Skip to main content

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 21/05/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU....... ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

वाचने 55614
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

राजीव गांधी यांना विनम्र आदरांजली!!!! (धागा आदरांजलीशी संबधीत असल्यामुळे, त्यांच्या गुणदोषांवर चर्चा करणे मला व्यक्तीशः बरं वाटत नाही. शिर्षस्थानी कोणताही नेता असू देत, सत्तेत राहण्याकरीता जातीय मतांचं राजकारण खेळणे हे कॉन्ग्रेस पक्षाचं वैशीष्टय आहे. मग ते जुनं शहाबानो प्रकरण असू देत की सध्याचं अफझलगुरू प्रकरण.)

विकास आणि क्लिंटन यांच्या प्रतिसादांसाठी वाचनखूण साठवली आहे. अदिती

सर्व प्रतिसाद वाचल्यावर त्यांचे दोन भाग पडतात असे वाटते. एक म्हणजे निपक्षपाती भूमिका नसल्याने गुडघ्यात मेंदु असल्यासारखे प्रतिसाद आणि क्लिंटनसाहेबांसारखे अभ्यासपूर्ण संतुलित प्रतिसाद. एखादा माणूस संपूर्णपणे चांगला वा वाईट असत नाही. तरी त्याचे मूल्यमापन योग्य रीतीने करता आले पाहिजे. मिपावर मला नेहेमीच काही विचारी मंडळी तर काही मॉब सायकॉलॉजी असलेली मंडळी दिसतात. असो, शेवटी ही लोकशाही आहे.

नमस्कार मंडळी, मला या चर्चेचा TRP विनाकारण वाढवायचा नाही. तरीही हे लिहिणे गरजेचे वाटते. अनेकदा मी मिपावरील माझे लेख/प्रतिसाद माझ्या मराठी ब्लॉगवरही पोस्ट करतो. आणि माझा ब्लॉग ’मराठी ब्लॉगविश्व’ वर निगडीत केलेला असल्याने मला माझ्या ब्लॉगवरही काही प्रतिसाद येतात. राजीव गांधींवरच्या या लेखावरील प्रतिसादावर आणखी काही प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर आले. त्याची उत्तरे मी माझ्या ब्लॉगवरच एकूण तीन भागांमध्ये दिली आहेत. त्याचा दुवा राजीव गांधींवरील माझ्या लेखावरील प्रतिसादास माझे उत्तर -- भाग ३ आहे आणि त्यातच यापूर्वीच्या लेखांचाही दुवा दिला आहे. मूळ पोस्टवर आलेल्या प्रतिसादाला उत्तर भाग १ मध्ये, भाग १ वर आलेल्या प्रतिसादास उत्तर भाग २ मध्ये आणि भाग २ ला आलेल्या प्रतिसादाचे उत्तर भाग ३ मध्ये दिले आहे. ती चर्चा वाचायला काही मिपाकर तरी इच्छुक असतील असे वाटते म्हणून हा प्रतिसाद. --विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

आज २१ मे. २०११. :| राजीव'जींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! :| ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ Rajeev'jee.... Still Love You... Still Miss You.....

अगदि टाईम्स नाऊ वर चाललेल्या चर्चसारखे वाटले. म्हणजे कसे ती चर्चा कशी स्पेक्ट्रम राजाच्या भ्रष्टाचारावर चालू होते आणि भाजपमधे पण हेच चाललेले आहे यावर संपते. राजाच्या भ्रष्टाचाराचा स्पेक्ट्रम केव्हाच चर्चेआड होतो. सगळे एक नंबरचे राजकारणी. शेवटी वाईट गोष्टींच्या प्रमाणावरच चर्चा करावी अशी सुचना आहे. म्हणजे कसे --- तुमची इतकी वर्षे सत्ता, तुम्हाला एकूण एवढी मते, तुमचा एवढा भ्रष्टाचार...... आमची एवढी वर्षे सत्ता, आमची मते एवढी, आमचा भ्रष्टाचार एवढा..... आता बोला कोण चांगले आणि कोण वाईट.... :-) :-)

