✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपावर उठवळ मोर्चा (स्लटवॉक)

र
राजेश घासकडवी यांनी
Fri, 08/26/2011 - 10:27  ·  लेख
लेख
तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात. आणि त्याच संस्कृतीचा आधिकारिक प्रतिनिधी धोरणाचा भाग असल्यासारखा त्यांना नाक वर करून सांगतो की ज्यांच्यावर बलात्कार होतात त्याच उठवळ! तोही स्वतः पुरुष. याचा निषेध झालाच पाहिजे. म्हणून त्यांनी जगभर जागोजागी मोर्चे काढले. स्लटवॉक. त्यामागचा उद्देश असा होता की स्त्रीने कुठचे कपडे घातले यावरून बलात्कार होतो की नाही हे ठरू नये. नाहीतर प्रत्येकीलाच मुकाट्याने बुरखा घालून रहावं लागेल. तर ही पार्श्वभूमी झाली स्लटवॉक अथवा उठवळ मोर्चाची. आता तुम्ही म्हणाल की 'मिपावर या उठवळ मोर्चाचा काय संबंध? मिपावर तर कपड्यांचा प्रश्नच येत नाही. चेहरेदेखील दिसत नाहीत, सगळेच आयडीच्या मुखवट्याआड लपलेले असतात. हा, आता काही लोक पूर्वी कपडे काढून टाकल्यासारखे निर्लज्जपणे वावरत. पण ती पूर्वीची गोष्ट झाली. मिपा आता थोडंसं मध्यमवयीनाळलेलं आहे. प्रभू गुरुजीदेखील क्रिप्टिक कमी, समुपदेशक जास्त असं लिहितात. आजच्या रसभरीत खादाडी बरोबर येणारे रसरशीत युवतींचे फोटो देखील थांबले. आता पेंड्यूलम दुसऱ्या दिशेला स्विंग झालाय की काय असं वाटावं असे जॉन, सलमान वगैरेंचे टॉपलेस फोटो येतात. वाताबरोबर बऱ्याच कुक्कुटांनी दिशा बदलली आहे. आता उठवळपणा वगैरे करायला जागाच राहिली नाही!' :-( हा मुद्दा अगदीच चुकीचा नाही, पण एवढ्यात हिंमत सोडू नका. उठवळपणासाठीचा लढा हा केवळ हवे ते कपडे घालण्याचा (नको ते न घालण्याचा), लैंगिक स्वरूपाचा लढा वाटतो. 'मी स्त्री आहे. मला हवे ते कपडे घालण्याचा हक्क आहे. त्यासाठी मला शिक्षा होता कामा नये.' पण उठवळ मोर्चाची कल्पना अधिक व्यापक आहे. 'मी अमुकतमुक आहे. मला हवी तशी अभिव्यक्ती करण्याचा मला अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणी सोम्यागोम्याने मला शिक्षा करता कामा नये'. आपण कोण आहोत याची जाणीव असणं व त्याप्रमाणे अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य मिळणं महत्त्वाचं. पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो. मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. आणि कॅनडाच्या त्या पोलिसाने जसं स्त्रियांनाच, व त्यांच्या अभिव्यक्तीलाच दोषी ठरवलं तसं इथेही होतं. म्हणून मी म्हणतो की सर्व पीडितांनी एकत्र होऊन याविरुद्ध आवाज उठवायला हवा तुम्ही सामान्यांसारखाच विचार करता म्हणून सो कॉल्ड विचारवंत तुम्हाला सडके किंवा भडके म्हणतात का? की तुम्ही लिबरल विचारसरणी बाळगल्यामुळे कोणीही उठून सडक्या प्रतिक्रिया देऊन तुम्हाला विचारजंती म्हणतो? तुम्ही केवळ नवे आहात, तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का? तुम्ही दारू पिता म्हणून दारू न पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का? तुम्ही शाकाहारी आहात म्हणून मांसाहारी तुम्हाला हिणवतात? तुम्ही सश्रद्ध आहात म्हणून निरीश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात? तुम्ही संपादक आहात म्हणून काही संधीसाधू तुमच्याविरोधात चौपाटी, भेळपुरी, उपोषण वगैरे हत्यार उपसतात का? तुम्ही निवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे? तुम्ही अनिवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला भारतातल्या घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? व्यनीमनीच्या गोष्टी करून विडंबक तुमच्या कवितांचं घाऊक प्रमाणात विडंबन करतात का? तुमची लोकप्रियता बघवत नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का? तुम्ही ज्योतिष/नाडीचा प्रसार करत असताना तुमच्यावर निव्वळ अविश्वास दाखवून तुमच्यावर जाहिरातबाजीचा आरोप होतो का? यापैकी कुठच्याही प्रश्नांना तुम्ही हो उत्तर दिलंत तर तुम्ही मिपापीडित आहात. सर्व मिपापीडितांनो एकत्र व्हा. मिपावर उठवळ मोर्चा काढा. आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा. बघताय काय, सामील व्हा आंतरजालावरील सर्वात पहिल्या 'उठवळ मोर्चा'त. आपल्या प्रतिसादात 'मी अमुकअमुक आहे व मला त्याचा अभिमान आहे' हे वाक्य लिहून आपल्यावर जुलूमजबरदस्ती करणाऱ्यांचा जाहीर निषेध करा. आपापल्या प्रकृतीला शोभेल त्याप्रमाणे मेणबत्त्या, काळ्या फिती, फेसबुकप्रमाणे लाइक, तलवारी, तुताऱ्या वगैरेचे फोटो डकवून या मोर्चात सहभाग घ्या. उठवळ मोर्चा, झिंदाबाद! (हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
वावर
धर्म
विनोद
इतिहास
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18610 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

