उत्तम चित्रपटाची तितकीच उत्तम ओळख. ट्रॉय हा चित्रपट ३०० आणि ग्लॅडीएटर प्रमाणे खुप आवडला. युद्धप्रसंग अप्रतिम चित्रीत केले आहेत. ब्रॅड पीटने उभा केलेला योद्धा अकिलीज पाहण्यासारखा आहे. एरीक बाना संवेदनशील पण तितकाच लढाऊ हेक्टर अप्रतिमच. एकदा जरुर पहा.
एरीक बाना संवेदनशील पण तितकाच लढाऊ हेक्टर अप्रतिमच
अगदी असंच वाटलं होतं सिनेमा बघून. तसाही अकिलीजच्या बेमुर्वतपणा, पॅरीस आणि हेलनचा अल्लडपणा ह्यांच्यासमोर हेक्टरचा समंजसपणा गोष्टीतही भावला होताच. एरिक बानाने खरंच ती तगमग खूप सुंदर व्यक्त केली आहे.
परा सुंदर परीक्षण! आता पुन्हा सिनेमा पहीन.
मोठी स्टार कास्ट असलेला सिनेमा.
फेस दॅट लॉन्च्ड थाउसंड शिप्स म्हणले जाणारी हेलनचे काम करणारी अभिनेत्री फारच मामुली पेश केली आहे असे वाटले. बाकी कलाकारांनी काम चोख केले आहे पण स्टोरी इतकी प्रभावी वाटली नाही खरी.
अकिलीजने बोगॅरीसची केलेली हत्या हा प्रसंग लै भारी.
जाताजाता - शेखर कपूरने दिग्दर्शीत केलेला "एलीझाबेथ - द गोल्डन इयर्स" (नवा २००७ सालचा जुना १९९८ नव्हे) छान आहे खरा. इंग्रज, स्पॅनिश लोकांचा रक्तरंजीत राजकारण इतिहास, धर्मसत्ता-राजकारणात असहाय परिस्थीतीची गुलाम इलिझाबेथ, घडत गेलेले प्रसंग व बनलेला इतिहास फार छान दाखवले आहे.
खरं तर मला ऐतिहासीक सिनेमे आवडतात पण ट्रॉय काही फारसा आवडला नाही. अकीलीजचे केलेले अविश्वसनीय उद्दात्तीकरण, स्टीक्स या मायावी नदित बुडवल्यमुळे तो जरी अजिंक्य योध्या असला तरी सुद्धा त्याचा वावर (ब्रॅड पीट जरा अतीच करतो त्यामुळे असेल) मात्र तसा वाटत नाही.
'मायथॉलॉजीकल कथा असल्यामुळे काही प्रसंग 'काहीच्या काही' असले तरी ते चांगल्या प्रकारे चित्रीत करता आले असते असे वाटते.
ट्रॉय , ३०० , ग्लॅडियेटर .... अल्टिमेट मुव्हीज .. कधीही आणि कितीही वेळा पहा .. बोर नाही होत .. आपल्या कडे एक जोधा अकबर का कोणता तरी फालतू सिनेमा आला होता .. त्यात काही ट्रॉय मधले ढापलेले सिन्स जश्शेच्या तश्शे टाकले होते.
असो .. पर्या मस्तंच लेख आहे रे ..
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर लिही एकदा .. च्यामायला ८ वेळा पाहुन पण काही पुर्ण कळलाय असं वाटत नाही ,,, तरीही आवडतो तो चित्रपट
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर लिहिच रे परा...
बाकी ट्रॉय चे परिक्षण मस्तच
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
चांगली माहिती मिळाली. अशी माहिती न वाचता इंग्रजी पिक्चर बघायला गेलो तर काही कळत नाही. माहिती वाचून सिनेमा काय आहे ते कळेल.
धन्यवाद
अमोल
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
प्रा धन्यवाद, सुंदर विवेचनाबद्दल.
केवळ अप्रतिम चित्रपट, माझ्या आवडत्यांपैकी एक.
हेक्टरची भुमिका अकीलीजपेक्षा उजवी वाटते. अकीलीज अतिउद्दात्तीकरण केले गेले आहे.
माझा फेवरीट चित्रपट. सगळे युद्ध प्रसंग तर केवळ अप्रतीम चित्रीत केलेत.
छान परिक्षण
परिक्षण लिहेलेल्या २ वाक्यांव्यतीरीक्त अजून २ वाक्य फार आवडतात, १ म्हणजे मेनेलॉस सुरवातीला टोस्ट करताना म्हणतो-
"may the gods keep wolves in the hills and women in our beds"
आणी तो १ ग्रीक राजा अकीलीज ला म्हणतो
"in war young men die and old men talk"
एरीक बाना चा अभिनय ब्रड पिट पेक्शा उजवा वाट्तो.
सुजय
छान लिहले आहेस...
स्पार्टाची सौंदर्यवती राणी हेलनला पाहण्यासाठी तरी एकदा हा चित्रपट पाहावा म्हणतो... ;)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
छान आढावा आहे रे पर्या चित्रपटाचा...
एरिक बाना चा अभिनय उत्तम..त्याने ब्लॅक हॉक डाउन मधे पण धमाल केलीय..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सुरेखच चित्रपट होता हा. पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे ईलियड आणि ओडीसी या दोन्ही महाकाव्याचा जो खरा नायक आहे त्या युलीसिसच्या पात्राला चित्रपटात खुपच कमी वाव देण्यात आलेला आहे. अर्थात एरिक बाना आणि ब्रॅड पीट सारखे दिग्गज असल्याने ते जाणवूनही येत नाही म्हणा.
अकिलीसचा कमालीचा थंडपणा आणि युद्धक्षेत्रावर आल्यावर मात्र त्याचे बदलणारे रौद्र रुप दोन्ही ब्रॅड पीट समर्थपणे दाखवतो.
मला मात्र यापेक्षा तरीही '३०० मेन' जास्त आवडला होता.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मस्त लिहीलेय. दुसरा फोटू जबरा हाय.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
पण ब्रॅड पिट पेक्षा नानाचा जहाजावरील रोल अप्रतिम. ग्रीसच्या महालातील अनुपम खेर आणि परेश रावल ह्यांची अभिनयातील जुगलबंदी लक्षात राहते. आयटम साँग नसल्यामुळे थोडा रुक्ष व मिळमिळीत वाटतो पण मल्लिकाचे कवि संमेलन थोडासा दिलासा देऊन जाते.
प्रतिक्रिया
छान
एरीक बाना
छान !
परिक्षण
सही.
काहीसे असेच मत.
ट्रॉय , ३००
+१
+२
चांगली
मस्त रे
परा छान परीक्षण रे
सुंदर!
चित्रपटाची ओळख छानच
छान
प्रा
माझा
मस्त रे
लवकरच बघणार...
छान लिहले
ल्हान्पणी
ठीकठाक आहे
सहमत!!
छान आढावा
ट्रॉय....
पा ही न
छान
मस्त
चित्रपट एकदम बघणीय आहे.