Skip to main content

मेळघाट ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 27/11/2019 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे.. पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे.. तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,.. आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे पाण्याविना आमचे रान सारे खडकाळ रे भविष्यात नसलेले माझे हे गाव रे भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे .. क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे - -शब्दमेघ ... मेळघाट डायरी २७/११/२०१९ (खुप वर्षांनी काव्य विभागात पुन्हा या शिघ्र कवितेतुन)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4338
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

तुम्ही खूप मनापासून लिहिलं आहे. पण.... खूप मनाला लावून घेऊ नका.

कवितेत पुनःप्रवेशाच्या शुभेच्छा.
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे
प्रत्ययाकारीपणे अंगावर येतंय रे.

"" आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. "" इथे थोडं काहीतरी भारदस्त हवं होत असं वाटतंय .. जसं कि "" आटलेल्या पाण्यातला, आमच्यासाठी गाळ रे.."' किंवा काहीतरी वेगळं .. पण एकंदरीत हेलावून टाकणारी झालीय .. मस्त

तुझ्या सारखे मिपाकर दिसतात म्हणूनच माणुसकीवर थोडाफार विश्वास उरला आहे

मेळघाटातील बहुतांश आदिवासी पाड्यांचे आता बाहेरील भागात विस्थापन झालेले आहे त्यामुळे त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण नक्कीच काहीअंशी कमी झालेले आहे आता.

आवडली कविता, चांङली लिहीली आहे पैजारबुवा,

क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे :(