणि प्रतिसाद फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
सर, `कपाळात जाणे' ही (मेन्स ओन्ली) म्हण तुम्हाला माहितीये ना?
In reply to सर, `कपाळात जाणे' ही (मेन्स ओन्ली) म्हण तुम्हाला माहितीये ना? by संजय क्षीरसागर
छे, काहीतरीच.तसला काहीही
In reply to छे, काहीतरीच.तसला काहीही by भरत कुलकर्णी
काय अर्थ लावता येईल?
In reply to काय अर्थ लावता येईल? by संजय क्षीरसागर
अर्थ: हा परमसनातन विश्वभरूनी
In reply to अर्थ: हा परमसनातन विश्वभरूनी by यकु
पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी
In reply to पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी by ५० फक्त
हाहाहा..पियूशयुक्त करी
In reply to याचे लेख आणि प्रतिसाद फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
-१
In reply to घासकडवी साहेब, तुम्ही by यकु
यक्या
In reply to घासकडवी साहेब, तुम्ही by यकु
??
In reply to घासकडवी साहेब, तुम्ही by यकु
यापेक्षा रोशशची कविता
हं...
In reply to हं... by श्रावण मोडक
श्रामो, तुम्ही फारच बारकावे काढता राव!
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार साहेब, माझ्या कडुनही धन्यवाद
In reply to परिकथेतील राजकुमार साहेब, माझ्या कडुनही धन्यवाद by निश
थान्कू
In reply to थान्कू by परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार साहेब, अहो दारु पेक्षा जीवनाचे आयुष्याचे ..
In reply to थान्कू by परिकथेतील राजकुमार
परा, डिसिजन घ्यायचा तर मन तरल पायजेल, हो किनई?
In reply to थान्कू by परिकथेतील राजकुमार
दारुवरती आमचे नितांत प्रेम
In reply to दारुवरती आमचे नितांत प्रेम by कवितानागेश
दारू च प्रेम हे फक्त एकावरच असत. ते दोघही येतात बहुतेक जोडीनेच..
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
खिक्
In reply to खिक् by श्रावण मोडक
च्यायला !
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
लोकेशन
In reply to लोकेशन by श्रावण मोडक
विनंती
In reply to विनंती by राजेश घासकडवी
गंमतीशीर प्रतिसाद आणि विनंती
In reply to गंमतीशीर प्रतिसाद आणि विनंती by नाना चेंगट
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
>>>आपण करतो ती चर्चा आणि लोकं
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
खंग्री
In reply to विनंती by राजेश घासकडवी
नाही
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
>>सध्या स्वतःच स्वतः वरती
राजेश घासकडवी साहेब, अतिशय कळकळीने लिहिला आहेत हा लेख.
लेख फार आवडला.
हम्म...
कॉलींग......... माननिय मदिना
मेंबर
असले काहीही करु नका....
In reply to असले काहीही करु नका.... by ज्ञानोबाचे पैजार
याच न्यायाने
In reply to याच न्यायाने by तिमा
जरुर,
In reply to जरुर, by ज्ञानोबाचे पैजार
फारच निष्ठूर दृष्टिकोन !
?
लेख चांगला
इंटरव्हेन्शन करुन दारु सुटते
In reply to इंटरव्हेन्शन करुन दारु सुटते by कवितानागेश
हा लेख फक्त दारूविषयी नाही.
In reply to हा लेख फक्त दारूविषयी नाही. by राजेश घासकडवी
हा लेख फक्त दारूविषयी नाही.
In reply to हा लेख फक्त दारूविषयी नाही. by कवितानागेश
हा लेख फक्त दारूविषयी नाही हे
In reply to हा लेख फक्त दारूविषयी नाही. by कवितानागेश
काही उत्तरं
In reply to काही उत्तरं by राजेश घासकडवी
प्रकाटाआ
In reply to काही उत्तरं by राजेश घासकडवी
माझा मुद्दा असा आहे, की
In reply to काही उत्तरं by राजेश घासकडवी
हम्म्म्म
इंटरव्हेन्शन
ज्या संस्थळावर रहदारी भरपूर
In reply to ज्या संस्थळावर रहदारी भरपूर by राजेश घासकडवी
कळले नाही
In reply to कळले नाही by शुचि
काही अघटीत घटले आहे काय मिपा
In reply to काही अघटीत घटले आहे काय मिपा by llपुण्याचे पेशवेll
हो . भारतीय संस्कृतीमधील
In reply to हो . भारतीय संस्कृतीमधील by नाना चेंगट
नानाना नाना,घासकडवींना हा
In reply to काही अघटीत घटले आहे काय मिपा by llपुण्याचे पेशवेll
गैरसमज नसावा
बहुतेकांना कल्पना असावी.
In reply to बहुतेकांना कल्पना असावी. by रामदास
हेच म्हणतो.
In reply to बहुतेकांना कल्पना असावी. by रामदास
अस काय करता काका आज सुट्टीचा
अल्कोहोलिझम-- मद्यपाश -
राजेश, कृतज्ञता नसणं हा मूळ प्रश्न आहे
दारू पिणे ही आवड तर पाजणे हा
In reply to दारू पिणे ही आवड तर पाजणे हा by निनाद मुक्काम …
मुळात व्यसनाधीन माणूस
In reply to मुळात व्यसनाधीन माणूस by llपुण्याचे पेशवेll
माफ करा जरा शब्दांशी खेळलो
हम्म
प्रयत्न करणे आपल्या हाती...
In reply to प्रयत्न करणे आपल्या हाती... by प्रभाकर पेठकर
वा काका..
In reply to प्रयत्न करणे आपल्या हाती... by प्रभाकर पेठकर
चांगला प्रतिसाद.
चिंता
दारू पिणे आणि त्याचे व्यसन
उत्तम लेख.......
दारु
लेख पावला.
विकीपिडीत रडारड
"यकुला वेळीच मदत मिळाली असती
In reply to "यकुला वेळीच मदत मिळाली असती by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे खरं आहे. पण आपण बरेचजण
In reply to हे खरं आहे. पण आपण बरेचजण by रेवती
ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार
In reply to हे खरं आहे. पण आपण बरेचजण by रेवती
ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार
In reply to ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे
In reply to सहमत आहे by बंडा मामा
आत्मशुन्यशी संपर्क झाला, तो
In reply to "यकुला वेळीच मदत मिळाली असती by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी समहत.. हाच विचार सारखा
चर्चा
In reply to चर्चा by श्रावण मोडक
हा धागा वर काढण्याची विनंती
लेखातले विचार पटले.