नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे. तेव्हा आपल्याला माहिती असलेली, नसलेली, मुक्ताफळं लिहून जरूर भर घालावी.
- डान्रावांच्या खरडी इतक्या मोठ्या असतात की एकदा त्यांनी लिहायला घेतलं तेव्हा कॉंप्युटरमधले १ आणि ० च संपले.
- एकदा डान्रावांनी 'तुमच्या प्रजातीचं रक्षण कसं करावं याबद्दल मी एक मोठा लेख लिहिणार आहे, काळजी करू नका' असा एक वायदा केला होता - डायनॉसॉरना.
- तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो.
- तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो.
- फक्त डान्रावांना मोकळेपणाने विचारांची रूपरेखा मांडता यावेत म्हणून मिपाच्या सर्व्हरचं अपग्रेडेशन झालं.
- डान्रावांचे धागे वाचून आपल्याला डान्रावांच्याच आधीच्या धाग्यांची आठवण येते.
- डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात.
- पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. तेव्हापासून त्या शहरात कुठच्या पाट्या लिहायच्या याचे सर्वाधिकार डान्रावांना मिळालेले आहेत.
- पंजाब आणि राजस्थान यांच्या पाट्या देखील लिहू अशी धमकी दिल्याबरोबर बीसीसीआयने त्या टीम्स रद्द केल्या. दुर्दैवाने बीसीसीआयला डान्रावांच्या वायद्यांविषयी माहिती नव्हती....नाहीतर कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती.
- तुम्ही वादविवादातात आपली बाजू कमकुवत असेल तर शेपूट घालता; इतरांना बोलण्याची संधी देण्यासाठीच डान्राव 'शेपूट घातले आहे' असा संक्षिप्त प्रतिसाद देतात.
- डान्रावांच्या बटांना इतका झगझगीत रंग लावलेला आहे की त्यांवरून परावर्तित होणारे किरण सूर्याचं तापमान वाढवतात.
- रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत.
वाचने
23756
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेहेहे!
In reply to खुर्चीवरचं हो. ते दहा तोंडे by Nile
प्र का टा
फारच मजा आली
हा धागा खरडफळा आहे असे
जन्गलात ढाण्या वाघ... जालात
डॉन्राव आणि विड्याचे पान
डोन्रावांचा फोटु
डानरावांवर हीन दर्जाची
डान्राव दारु पेग ने नाही टँकर
एक माहिती
सर्व चराचरात डान्राव , सर्व