मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रॉब्लेम

गणपा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज लेक शाळेतुन जरा तडतडतच घरी आली. बायकोने विचारल 'काय झाल गं? एवढी वैतागली का आहेस?' लेक "तो यश सारखा मला 'आय लव्ह यु' म्हणतो." बायको पण दचकली (लेक यत्ता पहिलीत आहे.) पण सावरुन म्हणाली "नक्की काय करतो वर्गात, तुला त्रास गेतो का?" लेक "त्रास नाही देत. मदत करतो. कधी मी क्रेयॉन्स विसरले, पेन्सिल/इरेझर विसरले तर तो लगेच देतो. पण दुसर्‍या कुणाला माझ्या बाजुला बसु पण देत नाही." बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला. बायको : "आता मला सांग तो नेहमी मदत करतो तर तो तुला आवडत नाही का?" लेक : "अग पण तो केवडुसा आहे. माझ्या चिन पर्यंत पण येत नाही." बायको पुन्हा स्तब्ध.

वाचने 36290 वाचनखूण प्रतिक्रिया 101

In reply to by समंजस

धमाल मुलगा Mon, 10/04/2010 - 20:49
मे डे..मे डे.....कॉलिंग प्रभुबाबा....मे डे... मे डे प्रभुबाबा इट इज ओ ओ फोर इमर्जन्सी.....

प्रियाली Mon, 10/04/2010 - 20:05
आमच्या मित्रमंडळीत दोन कुटुंबांचे मुलगे एकाच वर्गात आहेत. सध्या वय ६ पण ही गोष्ट मागची असल्याने तेव्हा वय साडे ४-५. एकदा आम्ही एकत्र जमलो असताना या दोघांचे भांडण सुरू होते. "डू नॉट टॉक टू सॅरा!" "व्हाय इज शी योर गर्ल फ्रेंड?" "येस शी इज! आय लव्ह हर अँड आय विल नेव्हर लेट यू टॉक टू हर."

In reply to by प्रियाली

Nile Mon, 10/04/2010 - 23:21
छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो होते हे पाहुन स्वतःची दया येउ लागली आहे. वर्गातील मुलीने असे म्हणले (असते) तर आम्ही चार कोस दुर पळालो असतो. कुणा गाढवाने आम्हाला मुली बावळट असतात हा पाठ पढवला होता कोण जाणे. -यत्ता पहिलीत मुलींशी पट्ट्यांची मारामारी करणारा

In reply to by Nile

प्रियाली Mon, 10/04/2010 - 23:29
वर्गातील मुलीने असे म्हणले (असते) तर आम्ही चार कोस दुर पळालो असतो. कुणा गाढवाने आम्हाला मुली बावळट असतात हा पाठ पढवला होता कोण जाणे.
हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत. मुली नाहीत. मुली मुलखाच्या श्मार्ट असतात. ;) त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते. :)

In reply to by प्रियाली

Nile Mon, 10/04/2010 - 23:33
हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत. मुली नाहीत.
तसे नाही हो, वरील दोन ओळी आमच्या बावळपणाचा अंदाज येण्याकरता दिल्या आहेत. ;-) बाकी आमचा मागासलेपणा, आम्ही कधी तसे म्हणुन शकलो नाही यात आहे हे सांगावे का लागावे?
मुली मुलखाच्या श्मार्ट असतात.त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते.
काय सांगता? मग आम्हीच अपवाद होतो की काय? हाय रे नसीब! ;-)

In reply to by Nile

मुली मुलखाच्या श्मार्ट असतात.त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते.
एकदम सच्ची बात! निळ्या, उगाच नाही रे तुला येता जाता लोकं 'मोठा हो'च्या टपल्या मारत!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रामदास Tue, 10/05/2010 - 21:14
आपण जेव्हा वर्गातल्या मुलीवर लाईन मारत असतो तेव्या तिचा नवरा कुठ्तरी प्रमोशनची खटपट करत अस्तो आणि आपली होणारी बायको आठवीचा गृहपाठ करत असते असे काहीसे वाचल्याचे आठवते. पण ही ग्याप फारच कमी झालेली दिसत्ये आहे.

