✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

छ
छोटा डॉन यांनी
Tue, 08/10/2010 - 14:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55069 वाचन

💬 प्रतिसाद (304)

प्रतिक्रिया

नाडी

शशिकांत ओक
Sat, 08/21/2010 - 20:05 नवीन
वरील ओळख पुर्ण आहे.
  • Log in or register to post comments

ओळख

पैसा
Sun, 08/22/2010 - 23:59 नवीन
नमस्कार मंडळी, मिसळपाव बरेच दिवस वाचत होते. सदस्यत्व मिळाल्याची मेल काहीशी उशीर करून मिळाली. (म्हणजे पाहिलीच नव्हती!) आता मराठी वाचण्याची आणि लिहिण्याची हौस पुरी करून घेते. प्रतिसादांचे जंगी सामने मला खूप आवडतात, त्यात आपलेही २/४ खडे मारायला आवडतात. माझ्या आयडी बद्दल म्हणाल तर, सर्कारी ब्यांकेच्या नोकरीमुळे हातात लाखो रुपये येतात आणि जातात. महागाईमुळे खात्यात फारसं काही उरत नाही. निदान नावात तरी पैसा असावा म्हणून हा आयडी घेतला. गावापासून दूर गोव्यात अर्थात "पैस" रहाते हेही एक कारण आहे. बाकी ओळख काय सांगणार? इतर १०० जणांसारखीच मी एक! असेच चकाट्या पिटत आणि मतांचे खडे मारत राहूच!
  • Log in or register to post comments

मी भडकमकर मास्तर... मिपावरती

भडकमकर मास्तर
Mon, 08/23/2010 - 17:59 नवीन
मी भडकमकर मास्तर... मिपावरती काही काळ करियर गायडन्स वर्ग चालवले.... नाटक सिनेमांवरती काही लेख लिहिले... जालिंदर जलालाबादी आणि शरदिनी अशा काही विशिष्ट व्यक्तिमत्त्वांचा जनक..... पोटापाण्यासाठी डेन्टिस्ट म्हणून काम करतो....
  • Log in or register to post comments

ओळखपरेड ( नव्या-जुन्या

दाद
Tue, 08/24/2010 - 23:59 नवीन
ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख )अतिशय स्तुत्य उपक्रम सध्या माझा सहभाग फक्त वाचन आणी कधीतरी प्रतीक्रीया देणे एवढाच आहे धागा सुरू करण्यासाठी छोटा डॉन यांचे मनापासून आभार!
  • Log in or register to post comments

काही जुने आणि काही (फारच) जुने!

सुनील
Wed, 08/25/2010 - 17:11 नवीन
हा एक जुना फोटो मिळाला. Image removed. डावीकडून - तात्या, अस्मादिक, प्रभूमास्तर, सर्वसाक्षी, रामदास आणि दांडीवाले विकास (स्थळ - महेश लंच होम, ठाणे. काळ - जानेवारी २००९)
  • Log in or register to post comments

महेश लंच होम ?

छोटा डॉन
Wed, 08/25/2010 - 17:58 नवीन
>>स्थळ - महेश लंच होम, ठाणे. काळ - जानेवारी २००९) आयला, महेश लंच होम का ? मास्तरांचीच चॉइस असणार, त्यांचे लै आवडते रेस्टोंरंट आहे हे. :) सह्ही है ! काळ- जानेवारी २०१० ला आम्ही पण काही थोरं आंतरजालीय व्यक्तिमत्वांसोबत तिथेच बसलो होतो. प्रभुमास्तर, रामदासकाका, संपादक निखिल देशपांडे आणि अस्मादिक !!! मस्त कट्टा झाला होता ;) ( फोटु काढला नव्हता, हाच फॉर्म करुन टाकावा काय ? ) ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

थितं

श्रावण मोडक
Wed, 08/25/2010 - 18:07 नवीन
थितं काय्काय मिळतं? कैबी दिसत नाय टेबलावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बडिशेप

अनाम
Wed, 08/25/2010 - 18:17 नवीन
बहुतेक मंडळी बडिशेपची वाट पहात असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बिल

