Skip to main content

ध्यान गरज आणि फायदे

लेखक स्वप्ना_तुषार यांनी सोमवार, 11/07/2011 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे "स्ट्रेस"(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक ताणातच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो? तशी बरीच कारणं देता येतील...कधी आपल्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता यात न बसलेला ताळमेळ तर कधी विश्वासाला गेलेला तडा..एक ना अनेक..थोडक्यात काय तर प्रामुख्याने आपल्या मनाला पवनकुक्कुटाप्रमाणे वारा येईल त्या दिशेला भरकटण्याच्या लागलेल्या सवयीने ही समस्या निर्माण झालेली दिसून येते. स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे असा बोलबालाही आपल्याला सर्वत्र ऐकू येतो.पण ध्यान करणे म्हणजे नेमके काय? इंग्रजीत ध्यानाला Meditation म्हटले आहे. Meditation या शब्दाच्या dictionary meaning नुसार Meditation is nothing but continuously thinking about something ! म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ ! मग कुणी पैशावर ध्यान करत असेल तर कुणी खेळावर. अर्थात प्रत्येकजण कशाना कशाचा सतत विचार करीत असतो म्हणजेच ढोबळ अर्थाने ध्यानच करीत असतो.विचार करणे हा मनाचा स्थायीभाव आहे मग त्याला चिरडून किंवा मारून आपल्याला जे साध्य करावयाचे आहे ते कसे साध्य करता येईल? मनाला आपला मित्र बनवूनच हे शक्य होईल.ज्याप्रकारे सुसाट वाहणार्‍या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशेने वळविले असता तिचा उपयोग जनकल्याणाकरिता करता येऊ शकतो त्याच प्रकारे आपल्या मनाचा नियमनाद्वारे आपल्याच कल्याणाकरिता उपयोग केला जाऊ शकतो.मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते. पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. डोळे मिटून बसल्यावर आपल्या मनात अक्षरशः विचारांचं काहूर माजतं.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात. मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.अश्या तर्‍हेने काही दिवस नियमितपणे अभ्यास चालू ठेवल्यास ध्यान करणे सोपेच नाही तर आनंददायी बनते. मग ताण्,स्ट्रेस अश्या शब्दांना आपल्या आयुष्यात काही महत्त्वच उरत नाही.म्हणूनच ध्यानामुळे होणार्‍या या फायद्याकडे पहाता ध्यान ही काळाची गरज होती , आहे आणि राहील असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34468
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by Nile

हे 'अनुभूती' प्रकरणच जरा विचित्र वाटतंय. म्हणूनच त्याबद्दल बरेच कुतुहल वाटते. अवांतरः अनेकजण आपल्याला ही अशी ध्यान किंवा झाडपाल्याच्या धूरातून अनुभूती आल्याचे दाखले देतात. मला आजवर कधीही कोणतीही अनुभूती आलेली नाही. त्याबद्दल कुतुहल, उत्सुकता बरीच आहे. त्यासाठी कोणता मार्ग जास्त श्रेयस्कर आहे? ;)

In reply to by स्मिता.

म्हणजे तुम्ही झाडपाल्याचा अनुभव घेतला नाही असं म्हणताय की अनुभव घेऊनही 'अनुभूती' आली नाही असं म्हणताय?

In reply to by नितिन थत्ते

ध्यान किंवा झाडपाला, दोघांचाही अनुभव नसल्याने अनुभूती नाही. सुदैवाने अजून तरी कोणतीही अनुभूती घेण्याची गरज पडलेली नाही.

In reply to by स्मिता.

त्यासाठी कोणता मार्ग जास्त श्रेयस्कर आहे?
अहो तोच, योग्य विपश्यना केंद्र! कधी आमच्या बाजूला आलात तर मारा चक्कर, 'पोहोचलेल्या' गुरुंशी गाठ घालून देऊ तुमची. त्यात तुमच्या निमित्ताने आमच्याही नशिबी चार थेंब आले तर .. हॅ हॅ हॅ..

In reply to by स्मिता.

धूरातून येणार्‍या अनुभूतीबद्दल कुतुहल, उत्सुकता नैसर्गीक आहे पण ती अनूभूती फार लवकरच प्रचंड शारीरीक व मानसीक अधोगतीमधे बद्दलते एव्हंड विसरू नका म्हणजे झालं. ही अधोगती जर नियंत्रीत करता येत असेल व मजबूत पैसा गाठीला असेल काही कामधाम व जबाबदार्‍या नसतील तर धूराचा मार्ग सूखदायक समजा. पण हे ९९% लोकांबाबद घडत नाही आणी ते लोक नशेलाच अनूभूती म्हणून चीकटून राहतात व वाहवत जातात.