कालची आमटी आज उकळून(नवीन फोडणीही न देता) वाढण्याच्या मृगनयनींजींच्या प्रयत्नांपुढे नतमस्तक आंबोळी

In reply to by आंबोळी

आम्बोळी'जी!... शिळ्या आमटातलं पाणी एक ग्रॅमने वाढवल्याबद्दल आभार!! राजीवजींची पुण्यतिथी सत्कारणी लागली म्हणायची!! ;)

In reply to by मृगनयनी

मसाले कमी पडत असतिल तर मागनी करन्यात यावी. इथे वर्शानुवर्शे दळुन दळुन दळललेले मसाले मिळतील.

*~*~*~ राजीव'जींना सर्व (सूज्ञ) मिसळपावीयांतर्फे भावपूर्ण श्रद्धान्जली~*~*~* राजीव'जी.... आज इतक्या वर्षांनन्तरही.. तुमचा तो हसरा, उमदा, आश्वासक चेहरा आठवत राहतो..... तुमची बोफोर्स'सारखी इतरही काही प्रकरणे सर्वज्ञात असूनही का कुणास ठाऊक.. पण तुमच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर वाटत आलेला आहे... तुमच्यासारखा "पन्तप्रधान" होणे आता कधीच शक्य नाही..... LOVE YOU... MISS YOU.... RAJEEV'JI ... :| अवान्तर :- राजीव'जी तुमच्या थोडेफार सद् गुण आणि कर्तव्यनिष्ठा (आणि अक्कलही) तुमच्या मातृमुखी मुलामध्ये असती.. तर कदाचित देशाचे कल्याण झाले असते...

:( :( :( भारतीय राजकारणात फक्त आणि फक्त '"नाठाळ" लोकच लागतात! नाहीतर तर मग त्यांची "घर का ना घाट का.. सिर्फ आण्णा के मोर्चे का" अशी अवस्था होते. राजीव'जी खानदानी राजकारणी होते. अर्थात ते त्यांच्या आईइतकेही पार पोचलेले वगैरे नव्हते!!! तुलनेने कमी नाठाळ होते. अर्थात एक गोष्ट मात्र खरी, की त्यांच्या बद्दल तमाम भारतीयांना जो विश्वास आणि आदर वाटायचा.. तो आत्तापर्यन्त कुठल्याही पन्तप्रधानाबद्दल वाटलेला नाही ( अंशतः अपवाद- अटलबिहारी वाजपेयी) कम्प्युटर प्रणाली फक्त राजीव'जींमुळे इन्डियात आली... (याचा ऑलरेडी वर सविस्तर उल्लेख आहे..) तसेच त्यांचे व्यक्तिमत्वही पन्तप्रधानपदास सुसह्य, योग्य होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला.. त्याबद्दल जास्त हळहळ वाटते... उलट सध्याचे काही (तोन्ड वाकडे असणारे) राजकारणी पाहिले, की राजीव'जींच्या ऐवजी ह्या लोकांच्या बाबतीत का असे झाले नाही.. असा सहजविचार मनात डोकावतो!.. (पक्षी: नाठाळपणा आणि निर्लज्जपणा इतका या लोकांमध्ये ठासून भरला आहे...राजीवजींपेक्षा कैक पटीने जास्त!!... त्यामुळे....)

हा(जी), हा(जी), करायची सवय काँग्रेजवाल्यांना कदाचीत मो.क. गांधी नंतर आलेल्या आणि त्यांचेच आडनाव घेतलेल्या या इतर गांधी आडनावाच्या बाटग्यानी लावली. मॅडमजी, राहुलजी,


In reply to by अविनाशकुलकर्णी

कुलकर्णीकाका, या फोटोतला पगडीधारी कोण? बियंत सिंह हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या बलवंत सिंह राजौनाच्या चेहऱ्यात आणि या व्यक्तीच्या चेहऱ्यात बरेच साम्य दिसत आहे. जरा हा फोटो बघून सांगता का? तशीच मिशी, तशीच दुभंगलेली दाढी!! तुम्ही दिलेल्या फोटोतली व्यक्ती नक्की कोण? बलवंत सिंह राजौना तर नव्हे?

