(फुकट सकाळ)
(आमच्या घरात दर शुक्रवारच्या मित्रमंडळी आयोजित 'पोकर नाईट' नंतर शनिवारी सकाळी सगळे काही/सगळे जण ठप्प होते/होतात. अशा एका शनिवार सकाळचे हे चित्र)
फुकट सकाळ
***
कुठे कोण पडले पहाटे बघितले
कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते
सुटीच्या सकाळी असावे तसे हे
पहा फक्त पेले रिकामे रिकामे
***
नि ओट्यावरी आकृत्या बाटल्यांच्या
(नि सोफ्यावरी मित्रही सांडलेले!)
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
निघाले धुराचे किती लोट होते
फुप्फुसातुनी? घाबरा जाहलो मी
***
आधारीतः धुकट सकाळ
वाचने
3133
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
हाहा
मस्तच बेला!
सही
झकास
छान
फारच छान विडंबन...!
हा हा हा...
मस्तच
अरे!