मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली
क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली
वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला
सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला
सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा
कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा
हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी
कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3267
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
सुरेख, चित्ररूप!
+1 आवडली
In reply to सुरेख, चित्ररूप! by प्राची अश्विनी
सुरेख कविता.
कविता आवडली. लिहीत रहा.
गहिर्या रंगांनी रंगलेली
सुंदर कविता!
आवडली !
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार
सुंदर रचना!
सुंदर!!