चला

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 08/26/2011 - 10:43 नवीन
आता मैच सुरु होणार!! ;) मागच्या शीटावर बसून मजा पाहतोय. ;)
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Fri, 08/26/2011 - 10:47 नवीन
ओये मिका , माझी सीट ठेव रे बाबा पॉपकॉर्न घिऊन येतो घासू गुर्जी, उठवळ मोर्चाच नेतृत्व करताना कशे दिसतील याच चित्र डोळ्या समोर अल.. आणि अमळ सद्गदित झाहलो -- माचो स्पा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

स्कोर किती होइल ?

शाहिर
Fri, 08/26/2011 - 11:26 नवीन
बेटींग घ्यावे असा विचार करतो आहे ..१०० तर सहजच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

उठवळ धाग्याना तर आधीच सुरुवात

मराठी_माणूस
Fri, 08/26/2011 - 10:48 नवीन
उठवळ धाग्याना तर आधीच सुरुवात झाली आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच

चिरोटा
Fri, 08/26/2011 - 10:51 नवीन
मस्तच रे राजेश. साधक बाधक चर्चा होईल ही अपेक्षा. मोर्चा काढण्यापेक्षा २/३ कि.मी. लांब मानवी शृंखला केली तर?
  • Log in or register to post comments

मोर्चा काढण्यापेक्षा २/३

वपाडाव
Fri, 08/26/2011 - 11:31 नवीन
मोर्चा काढण्यापेक्षा २/३ कि.मी. लांब मानवी शृंखला केली तर?
म्हणजे कसे ऑर म्हणजे काय ते? -अमानवी अमानुष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

