✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रॉब्लेम

ग
गणपा यांनी
Mon, 10/04/2010 - 19:56  ·  लेख
लेख
आज लेक शाळेतुन जरा तडतडतच घरी आली. बायकोने विचारल 'काय झाल गं? एवढी वैतागली का आहेस?' लेक "तो यश सारखा मला 'आय लव्ह यु' म्हणतो." बायको पण दचकली (लेक यत्ता पहिलीत आहे.) पण सावरुन म्हणाली "नक्की काय करतो वर्गात, तुला त्रास गेतो का?" लेक "त्रास नाही देत. मदत करतो. कधी मी क्रेयॉन्स विसरले, पेन्सिल/इरेझर विसरले तर तो लगेच देतो. पण दुसर्‍या कुणाला माझ्या बाजुला बसु पण देत नाही." बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला. बायको : "आता मला सांग तो नेहमी मदत करतो तर तो तुला आवडत नाही का?" लेक : "अग पण तो केवडुसा आहे. माझ्या चिन पर्यंत पण येत नाही." बायको पुन्हा स्तब्ध.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36079 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

कलीयुग!!!!

ऋषिकेश
Mon, 10/04/2010 - 23:41 नवीन
धम्या, तु कारे टेंशन घेतोयस कलीयुगाचं? नुसता गणपा चिंतेत आहे म्हणावं तर प्रतिसाद बघुन जात्यात बरेच जण आहेतसं दिसतंय... का आता तु सुपात आहेस म्हणून .... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

जगदंब, जगदंब! ह्याला राक्षसी

धमाल मुलगा
Tue, 10/05/2010 - 15:37 नवीन
जगदंब, जगदंब! ह्याला राक्षसी आनंद म्हणतात बरं ऋ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

हा हा हा. वरिल किस्सा ऐकुन

Nile
Mon, 10/04/2010 - 23:16 नवीन
हा हा हा. वरिल किस्सा ऐकुन एव्हरीबडी लव्ह्स रेमंड मधील अ‍ॅली आपल्या बापाला, रेमंडला, सेक्स-मनुष्य जन्माला का येतो वगैरेंबद्दल प्रश्न विचारुन भांडावुन सोडते. ह्या एपिसोडची आठवण आली. अत्यंत धमाल एपिसोड आहे, घरातील तमाम 'मोठ्यांची' अ‍ॅलीचा प्रश्न तारांबळ उडवुन देतो, बायबल चाळण्याप्सुन ते 'चर्च मधील फादर'ला फोन करणे, रेमंड एका प्रश्नाचा होमवर्क करुन जातो तर अ‍ॅली नविनच प्रश्न विचारुन त्याची दांडी गुल करते वगैरे प्रसंग बेस्ट आहेत. हे सगळं आठवुन, गणपाशेठ रेमंडच्या रोलमध्ये दिसु लागल्याने अजुन ह ह पु वा झाली.
  • Log in or register to post comments

तू ते 'डिफरंट स्ट्रोक्स'

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/04/2010 - 23:29 नवीन
तू ते 'डिफरंट स्ट्रोक्स' बघायचास का रे? त्यात ते गॅरी कोलमन "व्हॉच्यू टॉकिन्बाऊट विलिस?" विचारायचा ते? त्यात तो छोटा त्याच्या (दत्तक) वडलांना मुलं कशी होतात हे विचारतो. वडील त्याला मुद्दामच जार्गन वापरत हे सगळं सांगतात. छोटू भलतंच काहीतरी (बहुदा पचनासंदर्भातले शब्द) समजतो आणि नंतर काही दिवसांत्/तासांत वडलांना म्हणतो, मुलं कशी होतात हे तुम्हाला माहितच नाही. आणि सोप्या शब्दांत वडलांना सगळं समजावतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नाही हे मी पहात नव्हतो. पण

Nile
Mon, 10/04/2010 - 23:38 नवीन
नाही हे मी पहात नव्हतो. पण बील कॉस्बीचा हा इपिसोड पाहिला नसाल तर जरुर पहा. http://www.youtube.com/watch?v=Dggt7PuoG00
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न.. उत्तर.. पुन्हा

प्राजु
Mon, 10/04/2010 - 23:21 नवीन
प्रश्न.. उत्तर.. पुन्हा प्रश्न.. पुन्हा उत्तर... पुन्हा प्रश्न... सारवासारव.. पुन्हा प्रश्न.. मी गप्प! असा.. खेळ माझा आणि लेकाचा चाललेला असतो.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी..

