जरी अज्ञात देशाचा
लेखनविषय:
काव्यरस
जरी अज्ञात देशाचा
किनारा गाठला होता
तरी वारा शिडामधला
जरा खंतावला होता
दूरवरचे दिवे तिथले
झळाळून पेटले होते
तरी अंधार हटवादी
जरा रेंगाळला होता
वितळत्या चंद्रबिंबाने
दशदिशा भारल्या होत्या
तरी त्या चांदरातीचा
कवडसा गोठला होता
वाचने
2254
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
वा! खूप छान आहे कविता. पण
In reply to वा! खूप छान आहे कविता. पण by एस
एस, आपल्या..
In reply to वा! खूप छान आहे कविता. पण by एस
प्लस वन टू एस.
अजून एक. 'किनारा गाठला होता'
व्वा!
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haye Ni Haye Nakhra Tera Ni, High Rated Gabru Nu Maare... ;) :- High Rated Gabru Official Songअनुपम, मदनबाण
वाह्...क्या बात है!
सत्यजित... आपल्या