Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणेशा on Wed, 11/27/2019 - 12:41
कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे.. पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे.. तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,.. आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे पाण्याविना आमचे रान सारे खडकाळ रे भविष्यात नसलेले माझे हे गाव रे भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे .. क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे - -शब्दमेघ ... मेळघाट डायरी २७/११/२०१९ (खुप वर्षांनी काव्य विभागात पुन्हा या शिघ्र कवितेतुन)

Submitted by मुक्त विहारि on Wed, 11/27/2019 - 13:11

Permalink

खरी गोष्ट आहे. ..

तुम्ही खूप मनापासून लिहिलं आहे. पण.... खूप मनाला लावून घेऊ नका.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Wed, 11/27/2019 - 13:13

Permalink

कवितेत पुनःप्रवेशाच्या

कवितेत पुनःप्रवेशाच्या शुभेच्छा.
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे
प्रत्ययाकारीपणे अंगावर येतंय रे.
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Wed, 11/27/2019 - 16:21

Permalink

सुंदर कम ब्याक झालेले है , भौ. आवडली ..

"" आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. "" इथे थोडं काहीतरी भारदस्त हवं होत असं वाटतंय .. जसं कि "" आटलेल्या पाण्यातला, आमच्यासाठी गाळ रे.."' किंवा काहीतरी वेगळं .. पण एकंदरीत हेलावून टाकणारी झालीय .. मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 11/27/2019 - 23:02

In reply to सुंदर कम ब्याक झालेले है , भौ. आवडली .. by खिलजि

Permalink

तुम्ही जास्त करेक्ट लिहिले

तुम्ही जास्त करेक्ट लिहिले आहे ... आमच्यासाठी गाळ रे भारी एकदम
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on गुरुवार, 11/28/2019 - 01:41

Permalink

T

तुझ्या सारखे मिपाकर दिसतात म्हणूनच माणुसकीवर थोडाफार विश्वास उरला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 11/28/2019 - 08:45

Permalink

मेळघाटातील बहुतांश आदिवासी

मेळघाटातील बहुतांश आदिवासी पाड्यांचे आता बाहेरील भागात विस्थापन झालेले आहे त्यामुळे त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण नक्कीच काहीअंशी कमी झालेले आहे आता.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Sat, 11/30/2019 - 15:07

Permalink

अंगावर आली...पण

आवडली कविता, चांङली लिहीली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Sat, 11/30/2019 - 16:20

Permalink

वास्तववादी कविता

क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे :(
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4309 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com