Skip to main content

*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*

लेखक बाकरवडी यांनी शनिवार, 11/04/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा* आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी (आणि मिसळपाव वर)सगळीकडे जालिंदर बाबा यांची चर्चा चालू आहे. याकाळात लोकांना आलेले अनुभव आणि वाढत जाणारी भक्तसंख्या आपण सर्व जाणताच ! त्यामुळे आम्ही जालिंदर जलालाबादी बाबा यांची आरती लिहीण्याची स्पर्धा जाहीर करत आहे. तरी सर्व कवींनी , विडंबनकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. ही स्पर्धा १५ एप्रिल २००९, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहील, तरी इच्छुकांनी आपली आरती (जालिंदर जलालाबादी यांची) येथे मुदतीपूर्वी प्रकाशित करावी लगेचच म्हण्जे १६ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल व ३ उत्तम अशा आरत्यांना विजयी घोषित करण्यात येइल. प्रथम क्रमांक : जालिंदर जलालाबादी बाबा यांचा फोटो असलेली फोटोफ्रेम. द्वितीय क्रमांक :बाबांचा फोटो असलेले लॉकेट. तृतीय क्रमांक :जालिंदर जलालाबादी बाबांचा फोटो असलेले पेन. आणि विजेत्यांना आमच्या खव मधे आठवडाभर (जालिंदर जलालाबादी बाबा सप्ताह), त्यांनी लिहीलेल्या आरती सकट स्थान देण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना 'अंगारा' व 'तीर्थ' ! चला तर मग सर्व भक्तगणांनो लिहीण्यास सुरुवात करा. जालिंदर बाबा की जय ! जालिंदर बाबांचा विजय असो ! ( अवांतर पण महत्वाचे :- स्पर्धेला नियम व अटी लागू. परीक्षकांचा (माझा) निर्णय अंतिम राहील. सर्व पारीतोषिकांचे प्रायोजक आपले सुप्रसिद्ध मिपाकर आणि जलालाबादी बाबांचे परम भक्त 'खराटा' हे आहेत.खराटा यांच्या पूजनीय 'साहित्य भांडार' मधून बक्षिसे देण्यात येतील. http://misalpav.com/node/7190 )
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2385
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मी प्रायोजक आहे म्हटल्यावर मला स्पर्धेत भाग घेता येणार नाही. एका चांगल्या आरतीला मिपाकर मुकणार. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

ओ तुम्ही आरती लिहू शकता . नि:स्वार्थी मनाने काम करा , फळाची अपेक्षा करु नका. आणि हो स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर विजेत्यांना मी तुमच्या भांडाराचा पत्ता देइनच ! बाकी ते व्यवहाराचे आपण नंतर बघूच ! (खराटा यांच्याशिवाय कोणीही वाचु नये:- नाहीतरी तुम्ही आरती लिहीणार आहात्च तर तुम्हाला नंबर देउन टाकू काय? ;) )

जालिंदरजींचा महिमा असा की आरती स्पर्धा जाहीर होताच जे न देखे रवी सदरातील लिखाण एकदम आटले. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by अनंता

मग बिले वेळच्या वेळी भरावीत माणसाने मग आऊटगोइंग कॉल्स बंद होत नाहित नाय तर हा एक रुपाया घ्या माझ्या कडुन आनी पी सी ओ वरुन फोन करा ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!! http://lh4.ggpht.com/_mDH8

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

आऊटगोइंग कॉल्स हे क्रिप्टीक आहे. आपला : (लबाड लांडगा) अनंता. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

पी सी ओ हे पण क्रिप्टीक आहे. ते तुमाला नाय कळणार तात्याना अवलियांना प्रभुना कळल असेल (पालथ्या धंद्यातला एक्सपर्ट ) कोतवाल ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!! http://lh4.ggpht.com/_mDH8