उपास
Mon, 10/04/2010 - 23:24 नवीन
मला ही तो भाग आठवला.. (शोधावा लागेल पण ) तू नळीवर आहे तो भाग..
  • Log in or register to post comments

तुम्ही म्हणालात म्हणुन शोध

Nile
Mon, 10/04/2010 - 23:45 नवीन
तुम्ही म्हणालात म्हणुन शोध घेतला तर प्रश्न विचारते ती क्लीप सापडली, पुर्ण एपिसोड मिळाला तर धमाल येईल. (सद्ध्या टीबीएस वर पुन्हा मालिका सुरु आहे, ती पहातो आहे अर्थात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

नायल्या बील कॉस्बीच्या

गणपा
Tue, 10/05/2010 - 01:40 नवीन
नायल्या बील कॉस्बीच्या इपिसोडच्या दुव्या बद्दल धन्स. रेमंड चा एपिसोड पाहिला होता. मुलांच्या प्रश्नांना उत्तर देताना बरेच वेळा माझा रेमंड होतो. बर काही तरी थातुर मातुर उत्तर देउन भागत नाही. आपल्या उत्तरात नवा प्रश्न दडलेला नाहीना याची खात्री करुनच उत्तर द्याव लागत. नाही तर नविन प्रश्नांना उत्तर देताना तोंडाला फेस येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तोंडाला फेस येतो यालाच

रेवती
Tue, 10/05/2010 - 02:02 नवीन
तोंडाला फेस येतो यालाच मुलांचे प्रश्न फेस करणे म्हणत असावेत.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

@ रेवती, अगदी हेच मनात आले

मितान
Tue, 10/05/2010 - 02:11 नवीन
@ रेवती, अगदी हेच मनात आले :) गणपाभौ मस्त किस्सा ! मला एकदा शेजारच्या ४ वर्षाच्या मुलाने प्रपोज केले होते. का तर म्हणे ' तू मला स्कूटीवरून शाळेत सोडतेस म्हणून ! ' =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पूर्ण भाग नाही मिळाला. हे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 10/07/2010 - 01:18 नवीन
पूर्ण भाग नाही मिळाला. हे मिळाले. http://www.youtube.com/watch?v=0j4iMm4yz8I
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

वा गणपा...

वाटाड्या...
Mon, 10/04/2010 - 23:55 नवीन
तू असले प्रसंग आलेस की तू खुष्कीचा मार्ग पकडुन स्वयंपाक घर गाठतोस ना? खरं सांग? आणि बायकोला प्रसंगाला फेस करायला लावतोस ना? काळजी करु नकोस..मी पण तेच करतो... (वाटसरु) - वाटी..
  • Log in or register to post comments

ह्म्म्म... मी किती मागास

इंटरनेटस्नेही
Tue, 10/05/2010 - 01:12 नवीन
ह्म्म्म... मी किती मागास वर्गीय आहे याची जाणीव झाली. (वर्गातील मुलींशी पेन ड्राईव्ह ने कॅच कॅच खेळणारा) इंट्या.
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/05/2010 - 17:36 नवीन
वरच्या प्रतिसादात काही क्रिप्टीक नसावं अशी अपेक्षा आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

.

टिउ
Tue, 10/05/2010 - 02:25 नवीन
आयला! बघावं तिथे चिनचा प्रश्न आहेच राव...काही खरं नाही आपल्या (आणि आपल्या पुढच्या) पिढीचं!
  • Log in or register to post comments

मी चौथीत असताना एका मुलाने

शिल्पा ब
Tue, 10/05/2010 - 06:02 नवीन
मी चौथीत असताना एका मुलाने माझ्या हातावर हात ठेवला होता ते आठवले ;) त्याकाळी एवढे बॉय फ्रेंड / गर्ल फ्रेंड वगैरे काही नव्हते पण कदाचित इंग्रजी शाळेत असावे...कारण क्लास मधल्या इंग्रजी शाळेतल्या मुलींचं कोणाकोणावरून चिडवणं चालायचं...एकदा क्लासच्या टीचरने " कीस " चा वेगळा अर्थ (इंग्रजी ) सांगितल्याने एका मुलीला चांगलंच झापलं होतं...तो काळच साधा होता...त्याकाळी हे नव्हतं (आणि असलं तरी आम्हाला अनुभव नाही.)
  • Log in or register to post comments

जबरी

सहज
Tue, 10/05/2010 - 06:37 नवीन
भारी लिहले आहे.
  • Log in or register to post comments