In reply to by Nile

फारच बावळट होतो आपण!.... माझ्या लेकीबाबत (इयत्ता ३ री) घडलेला किस्सा!.. दोन वेळा doorbell वाजली. दोन्ही वेळा दारात कोणीच नाही... जर्राशी साशंक मनाने दार बंद करायला गेले तर सहज पायात लक्ष गेले तर doormat वर एक चिट्ठी! ....बरं....लहान मुलाची करतूत असणार हे कळुन येत होत्...कारण तेच नेहमीचं...book मधल page फाडून बरेच fold घालून केलेली चिट्ठी! ..दोन सेकंदांसाठी ब्र्म्हांड आठवले होते....अरे देवा..त्यावेळी जी घालमेल झाली होती ना जिवाची...अजुन आठवते... माझ्या नशिबाने चिठ्ठीत आक्षेपार्ह काहिहि नव्हते.... floor वरच्या denis आणि Daniel नामक टवाळ बंधुनी तिला झालेल्या भांडणाबद्दल official written कट्टी केली होती! पण काय पोट्टी कुठून शिकुन येतात देव जाणे..! आपण लई बावळट होतो नाहि या वयात?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नाय तर काय? तशीच आहे.... बौद्धिक पातळीत फारसा फरक पडला नाही...! इत्क्या दिवसात कसं समजलं नाहि तुम्हाला? :)

रेवती Mon, 10/04/2010 - 20:06
तुमच्या वाढदिवसानंतर लेक मोठी झाल्याचा पुरावा लग्गेच मिळाला कि!;) आमचा मुलगाही त्याच्या मैत्रिणीला यत्ता दुसरीत असताना 'आय लव्ह यू' म्हणाला होता. थोड्याच दिवसात "ह्या! मी हे काय बोललो" असे झाले त्याला!

गणपा Mon, 10/04/2010 - 20:12
अजुन एक किसा. ती केजीत असताना आम्ही गमतीत विचारायचो की "तु मोठी होउन कोण होणार?" आई तिची रोल मॉडेल असल्याने. ती म्हणायची "आई होणार, टिचर होणार आणि खुप शिकणार" आम्ही म्हणालो जरा उलट्या क्रमाने जा म्हणजे मिळवली.

मस्तानी Mon, 10/04/2010 - 20:45
माझ्या मुलाच्या (वय वर्षे ६) वर्गातील एक (इथल्या, अमेरिकन) मुलीने त्यांच्या परिवारातील एका लग्न समारंभात तिच्या आईला सांगितलं होत की "मी याचं चर्च मध्ये ( माझ्या मुलाशी) लग्न करणार आहे !" तिच्या आईने मला इमेल लिहून कळवलं होत :)

ज्ञानेश... Mon, 10/04/2010 - 21:02
मुलगा: डॅड, देअर इज अ बॉय इन माय स्कूल, हू कीप्स कॉलिंग मी 'गे'.... डॅड(लालबुंद): देन गो अ‍ॅन्ड कीक हीज फ*** **.. (जाणकारांनी आपल्या आवडीचे शब्द भरावेत! ;)) मुलगा: बट डॅsssssड, ही इज सो क्यूsssssट !!!

In reply to by चतुरंग

धमाल मुलगा Mon, 10/04/2010 - 21:56
गपा की! :D :D :D च्यायला, मार्ल्बोरोचं काय घेऊन बसलात? मीच गळाठलो ना. :) >>(बिगजॉनी)रंगा =)) =)) =)) =)) आधी ही सही बंद करा राव. जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा ठ्या करुन फूटतो मी. :D

विसोबा खेचर Mon, 10/04/2010 - 21:22
गणपा, बुटक्या जावयाबद्दल अभिनंदन रे.. :) तात्या. -- बनी माळरानी राई ठायी ठायी केले स्नेही तुझ्या विना नव्हते कोणी आत अंतरात.. (येथे ऐका) आम्ही यालाच यमन म्हणतो..!