In reply to by अविनाशकुलकर्णी

अविनाश'जी... वरच्या फोटोतल्या महारथींबद्दल नि:संशय आदर आहेच!!! पण या सगळ्यांमध्ये एक साम्य म्हणजे हे सगळे लोक "अविवाहित" आहेत. ;) अटल'जी, कलाम'जी, अण्णा हजारे (आय थिन्क न. मोदी पण)..... ह्या सगळ्यांना लग्न म्हणजे काय हे माहित नाही.. यांना मुलंबाळं नाहीत... त्यामुळे मुलाबाळांच्या भविष्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी यांना काहीही करायचे नाही. त्यामुळे थोड्याफार नि:स्वार्थीपणे हे सगळे अविवाहित लोक देशासाठी वेळ देऊ शकतात. ;) परन्तु गान्धी घराण्याचे मात्र असे नाही. त्या घराण्यातल्या "वरूण गान्धी" पर्यन्तच्या सगळ्या पिढ्यांचे लग्न झालेले आहे. मातृमुखी आल्पशिक्षित राहुल गान्धी पण अफगाणिस्तानाचे अघोषित जावई आहेत. ते जाऊदेत... पण आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठी उचित तजवीज करणं.. हा प्रत्येक मनुष्याचा धर्मच असतो. आणि या मानवी धर्मापासून इतर अनेक राजकारणी, फिल्म इन्डस्ट्री देखील दूर नाही. तोच कित्ता गान्धी घराण्याने गिरवला. आणि तसेही गांधी घराणेशाहीविरुद्ध ओरडणार्‍या आणि मुलंबाळं असणार्‍या राजकारण्यांनीही शेवटी आपल्याच मुलाला-नातवाला राजकीय वारसदार बनवले आहे.. अगदी मुलापेक्षा कितीतरी पटीने उजव्या असलेल्या पुतण्याला डावलले गेले... (पक्षी: बाळ, उद्धव, आदित्य, राज ठाकरे...) आता बाय चान्स कधी कुणाला महानगरपालिका चालवायला मिळते.. तर कुणाला देश!!!... शेवटी दोन्ही ठिकाणी निवडून आपणच देतो ना!.. इथे राजकारणात घुतल्या तान्दळासारखे कुणीच्च नसते..त्यामुळे फक्त गान्धी घराणे तेवढे वाईट.. आणि बाकीचे सगळे चान्गले... असे म्हणणे चुकीचे ठरते. :)

In reply to by मृगनयनी

पण आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठी उचित तजवीज करणं.. हा प्रत्येक मनुष्याचा धर्मच असतो. आणि या मानवी धर्मापासून इतर अनेक राजकारणी, फिल्म इन्डस्ट्री देखील दूर नाही. तोच कित्ता गान्धी घराण्याने गिरवला. किती हजार कोटी म्हणजे उचीत समजायचे? एक आपला अडाणी प्रश्न !

In reply to by शिल्पा ब

किती हजार कोटी म्हणजे उचीत समजायचे? एक आपला अडाणी प्रश्न !
हेहेहे.... कितीही कोटी मिळाले... तरी कमीच्च असतात.. जोपर्यन्त इन्कम्टॅक्स आणि सीबीआय वाले यांची मालमत्ता अधिकृत घोषित करून न भरलेल्या टॅक्सवरती कार्यवाही करत नाहीत.. तोपर्यन्त सगळं उचितच समजायचं!!! .. तरी बरं.. गान्धी घराणेवाले स्वतःकडे आणि स्वतःच्या नावावर बर्‍यापैकी सम्पत्ती असल्याचे जाहीर तरी करतात. नाही तर अजित पवार!... त्यांचा मुलगा म्हणे पुण्यात शिकयला आहे.. तो लॅन्ड माफिया अविनाश भोसले (सन & सॅन्डवाला) च्या एका आलिशान बन्गल्यात भाडेतत्वावर राहतो.. त्या बन्गल्याचे डिपॉझिट आहे १ कोटी रुपये.. आणि मन्थली भाडे आहे.. ५ कोटी!... अर्थात तशी स्टॅम्पपेपरवर आणि इतर कागदोपत्री नोन्द आहे म्हणे!!!!... :)

