तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू...
आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात. आणि त्याच संस्कृतीचा आधिकारिक प्रतिनिधी धोरणाचा भाग असल्यासारखा त्यांना नाक वर करून सांगतो की ज्यांच्यावर बलात्कार होतात त्याच उठवळ! तोही स्वतः पुरुष. याचा निषेध झालाच पाहिजे. म्हणून त्यांनी जगभर जागोजागी मोर्चे काढले. स्लटवॉक. त्यामागचा उद्देश असा होता की स्त्रीने कुठचे कपडे घातले यावरून बलात्कार होतो की नाही हे ठरू नये. नाहीतर प्रत्येकीलाच मुकाट्याने बुरखा घालून रहावं लागेल.
तर ही पार्श्वभूमी झाली स्लटवॉक अथवा उठवळ मोर्चाची. आता तुम्ही म्हणाल की 'मिपावर या उठवळ मोर्चाचा काय संबंध? मिपावर तर कपड्यांचा प्रश्नच येत नाही. चेहरेदेखील दिसत नाहीत, सगळेच आयडीच्या मुखवट्याआड लपलेले असतात. हा, आता काही लोक पूर्वी कपडे काढून टाकल्यासारखे निर्लज्जपणे वावरत. पण ती पूर्वीची गोष्ट झाली. मिपा आता थोडंसं मध्यमवयीनाळलेलं आहे. प्रभू गुरुजीदेखील क्रिप्टिक कमी, समुपदेशक जास्त असं लिहितात. आजच्या रसभरीत खादाडी बरोबर येणारे रसरशीत युवतींचे फोटो देखील थांबले. आता पेंड्यूलम दुसऱ्या दिशेला स्विंग झालाय की काय असं वाटावं असे जॉन, सलमान वगैरेंचे टॉपलेस फोटो येतात. वाताबरोबर बऱ्याच कुक्कुटांनी दिशा बदलली आहे. आता उठवळपणा वगैरे करायला जागाच राहिली नाही!' :-(
हा मुद्दा अगदीच चुकीचा नाही, पण एवढ्यात हिंमत सोडू नका. उठवळपणासाठीचा लढा हा केवळ हवे ते कपडे घालण्याचा (नको ते न घालण्याचा), लैंगिक स्वरूपाचा लढा वाटतो. 'मी स्त्री आहे. मला हवे ते कपडे घालण्याचा हक्क आहे. त्यासाठी मला शिक्षा होता कामा नये.' पण उठवळ मोर्चाची कल्पना अधिक व्यापक आहे. 'मी अमुकतमुक आहे. मला हवी तशी अभिव्यक्ती करण्याचा मला अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणी सोम्यागोम्याने मला शिक्षा करता कामा नये'. आपण कोण आहोत याची जाणीव असणं व त्याप्रमाणे अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य मिळणं महत्त्वाचं. पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो.
मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. आणि कॅनडाच्या त्या पोलिसाने जसं स्त्रियांनाच, व त्यांच्या अभिव्यक्तीलाच दोषी ठरवलं तसं इथेही होतं. म्हणून मी म्हणतो की सर्व पीडितांनी एकत्र होऊन याविरुद्ध आवाज उठवायला हवा
तुम्ही सामान्यांसारखाच विचार करता म्हणून सो कॉल्ड विचारवंत तुम्हाला सडके किंवा भडके म्हणतात का?
की तुम्ही लिबरल विचारसरणी बाळगल्यामुळे कोणीही उठून सडक्या प्रतिक्रिया देऊन तुम्हाला विचारजंती म्हणतो?
तुम्ही केवळ नवे आहात, तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का?
तुम्ही दारू पिता म्हणून दारू न पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का?
तुम्ही शाकाहारी आहात म्हणून मांसाहारी तुम्हाला हिणवतात?
तुम्ही सश्रद्ध आहात म्हणून निरीश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात?
