Skip to main content

ध्यान गरज आणि फायदे

लेखक स्वप्ना_तुषार यांनी सोमवार, 11/07/2011 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे "स्ट्रेस"(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक ताणातच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो? तशी बरीच कारणं देता येतील...कधी आपल्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता यात न बसलेला ताळमेळ तर कधी विश्वासाला गेलेला तडा..एक ना अनेक..थोडक्यात काय तर प्रामुख्याने आपल्या मनाला पवनकुक्कुटाप्रमाणे वारा येईल त्या दिशेला भरकटण्याच्या लागलेल्या सवयीने ही समस्या निर्माण झालेली दिसून येते. स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे असा बोलबालाही आपल्याला सर्वत्र ऐकू येतो.पण ध्यान करणे म्हणजे नेमके काय? इंग्रजीत ध्यानाला Meditation म्हटले आहे. Meditation या शब्दाच्या dictionary meaning नुसार Meditation is nothing but continuously thinking about something ! म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ ! मग कुणी पैशावर ध्यान करत असेल तर कुणी खेळावर. अर्थात प्रत्येकजण कशाना कशाचा सतत विचार करीत असतो म्हणजेच ढोबळ अर्थाने ध्यानच करीत असतो.विचार करणे हा मनाचा स्थायीभाव आहे मग त्याला चिरडून किंवा मारून आपल्याला जे साध्य करावयाचे आहे ते कसे साध्य करता येईल? मनाला आपला मित्र बनवूनच हे शक्य होईल.ज्याप्रकारे सुसाट वाहणार्‍या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशेने वळविले असता तिचा उपयोग जनकल्याणाकरिता करता येऊ शकतो त्याच प्रकारे आपल्या मनाचा नियमनाद्वारे आपल्याच कल्याणाकरिता उपयोग केला जाऊ शकतो.मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते. पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. डोळे मिटून बसल्यावर आपल्या मनात अक्षरशः विचारांचं काहूर माजतं.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात. मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.अश्या तर्‍हेने काही दिवस नियमितपणे अभ्यास चालू ठेवल्यास ध्यान करणे सोपेच नाही तर आनंददायी बनते. मग ताण्,स्ट्रेस अश्या शब्दांना आपल्या आयुष्यात काही महत्त्वच उरत नाही.म्हणूनच ध्यानामुळे होणार्‍या या फायद्याकडे पहाता ध्यान ही काळाची गरज होती , आहे आणि राहील असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34468
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by Nile

नविन आयडींना फक्त प्रोत्साहनपर प्रतिसाद देण्याच्या व्यवस्थापनाच्या जाचामूळे गप्प रहायचे ठरवले आहे.
काही गरज नाही रे निळ.. अरे हे नवीन आहेत म्हणुन यांनी आपला वाटेल तसा अपमान करायचा आणि आपण फक्त ऐकुन घ्यायला बसलो आहोत का इथे?

In reply to by स्वप्ना_तुषार

हा लेख इथे मिसळपाववर टाकून मी घोड चूक केली आहे हे लक्षात आले. यापुढे असे होणार नाही. कारण **पुढे वाचली गीता...सारखा हा प्रकार आहे.
अतिशय उद्धट प्रतिसाद. अश्या पद्धतीने मिपाकरांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, मॅडम? जरा विचारपुर्वक लिहा.

एकतर धागा एवढा टुकार होता तरीपण मिपाकरांनी आपापल्या परीने प्रयत्न करून त्यात रंगत आणली त्याचे कौतुक करायचे सोडून स्वप्ना तुषार बाई काहीतरीच बरळत आहेत

In reply to by स्पा

एकतर धागा एवढा टुकार होता तरीपण मिपाकरांनी आपापल्या परीने प्रयत्न करून त्यात रंगत आणली त्याचे कौतुक करायचे सोडून स्वप्ना तुषार बाई काहीतरीच बरळत आहेत
सहमत. हेच आणि असेच म्हणतो.

माझ्या प्रतिसादाबद्दल मी सर्व मिपाकरांची मनापासून माफी मागते. मला असे लिहायला नको होते. मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागते. आशा आहे तुम्ही मला समजून घ्याल.

In reply to by स्वप्ना_तुषार

हा वाद इथंच थांबावा आता. स्वप्ना, तुम्ही लिहित रहा. लेखनाच्या बाजूने, लेखनाच्या विरोधात, लेखनाची आरती करणाऱ्या, लेखनाची खिल्ली उडवणाऱ्या वगैरे प्रतिक्रिया येणारच.

In reply to by स्वप्ना_तुषार

माझ्या प्रतिसादाबद्दल मी सर्व मिपाकरांची मनापासून माफी मागते. मला असे लिहायला नको होते. मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागते. आशा आहे तुम्ही मला समजून घ्याल.
वांदा नाय ! रात गयी बात गयी. पुढचा लेख कधी टाकताय दंगा घालायला ? :)

In reply to by स्वप्ना_तुषार

धन्यवाद मिपाकर आता फक्त मूक वाचक होईन म्हणतेय..
अरेरे कशाला.. लिहा हो लिहा तुम्ही बिंधास.! एवढ्यातेवढ्याने नाराज कसल्या होता तुम्ही? लिहा बिंधास..!

अरेरे हा प्रतिसाद आवडला नाहि..!
श्रावण मोडक =हा वाद इथंच थांबावा आता. स्वप्ना, तुम्ही लिहित रहा. लेखनाच्या बाजूने, लेखनाच्या विरोधात, लेखनाची आरती करणाऱ्या, लेखनाची खिल्ली उडवणाऱ्या वगैरे प्रतिक्रिया येणारच.
+१ असेच म्हणतो