In reply to by आत्मशून्य

मला वाटणारी उत्सुकता किंवा कुतुहल हे लोकांना येणार्‍या निरनिराळ्या (किंवा किणतीतरी एकच) अनुभूतीबद्दल आहे. केवळ धूरातून येणार्‍या अनुभूतीबद्दल नक्कीच नाही. ती प्रतिक्रिया म्हणजे काहितरी गंमत करण्याचा माझा क्षीण प्रयत्न समजावा ;) बाकी तुमची प्रतिक्रिया लाख मोलाची आहे. ती अनूभूती फार लवकरच प्रचंड शारीरीक व मानसीक अधोगतीमधे बद्दलते. १०१% सहमत. त्यामुळे अश्या अनुभूत्यांपासून दूरच बरे!

In reply to by इंटरनेटस्नेही

स्पष्ट प्रश्न :- हे सर्व वाचायला - लिहायला ठिक आहे. पण प्रत्यक्ष विपशन्येनंतर तुझ्या आयुष्यात काय फरक पडला ? तुझा वागण्या / बोलण्यात काही फरक पडला का ? विपश्यने आधीचा तू आणि नंतरचा तू ह्यावर आई वडिलांचे मत काय? आधिचा आत्मविश्वास (असल्यास) आणि नंतरचा आत्मविश्वास ह्यात काही फरक वाटत आहे का ?

In reply to by इंटरनेटस्नेही

येथुन पुढे आळंदीला शिबीरस्थळी जाण्याकरता मिपाकर परा व धमु यांचे मोलाचे मार्गर्शन लाभले!
काय कटवलाय पर्‍याने इंट्याला!! सुमडी आहे साला एकदम!! ;-)

In reply to by Nile

काय कटवलाय पर्‍याने इंट्याला!! सुमडी आहे साला एकदम!!
निच माणसा ! चांगला तिर्थ प्रसाद देउन मग सोडले हो त्याला.

In reply to by इंटरनेटस्नेही

आपले मित्र / मैत्रीण / प्रियकर / प्रेयसी / पती / पत्नी / पालक / अपत्य / अन्य नातेवाईक हे आपल्यावर प्रेम करतात आणि आपण त्यांच्यावर प्रेम करतो असा आपला समज असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की माणुस फक्त स्वता:वर प्रेम करतो. आणि आपल्याला दुसर्‍यांची गरज आज ना उद्या, कधीतरी लागेल या भावनेतुन सर्व नाती गोती एकत्र बांधुन ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे आपण (मानवाने) निर्माण केलेले मायाजाल आहे. वस्तुत: प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे व त्याचे कर्म देखील त्यासोबत आहे. तेव्हा आत्मउन्नती करण्यासाठी आपण स्वता:चा प्रयत्न स्वता करणे श्रेयस्कर. यासाठी मी म्हणेन एक साडेसाती अनुभवावी. फार काही नाही 'अनुभवावी'.

In reply to by इंटरनेटस्नेही

प्रामाणिकपणे आणि कळकळीने हे सांगू इच्छितो की हे नाद सोडून द्यावेत. तुम्ही लिहिलेल्या परिच्छेदातील 'आत्मउन्नती करण्यासाठी आपण स्वता:चा प्रयत्न स्वता करणे श्रेयस्कर.' हे वाक्य पुढे कंटिन्यु करुन असे म्हणावेसे वाटते की 'त्यामुळेच काय करावे, कसे जगावे, वागावे याचे धडे घेण्यासाठी विपश्यना शिबिर वाल्यांच्या घशात पैसे घालण्याची आणि स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याची गरजच काय ? ' वयाच्या पंचविशीमध्ये(जे वय उमेदीचे, भविष्य घडवण्याचे, अडचणींशी हिरीरीने लढण्याचे वय असते ) त्या वयात ध्यान, संन्यास, विवंचना इत्यादी अनावश्यक बाबीं शिकण्यासाठी एका विपश्यना शिबिरात जावेसे वाटणे हीच मुळामध्ये अतिशय अश्लाघ्य गोष्ट आहे. नातीगोती, प्रेम, पैसे, संपत्ती हे सर्व मायाजाल आहे असे सांगत असतानाच अशा शिबिरांचे आयोजन करणारे भरमसाठ फी आकारतात ही विसंगती शिबिरार्थींच्या का लक्षात येत नाही याचे नेहमीच कोडे वाटते. अवांतर - आपण या भुतकाळ आणि भविष्यकाळ या दगडांवर पाय ठेवुन जगत आहोत, संजय दत्तचा एक भयानक पांचट ड्वायलाक या निमिताने आठवला.

