मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जुनेरलं नातं...

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जुनेरल्या नात्यामध्ये ऊब गोधडीची; विरलेले धागे तरी जर ओळखीची.. जुनेरल्या नात्यामध्ये अबोल पाऊस; भिजलेले मन तरी डोळा ना टिप्पूस.. जुनेरल्या नात्यामध्ये सल ही जुनीच; गळाभेट नाही परी सय नेहमीच.. जुनेरल्या नात्यामध्ये शब्द हरवले.. जुनेरले नाते आता मुके मुके झाले.. जुनेरले नाते सख्या नशिबाचा खेळ.. पाय निघता निघेना आली निरोपाची वेळ .... आली निरोपाची वेळ.

वाचने 3291 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सर्वप्रथम "जुनेरले" ह्या शब्दासाठी अभिनंदन. प्रथमच ऐकला. पण त्यातुन भावना पोचत आहेत. शेवटचा ट्विस्ट आवडला. खरेच नाते जुनेरले होणे आजकाल नशिबाचा खेळच आहे.......

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/07/2024 - 07:38
नेहमीच काहीतरी वेगळं देऊन जातात. प्रतीपदेची चंद्रकोर बघून सुचलेल्या काही ओळी अर्धवट राहील्या होत्या त्या आज पुर्ण झाल्यासारखे वाटले.