तू येता फुलांत गंध रुतला
पाना फुलांत रानवारा नाचू लागला
कंपने उठली अधरांच्या देहावरी
सुखाचा हिंदोळा झुलतो ह्रदयावरी
अधीर रातीचा रंग परि हसला
तवं पंथावर झाले डोळे चांदण्यांचे
चरणी दरवळे आभास स्पर्शांचे
हूरहूर बावरी जाई वेटाळूनी जीवाला
ओंजळीत मी चांदणे घेऊनी
तुझ्या रेशमी केसांत माळूनी
झाडाच्या डोईवर खेळतो चांद आपुला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
990
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
+१ खरच छान आहेत.
धऩ्यवाद