हा हा हा ... बिकाकडेपण असे किस्से आहेत म्हणे! पण मी तर इथेच अडकले.... "बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला." मला नाही ब्वॉ सांगता येणार पहिलीतल्या मुलांना असं काही!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवती Mon, 10/04/2010 - 22:39
मला नाही ब्वॉ सांगता येणार पहिलीतल्या मुलांना असं काही! थोडं थांबा हो बाईसाहेब! सगळं आपोआप येतयं. आपणही शिकतो......न शिकून सांगतोय कुणाला?;)

In reply to by रेवती

हो, तेही खरंच आहे म्हणा! पण मला तर शंका वाटत्ये, मी सगळं समजावून सांगायला लागले की तमाम आड्यंस झोपून जातो तसंच काही झालं तर ....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसा Mon, 10/04/2010 - 22:56
प्रश्न विचारायला लागली ना, की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत थांबतच नाहीत. मग आपल्याला झोप येते, नव्हे, लागते सुद्धा. पण "ऊठ ना ग! आधी सांग" चा हल्ला सुरूच रहातो!

In reply to by पैसा

सूड Tue, 10/05/2010 - 15:05
>>प्रश्न विचारायला लागली ना, की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत थांबतच नाहीत. वरील प्रश्नाशी सहमत. मला माझ्या मित्राने त्याच्या लहानपणचा सांगितलेला किस्सा आठवला. तो चौथ्या यत्तेत आणि त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा दोन वर्ष लहान. तो टिव्हीवर ऐकलेलं 'कुटं कुटं जायाचं हनिमुनला' हे गाणं सारखा गुणगुणायचा. एकदोनदा आईने ऐकलं मग, 'बाळा, दुसरं कोणतं तरी गाणं गा. सारखं सारखं हे काय गातोयस'. भाऊ: का या गाण्यात काय वाईट्टै ? आणि हो हनिमुन म्हणजे काय गं ममा ? ममा: भाऊ: सांग ना !! ममा: पपा सांगतील. पपा : ती म्हणजे ना, एक पिकनिक असते. माझा मित्रः असं नाहीच मुळी !! पिकनिक असते तर त्यात लाजण्यासारखं काय असतं ?? मी पाह्यलंय मामाच्या लग्नात मामीच्या मैत्रीणींनी तिला हनिमुनला कधी जाताय विचारलं तेव्हा सारखी लाजत होती ती. तुम्ही खरं काय ते सांगा. या आगाऊपणाचं उत्तर एक धम्मकलाडू होता.

In reply to by यशोधरा

सूड Tue, 10/05/2010 - 15:30
माझ्याइतका गुणी मुलगा नव्हता हों आमच्या शाळेत. एक मुलगी फार गप्पा मारायची म्हणून शाळेत बाईंनी तिला माझ्याशेजारी बसवलं जेणेकरून ती शांत बसेल, पण नंतर आम्ही दोघं इतक्या गप्पा मारायचो की बाईंना त्यांनी केलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करावा लागला.

In reply to by ऋषिकेश

धमाल मुलगा Mon, 10/04/2010 - 23:12
काय क्रूर मनुक्ष आहे हा ॠष्या! तिकडं गणप्या पडलाय चिंतेत आणि हा हसुन हसुन दमला म्हणे. छे छे छे! कलीयुग हों कलीयुग.

In reply to by धमाल मुलगा

ऋषिकेश Mon, 10/04/2010 - 23:41
धम्या, तु कारे टेंशन घेतोयस कलीयुगाचं? नुसता गणपा चिंतेत आहे म्हणावं तर प्रतिसाद बघुन जात्यात बरेच जण आहेतसं दिसतंय... का आता तु सुपात आहेस म्हणून .... ;)

