Skip to main content

तू येता

लेखक चांदणशेला यांनी गुरुवार, 20/04/2017 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
तू येता फुलांत गंध रुतला पाना फुलांत रानवारा नाचू लागला कंपने उठली अधरांच्या देहावरी सुखाचा हिंदोळा झुलतो ह्रदयावरी अधीर रातीचा रंग परि हसला तवं पंथावर झाले डोळे चांदण्यांचे चरणी दरवळे आभास स्पर्शांचे हूरहूर बावरी जाई वेटाळूनी जीवाला ओंजळीत मी चांदणे घेऊनी तुझ्या रेशमी केसांत माळूनी झाडाच्या डोईवर खेळतो चांद आपुला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 990
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छान कल्पना आहेत एकेक!