घसा जरा जास्तच ओला झाला की....
फुटपाथ वरच्या रस्त्याने, अगदी सावकाश चालत यावे |
खिडकीचे दार उघडून ,कुलूप हळूच ढकलून द्यावे ||
आपलाच पाय आत ठेवावा, पाटीवरचे दार पाहात |
समजेल की आपल्याच घरात, तुम्ही वाट चुकला आहात ||
कळेल जेव्हा मनावरचा ताबा ,इतका सुटला आहे |
आरशात पाहून म्हणाल ,हा अनोळखी माणूस कुठला आहे?
ओल्या गोष्टी उशीराच वाळतात ,त्यात तुमची चूक नाही |
पण अशा वेळी मात्र ,झोपेसारखं दुसरं सुख नाही ||
म्हणून उशीवर चादर टाकून ,गादीची छान सोय करावी |
पायांवरती पडून जरा ,पाठ लांबवर पसरावी ||
स्वप्नात डोळे करता करता ,विचारांची उघडझाप होते |
रात्रीच्या आठवणीतच ,आख्खी बाटली निघून जाते ||
काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल |
घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल ||
आता फक्त काही ग्लास काढायचे ,तोवर पुढचा तास येतोच आहे |
कोंबडा उगवला एकदाचा ,सूर्य बांग देतोच आहे ||
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2109
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
काट्यांमध
आँ!!!
ओला जरा जास्तच घसा झाला आहे की
:)
और भी आने दो...
निशब्द
हाहाहा.. आव
+१ एक्जॅक्टली हेच म्हणतो!
In reply to हाहाहा.. आव by प्राजु
सलाम..
धन्यवाद!!