Nile Mon, 10/04/2010 - 23:16
हा हा हा. वरिल किस्सा ऐकुन एव्हरीबडी लव्ह्स रेमंड मधील अ‍ॅली आपल्या बापाला, रेमंडला, सेक्स-मनुष्य जन्माला का येतो वगैरेंबद्दल प्रश्न विचारुन भांडावुन सोडते. ह्या एपिसोडची आठवण आली. अत्यंत धमाल एपिसोड आहे, घरातील तमाम 'मोठ्यांची' अ‍ॅलीचा प्रश्न तारांबळ उडवुन देतो, बायबल चाळण्याप्सुन ते 'चर्च मधील फादर'ला फोन करणे, रेमंड एका प्रश्नाचा होमवर्क करुन जातो तर अ‍ॅली नविनच प्रश्न विचारुन त्याची दांडी गुल करते वगैरे प्रसंग बेस्ट आहेत. हे सगळं आठवुन, गणपाशेठ रेमंडच्या रोलमध्ये दिसु लागल्याने अजुन ह ह पु वा झाली.

In reply to by Nile

तू ते 'डिफरंट स्ट्रोक्स' बघायचास का रे? त्यात ते गॅरी कोलमन "व्हॉच्यू टॉकिन्बाऊट विलिस?" विचारायचा ते? त्यात तो छोटा त्याच्या (दत्तक) वडलांना मुलं कशी होतात हे विचारतो. वडील त्याला मुद्दामच जार्गन वापरत हे सगळं सांगतात. छोटू भलतंच काहीतरी (बहुदा पचनासंदर्भातले शब्द) समजतो आणि नंतर काही दिवसांत्/तासांत वडलांना म्हणतो, मुलं कशी होतात हे तुम्हाला माहितच नाही. आणि सोप्या शब्दांत वडलांना सगळं समजावतो.

प्राजु Mon, 10/04/2010 - 23:21
प्रश्न.. उत्तर.. पुन्हा प्रश्न.. पुन्हा उत्तर... पुन्हा प्रश्न... सारवासारव.. पुन्हा प्रश्न.. मी गप्प! असा.. खेळ माझा आणि लेकाचा चाललेला असतो.

In reply to by उपास

Nile Mon, 10/04/2010 - 23:45
तुम्ही म्हणालात म्हणुन शोध घेतला तर प्रश्न विचारते ती क्लीप सापडली, पुर्ण एपिसोड मिळाला तर धमाल येईल. (सद्ध्या टीबीएस वर पुन्हा मालिका सुरु आहे, ती पहातो आहे अर्थात.)

In reply to by Nile

गणपा Tue, 10/05/2010 - 01:40
नायल्या बील कॉस्बीच्या इपिसोडच्या दुव्या बद्दल धन्स. रेमंड चा एपिसोड पाहिला होता. मुलांच्या प्रश्नांना उत्तर देताना बरेच वेळा माझा रेमंड होतो. बर काही तरी थातुर मातुर उत्तर देउन भागत नाही. आपल्या उत्तरात नवा प्रश्न दडलेला नाहीना याची खात्री करुनच उत्तर द्याव लागत. नाही तर नविन प्रश्नांना उत्तर देताना तोंडाला फेस येतो.

In reply to by रेवती

मितान Tue, 10/05/2010 - 02:11
@ रेवती, अगदी हेच मनात आले :) गणपाभौ मस्त किस्सा ! मला एकदा शेजारच्या ४ वर्षाच्या मुलाने प्रपोज केले होते. का तर म्हणे ' तू मला स्कूटीवरून शाळेत सोडतेस म्हणून ! ' =))

वाटाड्या... Mon, 10/04/2010 - 23:55
तू असले प्रसंग आलेस की तू खुष्कीचा मार्ग पकडुन स्वयंपाक घर गाठतोस ना? खरं सांग? आणि बायकोला प्रसंगाला फेस करायला लावतोस ना? काळजी करु नकोस..मी पण तेच करतो... (वाटसरु) - वाटी..

टिउ Tue, 10/05/2010 - 02:25
आयला! बघावं तिथे चिनचा प्रश्न आहेच राव...काही खरं नाही आपल्या (आणि आपल्या पुढच्या) पिढीचं!