तुम्ही संपादक आहात म्हणून काही संधीसाधू तुमच्याविरोधात चौपाटी, भेळपुरी, उपोषण वगैरे हत्यार उपसतात का?
तुम्ही निवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे?
तुम्ही अनिवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला भारतातल्या घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का?
तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?
व्यनीमनीच्या गोष्टी करून विडंबक तुमच्या कवितांचं घाऊक प्रमाणात विडंबन करतात का?
तुमची लोकप्रियता बघवत नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का?
तुम्ही ज्योतिष/नाडीचा प्रसार करत असताना तुमच्यावर निव्वळ अविश्वास दाखवून तुमच्यावर जाहिरातबाजीचा आरोप होतो का?
यापैकी कुठच्याही प्रश्नांना तुम्ही हो उत्तर दिलंत तर तुम्ही मिपापीडित आहात. सर्व मिपापीडितांनो एकत्र व्हा. मिपावर उठवळ मोर्चा काढा. आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा. बघताय काय, सामील व्हा आंतरजालावरील सर्वात पहिल्या 'उठवळ मोर्चा'त. आपल्या प्रतिसादात 'मी अमुकअमुक आहे व मला त्याचा अभिमान आहे' हे वाक्य लिहून आपल्यावर जुलूमजबरदस्ती करणाऱ्यांचा जाहीर निषेध करा. आपापल्या प्रकृतीला शोभेल त्याप्रमाणे मेणबत्त्या, काळ्या फिती, फेसबुकप्रमाणे लाइक, तलवारी, तुताऱ्या वगैरेचे फोटो डकवून या मोर्चात सहभाग घ्या.
उठवळ मोर्चा, झिंदाबाद!
(हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार)
वाचन संख्या
18658
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला
+१
In reply to चला by मिसळलेला काव्यप्रेमी
स्कोर किती होइल ?
In reply to +१ by स्पा
उठवळ धाग्याना तर आधीच सुरुवात
मस्तच
मोर्चा काढण्यापेक्षा २/३
In reply to मस्तच by चिरोटा
यातल्या काही प्रश्नांचं उत्तर होकारार्थी आहे
सद्य स्थीती शी काही संबंध आअहे का
In reply to यातल्या काही प्रश्नांचं उत्तर होकारार्थी आहे by चेतन सुभाष गुगळे
=))
In reply to सद्य स्थीती शी काही संबंध आअहे का by शाहिर
म्हंजे?
In reply to सद्य स्थीती शी काही संबंध आअहे का by शाहिर
Love is cliche and cliches
सहमत!
In reply to Love is cliche and cliches by विनीत संखे
चेतन आणि विनीत, हा लेख हे एक
In reply to सहमत! by चेतन सुभाष गुगळे
अहो गविसाहेब, आम्हीही
In reply to चेतन आणि विनीत, हा लेख हे एक by गवि
मस्त कार्टून आहे =)) =)) =))
In reply to Love is cliche and cliches by विनीत संखे
खरी वहिदा
In reply to Love is cliche and cliches by विनीत संखे
होय बाई-बायको-कॅलेंडर या
In reply to खरी वहिदा by राजेश घासकडवी
काय मिपा इतकं जुनं आहे?
In reply to होय बाई-बायको-कॅलेंडर या by शुचि
नवर्याच्या पिवळ्या बनियनची
In reply to काय मिपा इतकं जुनं आहे? by चेतन सुभाष गुगळे
ईईई
In reply to नवर्याच्या पिवळ्या बनियनची by शुचि
बनियन घालायचाच कशाला.
In reply to ईईई by मिसळलेला काव्यप्रेमी
बनियन घालायचाच कशाला. ..निदान
In reply to बनियन घालायचाच कशाला. by गवि
नीळ
In reply to बनियन घालायचाच कशाला. ..निदान by स्पा
__/\__
In reply to बनियन घालायचाच कशाला. by गवि
_/\_
In reply to बनियन घालायचाच कशाला. by गवि
शुचितै.. एक सुधारणा, हे वाक्य
In reply to नवर्याच्या पिवळ्या बनियनची by शुचि
काहीतरीच काय अर्धवटराव ....
