भन्नाट ३
भन्नाट १
भन्नाट २
"गफुर चरसीचा अड्डा?" मंदारने फिरोजकडे पाहतं विचारले आणि त्याक्षणी फिरोजने दाराकडे बघून स्मित केले. दोघांची विचार करण्याची पद्धत अगदी सहज जुळून गेली. इन्स्पेक्टर लाल तिघांकडे आळी पाळीने पाहतं असतानाच मंदारने फेयर डिलच्या मागच्या सिटवर झेप घेतली आणि फिरोजने क्षणात गाडीला वेग दिला.
आज कोणा कोणाच्या कबरी खणल्या जाणार ह्याची चिंता करत लालने जीपकडे मोर्चा वळवला.
अंधाराला सुसाट वेगाने कापत फिरोजने गाडीला वेग दिला, गाडीच्या वेगा बरोबरच तिघांच्या डोक्यातली विचारचक्रे देखील दुप्पट वेगाने धावत होती. सामच्या तरुणींच्या चिंतेने दारा ग्रासला होता तर मंदारला रमीची चिंता सतावत होती. फिरोज मात्र गफुरच्या अड्ड्यावर काय बंदोबस्त असेल त्या विचारात गुंतला होता.
गफुर चरसी असले सडकछाप नाव असले तरी गफुर काही लहान सहान माणूस नव्हता. वयाच्या १२ व्या वर्षी मुंबईत पळून आलेल्या गफुरने बूट पॉलिश करण्यापासून ते चरसाची ने-आण करण्यापर्यंत सगळे धंदे करून झालेले होते. वयाच्या १४ व्या वर्षी मुश्ताक साठी रोज ५ किलो चरसाची लोकलमधून ने आण करायचा पठ्ठ्या. मुश्ताक पकडला गेल्यावर एक वर्षासाठी भडवेगीरी करण्यापर्यंत देखील गफुरची मजल गेली. ह्याच व्यवसायात त्याची आणि सुगंधा लॉजच्या मॅनेजरची ओळख झाली. ह्या मॅनेजरचे खरे नाव होते रतनसींग पण त्याचे एकूण शौक पाहून दोस्त मंडळी त्याला नवाबच म्हणायची. राहणीमान अगदी नवाबी, राजस्थानी असूनही सुरमा वगैरे लावून जुन्या बाजारातली शेरवाणी वापरणारा हा माणूस दिसायचा पण नवाबा सारखाच. ह्याच नवाबने एक दिवशी गफुरचे आयुष्य पालटून टाकले.
एका पावसाळी रात्री गफुरच्या झोपडीवर दणदणा थापा पडल्या. ह्या व्यवसायात आल्यापासून पोलिसांची भिती अशी उरलीच नव्हती, मग आता कोण तडमडलंय काय माहीत अशा वैतागत गफुरने दार उघडले तर समोर पाण्यात निथळत नवाब उभा. काही महिन्यातच त्यांची एकदम गहरी दोस्ती झाली होती पण गफुरच्या घरी मात्र नवाब पहिल्यांदाच आला होता. गफुरला जवळजवळ दरवाज्यातून बाजूला ढकलतच तो आत शिरला. हातातली बॅग पलंगाखाली सारून त्याने पहिल्यांदा दरवाजा बंद केला.
"गफुर दोस्त आज मुझे बचा ले, जिंदगीभर तेरा अहसानमंद रहुंगा."
कोणा शेठला ३ लाख रुपयाचा चुना लावून नवाब त्याचे दागिने आणि थोडे फार पैसे घेऊन फरार झाला होता, तो थेट गफुरकडे येऊन थांबला होता. गफुरने जुन्या धंद्यातली थोडीफार ओळख वापरून नवाबला मुंबईच्या बाहेर काढले आणि थेट राजस्थानला रवाना केले. सगळे शांत होईपर्यंत माल सांभाळायची जबाबदारी देखील घेतली. नवाबचे नशीब खरेच चांगले असावे किंवा त्या शेठचा लुटला गेलेले माल काळ्या पैशातला असावा, कारण त्याने पोलिसात तक्रारच नोंदवली नाही. शेठचे भाड्याचे गुंड मात्र काही दिवस नवाबला शोधत मुंबई पालथी घालत होते. सगळे शांत झाल्याची खात्री होताच तिसर्याच महिन्यात नवाब मुंबईला हजर झाला. मैत्रीला जागलेल्या गफुरची आठवण ठेवून त्याने सरळ एक लाख रुपये उचलून गफुरच्या हातावर ठेवले. मुश्ताक पकडला गेल्यावर चारी दिशांना पांगलेली माणसेच मोठ्या सुज्ञपणे गफुरने गोळा केली आणि नव्याने धंदा सुरू केला, मात्र आता ह्या नव्या धंद्याचा तो मालक होता.
ह्या अशा गफुरच्या अड्ड्यावर होणारा प्रतिकार नक्कीच साधा नसणार ह्याची फिरोजला खात्रीच वाटत होती. भन्नाट वेगात त्याची रेसर इलियास नॉनव्हेजच्या बाहेर उभी राहिली आणि आजूबाजूच्या शेकडो नजरा त्यांच्याकडे वळल्या. ह्याच हॉटेलच्या बेसमेंटला गफुरचा अड्डा होता. फिरोजची कार बघूनच अनेक जणांनी त्या गल्लीतून काढता पाय घेतला होता, जे थोडे फार टोणगे उरले होते त्यांनी मंदारला कार मधून बाहेर पडताना बघून मागचा रस्ता पकडला होता. मंदार आणि फिरोज एकत्र ? आज एकतर गफुरची शंभरी भरलीये किंवा ह्या संपूर्ण एरियाची तरी.
फिरोजने सरळ इलियास मध्ये घुसून खाली जाणारा जिना पकडला. "अरे साब अरे साब नीचे सब फुल है" म्हणत एक दणकट वेटरने फिरोजला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र दाराने सरळ त्याच्या मानगुटीलाच हात घालून एखाद्या मांजराला उचलून बाजूला करावे तसे बाजूला केले. दणदणा पायर्या वाजवत तिघेही तळघरात दाखल झाले. तळघरात २ कोपर्यात २ ट्यूब लावून बर्यापैकी उजेडाची व्यवस्था केलेली असली तरी सर्व तळघर अक्षरशः: धुराने भरून गेलेले होते. रस्त्यात पडलेली, उभी असलेली माणसे जाणवत होती हेच काय ते उजेडाचे आभार. वेळ घालवून काहीच उपयोग न्हवता, सुरुवात करायलाच हवी होती. फिरोजने सरळ समोर आलेल्या एकाला उचलून कडेला भिरकावून दिले, तोवर मंदारने काउंटरकडे धाव घेतली होती. पळून जाण्याच्या एकमेव रस्त्यावर दारा पहाडासारखा ठाम उभा होता. 'ग फु र' हे तीन शब्द आणि तो त्या माणसाकडे चित्त्यासारखा झेपावणार होता.
फिरोजच्या बैदुलाने कामाला सुरुवात केली आणि फुटलेली नाकं आणि सुजलेली तोंडे घेऊन गर्दी कडेला पांगायला लागली. 'गफुर..' मंदारची आरोळी तळघरात घुमली आणि काही वेळातच काउंटरच्या मागचे दार उघडून एक व्यक्ती बाहेर आली. "माझ्या गिर्हाईकांना जाऊ दे फिरोज ! त्यांचे ह्याच्याशी काही घेणे देणे नाही" ती व्यक्ती ठामपणे म्हणाली. आता दाराच्या जोडीला फिरोज उभा राहिला आणि जाणार्या प्रत्येक चेहर्याची ओळख करून घेतच तो त्यांना बाहेर सोडायला लागला. एकदा पाहिलेला चेहरा फिरोज कधीच विसरत नसे आणि गफुरच्या दुर्दैवाने त्याला फिरोजने पाहिलेले होते.
काही क्षणातच तळघर रिकामे झाले आणि अंधारातून बोलणारी व्यक्ती उजेडात आली. तो गफुरच होता ह्यात शंका नव्हती.
"अरे वा ! आज फिरोजच्या जोडीला मंदार इथे आलाय म्हणजे आमची गणना टॉपच्या गुन्हेगारात व्हायला लागली तर. पण सध्यातरी मी किंवा माझ्या कुठल्याच माणसाने कायदा मोडलेला नाही, मग तुम्ही इथे कसे ? माझ्या माणसाला शोधताय का माझ्याकडे येणार्या कोणाला?"
"गफुर मला नवाब हवाय !" गफुरच्या डोळ्यात डोळे घालत मंदार म्हणाला. नजरेत एक चुकीची हालचाल आणि मंदारचा पंच त्याचे चार दात तरी नक्कीच पाडणारं होता.
"नवाब... कोण नवाब ?" गफुर आपली मेंदी लावलेली दाढी कुरवाळत म्हणाला आणि क्षणात फिरोजचा हात हालला. फिरोजच्या बैदुलाने गफुरच्या नाकाचा पार पिंगपाँगबॉल करून टाकला होता. गफुरची किंचाळी हवेत घुमली आणि मागच्या दारातून ६/७ गुंड हजर झाले. त्याचवेळी जिन्यावरूनही पावलांचे आवाज ऐकू यायला लागले. पण जोवर दारा बुलंद जिन्याजवळ हजर होता तोवर तरी त्यांची फिकीर करायची गरज नव्हती.
गफुरच्या हुकुमाची वाट न पाहता एकदम सहाजण मंदार आणि फिरोजवर झेपावले.. पण हि दोन भुतं काय करू शकतात ह्याची त्यांना कल्पना नव्हती. अंगावर धावून येणार्या एकाला मंदारने सरळ दोन्ही हात धरून आपल्याकडेच ओढून घेतले, मंदारच्या डोक्याची आणि त्याच्या नाकाची प्रेमळ भेट झाली आणि निदान तासाभरासाठी तरी तो डोळ्यापुढे अंधार घेऊन आडवा झाला. इकडे फिरोजच्या बैदुलाने एकाचे पुढचे दोन दात जमिनीला अर्पण केले होते तर एकाच्या नाकाचा आणि गालांचा आकार इडली बरोबर स्पर्धा करायला लागला होता. फिरोज आणि मंदारच्या तावडीत सापडलेल्यांची अवस्था तरी बरी म्हणावे अशी स्थिती मागच्या जिन्यावरून आलेल्यांची झाली होती. त्यांच्यातल्या एकाला दाराने सरळ दोन पाय धरून उचलला होता आणि त्यालाच गोल गोल फिरवून सगळ्याचा चोपत होता. शेवटी कंटाळा आल्यावर तर त्याने सरळ सापडला माणूस की उचल आणि फेक भिंतीवर असाच सपाटा लावला होता. शेवटचा माणूस भिंतीवर फेकून दारा, मंदार आणि फिरोजकडे आला तोवर आजूबाजुची माकडे संपवून ते गफुरच्या समोर पाय रोवून उभे होते.
गफुरच्या अड्ड्याची राखरांगोळी करून तिघेही बाहेर आले तेव्हा रस्ता सुनसान पडला होता, मात्र त्याकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसत कुठे होती. इतर दोघे बसताच फिरोजने कारला भन्नाट वेग दिला आणि गाडी कोळीवाड्याकडे सुसाट निघाली. कुठल्याही परिस्थितीत लवकरात कोळीवाड्यांतला रघुवीरकडे नवाबला गाठायचे होते. फिरोजची कार कोळीवाड्यात घुसली आणि चकाट्या पिटणारी टाळकी सावध झाली. त्यातली बरीच टाळकी फिरोजला चांगलाच ओळखून होती. एका टोळक्यापाशी पत्ता विचारायला फिरोजने कार थांबवली. "मंदार साहेब आज इकडे कुठे ? ओळखले ना मला ? मी हरी, कुलाबा मर्डर केसवाला?" एक जाडगेला माणूस सगळ्यांना मागे सारत पुढे झाला. मंदारने उगाचच चेहर्यावर ओळखीचे भाव आणले आणि त्याला रघुवीरचा पत्ता विचारला. "रघुवीर तर दुपारीच वस्ती सोडून गेला, दोन बॅगा होत्या हातात त्याच्या. बहिणींना कोल्हापुराला न्यायचे म्हणत होता." पुढच्याच क्षणी फिरोजने कारला टर्न मारला आणि गाडी स्टेशनकडे पळवली.
"फिरोज एखादा 'पी. सी. ओ.' दिसला तर बघ, दिनेशला फोन लाव आणि त्याला ताबडतोब माणसांना स्टेशन कव्हर करायला सांग." नाक्याच्या मेडिकलमध्ये बूथ दिसला आणि करकरत फिरोजने कारला ब्रेक दिला.
"हॅलो मी फिरोज बोलतोय, दिनेश आहे?"
"देतो साहेब...." काही क्षणातच दिनेशचा आवाज फोनमध्ये घुमला.
"फिरोज कुठे आहात तुम्ही ? आणि मंदार तुमच्या बरोबर आहे?'
"हो हो... अरे आधी मी काय सांगतोय ते ऐक, ताबडतोब स्टेशन कव्हर करा, रघुवीर नावाचा माणूस ताब्यात घ्यायचाय."
"त्याची गरज नाही फिरोज, आता मी काय सांगतोय ते ऐक. गफुरच्या अड्ड्या शेजारच्या लॉजमध्ये गफुर, रघुवीराची प्रेते पोलिसांना आताचं सापडली आहेत आणि त्याच्या जोडीला २ मुली देखील आहेत. चारही जणांना गोळ्या घातल्यायत आणि संशयित म्हणून लॉजच्या मॅनेजरने तुम्हा तिघांची नावे तक्रारीत नोंदवली आहे...."
(क्रमशः)
वाचने
20875
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
वाचत आहे......
भन्नाट ...
In reply to भन्नाट ... by छोटा डॉन
+१
In reply to +१ by टारझन
+२
वाचतेय!
आह्हा!! भन्नाटच. आणि तो
लै भारी !!! पुढचे भाग पटापट
लै भारी !!! पुढचे भाग पटापट
खरंच भन्नाट !
चांगले लिखाण झालेय. पण पहिले
अतिशय जबरी .. एकदम भन्नाट ..
झकास.. भन्नाट आहे
काही काही संदर्भ टिपिकल सुशि स्टाईल...
In reply to काही काही संदर्भ टिपिकल सुशि स्टाईल... by असुर
यस्स..
In reply to काही काही संदर्भ टिपिकल सुशि स्टाईल... by असुर
अगदी अगदी!
In reply to काही काही संदर्भ टिपिकल सुशि स्टाईल... by असुर
सुपर्ब बॉस...
In reply to काही काही संदर्भ टिपिकल सुशि स्टाईल... by असुर
पुढचे भाग लवकर लिवा राव !! हा
क्रमशः
ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च
झक्क्कास
हाही भाग सुंदर..
In reply to हाही भाग सुंदर.. by मस्त कलंदर
असेच
पऱ्या.. एकदम
भयानक वेग... पुभालटा.
In reply to भयानक वेग... पुभालटा. by बिपिन कार्यकर्ते
+१
झकास!
झ..का..स...!! पुढच्या भागाची
लय झ्याक लय भयाण लय अफलातून लय तूफान............. :)
१००००००००००००००००००+
In reply to १००००००००००००००००००+ by आदिजोशी
+१
In reply to १००००००००००००००००००+ by आदिजोशी
आदित्य भौ शी १००% सहमत
शैली सुरेख
In reply to शैली सुरेख by वाचक
लिखाण नक्कीच खिळवून ठेवणारं आहे..
In reply to लिखाण नक्कीच खिळवून ठेवणारं आहे.. by बहुगुणी
आँ?
In reply to शैली सुरेख by वाचक
@ वाचक...
In reply to @ वाचक... by चिगो
बरोबर.. पुस्तकाचे नाव
In reply to बरोबर.. पुस्तकाचे नाव by सुहास..
फिरोज आणि अमर एकत्र
In reply to @ वाचक... by चिगो
मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज
In reply to मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज by परिकथेतील राजकुमार
अहो परावळकर भौ...
In reply to अहो परावळकर भौ... by चिगो
नाव नाय आठवत, पण गोष्ट
In reply to नाव नाय आठवत, पण गोष्ट by असुर
"अ कॉफिन फॉर यू"
In reply to नाव नाय आठवत, पण गोष्ट by असुर
अरे असुरभौ...
In reply to शैली सुरेख by वाचक
माझ्या अंधुक आठवणींनुसार
मस्त बे पर्या!!!! भाड्या
मस्त
आवडलं आहे!
लेखन एकदम ढिशुम ढिशुम आहे
खरंच भन्नाट
छान आहे!
हा भाग सर्वात जास्त आवडला.
सु शी काय करतात हल्ली?
In reply to सु शी काय करतात हल्ली? by स्पा
स्वर्गात!
ह्म्म्म
भारी!
सु शि ग्रेत
गुड गोइंग