In reply to by अप्पा जोगळेकर

'त्यामुळेच काय करावे, कसे जगावे, वागावे याचे धडे घेण्यासाठी विपश्यना शिबिर वाल्यांच्या घशात पैसे घालण्याची आणि स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याची गरजच काय ? '
अशा शिबिरांचे आयोजन करणारे भरमसाठ फी आकारतात ही विसंगती शिबिरार्थींच्या का लक्षात येत नाही याचे नेहमीच कोडे वाटते.
श्री जोगळेकर विपश्यनेची कुठलीही फी नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

ध्यान, संन्यास, विवंचना इत्यादी अनावश्यक बाबीं शिकण्यासाठी एका विपश्यना शिबिरात जावेसे वाटणे हीच मुळामध्ये अतिशय अश्लाघ्य गोष्ट आहे
. अश्लाघ्य या शब्दावर तिव्र आक्षेप आहे, तुम्हाला विपश्यनेतला वि ही ठाऊक नाही, आणि वाट्टेल ते बरळताय...अगोदर नीट माहिती घ्या मग हवे ते बरळा. . . . . . . . . . . . . हि तुम्हाला आलेली खरड >अप्पा तुमची कलकल पटली आहे. मात्र, विपश्यना शिबीर हे संपूर्ण पणे मोफत असते, तिथे संपूर्ण दहा दिवस राहण्याचे, जेवण्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. तेव्हा आपण प्रतिसाद संपादित करावा ही नम्र विनंती. http://www.dhamma.org/ वरील विनंती नाकारुन स्वतःला काय सिध्द करण्याचा प्रयत्न आहे? अवांतर- तुमच्या वागण्याची एव्हाना सवय झाली आहे पण नवीन वाचणार्‍या लोकांचा गैरसमज नको म्हणून.

In reply to by अजातशत्रु

जेवण्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत.
ह्ये बेस झालं बघा! बाकी पोट भर जेवल्यावर पेंग आली तर चालते का हो तुमच्या केंद्रात? आणि आलीच तर गाद्या वगैरे असतात का लवंडायला? एसी असेलच म्हणून विचारत नाही. असलं काही लहानपणी सापडलं असतं तर शाळेच्या कचाट्यातून सूटका झाली असती राव!

In reply to by अजातशत्रु

+१ अजातशतत्रु, सदर खरड मीच अप्पांना टाकली होती. पण बहुदा त्यांनी आमची विनंती अव्हेरली असावी.
इंटरनेटस्नेहीThu, 14/07/2011 - 21:53 अप्पा तुमची कलकल पटली आहे. मात्र, विपश्यना शिबीर हे संपूर्ण पणे मोफत असते, तिथे संपूर्ण दहा दिवस राहण्याचे, जेवण्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. तेव्हा आपण प्रतिसाद संपादित करावा ही नम्र विनंती. http://www.dhamma.org/
जाऊंदे लीव्ह ईट.. मे गॉड ब्लेस हिम.

In reply to by इंटरनेटस्नेही

मी तुमच्या नावाचा वेगळा उल्लेख केला नाही, कारण जोगळेकरना माहीती होते ते, असो.. . . . . . . . . . तुमचा अनुभव आवडला, इथे दिल्या बद्दल धन्यवाद.

In reply to by अजातशत्रु

@ अजातशत्रू - तुम्हाला विपश्यनेतला वि ही ठाऊक नाही, तुम्हाला अश्लाघ्य या शब्दाचा अर्थही टाऊक नाही. अन्य सदस्यांनी मला केलेल्या विनंत्या मान्य करायच्या किंवा नाहीत याबद्दल तुम्हाला तसदी घेण्याचे कारण नाही. अवांतर- तुमच्या वागण्याची एव्हाना सवय झाली आहे पण नवीन वाचणार्‍या लोकांचा गैरसमज नको म्हणून मलासुद्धा तुमच्या जुने स्कोअर सेटल करण्याच्या सवयीची सवय झालेली आहे. @ईटरनेटस्नेही - मात्र, विपश्यना शिबीर हे संपूर्ण पणे मोफत असते, तिथे संपूर्ण दहा दिवस राहण्याचे, जेवण्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत ओके. आर्थिक लुटालुटीसंदर्भातला माझा आक्षेप मी मागे घेतो. जुना प्रतिसाद संपादित करण्याची गरज नाही. लुटालुटीसंदर्भात मी चुकीचा आक्षेप नोंदवला होता हे मी मान्य करत आहे. पण अश्या पेड शिबिरांच्या असंख्य जाहिराती मी आजवर पाहिलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित आक्षेप मी नोंदवला होता हेही सांगावेसे वाटते. अर्थातच विपश्यना, ध्यान यांच्या फोलपणाबाबतची माझी मते अजूनसुद्धा ठाम आहेत