सुनील
Wed, 08/25/2010 - 18:19 नवीन
तेवढं बिल दिसतं का तात्याच्या पुढ्यातलं? आता झूम करून वाचून टाका पाहू!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आईशप्पथ! किती जुना फोटो!!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 12/27/2014 - 14:12 नवीन
आईशप्पथ! किती जुना फोटो!!!! मजा आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

जुना फोटो

सुनील
Mon, 12/29/2014 - 11:30 नवीन
आयला, मीच टाकलेला फोटो पण आता हपिसातून मलाच दिसत नाहीए! :( घरी जाऊन बघावा लागणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मी अविनाश कुलकर्णी..पुण्याहुन

अविनाशकुलकर्णी
Wed, 08/25/2010 - 17:42 नवीन
मी अविनाश कुलकर्णी..पुण्याहुन ईजेनर झालो आहे..कारखानदारी करायचो..आता काहि नाहि... मला एक ओळीचे धागे टाकायला आवडतात...बाकि विषेश असे काहि नाहि..फुकट प्राण वायु मिळतो म्हणुन जिवंत आहे... बाकि..लाईफ म्हणजे Eat ..Drink and Be Merry. Image removed.
  • Log in or register to post comments

आई शप्पत.....

प्रास
Sun, 07/31/2011 - 22:45 नवीन
हा भारी धागा आहे. खूप वेळ वाचतोय आणि मिपाचा बराच इतिहास इथे उकरल्यामुळे कळतोय. बाकी माझ्याबद्दल इथे टिचकल्यास कळेलच.
  • Log in or register to post comments

लिंक चुकलीये..

मी-सौरभ
Sun, 07/31/2011 - 22:56 नवीन
मला माझीच महिती दिसतेय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

दुवा सुधरवला आहे. आता टिचका

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 00:13 नवीन
दुवा सुधरवला आहे. आता टिचका बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

संपादकांना

प्रास
Mon, 08/01/2011 - 11:57 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छ्या. ह्यो धागा कशापाई वरती आनला हाय.

गेंडा
Mon, 08/01/2011 - 02:14 नवीन
ह्यातले १५ आने (तुमच्या भासेत सुमारे ९५ %) वाचनमात्र हायेत. ना ते काही लिवीत ना कोनाला भेटत. काय उपेग त्याचा. त्या सुनीलभौनी येक फटु टाकला. तेच्यावर काय बी नाही कोनी बी लिवल. पण सोकाजीरावाने चांगल्या हस्तींचा परीचल्य दिला तर एक से एक शेरेबाजी. असा न्याय नका करूसा.
  • Log in or register to post comments

मी प्राजक्ता. इथे 'प्राजु'

प्राजु
Mon, 08/01/2011 - 03:51 नवीन
मी प्राजक्ता. इथे 'प्राजु' नावाने आहे... 'प्राजु चे प्राजुताई हे मिपाकरांनी केलेले बारसे...'
  • Log in or register to post comments

नमस्कार मी स्पा इथे स्पावड्या

स्पा
Mon, 08/01/2011 - 12:01 नवीन
नमस्कार मी स्पा इथे स्पावड्या या नावाने वेल(?) नोन :D
  • Log in or register to post comments

मी अत्रुप्त आत्मा...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/08/2012 - 00:53 नवीन
मी अत्रुप्त आत्मा... Image removed. व्यवसाय-भटजिगिरी... म्हणजे रोज लोकांचे आत्मे त्रुप्त करत फिरतो ;-) बिल्ला नं- अजुन माहित नाही,,,,,(किंवा हाच असावा ;-) ) माझ्या विषयी माहिती-इथले बाकिचे लोक सांगतील,कारण तीच खरी असते असं म्हणतात. Image removed. विशेष-अंतरजालावर Image removed. खेळता खेळता मिपावर आलो..आणी मी,,,पा...चाच झालो
  • Log in or register to post comments

जनरेशन शिफ्ट

प्रसाद गोडबोले
Mon, 12/08/2014 - 15:27 नवीन
एकतर मी मिपावर खुपच नईन आलोय किंव्वा मिपावर जनरेशन शिफ्ट झालाय ... वल्ली , मक , स्पा अन बुवा वगळता कोणालाच ओळखत नाहीये मी *unknw* कुणीतरी म्हणा रे आता "आमच्यावेळचं मिपा राहिलं नाही आता " *biggrin*
  • Log in or register to post comments

मलाही ओळखत नाहीस ना????

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 15:46 नवीन
मलाही ओळखत नाहीस ना???? अरेरेरेरेरे..... (दु:खी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मै हूं ना!

रेवती
Tue, 12/09/2014 - 01:54 नवीन
मै हूं ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गुर्जी तुमचा बिल्ला नंबर

विजुभाऊ
Mon, 12/08/2014 - 16:13 नवीन
गुर्जी तुमचा बिल्ला नंबर १४७६४
  • Log in or register to post comments

थांकू!

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/08/2014 - 18:51 नवीन
थांकू! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आँ

तिमा
Mon, 12/08/2014 - 20:07 नवीन
आमाला तर गुर्जींचा नं. १४७६७ दिसतोय! आता चष्मा बदलला पाहिजे बहुदा! आमचं नांव तिमा. आमी बाई हाय का मानूस हे फक्त जुन्या लोकास्नीच ठावं हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

रैट्ट! 14767 येच है।

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/08/2014 - 23:09 नवीन
रैट्ट! 14767 येच है। Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

तिरशिंगराव माणुसघाणे, मी

सतिश गावडे
Mon, 12/08/2014 - 23:18 नवीन
तिरशिंगराव माणुसघाणे, मी तुमच्यापेक्षाही जुना आहे. बिल्ला क्रमांक ५३६ *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

तिरशिंगराव माणुसघाणे,

खटपट्या
Tue, 12/09/2014 - 05:48 नवीन
तिरशिंगराव माणुसघाणे,
म्हन्जे तिमा "बाई मानूस" नसून बाप्या हाये. हे शीद्द झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्ही बरी "नजर" ठेवता

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 08:38 नवीन
तुम्ही बरी "नजर" ठेवता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खुपच जुना धागा!

भाते
Mon, 12/08/2014 - 20:36 नवीन
सगळे प्रतिसाद वाचायच्या भानगडीत पडलो नाही पण सगळ्या आयडींवरून नजर फिरवली. यातले जेमतेम १५-२० आयडी सध्या मिपावर लेख/प्रतिसाद रुपात अस्तित्वात आहेत. कदाचित काही वाचनमात्र असतीलही!
  • Log in or register to post comments

आपूनको लोगां बॅट्याभाई का

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 08:39 नवीन
आपूनको लोगां बॅट्याभाई का डूआयडी बोल्ते :(...अब्बी परसूईंच की बात हैं
  • Log in or register to post comments

उगाच बोलत नाहीत लोक!!

सूड
Tue, 12/09/2014 - 14:19 नवीन
उगाच बोलत नाहीत लोक!! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आयला सच्ची?

बॅटमॅन
Tue, 12/09/2014 - 14:47 नवीन
आयला सच्ची? क्या रे लोगां, मेरा डुआयडी टवाळभौ नैये रे. अगर होता तोभी नै बताता वो बात अलग है म्हणा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@ भाते :- +१ सहमत

प्रमोद देर्देकर
Tue, 12/09/2014 - 09:15 नवीन
@ भाते :- +१ सहमत मी मात्र सगळे प्रतिसाद वाचले आणि त्यात मिळालेल्या २००८ च्या http://www.misalpav.com/node/846 या धाग्याचे प्रतिसाद वाचण्यात काल माझा सगळा दिवस गेला. मिपावरच्या सर्व जुन्या लोकांपैकी काही लोकच आज हजर असतात हे बाकी खरे. या बाबतीत मला एका मिपास्नेहींनी मला सागितलेले आठवते की "मराठी आंतरजालावर साधारण २-२.५ वर्षांनी पिढी बदलते असं माझं एक निरिक्षण आहे" आणि ते खरच आहे. काही कार्यबाहुल्यामुळे येत नाहीत तर काही फक्त वाचनमात्र असतात कशातच भाग घेत नाहीत. अपवाद विजुभावु आणि पेठकरकाका...
  • Log in or register to post comments

माझी "ओळख" जागु तै च्या

मदनबाण
Tue, 12/09/2014 - 10:02 नवीन
माझी "ओळख" जागु तै च्या "मदनबाण" या धाग्यात दिली आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
  • Log in or register to post comments

स्वतची ओळख

टोपीवाला
Tue, 12/09/2014 - 13:58 नवीन
मी मिपा वर टोपीवाला मन्हून वावरतो. ना डोक्यावर केस ना टोपी, तरी " टोपीवाला " हे नाव का धारण केलं हे मलाही आठवत नाही. लोगिन करून फार कमी येत्तो. मिपा उघडून दणकन नवे लेखन वर जावून [ जुनी सवय ] आपल्या आवडीच्या लेखांचा आस्वाद घेतो. बऱ्याचदा लेखा पेक्षा प्रतिसादच आवडतात. माझ नाव दिलीप माथुलकर.माझ कालच, आजचं आणि me be उद्याच गाव सुद्धा चंद्रपूर.[ महाराष्ट्राच्या नकाशात सापडेल हो..] वय वर्ष ४६, नौकरी करतोय, घरी, आफिसात मिपा वर जाता येते [ चाणाक्ष मिपाकर नक्कीच सरकारी नौकरी अस समजले असतील.] पाककृती सौ ला सोबत घेवून वाचतो.[ हे तर मलाही करता येते/ माहित आहे- इति ; सौ ] परंतु अजून तोंडात काही पडल नाही. मिपा वरचे इतर सभासद एक्मेंकाना चांगले "ओळखून" आहेत याची प्रतीची प्रतिसाद वाच्णून येते. कॉम्पुटर/ मोबाईल या वरील लेख वाचायाला [ कधी-कधी काड्या करून पाहायला ] आवडतात. असाच लेख वाचून माझ्या samsung ६८०२ चा सुपर user बनायला गेलो आणि दोन दिवस व रु. २०० खर्च करूनही सुपर बनता आल नाही. दुसर्या लेखा प्रमाणे *९९# वापरून मोबाईल वरून बँक balance चेक करायला गेलो आणि mobile बँकिंग बंद करून घेतले. सुरु करण्यासाठी ३ दिवस sbi मध्ये खेटा घालाव्या लागल्या. सतत ३ दिवस ब्यांकेत गेल्यामुळे, ब्यान्केच तोंड न पाहता mobile बँकिंग कोणत्याही फोन वर कस सुरु करायचं याच ध्यान आलं. परंतु सतत तीन दिवस कार्यालयीन वेळेत बँकेत गेल्यामुळे " तुम्ही रिटायर्ड झालात काय " असा प्रश्न ब्यांकेतल्या बाबू ने विचारल्या मुले अकाली म्हातारपण येत आहे कि काय अस वाटून गेल. सबब थंडी असूनही [इच्छा नसूनही] पहाटे ६ किलोमीटर फिरावे लागत आहे. तूर्तास एवढेच.
  • Log in or register to post comments

मी दिपक.कुवेत

दिपक.कुवेत
Tue, 12/09/2014 - 14:04 नवीन
बस नाम हि काफि है...
  • Log in or register to post comments

धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल

निलीमा
Wed, 12/10/2014 - 12:55 नवीन
नमस्कार मीपकारहो, मी निलीमा *angel* मूळची औरंगबदची,पण सध्या वास्तव्य पुण्यात. तशी मी इकडे कुणाला प्रत्यक्ष भेटलेली नाही,पण बर्‍याच जनानचा पंखा आहे *yahoo* . माझी आवड म्हणाल तर खाणे ,झोपने , *music2* आणि फिरणे...काम करणे फारस आवडत नाही,तरी आपला वेळ जावा म्हणून एकाआयाटी कंपनीत कार्यरत.
  • Log in or register to post comments

जनान

प्रसाद गोडबोले
Wed, 12/10/2014 - 14:00 नवीन
पण बर्‍याच जनानचा पंखा आहे
जनान =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलीमा

जनान

निलीमा
Wed, 12/10/2014 - 14:33 नवीन
चालायच एवढ तेवढ ..घ्या सांभाळून *unknw*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

(No subject)

यसवायजी
Wed, 12/10/2014 - 18:12 नवीन
*music2*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलीमा

>>> तरी आपला वेळ जावा म्हणून

प्यारे१
Wed, 12/10/2014 - 14:17 नवीन
>>> तरी आपला वेळ जावा म्हणून एकाआयाटी कंपनीत कार्यरत. सोडून द्या. एखाद्याचा संसार चालतो तेवढ्यात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलीमा

प्यारे१

निलीमा
Wed, 12/10/2014 - 14:30 नवीन
नेहमी विचार करते... पण घरी बसून पैसा पण नाही मिळत आणि वेळ पण नाही जात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हम्म.