In reply to by मृगनयनी

वरच्या फोटोतल्या महारथींबद्दल नि:संशय आदर आहेच!!!
मृगनयनीजी तुमच्या प्रतिसादातील एका वाक्याला हा उपप्रतिसाद असला तरी तो तुम्हाला किंवा कोणाही एकाला उद्देशून नाही. तुम्ही राजीव गांधींच्या फ्यान आहात याची कल्पना आहे. (गांधी घराण्यातील इतर व्यक्तिंविषयीची तुमची मते माहित नाहीत). वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कुलकर्णी काकांनी दिलेल्या फोटोतील पगडीधारी व्यक्ती दहशतवादी बलवंत सिंह राजौना आहे असे मला वाटते.हे चुकीचे असल्यास बरोबर माहिती द्यावी ही विनंती. गांधी घराण्यातील व्यक्तींची (किंवा कोणाचीही) आंधळी भक्ती नको हे अगदी मान्य.पण त्याचबरोबर आंधळा द्वेषही नको ना? गांधी घराण्यातील व्यक्तिंचा इतका आंधळा द्वेष करावा की एखादा दहशतवादी पण नि:संशय आदर देण्यायोग्य महारथी वाटावा हे कितपत योग्य आहे?आणि अशा मनुष्याचा फोटो कलामसाहेब, वाजपेयी, अण्णा हजारेंच्या फोटोबरोबर देऊन तो फोटो प्रसिध्द केलेल्याला नक्की काय म्हणायचे आहे कोणास ठाऊक?

In reply to by क्लिंटन

क्लिन्टन'जी.. तो फोटोतला दाढीवाला सरदार "बलवन्तसिन्ग" आहे.. हे मला माहित नव्हते... असो..त्याचा फोटो इतर महारथींबरोबर नको होता.... या विधानाशी सहमत!

In reply to by अविनाशकुलकर्णी

ह्या पुरुषमंडळी बरोबरच जयललीथा :), मायावती वगैरेंचे देखील फोटू द्यायचे की हो! ;)

In reply to by अप्रतिम

भावपूर्ण श्रद्धान्जली हे ही दिवस जातील. म्हणजे? राजीवजींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचे दिवस जातील? असे म्हणायचे आहे का? अर्थ कळला नाही :(

In reply to by विकास

म्हणजे? राजीवजींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचे दिवस जातील? असे म्हणायचे आहे का? मला वाटतय त्याना असेच म्हणायचय.... णैणी'तै दर मे महिन्यात हा धागा वर आणतात... लोक पण ' आलाच आहे शिमगा तर बोंबलून घेउ' असे म्हणून उलट सुलट प्रतिसाद देतात... विकास'भौंना हेच दिवस बहुतेक घालवायचे असतील ;)

मला भारतीय असल्याची भारतीय लोकांच्या वर्तनाने बर्‍याचदा भयंकर शिसारी आली आहे. त्यातील राजीव गांधीच्या निगडीत आठवणी अशा - १. 'जब तक सुरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा' या गाण्याची प्रसिद्धी. ( हे १९८४ मधे निवडणूक गीत होते. प्रचारासाठी हे गाणे चालू होताच गावातल्या बायका कशा रडायला चालू करायच्या ...) २. युद्धानंतर चर्चिलची गरज नाही म्हणून त्याला पाडणारा युके आणि सहानुभूतीच्या लाटेत राजीवला मिळालेले अशक्यप्राय बहुमत यांची वृत्तपत्रांत चर्चा. ३. दैनिक लोकमतच्या 'देशाला ..... च्या मजबूतीची गरज - पंतप्रधान' टाइपच्या १९८४ ते १९८९ पर्यंतच्या बातम्या. (प्रकार अति झाल्यामुळे शिसारी, तसा मुळात यात वाईट काही नाही.) ४. राम जेठमलानी संसदेत राजीव गांधीला रोज १० प्रश्न विचारत. राजीवचे सबब विषयांतले ज्ञान आणि नाठाळपणा. ५. श्रीलंकेत साध्या सैनिकाने त्यांच्या डोक्यावर रायफल आपटली. कपाळमोक्ष झाला असता, बिचारे कसेबसे वाचले. (तसे राष्ट्रपतींची डबल झडती घेतली जाणे, ट्रॉफी देणार्‍या कॄषिमंत्र्यांना आमच्याच भारतात विदेशी कॅप्टनकडून धक्का देऊन लोटले जाणे, इ घटनांमुळे सबब जाणीव बोथट पडली आहे.) ६. न्यायसंस्थेच्या अवमानाचा पायंडा. शाहबानो प्रकरणानंतर 'न्यायालय' नावाच्या प्रकरणाच्या इज्जतीची दुरावस्था. ७. राजीव क्यूट आहे म्हणून त्याला मत देणार्‍या कॉलेजकुमारी ८. समाजवादाचे खानदानी प्रेम ९. अर्थव्यवस्थेला १९९१ कडे लोटणे. यातून तर हा बाबा नामानिराळा सुटला आहे.

In reply to by arunjoshi123

*~*~*~* राजीव'जी... आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!! *~*~*~* ......... खरंतर खेदाने म्हणावे लागतेय.. की बरे झाले.. आज आपण नाही आहात!!!! आपल्या सुपुत्राची व पक्षाची एकंदर कार्यक्षमता लक्षात घेता, संपूर्ण देशवासीयांनी "काँग्रेस आय"ला नाकारले आहे. अर्थात आज आपण असता तर कदाचित परिस्थिती बरीच वेगळी असती. आपले ज्ञान व खानदानी राजनीती आपल्या मुलामध्ये- चि. राहुलमध्ये, उतरू शकली नाही... हे दुर्दैव!!!! निवडणुका जवळ आल्या, की लोकांना आपला "आजीसारखा" चेहरा दाखवून, जास्त न बोलता शहाण्या राहणार्‍या सौ. प्रियांका वद्रा'ही फारसा प्रभाव पाडू शकल्या नाही. प्रत्येक वेळी "इंदिरा गांधी"ची स्टाईल मारून चालत नाही... तेवढे कर्तृत्व व गुणही अंगी असावे लागतात... हे कळायला बराच उशीर झाला. आपल्या पत्नी- श्रीमती सोनिया'जींनी रडत खडत का होईना... काही वर्षे एकहाती सत्ता सांभाळली. पण त्यात देशप्रेमाचा, नाविन्याचा, प्रॉडक्टीव्हिटीचा, पॉझिटीव्ह स्ट्रॅटेजीचा अभाव असल्यामुळे आणि त्यांचे आता वयही बर्‍यापैकी झाल्याने .... लोकांना काँग्रेस'चा कंटाळा आला. तुलनेने भारताचे भावी पंतप्रधान- "श्री. नरेन्द्र मोदी" हे प्रॅक्टीकल व रिलायबल आहेत. त्यांचे "इरादे" पक्के आहेत. मुख्य म्हणजे काँग्रेस'वाल्यांसारखी हवेतल्या फुग्यांसारखी स्वप्ने तरी त्यांनी (अजूनपर्यन्त) दाखवलेली नाहीत. आणि संघाचे उर्फ हाफचड्डीवाल्यांचे सुसंस्कार त्यांच्यावर आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाने भाजपा'ला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. राजीव'जी... कदाचित तुम्ही जिथून कुठून आपल्या भारतदेशाकडे पाहत असाल.. तर इथली एकंदर परिस्थिती.. तुम्हालाही कळत असेल... किमान देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी "कॉग्रेस" पेक्षा "भाजपा" कितीतरी पटीने चांगला आहे!!!!!! कदाचित तुम्हीदेखील म्हणत असाल...- "अब की बार मोदी सरकार!!!! *~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*

In reply to by मृगनयनी

मुख्य म्हणजे काँग्रेस'वाल्यांसारखी हवेतल्या फुग्यांसारखी स्वप्ने तरी त्यांनी (अजूनपर्यन्त) दाखवलेली नाहीत. मॄग्गा हे वाक्य सुपर-डुपर लाइक केल्या गेले आहे. B मोदींनी सगळे फुगे अगदी व्यवस्थीत फोडले आहेत ! ;) कॉंग्रसवर काय वेळ आली आहे...

