Skip to main content

सोनरंग

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 12/02/2018 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3267
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कवितेतले रंग आवडले. लिहित राहा. -दिलीप बिरुटे