बाप्पाचा नैवेद्य - चाॅको कोकोनट लाडू

इशा१२३ लेखमाला
साहित्य : चॉकलेट कंपाउंडचे तुकडे : एक वाटी डेसिकेटेड कोकोनट : दोन वाट्या बदाम-काजू-पिस्ता पूड : एक वाटी कंडेन्स्ड मिल्क : तीन चमचे . कृती : प्रथम डेसिकेटेड नारळ आणि सुकामेव्याची पूड एकत्र करून बाजूला ठेवावी. चॉकलेटचे तुकडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून हाय पॉवरवर मिनिटभर ठेवून वितळवून घ्यावेत. मायक्रोवेव्ह नसेल तर गॅसवर भांड्यात पाणी घेऊन त्यात आणखी एक भांडे ठेवावे, त्यात चॉकलेट टाकून वितळवावे. . आता हे वितळलेले चॉकलेट चमच्याने एकसारखे करून त्यात कंडेन्स्ड मिल्क, डेसिकेटेड नारळ व सुकामेव्याचे मिश्रण अंदाज घेत मिसळावे. आता याचा छान गोळा तयार होईल. याचे एकसारखे लाडू वळून ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत. हवे तर मोदक साच्यात घालून याचे मोदकही करता येतील. . करायला सोपे आणि मोजक्या साहित्यात होणारे हे लाडू चवीला मस्त लागतात. .

34 टिप्पण्या 19,854 दृश्ये

Comments

पैसा नवीन

खूपच छान प्रकार! चॉकोलेटचं काय काय बनवतेस ग!

फेदरवेट साहेब नवीन

डेसिकेटेड कोकोनटच्या जागी, "खवलेला सुका नारळ" किंवा "सुक्या खोबऱ्याचा किस" म्हणले असते तर जास्त बरे वाटले असते, मराठी संस्थळ असल्यामुळे..... बाकी पाकृ निर्विवाद झकास आहे! (मराठीशी इमानदार श्वान) ढेल्या

स्वाती दिनेश नवीन

छानच दिसत आहेत हे चॉको कोकोनट लाडू.. पाकृही सोपी आहे. मस्तच! स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

लाडू भारी दिसताहेत. आवडले. -दिलीप बिरुटे

सत्याचे प्रयोग नवीन

कृती प्रमाणे करुन पाहिले मस्तच होतात. फक्त सुका नारळ अगदी थोड्या प्रमाणात भाजुन घेतला होता मी. सर्व लाडू फस्त झाले लगेच. आणि डार्क चॊकलेट कंपाऊंड वापरले होते

स्रुजा नवीन

फार च छान ! सुबक आणि देखणी पाकृ. मी आल्यावर फ्लॉवर न आणता चॉकोलेट कंपाऊंड विकत आणण्याची सदबुद्धी बाप्पा तुला देओ ;)