In reply to शुचितै.. एक सुधारणा, हे वाक्य by अर्धवट
मिपा सोडाच पण संपूर्ण मास
In reply to खरी वहिदा by राजेश घासकडवी
धन्य
तुम्ही नीट वाचत नाही काय?
In reply to धन्य by विनायक प्रभू
प्रतिक्रिया
खुलाश्याबद्दल धन्यवाद
In reply to प्रतिक्रिया by विनायक प्रभू
बाब्या, बाबी आणि बॉबी बाकीचा
?
In reply to बाब्या, बाबी आणि बॉबी बाकीचा by इरसाल
उठवळ मोर्चा चं उठुन वळवळ
काय काय पहावं लागणार आहे?
>> मिपावरती वेगवेगळ्या
मोर्चा फारच गंमतीदार
अगदी सहमत
In reply to मोर्चा फारच गंमतीदार by नितिन थत्ते
हरकत नाही
In reply to मोर्चा फारच गंमतीदार by नितिन थत्ते
+१
In reply to हरकत नाही by राजेश घासकडवी
उम्म्म्म
या लाह्या खाणर्यांमुळे काही
In reply to उम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
निषेध
In reply to उम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to निषेध by ढब्बू पैसा
उद्देश
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
गुर्जी काढाच मोर्चा...
शांत
सहमत
In reply to शांत by चिरोटा
उठ्वळ आय डी नी बहुधा ....
बाबौ
वय
हेहेहे
In reply to वय by विनायक प्रभू
अजून थोडे प्रश्न
एन्जॉय
चर्चा फक्त रंगलीच नाहीये तर
व्वा बरे झाले.......... मला
प्रतिसाद
अगदी खरं
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
लेख आवडला!
साते साते
In reply to लेख आवडला! by साती
+१
In reply to साते साते by प्रियाली
+२
In reply to +१ by मी_ओंकार
हो हो
कमाल आहे!
मला बी तुमच्यात येऊ द्या की रं
In reply to कमाल आहे! by श्रावण मोडक
या की...
In reply to मला बी तुमच्यात येऊ द्या की रं by प्रियाली
ओहोहो... मस्त लिखाण. मूक्त आविश्कार..... आवडलं
चांगले आहे.. आजकाल मिपाला
धागा...धागा...
वायफळाचा मळा कसा फुलवायचा हे
आजच्या रसभरीत खादाडी बरोबर
आणखी एक उल्लेख राहिला
अप्रतीम उदाहरण.
In reply to आणखी एक उल्लेख राहिला by चेतन सुभाष गुगळे
आभारी आहे
In reply to अप्रतीम उदाहरण. by आत्मशून्य
मिपा-कम्यूनीस्ट चिंगम है, चेतन गुगळे सिंघम है.
In reply to आभारी आहे by चेतन सुभाष गुगळे
>>यावेळी माझी तयारी पुरेशी
In reply to आभारी आहे by चेतन सुभाष गुगळे
असहमत.
In reply to >>यावेळी माझी तयारी पुरेशी by विश्वनाथ मेहेंदळे
मी नक्की कुठला आरोप केला असे
In reply to असहमत. by आत्मशून्य
तीच माझी सावधगिरी
In reply to मी नक्की कुठला आरोप केला असे by विश्वनाथ मेहेंदळे
आरोप नव्हे काळजीपोटी दिलेला सल्ला
In reply to असहमत. by आत्मशून्य
स्लट आणि उठवळ
:)
छान आहे हं मांजर !!
In reply to :) by चित्रा
ऐकते आहे
In reply to छान आहे हं मांजर !! by सूड
अश्लील
हे लिहिले!
हा हा
In reply to हे लिहिले! by धनंजय
धन्यवाद
In reply to हे लिहिले! by धनंजय
अगदी अगदी मनातले
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी