Skip to main content

"डान्राव" व काही "मुक्ताफळे"........

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 13/10/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे. तेव्हा आपल्याला माहिती असलेली, नसलेली, मुक्ताफळं लिहून जरूर भर घालावी. - डान्रावांच्या खरडी इतक्या मोठ्या असतात की एकदा त्यांनी लिहायला घेतलं तेव्हा कॉंप्युटरमधले १ आणि ० च संपले. - एकदा डान्रावांनी 'तुमच्या प्रजातीचं रक्षण कसं करावं याबद्दल मी एक मोठा लेख लिहिणार आहे, काळजी करू नका' असा एक वायदा केला होता - डायनॉसॉरना. - तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो. - तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो. - फक्त डान्रावांना मोकळेपणाने विचारांची रूपरेखा मांडता यावेत म्हणून मिपाच्या सर्व्हरचं अपग्रेडेशन झालं. - डान्रावांचे धागे वाचून आपल्याला डान्रावांच्याच आधीच्या धाग्यांची आठवण येते. - डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात. - पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. तेव्हापासून त्या शहरात कुठच्या पाट्या लिहायच्या याचे सर्वाधिकार डान्रावांना मिळालेले आहेत. - पंजाब आणि राजस्थान यांच्या पाट्या देखील लिहू अशी धमकी दिल्याबरोबर बीसीसीआयने त्या टीम्स रद्द केल्या. दुर्दैवाने बीसीसीआयला डान्रावांच्या वायद्यांविषयी माहिती नव्हती....नाहीतर कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती. - तुम्ही वादविवादातात आपली बाजू कमकुवत असेल तर शेपूट घालता; इतरांना बोलण्याची संधी देण्यासाठीच डान्राव 'शेपूट घातले आहे' असा संक्षिप्त प्रतिसाद देतात. - डान्रावांच्या बटांना इतका झगझगीत रंग लावलेला आहे की त्यांवरून परावर्तित होणारे किरण सूर्याचं तापमान वाढवतात. - रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23756
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by Nile

दहा तोंडे असलेले मानव की दानव फक्त तुमच्या रामायणात
दहा तोंडी मानव/दानव रामायणापेक्षा मराठी संकेतस्थळांवर मुबलक आढळतात.

१.डॉन्राव जेवल्यावर 'केळीच्या पानाचा' विडा खातात २.त्यांच्यासाठी विडा बनवण्यात पानवाल्याच्या तीन पिढ्या पान लावता लावता 'कामी' आल्या ३.त्यांच्या विड्यात 'सुपारी' नाही , अख्खा 'नारळ' घालतात.

डॉन्राव कशाला फोटूची काळजी करताय तुमचा फोटू 'मावेल' अस्सा क्यामेराच बनाला नाहीये. म्हणजे मेगाबाईट्,गिगाबईट्,टेराबईटींपेक्षा , आपलीच 'बाईट' लई 'मोठ्ठी' असते.... कसं...;)

डानरावांवर हीन दर्जाची चिखलफेक केल्याबद्दल मिपाकरांचा तीव्र निषेध. (आम्ही चांगल्या दर्जाची चिखलफेक केली होती हो) ज्याना डानरावांचा फोटो बघायचा आहे त्यानी मिपावर शोध घ्यावा कट्ट्याच्या धाग्यांवर त्यांचे फोटो मिळतील. .

डान्राव दारु पेग ने नाही टँकर ने पितात! ३०,००० लिटर स्मॉल पेग, ६०,००० लिटर लार्ज पेग, १,८०,००० लिटर म्हणजे एक क्कॉर्टर असते त्यांची! (डॉन्रावां बरोबर आयुष्यात एकदा तरी बसण्याची मनिषा असलेला) इंट्या.

या धाग्यावरील सर्व प्रतिसाद आणि सर्व उप प्रतिसाद ही डॉनरावांनीच टंकले आहेत. दिसणारे आय डी वेगळे आहेत ही पण त्यांचीच कला आहे. :) - एक उपरा संपादक

सर्व चराचरात डान्राव , सर्व व्यापी विश्वात डान्राव, अणूत डान्राव, रेणूत डान्राव, न्युट्रॉन्स मध्ये डान्राव, प्रॉटॉन्स मध्ये डान्राव, ईलेक्ट्रॉन्स मध्ये डान्राव, ब्लॅक होल मध्ये डान्राव, व्हाईट होल मध्ये डान्राव, जिकडे अजुन कुठ्ले होल (म्हणजे पिवळे, लाल, नारंगी) तिकडे डान्राव, hydrocolloid मध्ये डान्राव मिपा डान्राव, बकि इतर संकेत स्थळ डान्राव, त्यांचे प्रतिसाद डान्राव, windows डान्राव C डान्राव C++ डान्राव drupal डान्राव hard disk डान्राव RAM डान्राव CPU डान्राव CPU FAN डान्राव डान्राव डान्राव डान्राव डान्राव ब्बास अजून काही ?