ग़ज़ल - म्हटलेच होते
काव्यरस
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं.
म्हटलेच होते...
होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते
धीर देती ते जणु हरलो पुरा मी
मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते
एक मिटते वाट अन खुलतेही एक
प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते
वाटली होतीच भीती या क्षणाची
मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते
वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व
आसवांना मी प्रलय म्हटलेच होते
- अपूर्व ओक
२०-३-१७
वाचने
4639
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
सुरेख !!
आवडली
धीर देती ते जणु हरलो पुरा मी
मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते
//वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व
आसवांना मी प्रलय म्हटलेच होते // हे खूपच आवडली कविता.. खरे तर गजलच.
सगळ्यात शेवटी तुझं नाव येतं कवितेचा भाग बनून ती तुझी सवय ( का नाईलाज ;)) आवडेश ! गजल सुरेख !
In reply to सगळ्यात शेवटी तुझं नाव येतं by स्रुजा
धन्यवाद
तुझी सवय ( का नाईलाज ;)असं नाही काही. ग़ज़लेत शेवटच्या शेरात 'शायर का तखल्लुस' असण्याचं चलन म्हण, पद्धत म्हण, स्टाईल म्हण पूर्वीपासून आहे. अशा आणि प्रामुख्याने शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात. माझा आपला तसा प्रयत्न असतो इतकंच. :)
छान
आवडली गझल!
होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते
वाह!!!
वेगळीच आहे गजल.
आमचा नजराणा इथे आहे! ;)
-रंगा
शार्दुल, समाधान, निनाव, पैतै, फुत्कार, सत्यजित, पिरा, चतुरंगभाऊ धन्यवाद
गजल विचारपूर्वक पणे लिहिलेली सबब अपूर्व !
In reply to अपूर्व गझल .... by चौकटराजा
धन्यवाद चौ.रा.काका
सुरेख गझल ! राग येणार नसेल तर एक सुचवू? शक्यतो सुट घ्यायचा मोह टाळता येतो का पाहा. मीहि, प्रीति यात हि किंवा ति हे दीर्घ हवेत. फार काही फरक नाही पड़त पण गझलेचा निर्दोषपणा कमी होतो. आगावूपणाबद्दल क्षमस्व _/!\_
In reply to सुरेख गझल ! राग येणार नसेल by विशाल कुलकर्णी
बरोबर आहे. पुढील वेळी नक्की हे टाळण्याचा प्रयत्न करतो.
मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होतेअभय सोडून काहीही व्हा वेल्लाकाका.
In reply to मी मनाला 'हो अभय' म्हटलेच by सूड
अगदी अगदी :P
In reply to मी मनाला 'हो अभय' म्हटलेच by सूड
हाहाहा. नाही रे बाबा.
सुरेख !!