शिल्पा ब Tue, 10/05/2010 - 06:02
मी चौथीत असताना एका मुलाने माझ्या हातावर हात ठेवला होता ते आठवले ;) त्याकाळी एवढे बॉय फ्रेंड / गर्ल फ्रेंड वगैरे काही नव्हते पण कदाचित इंग्रजी शाळेत असावे...कारण क्लास मधल्या इंग्रजी शाळेतल्या मुलींचं कोणाकोणावरून चिडवणं चालायचं...एकदा क्लासच्या टीचरने " कीस " चा वेगळा अर्थ (इंग्रजी ) सांगितल्याने एका मुलीला चांगलंच झापलं होतं...तो काळच साधा होता...त्याकाळी हे नव्हतं (आणि असलं तरी आम्हाला अनुभव नाही.)

स्पंदना Tue, 10/05/2010 - 09:26
"आई, आई, वन बिग बॉय हेल्पड मी फॉर माय सायन्स प्रोजेक्ट बिकॉज ही लाइक्ड इट, बट ही इज नॉट माय बॉय्फ्रेंड!!!" आमची वय वर्षे १०. लेकाच तर विचारुच नका, अजुन माझ्याच प्रेमात आहे. गणपा भाउ फेस आला तरी फेस करावच लागत बर, वरील बाकिच्यांचे अनुभव सुद्धा मस्त.

विनायक प्रभू Tue, 10/05/2010 - 09:36
ही एक पासींग फेज असते. आधीही होती. आजही आहे. उद्या ही असेल. फक्त संख्या वाढते आहे. आणि आजुबाजुचे वातावरण ही संख्या वाढवेल. ह्या वर इलाज- पक्का इलाज काही ही नाही. त्यातल्या त्यात लाफ इट ऑर स्माइल इट ऑफ बरा. (१९६५ सालामधे हाचअनुभव घेतलेला विप्र)

गणप्या, तुझ्या भावना समजू शकतो. =)) आमचे किस्से (अदिती / रंगा फर्माईश) ०१. "बाबा, तो क्ष अगदीच बॅड आहे." "का?" "तो मला आय लाईक यु म्हणला" "बरं मग?" मी नेहमीसारखे अंडरप्ले करत. "तुम्हाला काही समजतं की नाही? असं फक्त नवरा बायकोला म्हणतो." मी ओव्हरप्ले झाल्याने बर्न आऊट. ०२. मोठी धाकटीबद्दल तक्रार करतीये "बाबा, ही बघा ना कशी करते आहे?" "काय झालं?" "स्वतःला हिरॉईन समजते की काय?" "अगं काय झालं पण?" "सारखी मला जवळ घेते आणि पप्पी घेते." हे म्हणजे धाकटी मोठीचे लाड / कौतुक इत्यादी करत होती. मोठीच्या डोक्यात भलतंच. "मग काय झालं?" "अहो पण तसं फक्त हिरोलाच करते ना हिरॉईन सिनेमात?" ०३. एका मित्राचा किस्सा. भडक दृष्य आली की मित्र चॅनेल बदलायचा. त्याचा मुलगा तेव्हा ५वीत. एकदा असाच काहीसा सीन आला म्हणून त्याने गडबडीत रिमोटचे बटण दाबले आणि दुसरे चॅनेल आणले, तर त्यावर पहिल्यापेक्षा जास्त गंमत जंमत चालू होती. "बाबा आता काय कराल?"

स्वछंदी-पाखरु Wed, 10/06/2010 - 00:06
असलाच एक किस्सा मध्यंतरी काही कामा निमित्त मायदेशी आलो होतो. सकाळी एका मीटींगला जायचे म्हणून दाढी करत होतो. माझ्या मोठ्या भ्राताश्रींची मुलगी सुखदा (वय ३ वर्ष ) माझ्या खोली मधे येउन मला दाढी करतांना बघत होती तेव्हाचा संवाद.. सुखदा: काका काय कलतोय? मला सांग ना??? मी: मी ... ना.... दाढी करतोय बेटा...... सुखदा: का???? काल लात्ली (रात्री )काकुला टोचली होती म्हनुन का?? हे ऐकून एकदम थक्क झालो... माझा चेहर्‍याला एका ठीकाणी सटकन ब्लेड लागली...... बायकोने मात्र "काल रात्री आपल्या खोलीच दार खरच उघड राहीलं होत की काय??? " ह्या प्रश्नाने दीवसभर डोकं खाल्लं......... स्वपा. आजपण एकटा असलो तरी झोपायच्या आधी दार बंद असल्याची खात्री घेणारा......

जागु Wed, 10/06/2010 - 10:48
गणपा मांडणी छान केलीत. सेम किस्सा माझ्या भाचीच्या बाबतीत झाला होता. ती २रीत आहे. तिने लगेच जाऊन मॅडमना सांगितले. मॅडमने तिथेच त्याला खानाखाली लावुन दिली. आणी ह्यापुढे अस न वागण्याची हमी घेतली. आता ह्या गोष्टीवर हसाव की रडाव तेच कळत नाही.

In reply to by जागु

गणपा Wed, 10/06/2010 - 13:00
मॅडमने तिथेच त्याला खानाखाली लावुन दिली.
अरेरे हे म्हणजे फारच झाल. इतक्या लहान मुलांनावर हात उगारु नये, त्यापेक्षा त्या शिक्षिकेने त्या मुलाला समजवुन सांगायला पाहिजे. माराने मुलं सुधारतात या मताचा मी नाही.

आमच्या एका मित्राचा ३ वर्षाचा भाचा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी त्याच्याकडे आला होता. दुपारी तो मित्र आणि मी त्याच्या संगणकावर थोडे काम केले आणि तो बंद करायला लागलो. भाचा :- मामा बंद नको करु. मला प्रिंसची गेम लावुन दे. मित्र :- अरे काय सारखे प्रिंस प्रिंस ? जा ताई बरोबर पत्ते वगैरे खेळ. भाचा :- तु मला गेम लावुन दिली नाहिस तर मी तुला बलविर पाशा म्हणेन. ======== ह्यावरुन एक विनोद आठवला. दुसरीतला बंड्या शाळेतुन धावत धावत घरी येतो. बंड्या :- बाबा, आज ना आम्हाला शिकवायला नविन मॅडम आल्यात. त्या असल्या चिकन्या आहेत ना. बाबा :- बंड्या गाढवा अरे असे बोलतात का? त्या तुझ्या आईसारख्या आहेत. बंड्या :- बाबा मला तुमचे हेच आवडत नाही ! जिथे तिथे स्वतःचे सेटिंग लावायला बघता.

पोट्टी फार आगोचर पणा करायला शिकतायत खरी! पण आजुबाजुला जे पाहतात तेच शिकतात! आपल्याकड्च्या अ‍ॅड्स पाहिल्यांनंतर त्यांचे प्रश्नार्थक झालेले चेहरे खुप त्रास देतात. काय उत्तर द्यावं कळत नाही... कारण त्यांनी ते विषय मित्र मैत्रिणीच्यात discuss केले तर जर्रा मोठे शाळकरी असतातच माहिती द्यायला... wide stone ची अ‍ॅड पाहुन माझा ३ वर्षाचा पुतण्याने मला विचारले होते " काकी....तो छान छान वास (deo) फुस्स (spray) करत असताना त्या आंटी ला अस का होत?" आता काकी काय सांगणार? अ‍ॅक्स ची लिफ्ट वाली अ‍ॅड पाहुनही तेच.... त्याचे कपडे कोणी विस्कटले....आणि नंतर च्या काकु अशा का दिसतात्?...हा प्रश्न लेकीच्या मैत्रीणीचा!

सुहास.. Wed, 10/06/2010 - 17:10
एका मित्राचा किस्सा. भडक दृष्य आली की मित्र चॅनेल बदलायचा. त्याचा मुलगा तेव्हा ५वीत. एकदा असाच काहीसा सीन आला म्हणून त्याने गडबडीत रिमोटचे बटण दाबले आणि दुसरे चॅनेल आणले, तर त्यावर पहिल्यापेक्षा जास्त गंमत जंमत चालू होती. "बाबा आता काय कराल?" >>> अगगगगय्य्य्य्य्य्य !!