आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे "स्ट्रेस"(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक ताणातच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो? तशी बरीच कारणं देता येतील...कधी आपल्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता यात न बसलेला ताळमेळ तर कधी विश्वासाला गेलेला तडा..एक ना अनेक..थोडक्यात काय तर प्रामुख्याने आपल्या मनाला पवनकुक्कुटाप्रमाणे वारा येईल त्या दिशेला भरकटण्याच्या लागलेल्या सवयीने ही समस्या निर्माण झालेली दिसून येते.
स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे असा बोलबालाही आपल्याला सर्वत्र ऐकू येतो.पण ध्यान करणे म्हणजे नेमके काय? इंग्रजीत ध्यानाला Meditation म्हटले आहे. Meditation या शब्दाच्या dictionary meaning नुसार Meditation is nothing but continuously thinking about something ! म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ !
मग कुणी पैशावर ध्यान करत असेल तर कुणी खेळावर. अर्थात प्रत्येकजण कशाना कशाचा सतत विचार करीत असतो म्हणजेच ढोबळ अर्थाने ध्यानच करीत असतो.विचार करणे हा मनाचा स्थायीभाव आहे मग त्याला चिरडून किंवा मारून आपल्याला जे साध्य करावयाचे आहे ते कसे साध्य करता येईल? मनाला आपला मित्र बनवूनच हे शक्य होईल.ज्याप्रकारे सुसाट वाहणार्या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशेने वळविले असता तिचा उपयोग जनकल्याणाकरिता करता येऊ शकतो त्याच प्रकारे आपल्या मनाचा नियमनाद्वारे आपल्याच कल्याणाकरिता उपयोग केला जाऊ शकतो.मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते.
पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. डोळे मिटून बसल्यावर आपल्या मनात अक्षरशः विचारांचं काहूर माजतं.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात. मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.अश्या तर्हेने काही दिवस नियमितपणे अभ्यास चालू ठेवल्यास ध्यान करणे सोपेच नाही तर आनंददायी बनते. मग ताण्,स्ट्रेस अश्या शब्दांना आपल्या आयुष्यात काही महत्त्वच उरत नाही.म्हणूनच ध्यानामुळे होणार्या या फायद्याकडे पहाता ध्यान ही काळाची गरज होती , आहे आणि राहील असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वाचने
34407
प्रतिक्रिया
150
मिसळपाव
प्रतिक्रिया
@ अजातशत्रू - तुम्हाला
In reply to जोगळेकर उवाच !१! by अजातशत्रु
ही मते स्वानुभवावरून बनली
In reply to @ अजातशत्रू - तुम्हाला by अप्पा जोगळेकर
@ जोगळेकर यांस धन्यवाद !
In reply to @ अजातशत्रू - तुम्हाला by अप्पा जोगळेकर
"विपश्यना पेड शिबिर" अशी
In reply to @ जोगळेकर यांस धन्यवाद ! by अजातशत्रु
अश्लाघ्य शब्दाचा अर्थ
In reply to "विपश्यना पेड शिबिर" अशी by अप्पा जोगळेकर
'अश्लाघ्य'चा अर्थ
In reply to अश्लाघ्य शब्दाचा अर्थ by अजातशत्रु
'अश्लाघ्य'चा अर्थ
In reply to 'अश्लाघ्य'चा अर्थ by पंगा
आपण प्रत्येक प्रतिसादात ते
In reply to 'अश्लाघ्य'चा अर्थ by अजातशत्रु
कोण मि काय ?
In reply to आपण प्रत्येक प्रतिसादात ते by अर्धवट
हो तुम्हीच..
In reply to कोण मि काय ? by अजातशत्रु
ओके
In reply to हो तुम्हीच.. by अर्धवट
(आवडत नसल्यास कमी
In reply to ओके by अजातशत्रु
अरेरे....
In reply to (आवडत नसल्यास कमी by परिकथेतील राजकुमार
निर्विकार
In reply to मन वढाय वढाय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, काही गडबड झाली काय ?
In reply to निर्विकार by श्रावण मोडक
नाही
In reply to च्यायला, काही गडबड झाली काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध्यानामुळे मन निर्विकार होऊ
In reply to निर्विकार by श्रावण मोडक
निर्विचार
च्यायला!!
In reply to निर्विचार by श्रावण मोडक
विकार
In reply to च्यायला!! by Nile
बाब्बोय!
In reply to विकार by श्रावण मोडक
हाच तो विकार. यापासून मुक्त
In reply to विकार by श्रावण मोडक
जमलं, जमलं...
In reply to हाच तो विकार. यापासून मुक्त by Nile
तुमचीच शिकवण हो गुर्जी, अशी
In reply to जमलं, जमलं... by श्रावण मोडक
आता
In reply to तुमचीच शिकवण हो गुर्जी, अशी by Nile
शिरसावंद्य
In reply to आता by श्रावण मोडक
>>.म्हणजे डोळे उघडे असताना
सहमत आहे!
वाचली
In reply to सहमत आहे! by Nile
अहो तिची नाडी* जर हातात आली
In reply to वाचली by श्रावण मोडक
नाडी
In reply to अहो तिची नाडी* जर हातात आली by Nile
खो खो खो
In reply to सहमत आहे! by Nile
येथुन पुढे आळंदीला शिबीरस्थळी
+१
In reply to येथुन पुढे आळंदीला शिबीरस्थळी by स्पा
ये धत्ताड! ये धत्ताड ये
विपश्यना
हे १० दिवस केवळ स्वतःसोबत
In reply to विपश्यना by विलासराव
विलासराव छान आहे तुमचा
In reply to विपश्यना by विलासराव
छानच अनुभव विलासराव! बाकी
In reply to विपश्यना by विलासराव
चांगला अनुभव
इगतपुरी
In reply to चांगला अनुभव by ईश आपटे
चूक झाली लेख लिहून
ठीक.
In reply to चूक झाली लेख लिहून by स्वप्ना_तुषार
+१
In reply to ठीक. by गवि
ऑ ?
In reply to चूक झाली लेख लिहून by स्वप्ना_तुषार
हॅ हॅ हॅ पराशी सहमत "हा लेख
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद. केलेला नियम पाळा
In reply to हॅ हॅ हॅ पराशी सहमत "हा लेख by अर्धवट
अरे अरे मिपाकरांनो भडकू नका.
In reply to धन्यवाद. केलेला नियम पाळा by परिकथेतील राजकुमार
१००% सहमत
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
नविन आयडी
In reply to चूक झाली लेख लिहून by स्वप्ना_तुषार
नविन आयडींना फक्त
In reply to नविन आयडी by Nile
तीव्र निषेध
In reply to चूक झाली लेख लिहून by स्वप्ना_तुषार
+११११
१००% सहमत.
In reply to +११११ by स्पा
क्षमा करा
मला वाटतं
In reply to क्षमा करा by स्वप्ना_तुषार
माझ्या प्रतिसादाबद्दल मी सर्व
In reply to क्षमा करा by स्वप्ना_तुषार
धन्यवाद मिपाकर आता फक्त मूक
धन्यवाद मिपाकर आता फक्त मूक
In reply to धन्यवाद मिपाकर आता फक्त मूक by स्वप्ना_तुषार
मूक वाचक?