Skip to main content

वादळ...

लेखक हर्षदा विनया यांनी शनिवार, 18/10/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ,घोंघावणारे, पूढेच सरसावणारं, अश्रूच्या थारोळ्यात हळूच डोकावणारं! वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ बाहेरेंच,वेगाने त्वेषात येणारं, सगळंच उध्वस्त करून सोडणारं, कि वादळ आतलं,अलगद येणारं, कूरवाळणा-या हातांनीच ओरबाड्णारं ! वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ,तूझ्यापूढे जगाला ठाकणारं, लक्तरे उडवून,मग तमाशा पाहणारं, कि वादळ,तूलाच तूझ्यासमोर ठाकणारं, आत्मपाशांच्या गूंत्यातच गूंतवणारं, वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ, तूला नकळत उडवून नेणारं, वाहवत-वाहवत,रानात नेऊन सोडणारं, कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व, स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं, वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? तूझं-तूझं की माझे आणि तूझे?? हर्षदा (६ ओक्टो. '०८) या अनूभवानंतर लिहीलेली कविता.. http://karadyaachhata.blogspot.com/2008/10/blog-post.html इथे आहे..
लेखनविषय:

वाचने 2440
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व, स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं, वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?
खल्लास! मस्त ओळी कविताही वेगळी आणि बरंच काहि सांगणारी आहे.. आवडली -(वादळी) ऋषिकेश

इथलं कवितारुपी आणि ब्लॉगावरचं स्फुटरुपी वादळ, दोन्हीही मस्तच पकडली आहेत शब्दांत. अदिती

कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व, स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं, या ओळी तर मस्तच आहेत !!!!!!!! सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by फटू

धन्यवाद.. तूमच्या ब्लोग वरंचं चित्र आवडले हो प्रचंड.. आधीच वाचला होता... बहूतेक तसं लिहूनही ठेवलय तूमच्या ब्लोग वर..

In reply to by हर्षदा विनया

तो माझा भाचा आहे... सतीश गावडे मी शोधतो किनारा... A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for. मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.

साला, लै भारी कविता आहे! आपला, (वादळी व्यक्तिमत्वाचा) तात्या.

>>तो माझा भाचा आहे... सतीश गावडे मी शोधतो किनारा... फार गोड आहे मग.. आणि खरच शोधतोय काहीतरी असे वाटते.. आणि धन्यवाद विसोबा