यातल्या काही प्रश्नांचं उत्तर होकारार्थी आहे

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 10:55 नवीन
<< तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... >> << तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का? >> << पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो. >> << काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?>> असा अनुभव आलाय पण तरीही उठवळ मोर्चा काढायची इच्छा नाहीय. आम्ही अगदी टोकाचे देव आनंद भक्त, म्हणजे आम्हाला सबकुछ देवआनंद (लेखक/निर्माता/दिग्दर्शक/अभिनेता सारं काही देवआनंदच असलेले) चित्रपटच जास्त आवडतात. अशा चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ प्रेमपुजारी, हरे राम हरे कृष्ण, मिस्टर प्राईम मिनिस्टर, सेन्सॉर, लुटमार, हे व असे अनेक) अनेक पात्र देव आनंद ला छळ छळ छळतात तरी तो अगदीच गरज पडल्याशिवाय फारसा कुणाचा प्रतिवाद करीत नाही (सेन्सॉर मध्ये तर ममता कुलकर्णी देव आनंद चा एकेरी उल्लेख करून बराच उपमर्द करते तरी तो स्थितप्रज्ञच. शेवटी जेव्हा तो शांतपणे आपली लढाई लढून जिंकतो तेव्हा तीदेखील आनंद व्यक्त करतेच. कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो. तो मिळत नाही म्हणून एक सॅडिस्ट जळजळ ती व्यक्त करीत असते इतकेच.). तो छळ तो एन्जॉय करतो. आम्हीही मिपावर होणारा आमचा छळ एन्जॉय करतो. त्यांना कळत नाहीय ते काय करतात असाच काहीसा छळ करणार्‍यांविषयीचा आमचा दृष्टीकोन असतो. एका महिलेला स्लट वॉक विषयी मुलाखतकर्त्याने तिचे मत विचारले (काही दिवसांपूर्वीच्या मटात आले होते). ती म्हणाली, "मला याचा उद्देशच पटत नाही. 'हे पाहा, माझ्याकडे तुम्ही पाहू नका' असा काही तरी विसंगत संदेश हा मोर्चा देतो असे मला वाटते." स्लटवॉक / उठवळ मोर्चा विषयीच्या त्या महिलेच्या विधानाशी मी देखील सहमत आहे. << हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार >> या विधानाबद्दल विशेष कौतूक.
  • Log in or register to post comments

सद्य स्थीती शी काही संबंध आअहे का

शाहिर
Fri, 08/26/2011 - 14:11 नवीन
कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो ऑ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

=))

बिपिन कार्यकर्ते
Sat, 08/27/2011 - 20:11 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

म्हंजे?

आनंदी गोपाळ
Fri, 11/11/2011 - 01:35 नवीन
ये उस्का स्टाईल होयंगा होटोपे हाँ दिल्मे ना होंगा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

Love is cliche and cliches

विनीत संखे
Fri, 08/26/2011 - 10:57 नवीन
Love is cliche and cliches doent make you extraordinary but only human. सामान्य असणं हा मानव असल्याचा मुख्य पुरावा आहे असे मार्टीन ल्युथर किंग यानी म्हटलंय. आपण असामान्य आहोत हे इतरांना किंवा किंबहुना स्वतःला पटवून देण्याची उठाठेप करावीच का माणसानं? सो कॉल्ड विचारवंत किंवा विचारजंत माझ्या सामान्यत्वाविषयी आपले असामान्य किंवा अतिसामान्य विचार मांडोत अथवा नाही, त्यामुळे माझ्या बायकोचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. आणि मिपापिडित असणं हा प्रकार काय बुवा हे मला कळलेलेले नाही... इंटरनेट वर भांडणे हे सामान्य नेटकराचे उदाहरण झाले. म्हणून कुणी अमका तमका तुमच्याशी मिपावर भांडला आणि तुम्हाला त्याने टिकेचं धनी केलं तर काय बिघडलं? इथंच बघा... Image removed. बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना? पुरेसं आहे. उठवळ मोर्चा काढायचा का त्यासाठी?
  • Log in or register to post comments

सहमत!

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 10:58 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

चेतन आणि विनीत, हा लेख हे एक

गवि
Fri, 08/26/2011 - 11:10 नवीन
चेतन आणि विनीत, हा लेख हे एक विनोदी आणि उपरोधात्मक / विरंगुळात्मक वगैरे लिखाण आहे अशी माझी समजूत आहे. तुम्ही गंभीर स्पष्टीकरण दिले आहेत म्हणून आता मात्र लेखाविषयी पुनर्विचार करुन पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अहो गविसाहेब, आम्हीही

विनीत संखे
Fri, 08/26/2011 - 11:20 नवीन
अहो गविसाहेब, आम्हीही उपहासात्मकच प्रतिक्रिया दिलीय... कार्टूनच खटाटोप त्यासाठीच होता. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त कार्टून आहे =)) =)) =))

शुचि
Fri, 08/26/2011 - 11:11 नवीन
मस्त कार्टून आहे =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

