बाप्पाचा नैवेद्य - चाॅको कोकोनट लाडू
साहित्य :
चॉकलेट कंपाउंडचे तुकडे : एक वाटी
डेसिकेटेड कोकोनट : दोन वाट्या
बदाम-काजू-पिस्ता पूड : एक वाटी
कंडेन्स्ड मिल्क : तीन चमचे
कृती :
प्रथम डेसिकेटेड नारळ आणि सुकामेव्याची पूड एकत्र करून बाजूला ठेवावी. चॉकलेटचे तुकडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून हाय पॉवरवर मिनिटभर ठेवून वितळवून घ्यावेत. मायक्रोवेव्ह नसेल तर गॅसवर भांड्यात पाणी घेऊन त्यात आणखी एक भांडे ठेवावे, त्यात चॉकलेट टाकून वितळवावे.
आता हे वितळलेले चॉकलेट चमच्याने एकसारखे करून त्यात कंडेन्स्ड मिल्क, डेसिकेटेड नारळ व सुकामेव्याचे मिश्रण अंदाज घेत मिसळावे.
आता याचा छान गोळा तयार होईल. याचे एकसारखे लाडू वळून ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत.
हवे तर मोदक साच्यात घालून याचे मोदकही करता येतील.
करायला सोपे आणि मोजक्या साहित्यात होणारे हे लाडू चवीला मस्त लागतात.

वाचने
19854
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
अरे वा! मस्त लागत असतील हे लाडू.सोपे आहेत करायलाही.
खूपच छान प्रकार! चॉकोलेटचं काय काय बनवतेस ग!
डेसिकेटेड कोकोनटच्या जागी, "खवलेला सुका नारळ" किंवा "सुक्या खोबऱ्याचा किस" म्हणले असते तर जास्त बरे वाटले असते, मराठी संस्थळ असल्यामुळे.....
बाकी पाकृ निर्विवाद झकास आहे!
(मराठीशी इमानदार श्वान) ढेल्या
In reply to डेसिकेटेड कोकोनटच्या जागी, by फेदरवेट साहेब
हो खवलेला सुका नारळ नक्कीच चालले असते.लक्षात आले नाहि.
धन्यवाद!
ताजा नारळ वापरला तर चालेल का?
In reply to सोप्पी पाकृ इशा! by अनन्न्या
नाहि. ओलसर होतील, टिकायचे नाहीत आणि वळले जातील कि नाहि शंका.
सोप्पी आहे कृती, करून बघणार.
कडवट चॉकलेट असते ते वापरायचे का की आपले नेहमीचे?
In reply to कडवट चॉकलेट असते ते वापरायचे by यशोधरा
मिल्क वा डार्क चॊकलेट कंपाऊण्ड कुठलेही चालेल.छान लागतात.
In reply to कडवट चॉकलेट असते ते वापरायचे by यशोधरा
मिल्क वा डार्क चॊकलेट कंपाऊण्ड कुठलेही चालेल.छान लागतात.
छानच दिसत आहेत हे चॉको कोकोनट लाडू.. पाकृही सोपी आहे. मस्तच!
स्वाती
अरे वाह, मस्तं दिसताहेत लाडू.
फोटो बघूनच करून खाण्याची इच्छा होते आहे. सध्या तरी डोळे तृप्त झाले.
लाडू भारी दिसताहेत. आवडले.
-दिलीप बिरुटे
सुंदर प्रसाद, सोपा
लाडू आवडले. सोपे वाटतायत.
असला नैवेद्य घरी केला तर बाप्पाच्या आधी माझ्याच पोटात जाईल हे नक्की. :)
वाह ईशे मस्तच
Isha,mastch.
स्वादिष्ट प्रसाद!!
या लाडूत पाक करायचा नाहीय म्हणून नक्की करायचा प्रयत्न केला जाईल.
मस्त दिसताहेत लाडू एकदम. झक्कासच
सहिच दिअसताह्त लाडु :)
तों.पा.सु.
कृती प्रमाणे करुन पाहिले मस्तच होतात. फक्त सुका नारळ अगदी थोड्या प्रमाणात भाजुन घेतला होता मी. सर्व लाडू फस्त झाले लगेच. आणि डार्क चॊकलेट कंपाऊंड वापरले होते
In reply to मस्तच आहे by सत्याचे प्रयोग
धन्यवाद करुन इथे कळवल्याबद्दल!
फार च छान ! सुबक आणि देखणी पाकृ.
मी आल्यावर फ्लॉवर न आणता चॉकोलेट कंपाऊंड विकत आणण्याची सदबुद्धी बाप्पा तुला देओ ;)
छानच आयडिया! येच तु त्या वितळलेल्या चोकलेटात फ्लॉवर तुरे बुडवून देइन ;)
In reply to छानच आयडिया! येच तु त्या by इशा१२३
वरचं चॉकोलेट खाऊन तुरे साभार परत देण्यात येतील ;)
छानच आयडिया! येच तु त्या वितळलेल्या चोकलेटात फ्लॉवर तुरे बुडवून देइन ;)
वा. मस्त, सोपी पाकृ!
वाह! वाह! मस्तं पाककृती
फोटो पाहून तोंपासू.
आहा सुरेख. चॉकलेट आणि कोकोनट चा सुरेख मेळ.
खुप छान. चॉकलेट आणि कोकोनट माझे फेवरेट कॉम्बीनेशन आहे.
अरे वा! मस्त लागत असतील हे