In reply to by arunjoshi123

ट्रॉफी देणार्‍या कॄषिमंत्र्यांना आमच्याच भारतात विदेशी कॅप्टनकडून धक्का देऊन लोटले जाणे हे आत्ता झालेले आहे

*~*~*~* राजीव'जी... आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!! *~*~*~* ......... ( सालाबादप्रमाणे श्रद्धांजली )

In reply to by कपिलमुनी

ठ्ठो =)) =)) =)) असे लिहिले तरी प्रत्यक्ष कधी होत नाही, पण आज मात्र झाले. सुदैवाने बिस्कीट अगोदरच खाऊन संपल्यामुळे बिस्कीटदेहाचे अवशेष इतस्ततः पसरले नाहीत.

*~*~*~* राजीव'जी... आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!! *~*~*~* ......... ( सालाबादप्रमाणे श्रद्धांजली )

२०१०-११ मध्ये राजीव गांधींवरील हा आणि आणखी एक धागा यावर बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी राजीव गांधींविषयी अनेक गोष्टी मला माहित नव्हत्या. नंतरच्या काळात अधिक वाचन केल्यावर आणि अधिक माहिती घेतल्यावर राजीव गांधी म्हणजे नक्की काय चीज होते हे समजले. त्यांच्या कारकिर्दीत सोशल मिडिया असता तर कदाचित आद्य पप्पू म्हणून राजीव गांधींचे नाव झाले असते. तरीही ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियाची ताकद अशी असते की अशा काही गोष्टी सहजासहजी बाहेर येत नसतात. टेलिकॉम क्रांती असा नेहमी दावा केला जातो की राजीव गांधी आणि सॅम पित्रोदा या जोडगोळीने भारतात टेलिकॉम क्रांती आणली. अनेक वर्षे मी पण त्या खोट्या प्रचाराला बळी पडलो होतो. पूर्वी फोनचा अर्ज केल्यापासून फोन मिळायला दहा-दहा वर्षे थांबायला लागायचे. माझ्या अनेक ओळखीच्यांकडे १९८२-८३ च्या सुमारास फोनचा अर्ज केल्यानंतर १९९२-९३ मध्ये फोन आले होते. नंतरच्या काळात दहा वर्षे थांबायला लागत नसेल पण तीन-चार वर्षे नक्कीच थांबायला लागायचे. भारतात फोन ऑन डिमांड ही परिस्थिती आली ती १९९८ च्या सुमारास. सॅम पित्रोदांचा टेलिकॉम कमिशनचे प्रमुख म्हणून कार्यकाळ त्यापूर्वी बराच काळ आधी संपला होता. मग पित्रोदांनी नक्की कोणती टेलिकॉम क्रांती भारतात आणली? अगदी १९९७-९८ मध्ये मुंबईत फोर्टमध्ये हातात मोबाईल फोन घेऊन त्यावर बोलत चालणारे लोक स्वत:ला फार उच्चभ्रू समजायचे आणि मी म्हणजे कोण आणि बाकी सगळी दुनिया झाडू असा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. अशा लोकांना मी स्वत: बघितलेले आहे. पण त्यानंतर ५-६ वर्षातच मोबाईल फोन अगदी रस्त्यावर भाजी विकणाऱ्यापर्यंत गेला. ती खरी टेलिकॉम क्रांती म्हणता येईल. या क्रांतीचा सॅम पित्रोदांशी काहीही संबंध नाही. https://data.worldbank.org/indicator/IT.MLT.MAIN.P2?end=1989&locations=… या लिंकवर जागतिक बँकेच्या वेबसाईटवर विविध देशांमध्ये दर १०० लोकांमागे किती फोन होते हा १९६० ते १९८९ या काळातील विदा आहे. १९८९ पर्यंतचा डेटा म्हणजे अर्थातच लॅन्डलाईन फोन होते. यात बघता येईल की १९६० ते १९८४ पर्यंत जितका वाढीचा वेग होता तितकाच नंतरची पाच वर्षेही राहिला. भारत अफगाणिस्तान, म्यानमार वगैरे देशांच्या पुढे होता पण पाकिस्तान, केनिया, इंडोनेशिया वगैरे देशांच्या मागे होता. खरं तर १९८५ ते १९८९ या काळात पाकिस्तानात फोनचा प्रसार अधिक वेगाने झाला हे त्या लाईन्सच्या स्लोपवरून कळेलच. १९८९ मध्ये पाकिस्तानने केनियाला मागे टाकले. आणि तुलना करताना अमेरिका, जर्मनी वगैरे देशांशी नाही तर पाकिस्तान, केनिया, इंडोनेशिया वगैरे म्हणजे भारतासारखीच आर्थिक स्थिती असलेल्या देशांशी तुलना करत आहे. मग कसली डोंबलाची टेलिकॉम क्रांती या महाशयांनी आणली होती? संगणकक्रांती दुसरी भूलथाप म्हणजे राजीव गांधींनी भारतात संगणकक्रांती आणली. राजीव गांधी पंतप्रधान असताना संगणकाचा प्रसार अधिक प्रमाणात झाला (आताच्या तुलनेत ०.१% ही नाही) असेल तर ती संगणकक्रांती राजीव गांधींनी आणली असे म्हणायचे असेल तर मग त्याच न्यायाने एच.डी.देवेगौडांनी भारतात इंटरनेट क्रांती आणली असे म्हणायला हवे. बरं टी.सी.एस वगैरेंची स्थापना राजीव गांधी पंतप्रधान होण्यापूर्वी अनेक वर्षे झाली होती त्याचे काय? इन्फोसिसची स्थापनाही १९८१ मधील- राजीव पंतप्रधान व्हायच्या तीन वर्षे आधीची. मग भारतात राजीव गांधींनी संगणकक्रांती नक्की कसली आणि कुठून आणली? बोफोर्स राजकीय दृष्ट्याही राजीव गांधी हे अत्यंत अपरिपक्व नेते होते. १६ एप्रिल १९८७ रोजी बोफोर्स कंपनीने भारताकडून तोफांचे कंत्राट मिळवायला मध्यस्थांना लाच दिली ही बातमी स्विडीश रेडिओवर आल्यानंतर सुरवातीला थेट आरोप पंतप्रधानांवर नव्हताच तर तो मध्यस्थांवर होता. असे असताना राजीव गांधींनी 'मी किंवा माझ्या कुटुंबियांपैकी कोणीही लाच स्विकारलेली नाही' असे हजारदा म्हटले. त्याची काय गरज होती? की ते चोराच्या मनातले चांदणे होते? बोफोर्स प्रकरण उघडकीला यायच्या आधी वि.प्र.सिंग संरक्षणमंत्री असताना त्यांनी एच.डी.डब्ल्यू या जर्मन कंपनीकडून पाणबुड्या विकत घ्यायच्या व्यवहारातही बोफोर्सप्रमाणेच लाच दिली गेली या आरोपाची चौकशी सुरू केली होती. त्यावेळी ११ एप्रिल १९८७ या दिवशी राजीव गांधींनी वि.प्र.सिंगांना 'ती जर्मन कंपनी कोणाकोणाला लाच दिली हे थोडीच जाहीर करणार आहे' असे म्हटले होते. हा उल्लेख मी India since independence making sense of Indian politics या व्ही. कृष्ण अनंत या जनेयुच्या प्रोफेसरने लिहिलेल्या पुस्तकात वाचला आहे. अयोध्या अयोध्येत राम जन्मभूमीचे १९४९ पासून असलेले कुलूप उघडले. यावर कोणी म्हणेल की राजीव सरकारने फैजाबाद जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.पण तो आदेश आल्यापासून ४० मिनिटात कुलूप उघडले जाणे आणि तिथे दूरदर्शनचे कॅमेरे आधीपासून हजर असणे यावरूनच काहीतरी ’फिक्सिंग’ त्यात होते असे म्हटले तर काय चुकले?पुढे राजीव सरकारनेच शीलान्यासाला परवानगी दिली.गृहमंत्री बुटासिंग तिथे हजर होते. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सुरवात राजीव गांधींनी फैजाबादपासून केली.आता कोणी म्हणेल की कुठून तरी सुरवात करायची ती फैजाबादपासून केली (संस्कृतमधला अशोकवनिकान्याय). पण या सगळ्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींनी नेमकी फैजाबादपासूनच प्रचाराला सुरवात करणे नक्की काय दर्शविते? वातावरण तापविल्याबद्दल संघ परिवार जितका दोषी आहे त्यापेक्षा जास्त तशी पार्श्वभूमी बनायला पंतप्रधान असताना मदत केल्याबद्दल राजीव गांधी जबाबदार आहेत असे म्हटले तर? श्रीलंका १९८० च्या दशकात तामिळ वाघांना आपण (म्हणजे भारत सरकार) उघडपणे समर्थन देत होतो हे जगजाहिर आहे. म्हणजे पाकिस्तान काश्मीरमध्ये आता करत आहे ते आपण श्रीलंकेत १९८० च्या दशकात करत होतो आणि ते पण उघडपणे. मे १९८७ च्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकन सैन्याने तामिळ वाघांविरूध्द मोहिम उभारून त्यांना जाफनात चांगलेच अडचणीत आणले होते. ३० मे १९८७ रोजी ऑपरेशन पूमलाई या नावाने भारतीय हवाईदलाची विमाने जाफनात गेली आणि त्यांनी अडचणीत सापडलेल्या तामिळ वाघांसाठी मदत म्हणून काही गोष्टी खाली टाकल्या. इतकेच नव्हे तर परराष्ट्रराज्यमंत्री नटवरसिंग यांनी श्रीलंकेच्या दिल्लीतील राजदूताला बोलावून घेऊन आमची विमाने तुमच्या देशात जाऊन असे करणार आहेत त्यांना श्रीलंकेकडून कोणताही प्रतिकार झाल्यास गंभीर परिणाम होतील ही दमदाटी केली. उद्या काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे अशी हाकाटी करत पाकिस्तानची विमाने श्रीनगरमध्ये येऊन त्यांनी जमिनीवर मदत टाकली तर ते आपल्याला चालेल का? श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचे पूर्ण उल्लंघन राजीव गांधींच्या या अविचारी कृतीने झाले होते. हा प्रकार अंगाशी येणार हे दिसताच मग बाजू बदलून स्वत: राजीव गांधींनी कोलंबोत जाऊन अध्यक्ष जयवर्धने यांच्याशी करार करून तामिळ वाघांविरूध्द लढायला भारतीय शांतीसेना पाठवली. आपल्या सैनिकांवर श्रीलंका सरकारचा विश्वास असायचे कारणच नव्हते आणि तामिळ वाघ पण विरोधात गेले. अशा दोन्ही बाजूंनी अडचणीत आलेल्या आपल्या शांतीसेनेचे १३०० पेक्षा जास्त सैनिक श्रीलंकेत मारले गेले होते. नक्की कोणत्या कारणासाठी राजीव गांधींनी आपल्या सैनिकांचे बळी दिले? असो. आद्य पप्पू राजीव गांधींचे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शहाबानो प्रकरणात मुस्लिम धर्मांधांसमोर लोटांगण घालून कोट्यवधी मुस्लिम महिलांना अंधारात ढकलून देण्याच्या निर्णयाचा उल्लेख राहिला की. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, "महावृक्ष कोसळल्यानंतर आजूबाजूची जमीन हादरतेच" असे सांगून हजारो शिखांच्या हत्याकांडाचे समर्थक सुद्धा राहिले की. हरकिशनलाल भगत, ललित माखन, जगदीश टायटलर, सज्जनकुमार, धरमदास शास्त्री या हजारो शिखांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपींना मंत्रीपदाचे बक्षीस देण्याचा उल्लेखही राहिला की.