In reply to by अप्पा जोगळेकर

विपश्यना संदर्भात आर्थिक लुटालुटीसंदर्भातला आक्षेप मागे घेतल्याबद्दल... . . . . बाकि "विपश्यना पेड शिबिर" अशी जाहिरात कुठे बीबीसी वर पाहिलीत काय?
अर्थातच विपश्यना, ध्यान यांच्या फोलपणाबाबतची माझी मते अजूनसुद्धा ठाम आहेत
हे तुमचे स्वतःचे वैयक्तिक मत/विचार आहे.अर्थात तुम्हि त्याचा अगोदर अनुभव घेतला असणे याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हे वक्तव्य हे तुमच्या पुर्वग्रहातून आलेले आहे हे वेगळे सांगायची गरज नाहि. तुम्ही कशावरहि ठाम रहा,फक्त इतरांची दिशाभूल करु नका ही विनंती.. . . . . . . . . . . -आपला मित्र ( जिवलग लिहू कि विश्वासू हा संभ्रम आहे ) अजातशत्रु

In reply to by अजातशत्रु

"विपश्यना पेड शिबिर" अशी जाहिरात कुठे बीबीसी वर पाहिलीत काय मी केलेल्या प्रत्येक विधानाचा पुरावा देण्यासाठी मी कोणालाही बांधील नाही. शिवाय मी पुरावा दिलाच तरी तो तुम्ही मान्य कराल याची काहीच गॅरेंटी नाही. अशी एक नव्हे असंख्य जाहिराती पाहिलेल्या आहेत हे रिईटिरेट करतो. हे तुमचे स्वतःचे वैयक्तिक मत/विचार आहे.अर्थात तुम्हि त्याचा अगोदर अनुभव घेतला असणे याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हे वक्तव्य हे तुमच्या पुर्वग्रहातून आलेले आहे हे वेगळे सांगायची गरज नाहि हे माझे मत नाही. जे सत्य आहे ते मी इंटरनेटस्नेही यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. 'अनुभव घेऊन पाहा' हे वाचून नाडीपट्टीच्या धाग्याची आठवण झाली. तुम्ही कशावरहि ठाम रहा,फक्त इतरांची दिशाभूल करु नका ही विनंती.. छे. दिशाभूल झालेल्या, भरकटलेल्यांना रस्ता दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला. यानिमित्ताने तुम्ही याही बाबतीत गंडलेले आहात हे कळले. अश्लाघ्य शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक नाही हे गॄहीत धरावे काय ? की मेहमीप्रमाणेच मुद्याला बगल दिली?

In reply to by अप्पा जोगळेकर

तुम्हि एकाच शब्दाची नाडि पकडून तेच सारखे तानत असता हे मागे बामण या शब्दावरुन आठवले. असो, अश्लाघ्य शब्दाचा अर्थ= बहुधा निंद्य/ निंद्यनीय मला तरी असा माहित आहे, तुमच्या दृष्टिने काय आहे? नाहि तुमचे अर्थ भलतेच भारी भारी असतात, तुम्हाला कोणते शब्द शिवि वाटतील याचा काहि भरवसा नाही, मग तुमच्या मते अश्लाघ्य हा शब्द आदरार्थी आहे काय? तो तुम्ही सन्मानार्थ तिथे योजला आहे काय? (आता मि हि म्हणू काय हा शब्द मला शिवी सारखा वाटला, जौ द्या चर्चेला बगल देण्यासाठी अशा गोष्टी मी करत नाहि)
हे माझे मत नाही. जे सत्य आहे ते मी इंटरनेटस्नेही यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. 'अनुभव घेऊन पाहा' हे वाचून नाडीपट्टीच्या धाग्याची आठवण झाली.
हे माझे मत नाही. जे सत्य आहे ???????? असे म्हणावेसे वाटते की 'त्यामुळेच काय करावे, कसे जगावे, वागावे याचे धडे घेण्यासाठी विपश्यना शिबिर वाल्यांच्या घशात पैसे घालण्याची आणि स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याची गरजच काय ? ' वयाच्या पंचविशीमध्ये(जे वय उमेदीचे, भविष्य घडवण्याचे, अडचणींशी हिरीरीने लढण्याचे वय असते ) त्या वयात ध्यान, संन्यास, विवंचना इत्यादी अनावश्यक बाबीं शिकण्यासाठी एका विपश्यना शिबिरात जावेसे वाटणे हीच मुळामध्ये अतिशय अश्लाघ्य गोष्ट आहे. नातीगोती, प्रेम, पैसे, संपत्ती हे सर्व मायाजाल आहे असे सांगत असतानाच अशा शिबिरांचे आयोजन करणारे भरमसाठ फी आकारतात ही विसंगती शिबिरार्थींच्या का लक्षात येत नाही याचे नेहमीच कोडे वाटते. हे तुमचे मत नाही ? हे सत्य आहे ?
काय करावे, कसे जगावे, वागावे याचे धडे घेण्यासाठी विपश्यना शिबिर वाल्यांच्या घशात पैसे घालण्याची आणि स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याची गरजच काय ?
तुम्ही/किंवा इतर विपश्यना शिबिर वाल्यांच्या घशात पैसे घातले काय? किंवा विपश्यना शिबिर संपन्न झाल्यानंतर तुम्हाला तसे वाटले काय? तुमच्या कडून भरमसाठ फि आकारली गेली? वस्त्र, फळे, धन, नाणी, दागिने कोरडा शिधा तांदूळ वगैरे दक्षिणा म्हणून मनाविरुध्द द्यावे लागले आहे काय? तिथले आचार्य तुम्हाला हल्ली महागाई फारच वाढली आहे, तेव्हा दक्षिणा थोडि जास्त द्या असे म्हणले काय?
अनुभव घेऊन पहा हे वाचून नाडीपट्टीच्या धाग्याची आठवण झाली
तुम्हि अनुभव न घेताच विधाने करताय,हे म्हणजे भुस्काटात पोहून समुद्राची खोली सांगण्या सारखे आहे, नाडि बाबतही माझे हेच मत आहे, मी तरि अजून नाडिचा अनुभव न घेताच खिल्ली उडवलेली नाही, अनुभव हाच माणसाचा खरा गुरु आहे,हा सुविचार फक्त पाठ करायचा नसतो, पण हे तुमच्या सारख्या अनअनुभवी व्यक्तिला समजणार तरी कसे?
छे. दिशाभूल झालेल्या, भरकटलेल्यांना रस्ता दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला. यानिमित्ताने तुम्ही याही बाबतीत गंडलेले आहात हे कळले.
भरकटलेल्यांना रस्ता जरुर दाखवा पण अगोदर अनुभव घ्या, तुमचे म्हणजे असे आहे रस्ता माहित आहे पण ड्रायव्हिंग करता येत नाही, तेव्हा इथे गंडलेले कोण हे वे.सां. न.
मी केलेल्या प्रत्येक विधानाचा पुरावा देण्यासाठी मी कोणालाही बांधील नाही.
वादच संपला, त्यामुळे तुम्ही काहीही बेछूट विधाने करण्यास मोकळे आहात,आम्हि पुरावे मागण्याचा मुर्खपणा करणार नाहि :) मि विपश्यना शिबिराचा अनुभव घेतला आहे, या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे द्या अवांतर: वादच संपला, याचा अर्थ मि तुमच्याशी चर्चा करणार नाही, असे कृपया घेउ नका, आम्हि केव्हाही तयारच(तत्पर) असतो,

In reply to by पंगा

'अश्लाघ्य' = 'कौतुकास अजिबात पात्र नाही असा'.
मला हे सापडले अश्लाघ्य = निंद्य (संदर्भ http://www.maayboli.com/node/24881 ) . . . . . . . . . . . . . . { ....?........ }

In reply to by अजातशत्रु

आपण प्रत्येक प्रतिसादात ते टिंब टिंब घालून ओळी वाढवण्याचं काही विशेष कारण आहे काय? की आपली स्वाक्षरीच तशी आहे?

In reply to by अर्धवट

आपण प्रत्येक प्रतिसादात ते टिंब टिंब घालून ओळी वाढवण्याचं काही विशेष कारण आहे काय? की आपली स्वाक्षरीच तशी आहे?
टिंब घालून ओळी वाढवण्याचं काही विशेष कारण नाहि, (आवडत नसल्यास कमी करतो)

In reply to by अजातशत्रु

(आवडत नसल्यास कमी करतो)
अजातशत्रु मला तुमचे मिपावर येणे आवडत नाही. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

कित्ती कित्ती म्हणून द्वेष करायचा एखाद्याचा :) तुमच्याकडे मिपाचा मालकी हक्क आहे काय? तो असल्यास आम्हि पुन्हा इथे थुंकणारही नाहि, ;) यायचे का नाही हे मालक ठरवतील..तुम्ही कोण? टिकोजीराव.. तुमच्या आवडी निवडीशी आम्हाला काडीचे सोयर सुतक नाही, सबब आम्ही दारावरच्या दरबानाला भिक घालत नाहि, :) . . . {द्वेषकथेतील खाजकुमार}

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ध्यानामुळे मन निर्विकार होऊ शकते
टायपो म्हणू की नको? :)

In reply to by श्रावण मोडक

राग,लोभ,मोह,द्वेष वगैरे हे सर्व विकार आहेत तेव्हा ध्यानाने हे सर्व विकार जाऊ शकतात काय असे म्हणायचे आहे, विकार गेले की विचार जातील ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गडबड नाही. खरं तर, संपूर्ण लेखात, आणि प्रतिसादांतही, मला विकार - निर्विकार कुठंही दिसलं नाही. तरी तुम्ही तो मुद्दा घेतलात. म्हटलं, तुम्हाला नेमकं तेच म्हणायचं आहे किंवा कसे? म्हणून मी प्रश्न टाकला.

In reply to by श्रावण मोडक

ध्यानामुळे मन निर्विकार होऊ शकते
टायपो म्हणू की नको?
त्यांना बहुदा लग्न करुन पदरात पडलेल्या ध्यानामुळे मन निर्विकार होते असे म्हणायचे असावे.

'निर्विचार' या शब्दावरून चाललेला खल वाचतो आहे. 'निर्विचार' हा शब्द विपश्यनेच्या संदर्भात नेमका काय असावा असा प्रश्न पडला आहे. विपश्यनेच्या संदर्भात 'संस्कार' या शब्दाचाही अर्थ एकदा जाणून घेतला पाहिजे. :)

In reply to by श्रावण मोडक

'निर्विचार' या शब्दावरून चाललेला खल वाचतो आहे.
निर्विचारावरचा हा विचारांचा गोंधळ वाचून विचारात पडलो! ;-)

In reply to by Nile

विचारात पडलो!
हाच तो विकार. ;) यापासून मुक्त व्हा. :)

In reply to by श्रावण मोडक

हल्ली मोठे होण्याबद्दलसोबत विकार मुक्ततेचीहे दिक्षा द्यायला सुरुवात केलीत की काय आचार्य स्थितप्रज्ञानंद? ;)

In reply to by श्रावण मोडक

हाच तो विकार. यापासून मुक्त व्हा.
ह्या विचारात पडल्याने झालेल्या विकारामुळे डोस्कं पार उठलं म्हणून दोन चार घोट घेतले, १२ तासांचं ध्यान लागलं!! त्यावेळी आलेला एकही विचार आता आठवत नाहीए, आता आम्हाला जमलं का नाही ते सांगा बुवा गुरुजी!

In reply to by Nile

आता 'ध्याना'च्या जोडीनं थोडा धूरही घेत चला. म्हणजे, स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच, ही अनुभूतीही येईल. :)

In reply to by श्रावण मोडक

तुमची आज्ञा शिरसावंद्य! :-) नाहीतर आपल्याला स्वर्गाचं तसं काही अ‍ॅट्रॅक्शन नाही ब्वॉ. नरकात काय धमाल असेल, सगळे मित्र वगैरे तिकडे सोडून स्वर्गात जाउन करायचं काय?

>>.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात. +१०० >> मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं. फारच तपश्चर्या लागते असे करायला आणि करण्यायोग्य व्हायला. माझे वडिल ह्या गोष्टीमधे पारंगत आहेत. त्यांनी मला दिक्षा देउन साधना करायला शिकवण्याचा प्रयत्न केला होता. ते मला काही झेपले नाही. पण पराने सांगितलेला रासायनिक प्रयोग मात्र एकदम आणि पटकन झेपला, अमलात आणला गेला आणि आजतागायत आणाला जातोय. :P पण बाकी लेखातल्या ध्यानाच्या बाबतीत सहमत. ज्यांना हे जमेल त्यांनी ते जरूर करावे. - (अनाव'ध्यानी') सोकाजी

Meditation is nothing but continuously thinking about something !
असंच एकदा आमचं झालं होतं. एका देवतेनं मनाला भुरळं घातली अन आम्ही असल्या गाढ 'ध्यानात' गेलो की दुसरा विचारच नाही. मग डोळे उघडे असोत नाहीतर बंद. पण साला आमच्या नाडीत लिहलं नव्हतं ना.. "इफ इट्स नॉट इन नाडी क्या करेगा अनाडी!!"

In reply to by Nile

वाचली. एरवी तिला बिचारी म्हणायची वेळ आली असती. ;) नायल्या, तिची नाडीपट्टी मिळते का पहा रे जरा...

In reply to by श्रावण मोडक

अहो तिची नाडी* जर हातात आली असती तर पुढचे प्रश्नच उद्धभवले नसते हो!! (चावट लोकांकरता डिस्क्लेमरः ही नाडी म्हणजे तुमच्या मनातली नाडी नव्हे!!)

In reply to by Nile

अहो तिची नाडी* जर हातात आली असती तर पुढचे प्रश्नच उद्धभवले नसते हो!! (चावट लोकांकरता डिस्क्लेमरः ही नाडी म्हणजे तुमच्या मनातली नाडी नव्हे!!) :bigsmile:

येथुन पुढे आळंदीला शिबीरस्थळी जाण्याकरता मिपाकर परा व धमु यांचे मोलाचे मार्गर्शन लाभले! यानंतर. परा आणि धमुच्या जीवनात मात्र अमुलाग्र बदल घडला =)) कितीही कठीण परिस्थिती आली तरी मनाला शांत ठेवायचे हे परा याच काळात शिकला म्हणे =))

ये धत्ताड! ये धत्ताड ये धत्ताड! ये धत्ताड! शतकी धाग्याबद्दल मिपा भगिनी स्वप्ना_तुषार यांचे अभिनंदन! ये धत्ताड! ये धत्ताड ये धत्ताड! ये धत्ताड! शतकी धाग्याबद्दल मिपा भगिनी स्वप्ना_तुषार यांचे अभिनंदन! ये धत्ताड! ये धत्ताड ये धत्ताड! ये धत्ताड! शतकी धाग्याबद्दल मिपा भगिनी स्वप्ना_तुषार यांचे अभिनंदन! ये धत्ताड! ये धत्ताड ये धत्ताड! ये धत्ताड! शतकी धाग्याबद्दल मिपा भगिनी स्वप्ना_तुषार यांचे अभिनंदन! ये धत्ताड! ये धत्ताड ये धत्ताड! ये धत्ताड! शतकी धाग्याबद्दल मिपा भगिनी स्वप्ना_तुषार यांचे अभिनंदन!

ही मन निर्विकार करण्याची साधना(तपश्चर्या) आहे. तीची सुरवात आपल्या विचारांकडे तटस्थपणे( साक्षीभावाने) पाहुनच करावी लागते. सुरवातीला फार अवघड जाते. पण दृढनिश्चय करुन ती चालु ठेवल्यास जमते असा स्वानुभव आहे. मी एक १० दिवशीय आणी एक ३ दिवसांचे शिबीर करुन आलो आहे. सुरवातीला रोज सकाळ-संध्याकाळी १-१ तास साधना करत होतो. आता तर दिवसरात्र ही प्रतिक्रिया न देण्याची प्रोसेस चालु असते. अजुनही मन भटकतेच. सुरवातीला मनाला पकडुन परत आणावे लागत असे पण आता ते काम आपोआप होते. मन भटकते भटकते आनी अचानक पुन्हा शांत होउन विचारांचे तटस्थपणे निरीक्षण करायला लागते. पण आता त्याचे लाभ निश्चीतच मिळताहेत. एकाग्रता वाढते. ईतकी मनशांती मीतरी पुर्वी कधी अनुभवली नव्ह्ती. मी रोजची संध्याकाळ बारमधे घालवायचो गेली १० वर्शे. त्याआधी रोज नाही तरी जमेल तेव्हा पिणे चालुच होते. पण २० जानेवारी २०११ ते ३० जानेवारी २०११ पहीले शिबीर केले आनी त्यादिवसापासुन आजपर्यंत मला बारमधे जाण्याची (एकुनच पिण्याची) गरज पडलेली नाही. आनी मी माझ्या आयुष्यात तरी या वाटेला परत जाणार नाही. हा माझा अनुभव मी शेअर करतोय. त्यासाठी कुणी शिबीराला जाउ नये. आणखी बरेच काही सांगता येईल पण टायपींगचा कंटाळा असल्याने येथेच थांबतो. मी मुंबईला गिरगावात असतो. कुणाला जास्त चर्चा कारायची असल्यास प्रत्यक्ष भेटावे. ज्याला खरोखर या विषयाची आवड असेल त्यांनीच. बाकी कोणाशीही वादविवाद करण्यात मला स्वारश्य नाही.

In reply to by विलासराव

हे १० दिवस केवळ स्वतःसोबत रहणे हादेखिल एक वेगळा आणि सुंदर अनुभव आहे. स्वतःची नीट ओळख तर होतेच, पण Harmony म्हणजे काय, याचा अनुभव येतो.

In reply to by विलासराव

विलासराव छान आहे तुमचा अनुभव. मी ११ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०१० इगतपुरी इथे विपश्यना केली आहे. परत १० ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०११ या इगतपुर्री या केंद्रात होणार्या शिबिरासाठी नावनोंद्णी केली आहे. बाकी अप्पांनी अर्धवट माहीतीच्या आधारावर टाकलेली पिंक परत पुसली त्याबद्दल अभिनंदन. भावश्या.

चांगला अनुभव... इतर नेहमीच्या चिल्लर व थिल्लर प्रतिसादांपेक्षा खूपच चांगला.... निदान काही सवयी सुटायला मदत झाली ही सुध्दा अचिव्ह्मेंटच नाही का ??? इंटरनेटस्नेही इगतपुरीचे केन्द्र जास्त चांगले असावे. परवाच इगतपुरीचे दर्शन घडले. पावसाळ्यात खंडाळ्याच्या बरोबरीचे अद्भुत वातावरण असते तिथे. शिवाय डोंगररानातील शांत गाव. व शुध्द हवा.

हा लेख इथे मिसळपाववर टाकून मी घोड चूक केली आहे हे लक्षात आले. यापुढे असे होणार नाही. कारण **पुढे वाचली गीता...सारखा हा प्रकार आहे.

In reply to by गवि

सहमत. कोणाला एखादी कृती चूकीची वाटते, अथवा त्यांनी केलेल्या कृतीचा पश्चाताप होत असेल तर याचा अर्थ असा काढण्यात येऊ नये की मिपाकर **व आहेत.

In reply to by स्वप्ना_तुषार

हा लेख इथे मिसळपाववर टाकून मी घोड चूक केली आहे हे लक्षात आले.
काय सांगता ? आणि तरीसुद्धा वर तुम्ही पुन्हा प्रतिसाद टाकताय ?
यापुढे असे होणार नाही. कारण **पुढे वाचली गीता...सारखा हा प्रकार आहे.
आम्ही ** असू हो पण तुम्ही गीता वाचताय असे तुम्हाला कोणी सांगीतले ? मिपाचे शिष्ठमंडळ काय आमंत्रण घेउन आले होते का काय तुम्हाला लेखनासाठी ? स्वतःचा ब्लॉग उघडावा आणि तिथे स्वांतसुखाय लिहावे की. असो नव्या नवलाईचे कौतुक करणारे आणि त्यांच्या डोक्यावर छत्र चामरे धरणारे ह्या लाथा सुद्धा गोड मानुन घेतीलच. बाकी एक मिपाकर म्हणुन तुमचा प्रतिसाद हा तद्दन आकसातुन आणि 'नाचता येईना..' ह्या प्रकारातुन आलेला आहे असे मत नोंदवतो. बाकी चालु द्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ पराशी सहमत
"हा लेख इथे मिसळपाववर टाकून मी घोड चूक केली आहे हे लक्षात आले." ध्यान करून एवढे तटस्थ होता येतं हे पाहून आनंद वाटला असो..
"यापुढे असे होणार नाही." धन्यवाद. केलेला नियम पाळा म्हणजे झालं. गप्ना हुशार

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे अरे मिपाकरांनो भडकू नका. त्यांनी मिपाकरांना गाढव म्हटले असले तरी स्वतः 'घोड'चूक केली हे ही कबूल केले आहे ना. झाली फिटांफिट.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा सोबत १००% सहमत. काय पण दिवस आलेत :P वरची प्रतिक्रिया फारच उर्मट आहे. मिपाकर जर *** आहेत हे माहितीच होतं तर सो कॉल्ड गीता वाचायलाच कोणी सांगितली होती?

In reply to by स्वप्ना_तुषार

नविन आयडींना फक्त प्रोत्साहनपर प्रतिसाद देण्याच्या व्यवस्थापनाच्या जाचामूळे गप्प रहायचे ठरवले आहे.