प्यारे१
Wed, 12/10/2014 - 14:32 नवीन
हम्म.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलीमा

म्यांव म्यांव

बोका-ए-आझम
Wed, 12/10/2014 - 20:02 नवीन
नमस्कार! मी बोका-ए-आझम! मुख्य काम मिशा साफ करणे,पलंगावर लोळणे आणि अगदीच नाविलाज झाला तर काम करण्याचा आव आणणे. मी प्रशिक्षण क्षेत्रात उंदीर मारत फिरत असतो. वास्तव्य बडी बाका नगरीत. मिपावर मला माझ्या एका मानवी मैत्रिणीने मासळीचं आमिष देऊन ढकलले (पण अजून मासळीचा पत्ता नाही! णिशेध!). इतिहास, राजकारण आणि अर्थशास्त्र हे प्रचंड आवडीचे विषय. आम्ही बोका असल्यामुळे कुठल्याही भांड्यात तोंड घालून फिस्कारत असतो!
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Mon, 12/29/2014 - 15:07 नवीन
भारी ओळख! मिपावर आधीच खादाड बोका, उपाशी बोका आहेत बहुतेक. मनिमौ पण आहे. तुमची म्यांव म्यांव लै आवडते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

ह्या धाग्यात देखील अशीच चर्चा

शिद
Wed, 12/10/2014 - 20:31 नवीन
ह्या धाग्यात देखील अशीच चर्चा झाली होती. तिथलाच प्रतिसाद येथे देतोयः माझा आयडी हे माझ्या नावाचं व आडनावाचं प्रथम अक्षरं मिळवून बनला आहे. :)
  • Log in or register to post comments

असेच आंतरजालावर इकडे-तिकडे भटकत असतांना...

मुक्त विहारि
Fri, 12/12/2014 - 03:32 नवीन
आधी माबो, मग मनोगत, मग उपक्रम, अशा एक एक पायर्‍या पार करत आधी वाचनमात्र मिपाकर झालो. आणि आता तर पक्का मिपाकर झालो. आय.डी. अद्याप सांभाळून आहे.बर्‍याच वेळा उडाला पण असता.पण संपादकांनी अद्याप सांभाळून घेतले आहे. आमचे अतिशय आवडते लेखक म्हणजे, जीवन भाऊ आणि पेशवे....ते आजकाल जास्त लिहीत नाहीत. बाकी अधिक जाणून घ्यायचे असेल तर, आमचे प्रोफाइल बघा...
  • Log in or register to post comments

मिपाकरांची ओळख

जयन्त बा शिम्पि
Sat, 12/27/2014 - 15:46 नवीन
टोपण नाव घ्यावे असे कधीही वाटले नव्हते.मिसळ पाव मध्ये थोडीशी बारीक शेव टाकण्याचा दोन चार वेळा प्रयत्न केला , पण कोणावरही आडवी/उभी/तिरकस/बोचरी टिका नसतांना,चार दिवस प्रकाशित झालेला साधा प्रतिसाद ,बरोब्बर नाहीसा होत असे ! ! कदाचित संपादक मंडळीस शेव जरा जास्तच तिखट लागत असावी ,अशी मीच माझी समजुत करुन घेतली आणि प्रतिसाद देणे बन्द केले , मात्र " मिसळपाव " दररोज चाखत असतो. एक कवन आठवले " रोज रोज नित्य नवा मेवा , तुम्ही खावा ! रेवडीचा हि स्वाद आम्ही का न चाखावा ? " लिहावेसे भरपूर आहे , पण वर उल्लेखिलेली खन्त मनात आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा