मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*

बाकरवडी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा* आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी (आणि मिसळपाव वर)सगळीकडे जालिंदर बाबा यांची चर्चा चालू आहे. याकाळात लोकांना आलेले अनुभव आणि वाढत जाणारी भक्तसंख्या आपण सर्व जाणताच ! त्यामुळे आम्ही जालिंदर जलालाबादी बाबा यांची आरती लिहीण्याची स्पर्धा जाहीर करत आहे. तरी सर्व कवींनी , विडंबनकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. ही स्पर्धा १५ एप्रिल २००९, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहील, तरी इच्छुकांनी आपली आरती (जालिंदर जलालाबादी यांची) येथे मुदतीपूर्वी प्रकाशित करावी लगेचच म्हण्जे १६ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल व ३ उत्तम अशा आरत्यांना विजयी घोषित करण्यात येइल. प्रथम क्रमांक : जालिंदर जलालाबादी बाबा यांचा फोटो असलेली फोटोफ्रेम. द्वितीय क्रमांक :बाबांचा फोटो असलेले लॉकेट. तृतीय क्रमांक :जालिंदर जलालाबादी बाबांचा फोटो असलेले पेन. आणि विजेत्यांना आमच्या खव मधे आठवडाभर (जालिंदर जलालाबादी बाबा सप्ताह), त्यांनी लिहीलेल्या आरती सकट स्थान देण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना 'अंगारा' व 'तीर्थ' ! चला तर मग सर्व भक्तगणांनो लिहीण्यास सुरुवात करा. जालिंदर बाबा की जय ! जालिंदर बाबांचा विजय असो ! ( अवांतर पण महत्वाचे :- स्पर्धेला नियम व अटी लागू. परीक्षकांचा (माझा) निर्णय अंतिम राहील. सर्व पारीतोषिकांचे प्रायोजक आपले सुप्रसिद्ध मिपाकर आणि जलालाबादी बाबांचे परम भक्त 'खराटा' हे आहेत.खराटा यांच्या पूजनीय 'साहित्य भांडार' मधून बक्षिसे देण्यात येतील. http://misalpav.com/node/7190 )

वाचने 2379 वाचनखूण प्रतिक्रिया 8

नितिन थत्ते 11/04/2009 - 20:44
मी प्रायोजक आहे म्हटल्यावर मला स्पर्धेत भाग घेता येणार नाही. एका चांगल्या आरतीला मिपाकर मुकणार. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

बाकरवडी 12/04/2009 - 07:41
ओ तुम्ही आरती लिहू शकता . नि:स्वार्थी मनाने काम करा , फळाची अपेक्षा करु नका. आणि हो स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर विजेत्यांना मी तुमच्या भांडाराचा पत्ता देइनच ! बाकी ते व्यवहाराचे आपण नंतर बघूच ! (खराटा यांच्याशिवाय कोणीही वाचु नये:- नाहीतरी तुम्ही आरती लिहीणार आहात्च तर तुम्हाला नंबर देउन टाकू काय? ;) )

नितिन थत्ते 12/04/2009 - 10:56
जालिंदरजींचा महिमा असा की आरती स्पर्धा जाहीर होताच जे न देखे रवी सदरातील लिखाण एकदम आटले. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by अनंता

घाशीराम कोतवाल १.२ 28/04/2009 - 15:57
मग बिले वेळच्या वेळी भरावीत माणसाने मग आऊटगोइंग कॉल्स बंद होत नाहित नाय तर हा एक रुपाया घ्या माझ्या कडुन आनी पी सी ओ वरुन फोन करा ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

अनंता 28/04/2009 - 16:06
आऊटगोइंग कॉल्स हे क्रिप्टीक आहे. आपला : (लबाड लांडगा) अनंता. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

घाशीराम कोतवाल १.२ 28/04/2009 - 16:28
पी सी ओ हे पण क्रिप्टीक आहे. ते तुमाला नाय कळणार तात्याना अवलियांना प्रभुना कळल असेल (पालथ्या धंद्यातला एक्सपर्ट ) कोतवाल ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!