खरी वहिदा

राजेश घासकडवी
Fri, 08/26/2011 - 11:32 नवीन
उठवळ मोर्चाचा उद्देश तुम्ही सामान्य असा वा असामान्य तुमच्यावर तुमच्या अभिव्यक्तीबद्दल हल्ला होऊ नये यासाठीच आहे. जगा आणि जगू द्या.
बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना?
जर तुम्हाला मिपावरच्या प्रतिसादांपेक्षा खऱ्या माणसांच्या प्रेमाचीच पडलेली असेल तर तुमच्या प्रायॉरिटीज थोड्या और आहेत असंच म्हणावं लागेल. टू इच इट्स ओन. 'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे) कार्टून लय भारी. (प्रतिसादात पुरेसे क्लिशे झाले का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

होय बाई-बायको-कॅलेंडर या

शुचि
Fri, 08/26/2011 - 11:37 नवीन
होय बाई-बायको-कॅलेंडर या अप्रतिम पुस्तकातील कथेमधील हे वाक्य आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काय मिपा इतकं जुनं आहे?

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 11:44 नवीन
<< 'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे)>> वपुंचं ते पुस्तक तर बरंच जुनं आहे. मिपा हे संकेतस्थळ तेव्हाही अस्तित्वात होतं. कमाल आहे, मला ठाऊक च नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

नवर्‍याच्या पिवळ्या बनियनची

शुचि
Fri, 08/26/2011 - 11:48 नवीन
नवर्‍याच्या पिवळ्या बनियनची पर्वा न करता ... त्याच्या कुशीत शिरणारी ,,,,,,,,, का काहीतरी वाक्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

ईईई

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 08/26/2011 - 11:58 नवीन
पिवळे बनियन घालणार्‍या माणसाला नवरा म्हणून निवडणे हाच मुळात उठवळपणा आहे. :D अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. इतरांच्या मताचा आदर, अभिव्यक्तिस्वातंत्र, ई. ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

बनियन घालायचाच कशाला.

गवि
Fri, 08/26/2011 - 12:01 नवीन
बनियन घालायचाच कशाला. ..निदान घरात असताना.. कुशीत शिरण्याच्या वेळी इ इ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

बनियन घालायचाच कशाला. ..निदान

स्पा
Fri, 08/26/2011 - 12:07 नवीन
बनियन घालायचाच कशाला. ..निदान घरात असताना.. कुशीत शिरण्याच्या वेळी इ इ.. अग्ग्ग्गग्ग्ग्ग __/\__ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नीळ

आनंदी गोपाळ
Fri, 11/11/2011 - 01:42 नवीन
बायकोने नीट धुतल्यानंतर नीळ लावली तर पिवळा पडत नाही असा अनुभव आहे. इथे नीळ लावायचा कंटाळा दिसतोय. मग पिवळ्याकडे दुर्लक्ष करणे तिला भाग आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

__/\__

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 08/26/2011 - 12:10 नवीन
:D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

_/\_

सूड
Fri, 08/26/2011 - 15:42 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शुचितै.. एक सुधारणा, हे वाक्य

अर्धवट
Fri, 08/26/2011 - 16:13 नवीन
शुचितै.. एक सुधारणा, हे वाक्य कॅलेंडर ह्या कथेतील नसून, "वहिदा रेहमान" ह्या कथेतील आहे बाकी चालूद्या, ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

काहीतरीच काय अर्धवटराव ....

sagarparadkar
Fri, 08/26/2011 - 17:54 नवीन
हे वाक्य "मीच तुमची वहिदा" ह्या वपुकथेतील आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

