जुनेरल्या नात्यामध्ये
ऊब गोधडीची;
विरलेले धागे तरी
जर ओळखीची..
जुनेरल्या नात्यामध्ये
अबोल पाऊस;
भिजलेले मन तरी
डोळा ना टिप्पूस..
जुनेरल्या नात्यामध्ये
सल ही जुनीच;
गळाभेट नाही परी
सय नेहमीच..
जुनेरल्या नात्यामध्ये
शब्द हरवले..
जुनेरले नाते आता
मुके मुके झाले..
जुनेरले नाते सख्या
नशिबाचा खेळ..
पाय निघता निघेना
आली निरोपाची वेळ
....
आली निरोपाची वेळ.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3319
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
धन्यवाद सर!
In reply to सुंदर by चांदणे संदीप
सुंदर रचना
धन्यवाद.:)
In reply to सुंदर रचना by कर्नलतपस्वी
ओह सुरेख
Thank you . :)
In reply to ओह सुरेख by माहितगार
वाह!! सुंदर कविता
खूप खूप धन्यवाद.
In reply to वाह!! सुंदर कविता by राजेंद्र मेहेंदळे
प्राची ताईंच्या कवीता
ती स्वतंत्र कविताघ्च आहे. आणि
In reply to प्राची ताईंच्या कवीता by कर्नलतपस्वी
आली निरोपाची वेळ.>>
:)
In reply to आली निरोपाची वेळ.>> by भागो
वाह!
धन्यवाद!.
In reply to वाह! by किसन शिंदे