Skip to main content

जुनेरलं नातं...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 05/03/2024 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
जुनेरल्या नात्यामध्ये ऊब गोधडीची; विरलेले धागे तरी जर ओळखीची.. जुनेरल्या नात्यामध्ये अबोल पाऊस; भिजलेले मन तरी डोळा ना टिप्पूस.. जुनेरल्या नात्यामध्ये सल ही जुनीच; गळाभेट नाही परी सय नेहमीच.. जुनेरल्या नात्यामध्ये शब्द हरवले.. जुनेरले नाते आता मुके मुके झाले.. जुनेरले नाते सख्या नशिबाचा खेळ.. पाय निघता निघेना आली निरोपाची वेळ .... आली निरोपाची वेळ.
लेखनविषय:

वाचने 3319
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सुंदर रचना. सं - दी - प

ओह " आली निरोपाची वेळ." अचानक गंभीर टर्न देणार्‍या या शेवटच्या ओळीसाठी

सर्वप्रथम "जुनेरले" ह्या शब्दासाठी अभिनंदन. प्रथमच ऐकला. पण त्यातुन भावना पोचत आहेत. शेवटचा ट्विस्ट आवडला. खरेच नाते जुनेरले होणे आजकाल नशिबाचा खेळच आहे.......

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

खूप खूप धन्यवाद. जुनेरले हा शब्द माझा नाही. मी फेसबुकवर कुठेतरी वाचला, आवडला आणि इथं वापरला.

नेहमीच काहीतरी वेगळं देऊन जातात. प्रतीपदेची चंद्रकोर बघून सुचलेल्या काही ओळी अर्धवट राहील्या होत्या त्या आज पुर्ण झाल्यासारखे वाटले.

आशयपूर्ण कविता. अशीच काही जुनेरली नाती आठवली.