मिपा सोडाच पण संपूर्ण मास

विनीत संखे
Fri, 08/26/2011 - 12:24 नवीन
मिपा सोडाच पण संपूर्ण मास मिडिया हे अभिव्यक्तीवरील टिकेहल्ल्यांनी कोळलेलं आहे. वृत्तपत्रांनी कसाबवर तेवढी टिका केलेली नाही जेवढी अण्णांवर केलीय. म्हणून काय अण्णा मिडियाविरुद्ध आंदोलन करत नाहीत. अण्णांचं सोडा (अगदीच क्लिशे झालाय तो विषय आजकल) पण खुद्द पुलंना रात्री नाट्यसमीक्षक डास होऊन चावतायत असं स्वप्न पडलं होतं म्हणून काही त्यांनी समीक्षकांच्या तोंडांची तुंबलेली गटारं साफ करण्यात आपलं आयुष्य नाही घालवलं. तुमचं साहित्य हे केर असेल तर आपसूकच कालौघात त्याचं विघटन होतं आणि जर ते कालातीत असेल तर त्याला 'कल्ट' चा दर्जा मिळतोच. मिपाही त्याला अपवाद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

धन्य

विनायक प्रभू
Fri, 08/26/2011 - 10:59 नवीन
धन्य जाहलो. महान घासु गुर्जी कडुन महान लेखात फक्त माझाच नामोल्लेख. @चे.सु.गु. तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय हो?
  • Log in or register to post comments

तुम्ही नीट वाचत नाही काय?

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 11:05 नवीन
@ वि. प्र. तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच अस्थानी प्रतिक्रिया देता काय? माझा काही प्रॉब्लेम आहे असं मत मी कुठेच मांडलेलं नाहीय. धागाकर्त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहे असा माझा अनुभव मांडलाय फक्त त्याबाबत त्यांनी सूचविलेला उपाय मला अवलंबायचा नाहीय एवढंच माझं मत मी मांडलंय. हा काही माझा प्रॉब्लेम नाहीय. उलट असले अनुभव मी एन्जॉय करतोय असं म्हंटलंय. एन्जॉय करणं प्रॉब्लेम असू शकतं का? अर्थात मी एन्जॉय करतो हा तुमचा प्रॉब्लेम असल्यास त्याविषयी एक्झॅक्टली तुम्हाला च जास्त ठाऊक असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

प्रतिक्रिया

विनायक प्रभू
Fri, 08/26/2011 - 11:12 नवीन
एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) मला वाटला. नाही पटत द्या सोडुन. एन्जॉय करता आहात तर काहीच प्रॉब्लेम नाही. एन्जॉय करण्याकरता धरलेला रस्ता तुम्हाला योग्य वाटत असेल तर... लगे रहो.
  • Log in or register to post comments

खुलाश्याबद्दल धन्यवाद

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 11:33 नवीन
<< एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) >> तुम्हाला या संकेतस्थळावरील वाटचाली विषयी म्हणायचं आहे का? की माझ्या एकंदर आयुष्याबद्दल बोलताय? जरा अजून खुलासा करावा. तुमचा या संकेतस्थळावरचा प्रॉब्लेम तर तुम्ही न सांगताही माझ्या लक्षात आला. तुम्हाला प्रतिसादाला जिथल्या तिथे प्रतिक्रिया देताच येत नाही. तुम्ही जी प्रतिक्रिया देता ती त्यामुळे धाग्यावरचा नवा प्रतिसाद ठरतो. हे कसे करायचे ते कुणाकडून तरी नीट समजून घ्या. अर्थात हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नसेल तर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

बाब्या, बाबी आणि बॉबी बाकीचा

इरसाल
Fri, 08/26/2011 - 11:22 नवीन
बाब्या, बाबी आणि बॉबी बाकीचा प्रतिसाद नंतर.
  • Log in or register to post comments

?

विनीत संखे
Fri, 08/26/2011 - 11:26 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

उठवळ मोर्चा चं उठुन वळवळ

५० फक्त
Fri, 08/26/2011 - 11:47 नवीन
उठवळ मोर्चा चं उठुन वळवळ मोर्चात रुपांतर होउ नये म्हणजे मिळवलं.
  • Log in or register to post comments

काय काय पहावं लागणार आहे?