"आई, आई, वन बिग बॉय हेल्पड मी

स्पंदना
Tue, 10/05/2010 - 09:26 नवीन
"आई, आई, वन बिग बॉय हेल्पड मी फॉर माय सायन्स प्रोजेक्ट बिकॉज ही लाइक्ड इट, बट ही इज नॉट माय बॉय्फ्रेंड!!!" आमची वय वर्षे १०. लेकाच तर विचारुच नका, अजुन माझ्याच प्रेमात आहे. गणपा भाउ फेस आला तरी फेस करावच लागत बर, वरील बाकिच्यांचे अनुभव सुद्धा मस्त.
  • Log in or register to post comments

पास

विनायक प्रभू
Tue, 10/05/2010 - 09:36 नवीन
ही एक पासींग फेज असते. आधीही होती. आजही आहे. उद्या ही असेल. फक्त संख्या वाढते आहे. आणि आजुबाजुचे वातावरण ही संख्या वाढवेल. ह्या वर इलाज- पक्का इलाज काही ही नाही. त्यातल्या त्यात लाफ इट ऑर स्माइल इट ऑफ बरा. (१९६५ सालामधे हाचअनुभव घेतलेला विप्र)
  • Log in or register to post comments

=))

अवलिया
Tue, 10/05/2010 - 10:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments

गणपा, जोडे झिजवण्यापासून

परिकथेतील राजकुमार
Tue, 10/05/2010 - 14:17 नवीन
गणपा, जोडे झिजवण्यापासून वाचवले हो लेकीने ;)
  • Log in or register to post comments

गणपाभौ, लेक एकदम हुश्शार आहे!

यशोधरा
Tue, 10/05/2010 - 15:13 नवीन
गणपाभौ, लेक एकदम हुश्शार आहे! :)
  • Log in or register to post comments

अग्गग !! =))

सुहास..
Tue, 10/05/2010 - 15:15 नवीन
अग्गग !! =))
  • Log in or register to post comments

गणप्या, तुझ्या भावना समजू

बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/05/2010 - 20:09 नवीन
गणप्या, तुझ्या भावना समजू शकतो. =)) आमचे किस्से (अदिती / रंगा फर्माईश) ०१. "बाबा, तो क्ष अगदीच बॅड आहे." "का?" "तो मला आय लाईक यु म्हणला" "बरं मग?" मी नेहमीसारखे अंडरप्ले करत. "तुम्हाला काही समजतं की नाही? असं फक्त नवरा बायकोला म्हणतो." मी ओव्हरप्ले झाल्याने बर्न आऊट. ०२. मोठी धाकटीबद्दल तक्रार करतीये "बाबा, ही बघा ना कशी करते आहे?" "काय झालं?" "स्वतःला हिरॉईन समजते की काय?" "अगं काय झालं पण?" "सारखी मला जवळ घेते आणि पप्पी घेते." हे म्हणजे धाकटी मोठीचे लाड / कौतुक इत्यादी करत होती. मोठीच्या डोक्यात भलतंच. "मग काय झालं?" "अहो पण तसं फक्त हिरोलाच करते ना हिरॉईन सिनेमात?" ०३. एका मित्राचा किस्सा. भडक दृष्य आली की मित्र चॅनेल बदलायचा. त्याचा मुलगा तेव्हा ५वीत. एकदा असाच काहीसा सीन आला म्हणून त्याने गडबडीत रिमोटचे बटण दाबले आणि दुसरे चॅनेल आणले, तर त्यावर पहिल्यापेक्षा जास्त गंमत जंमत चालू होती. "बाबा आता काय कराल?"
  • Log in or register to post comments

खल्लास!

पैसा
Tue, 10/05/2010 - 20:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिचारा बाबा =)) =)) =)) =))

गणपा
Tue, 10/05/2010 - 20:21 नवीन
बिचारा बाबा =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सहीच !!

सूड
Tue, 10/05/2010 - 20:32 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

=)) =)) " बाबा आता काय

शिल्पा ब
Tue, 10/05/2010 - 22:39 नवीन
=)) =)) " बाबा आता काय कराल?" =)) =)) बिचारा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मजेदार किस्से!

रेवती
Tue, 10/05/2010 - 21:10 नवीन
मजेदार किस्से!
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

स्वप्निल..
Tue, 10/05/2010 - 23:34 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

दाढी टोचते का??

स्वछंदी-पाखरु
Wed, 10/06/2010 - 00:06 नवीन
असलाच एक किस्सा मध्यंतरी काही कामा निमित्त मायदेशी आलो होतो. सकाळी एका मीटींगला जायचे म्हणून दाढी करत होतो. माझ्या मोठ्या भ्राताश्रींची मुलगी सुखदा (वय ३ वर्ष ) माझ्या खोली मधे येउन मला दाढी करतांना बघत होती तेव्हाचा संवाद.. सुखदा: काका काय कलतोय? मला सांग ना??? मी: मी ... ना.... दाढी करतोय बेटा...... सुखदा: का???? काल लात्ली (रात्री )काकुला टोचली होती म्हनुन का?? हे ऐकून एकदम थक्क झालो... माझा चेहर्‍याला एका ठीकाणी सटकन ब्लेड लागली...... बायकोने मात्र "काल रात्री आपल्या खोलीच दार खरच उघड राहीलं होत की काय??? " ह्या प्रश्नाने दीवसभर डोकं खाल्लं......... स्वपा. आजपण एकटा असलो तरी झोपायच्या आधी दार बंद असल्याची खात्री घेणारा......
  • Log in or register to post comments

हा हा हा हा!!

चतुरंग
Wed, 10/06/2010 - 00:14 नवीन
खल्लास!! =)) =)) =)) तुमच्या पुतणीने एकदम बिनपाण्यानेच केली की तुमची! ;) (ह.घ्या.) (फ्रेंचदाढीधारी)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु

गणपा मांडणी छान केलीत. सेम

जागु
Wed, 10/06/2010 - 10:48 नवीन
गणपा मांडणी छान केलीत. सेम किस्सा माझ्या भाचीच्या बाबतीत झाला होता. ती २रीत आहे. तिने लगेच जाऊन मॅडमना सांगितले. मॅडमने तिथेच त्याला खानाखाली लावुन दिली. आणी ह्यापुढे अस न वागण्याची हमी घेतली. आता ह्या गोष्टीवर हसाव की रडाव तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments

अरेरे

गणपा
Wed, 10/06/2010 - 13:00 नवीन
मॅडमने तिथेच त्याला खानाखाली लावुन दिली.
अरेरे हे म्हणजे फारच झाल. इतक्या लहान मुलांनावर हात उगारु नये, त्यापेक्षा त्या शिक्षिकेने त्या मुलाला समजवुन सांगायला पाहिजे. माराने मुलं सुधारतात या मताचा मी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

तुमच बरोबर आहे गणपा माराने

जागु
Sat, 10/09/2010 - 20:08 नवीन
तुमच बरोबर आहे गणपा माराने मुल सुधारत नाहीतच. उलत घाबरट किंवा अती झाल्यावर बेडर बनतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आमच्या एका मित्राचा ३ वर्षाचा

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/06/2010 - 14:07 नवीन
आमच्या एका मित्राचा ३ वर्षाचा भाचा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी त्याच्याकडे आला होता. दुपारी तो मित्र आणि मी त्याच्या संगणकावर थोडे काम केले आणि तो बंद करायला लागलो. भाचा :- मामा बंद नको करु. मला प्रिंसची गेम लावुन दे. मित्र :- अरे काय सारखे प्रिंस प्रिंस ? जा ताई बरोबर पत्ते वगैरे खेळ. भाचा :- तु मला गेम लावुन दिली नाहिस तर मी तुला बलविर पाशा म्हणेन. ======== ह्यावरुन एक विनोद आठवला. दुसरीतला बंड्या शाळेतुन धावत धावत घरी येतो. बंड्या :- बाबा, आज ना आम्हाला शिकवायला नविन मॅडम आल्यात. त्या असल्या चिकन्या आहेत ना. बाबा :- बंड्या गाढवा अरे असे बोलतात का? त्या तुझ्या आईसारख्या आहेत. बंड्या :- बाबा मला तुमचे हेच आवडत नाही ! जिथे तिथे स्वतःचे सेटिंग लावायला बघता.
  • Log in or register to post comments

भाचा :- तु मला गेम लावुन दिली

सूड
Wed, 10/06/2010 - 14:09 नवीन
भाचा :- तु मला गेम लावुन दिली नाहिस तर मी तुला बलविर पाशा म्हणेन. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हिहहहह....

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 10/06/2010 - 14:17 नवीन
पोट्टी फार आगोचर पणा करायला शिकतायत खरी! पण आजुबाजुला जे पाहतात तेच शिकतात! आपल्याकड्च्या अ‍ॅड्स पाहिल्यांनंतर त्यांचे प्रश्नार्थक झालेले चेहरे खुप त्रास देतात. काय उत्तर द्यावं कळत नाही... कारण त्यांनी ते विषय मित्र मैत्रिणीच्यात discuss केले तर जर्रा मोठे शाळकरी असतातच माहिती द्यायला... wide stone ची अ‍ॅड पाहुन माझा ३ वर्षाचा पुतण्याने मला विचारले होते " काकी....तो छान छान वास (deo) फुस्स (spray) करत असताना त्या आंटी ला अस का होत?" आता काकी काय सांगणार? अ‍ॅक्स ची लिफ्ट वाली अ‍ॅड पाहुनही तेच.... त्याचे कपडे कोणी विस्कटले....आणि नंतर च्या काकु अशा का दिसतात्?...हा प्रश्न लेकीच्या मैत्रीणीचा!
  • Log in or register to post comments

एका मित्राचा किस्सा. भडक

सुहास..
Wed, 10/06/2010 - 17:10 नवीन
एका मित्राचा किस्सा. भडक दृष्य आली की मित्र चॅनेल बदलायचा. त्याचा मुलगा तेव्हा ५वीत. एकदा असाच काहीसा सीन आला म्हणून त्याने गडबडीत रिमोटचे बटण दाबले आणि दुसरे चॅनेल आणले, तर त्यावर पहिल्यापेक्षा जास्त गंमत जंमत चालू होती. "बाबा आता काय कराल?" >>> अगगगगय्य्य्य्य्य्य !!
  • Log in or register to post comments

फुलटु करमणुक झाली... मिपाच्या

इंटरनेटस्नेही
Fri, 10/08/2010 - 15:36 नवीन
फुलटु करमणुक झाली... मिपाच्या अनुभवी पालकांकडुन अजुन किस्से अपेक्षित आहेत! (सिंगल आणि सरळमार्गी, म्हणुन पालकत्वाचा अनुभव नसणारा) इंट्या.
  • Log in or register to post comments

सिंगल आणि सरळमार्गी , म्हणुन

परिकथेतील राजकुमार
Fri, 10/08/2010 - 15:57 नवीन
सिंगल आणि
सरळमार्गी
, म्हणुन पालकत्वाचा अनुभव नसणारा
अच्छा म्हणजे जे पालक होतात ते वाममार्गी असतात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

तसं नाय रे परा, पालकत्वासाठी

Nile
Fri, 10/08/2010 - 16:21 नवीन
तसं नाय रे परा, पालकत्वासाठी जे काय असावं लागतं (पण जे सरळ नसतं) ते त्याच्या कडे नाहीए इतकंच त्याला म्हणायचं आहे. -मार्गाप्रमाणे अ‍ॅडजस्ट होणारा, सर्वमार्गी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

__/\__

परिकथेतील राजकुमार
Fri, 10/08/2010 - 16:27 नवीन
__/\__ Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अरारारा. लैच घाण मारली.

मृत्युन्जय
Fri, 10/08/2010 - 19:12 नवीन
अरारारा. लैच घाण मारली. सिक्सर हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अरारारा. लैच घाण मारली.

मृत्युन्जय
Fri, 10/08/2010 - 19:16 नवीन
अरारारा. लैच घाण मारली. सिक्सर हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मला असे म्हणायचे आहे की, ....

इंटरनेटस्नेही
Sat, 10/09/2010 - 01:33 नवीन
मला असे म्हणायचे आहे की, .... जाउंदे काही फायदा नाहीये स्वत:ला एक्सप्लेन करुन.. लोक अजुन चुकीचा अर्थ काढतील.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लग्न!

कवितानागेश
Sat, 10/09/2010 - 14:44 नवीन
माझ्या ४ वर्षाच्या भाच्याला त्याच्या ३० वर्षाच्या मामाशी आणी ६० वर्षाच्या आजीशी लग्न करायचे होते, अगदी हटून बसला होता ..... नुकतेच त्याला कळले होते की लग्न झाले की आयुष्यभर एकत्र रहावे लागते! मामाला आणी आजीला आपल्याबरोबर अडकवण्याचा सोप्पा उपाय!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद ९९

नेत्रेश
Tue, 12/07/2010 - 02:07 नवीन
प्रतिसाद ९९
  • Log in or register to post comments

प्रतिसाद १०० - गणपाभाउंचा पहिला शतकी धागा!

नेत्रेश
Tue, 12/07/2010 - 02:08 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा