आमच्या मित्रमंडळीत दोन कुटुंबांचे मुलगे एकाच वर्गात आहेत. सध्या वय ६ पण ही गोष्ट मागची असल्याने तेव्हा वय साडे ४-५. एकदा आम्ही एकत्र जमलो असताना या दोघांचे भांडण सुरू होते.
"डू नॉट टॉक टू सॅरा!"
"व्हाय इज शी योर गर्ल फ्रेंड?"
"येस शी इज! आय लव्ह हर अँड आय विल नेव्हर लेट यू टॉक टू हर."
छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो होते हे पाहुन स्वतःची दया येउ लागली आहे.
वर्गातील मुलीने असे म्हणले (असते) तर आम्ही चार कोस दुर पळालो असतो. कुणा गाढवाने आम्हाला मुली बावळट असतात हा पाठ पढवला होता कोण जाणे.
-यत्ता पहिलीत मुलींशी पट्ट्यांची मारामारी करणारा
वर्गातील मुलीने असे म्हणले (असते) तर आम्ही चार कोस दुर पळालो असतो. कुणा गाढवाने आम्हाला मुली बावळट असतात हा पाठ पढवला होता कोण जाणे.
हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत. मुली नाहीत.
मुली मुलखाच्या श्मार्ट असतात. ;) त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते. :)
तसे नाही हो, वरील दोन ओळी आमच्या बावळपणाचा अंदाज येण्याकरता दिल्या आहेत. ;-)
बाकी आमचा मागासलेपणा, आम्ही कधी तसे म्हणुन शकलो नाही यात आहे हे सांगावे का लागावे?
मुली मुलखाच्या श्मार्ट असतात.त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते.
काय सांगता? मग आम्हीच अपवाद होतो की काय? हाय रे नसीब! ;-)
आपण जेव्हा वर्गातल्या मुलीवर लाईन मारत असतो तेव्या तिचा नवरा कुठ्तरी प्रमोशनची खटपट करत अस्तो आणि आपली होणारी बायको आठवीचा गृहपाठ करत असते असे काहीसे वाचल्याचे आठवते.
पण ही ग्याप फारच कमी झालेली दिसत्ये आहे.
फारच बावळट होतो आपण!....
माझ्या लेकीबाबत (इयत्ता ३ री) घडलेला किस्सा!..
दोन वेळा doorbell वाजली. दोन्ही वेळा दारात कोणीच नाही...
जर्राशी साशंक मनाने दार बंद करायला गेले तर सहज पायात लक्ष गेले तर doormat वर एक चिट्ठी!
....बरं....लहान मुलाची करतूत असणार हे कळुन येत होत्...कारण तेच नेहमीचं...book मधल page फाडून बरेच fold घालून केलेली चिट्ठी!
..दोन सेकंदांसाठी ब्र्म्हांड आठवले होते....अरे देवा..त्यावेळी जी घालमेल झाली होती ना जिवाची...अजुन आठवते...
माझ्या नशिबाने चिठ्ठीत आक्षेपार्ह काहिहि नव्हते.... floor वरच्या denis आणि Daniel नामक टवाळ बंधुनी तिला झालेल्या भांडणाबद्दल official written कट्टी केली होती!
पण काय पोट्टी कुठून शिकुन येतात देव जाणे..!
आपण लई बावळट होतो नाहि या वयात?
तुमच्या वाढदिवसानंतर लेक मोठी झाल्याचा पुरावा लग्गेच मिळाला कि!;)
आमचा मुलगाही त्याच्या मैत्रिणीला यत्ता दुसरीत असताना 'आय लव्ह यू' म्हणाला होता.
थोड्याच दिवसात "ह्या! मी हे काय बोललो" असे झाले त्याला!
अजुन एक किसा.
ती केजीत असताना आम्ही गमतीत विचारायचो की "तु मोठी होउन कोण होणार?"
आई तिची रोल मॉडेल असल्याने.
ती म्हणायची "आई होणार, टिचर होणार आणि खुप शिकणार"
आम्ही म्हणालो जरा उलट्या क्रमाने जा म्हणजे मिळवली.
माझ्या मुलाच्या (वय वर्षे ६) वर्गातील एक (इथल्या, अमेरिकन) मुलीने त्यांच्या परिवारातील एका लग्न समारंभात तिच्या आईला सांगितलं होत की "मी याचं चर्च मध्ये ( माझ्या मुलाशी) लग्न करणार आहे !" तिच्या आईने मला इमेल लिहून कळवलं होत :)
गपा की! :D :D :D
च्यायला, मार्ल्बोरोचं काय घेऊन बसलात? मीच गळाठलो ना. :)
>>(बिगजॉनी)रंगा
=)) =)) =)) =))
आधी ही सही बंद करा राव. जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा ठ्या करुन फूटतो मी. :D
गणपा,
बुटक्या जावयाबद्दल अभिनंदन रे.. :)
तात्या.
--
बनी माळरानी राई
ठायी ठायी केले स्नेही
तुझ्या विना नव्हते कोणी
आत अंतरात..
(येथे ऐका)
आम्ही यालाच यमन म्हणतो..!
हा हा हा ... बिकाकडेपण असे किस्से आहेत म्हणे!
पण मी तर इथेच अडकले.... "बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला." मला नाही ब्वॉ सांगता येणार पहिलीतल्या मुलांना असं काही!
प्रश्न विचारायला लागली ना, की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत थांबतच नाहीत. मग आपल्याला झोप येते, नव्हे, लागते सुद्धा. पण "ऊठ ना ग! आधी सांग" चा हल्ला सुरूच रहातो!
>>प्रश्न विचारायला लागली ना, की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत थांबतच नाहीत.
वरील प्रश्नाशी सहमत.
मला माझ्या मित्राने त्याच्या लहानपणचा सांगितलेला किस्सा आठवला. तो चौथ्या यत्तेत आणि त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा दोन वर्ष लहान. तो टिव्हीवर ऐकलेलं 'कुटं कुटं जायाचं हनिमुनला' हे गाणं सारखा गुणगुणायचा. एकदोनदा आईने ऐकलं मग, 'बाळा, दुसरं कोणतं तरी गाणं गा. सारखं सारखं हे काय गातोयस'.
भाऊ: का या गाण्यात काय वाईट्टै ? आणि हो हनिमुन म्हणजे काय गं ममा ?
ममा:
भाऊ: सांग ना !!
ममा: पपा सांगतील.
पपा : ती म्हणजे ना, एक पिकनिक असते.
माझा मित्रः असं नाहीच मुळी !! पिकनिक असते तर त्यात लाजण्यासारखं काय असतं ?? मी पाह्यलंय मामाच्या लग्नात मामीच्या मैत्रीणींनी तिला हनिमुनला कधी जाताय विचारलं तेव्हा सारखी लाजत होती ती. तुम्ही खरं काय ते सांगा.
या आगाऊपणाचं उत्तर एक धम्मकलाडू होता.
माझ्याइतका गुणी मुलगा नव्हता हों आमच्या शाळेत. एक मुलगी फार गप्पा मारायची म्हणून शाळेत बाईंनी तिला माझ्याशेजारी बसवलं जेणेकरून ती शांत बसेल, पण नंतर आम्ही दोघं इतक्या गप्पा मारायचो की बाईंना त्यांनी केलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करावा लागला.
प्रतिक्रिया
हाहाहा
प्रभु सरांच्या
+१
खरंय
हाहाहाहा!
छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो
बाबौ
हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत.
मुली मुलखाच्या श्मार्ट
नेमाड्यांच्या एक पुस्तकात
२०० % सहमत
आपण लई बावळट होतो नाहि या
नाय तर काय
तुमच्या वाढदिवसानंतर लेक मोठी
ग्रेट
कठीण आहे.. प्रभु मास्तर कुठे
अजुन एक किसा. ती केजीत असताना
हा हा!! हे मस्त.
हा हा हा!मस्त!
=)) =))
बापरे...
मजेशीर
नक्की प्रॉब्लेम काय आहे?
हाण्ण तिच्यायला!
माझ्या मुलाच्या (वय वर्षे ६)
अजून एक-
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं...... मेलो!
ए धमाल्या, अरे मुलं पटापट्
ओ... का मला भ्याव घालताय
हाण्ण!!!
ओऽऽ
एकसे भले दो
आगागा
गणपा, बुटक्या जावयाबद्दल
मस्त किस्से!
हा हा हा ... बिकाकडेपण असे
येतं आपोआप!
स्वानुभव का?
बिकाशेठ, ऐकताय ना?
मला नाही ब्वॉ सांगता येणार
हो, तेही खरंच आहे म्हणा! पण
लहान मुलं
सहमत
हा धपाटा खाल्लेला मुलगा
नाही गं !
अरे वा! भलताच गुणी की तू!
मुलगी, टिळक,स्वामी विवेकानंद
कुठला जोक?
हा हा हा हसून हसून दमलो!
काय क्रूर मनुक्ष आहे हा