Nile
Fri, 08/26/2011 - 11:50 नवीन
आता उरल्यासुरल्या आयुष्यात* अजून काय काय पहावं लागणार आहे कोणास ठावूक! ;-) *अधिक माहीती करता.. अभ्यास वाढवा म्हणजे आपोआप कळेल.
  • Log in or register to post comments

>> मिपावरती वेगवेगळ्या

शुचि
Fri, 08/26/2011 - 12:00 नवीन
>> मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. >> :( सुंदर विश्लेषण!!!
  • Log in or register to post comments

मोर्चा फारच गंमतीदार

नितिन थत्ते
Fri, 08/26/2011 - 12:05 नवीन
मोर्चा फारच गंमतीदार असेल. म्हणजे मोर्चातल्या अनेक व्यक्ती एकमेकाविरुद्ध मोर्चात आलेल्या असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

अगदी सहमत

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 12:16 नवीन
म्हणूनच अशा मोर्चाचा काही उपयोग नाही म्हणतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हरकत नाही

राजेश घासकडवी
Fri, 08/26/2011 - 19:31 नवीन
म्हणजे मोर्चातल्या अनेक व्यक्ती एकमेकाविरुद्ध मोर्चात आलेल्या असण्याची शक्यता आहे.
त्याला काहीच हरकत नाही. पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज मोर्चाफेलोज असं कायसं कोणीतरी म्हटलेलं आहेच. किंबहुना एकमेकांचा उद्धार करणारे खांद्याला खांदा लावून मोर्चात उभे राहिले तर सगळेच समदुःखी आहेत ही जाणीव होईलच ना. तेच महत्त्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/26/2011 - 19:44 नवीन
होय तर! अण्णांमुळे नाही का सगळे राजकीय पक्ष एकत्र येत आहेत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

उम्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/26/2011 - 12:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

या लाह्या खाणर्‍यांमुळे काही

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/26/2011 - 20:23 नवीन
या लाह्या खाणर्‍यांमुळे काही वैचारिक प्रगती होत नाही, मी त्यांचा निषेध करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

निषेध

ढब्बू पैसा
Fri, 08/26/2011 - 20:58 नवीन
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा! (संतप्त मोर्चेकरी) ढब्बू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Sat, 08/27/2011 - 11:14 नवीन
या लाह्या खाणर्‍यांमुळे काही वैचारिक प्रगती होत नाही, मी त्यांचा निषेध करते.
तुमची झाली आहे तेवढी प्रगती पुरी आहे की देशासाठी ;)
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा!
म्हणजे नक्की काय करा ? परदेशात बसून देशात उगा राळ उडवणार्‍या अदिती व ढब्बीचा तिव्र निषेध !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्बू पैसा

उद्देश

राजेश घासकडवी
Sat, 08/27/2011 - 17:17 नवीन
परा, अदिती, व ढब्बू पैसा यांना: लोकहो, निव्वळ निषेध हा नकारात्मक आहे. त्याला सकारात्मक डूब हवी. म्हणजे उदाहरणार्थ 'मी हिरवा माजवाली/ला आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करते/तो' किंवा 'मी सौंदर्यफुफाटा निरखून पहाणारा/री आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करतो/ते' उठवळ मोर्चा हा एकमेकांचा निषेध करण्यासाठी नाही. मिळून मिसळून आपल्या समान शत्रूला विरोध करण्यासाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

गुर्जी काढाच मोर्चा...

वात्रट
Fri, 08/26/2011 - 12:50 नवीन
पण प्रश्न असा अही कि ज्यान्च्या विरोधात मोर्चा काढायचा तेच मोर्चात पुढे उभे राहतील.. त्याच काय करणार ते सांगा आधी.
  • Log in or register to post comments

शांत

चिरोटा
Fri, 08/26/2011 - 13:56 नवीन
भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो. चिरोटा मोर्चाअडवी
  • Log in or register to post comments

सहमत

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/26/2011 - 14:02 नवीन
भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो.
अगदी अगदी. परदेशात बसून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुंची तुलना फक्त दाऊद बरोबरच होउ शकते. आम्हाला सत्ता दिल्यास त्यांना मुसक्या बांधून इकडे आणतो का नाही बघाच. परानाथ मुंढे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

उठ्वळ आय डी नी बहुधा ....

शाहिर
Fri, 08/26/2011 - 14:16 नवीन
उठ्वळ आय डी नी बहुधा बहिष्कार घातला आहे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा